हॉस्टेलच्या दिशेने प्रोफेसर गोडे खुद्द चालून येत आहेत हे पाहून विष्णूच्या विचाराना अगदी वेगळीच कलाटणी मिळाली. नक्कीच काहीतरी विचित्र घडल आहे कारण आजवर कुठल्याहि स्टाफने अथवा टीचरने हॉस्टेलच्या दिशेने आपले साधे पाउल सुद्धा वळवले नव्हते. आणि आज असे अचानक कोणीतरी इकडे येतय..
आणि ते पण विद्यालयाचे अगदी नामंवत प्राध्यापक गोडे गुरुजी. याच्या मागे काही न काहीतरी रहस्य दडल आहे. आणि कुठल्या साधारण मुलाच्या बेपत्ता होण्यामागे वार्डन सोडून एवढ्या मोठ्या प्राध्यापकाला इकडे येण्याची काय एवढी गरज भासली... ते पाहून विष्णू धावतच आपल्या खोलीतून बाहेर पडला... बाहेर च्या पेसेजमध्ये प्रशांतच्या
खोलीबाहेरच सर्वच्या सर्व मुल घोळका करून त्या भयंकर वेदनादायी चीत्काराचे निष्कर्ष लावत होते. दोघे तिघे जन हातामध्ये कंदील घेऊन उभे होते बऱ्याच मुलांचा घोळका जमा झाला होता. त्यात कंदिलाच्या प्रकाशामध्ये प्रत्येक दुसऱ्या मुलाचा चेहरा अगदी घाबरून थरथरून गेलेला दिसून येत होता.
त्यांच्यामध्येच मोहनदेखील उभा होता... " काय रे काय झाल असेल ? कसला आवाज होता तो ? " त्या गर्दीमध्ये मुलांची कुजबुज चालू होती. जो तो फक्त एकाच गोष्टीवर अडून होता. तो आवाज कसला होता ? आणि कुणाचा होता ? संपूर्ण हॉस्टेलमध्ये एक भयमय वातावरण निर्माण झाल होत..
" मित्रानो... ? माझ ऐका ?? " त्या घोळक्याच्या बाहेरून एका कुणाचातरी आवाज आला. तो विष्णू होता. सर्वाना काहीतरी सांगण्यासाठी धडपडत तो आपल्या खोलीतून बाहेर आला होता. आजूबाजूच्या गर्दीतून मुलामधून वाट काढत तो येऊन अगदी सर्वांच्या मधोमध उभा राहिला. विष्णूला काही बोलायचं होत..
त्याच्या कडच्या वार्ता ऐकण्यासाठी सर्वजण सज्ज झाले होते. आणि विष्णूने तेव्हा बोलायला सुरुवात केली... " मित्रानो खाली दोन माणसे आली आहेत... आणि त्यांच्या पैकी एकाचा चेहरा पाहून मला काहीतरी वेगळीच आशंका येतेय. कारण आजवर तो व्यक्ती इथे कधीही पाउल ठेवण्यासाठी आला नव्हता.."
त्यातच मुलांची परत कुजबुज सुरु झाली.." हा असा काय बोलतोय ? काय प्राचार्य तर नाही आले न? " प्राचार्यच नाव काढताच आता प्रत्येकाला धडकी भरून आली... पण वेळेतच विष्णूने त्यांना सावरले व पुढचा खुलासा केला... " नाही ... नाही माझ ऐका..सगळे शांत व्हा ; आजवर कुणीही स्टाफ इथपर्यंत आला नव्हता आणि आज खुद्द
आपले प्रोफेसर गोडे इथे आले आहेत. मी ... मी स्वतः त्यांना इथे येताना पाहिलं आहे... " विष्णूने आपले वाक्य संपवले... " ए बाबा... खर बोलतो आहेस न तू हे ? " त्याच्या जवळ उभा मोहन उद्गारला... " होय मी खरच बोलतो आहे. गोडे सर इकडेच येताहेत. आणि त्याचं इकडे आपल्या हॉस्टेलवर येणे म्हणजे काही साधी सुधी गोष्ट नक्कीच नाहीये..."
आता आपण काय करायला पाहिजे ? त्यांच्या पैकीच एकाने विचारले... " मला वाटत आपण आपल्या रूममध्ये जाऊन वाट बघायला हवी सर जेव्हा येतील तेव्हा आपली आणि त्यांची भेट होईलच.. " विष्णू ,म्हटला.. " हो विष्णू ते सगळ ठीक आहे तर, आपला वार्डन का नाहीये त्यांच्या सोबत ? काय झाल असेल ? आणि प्रशांतची पण काही बातमी नाहीये.."
मोहन म्हणाला त्याला दुजोरा देत बाकीचे मुले बोलू लागली.. " होय ते पण आहे. प्रशांतच काय झाल असेल ?" तेव्हा विष्णूने सर्वाना शांत राहण्यास सांगितले... त्या सर्वांच्या नजरेआड विलक्षण गोष्ट घडली होती परंतु त्याची चाहूल, अनुभूती ती मात्र सर्वाना लागली होती. पण त्या मागे कसला अपघात , घात कि इतर काही आहे... याचा कुणालाच पत्ता नव्हता..
एक एक करून विष्णूच्या सांगण्यावरून सर्व मुलांनी आपापल्या खोल्या गाठल्या एवढे सर्वजण बाहेर पाहून प्रोफेसर गोडे कदाचित त्या सर्वांवर रागावतील दाब देतील या धाकाने मुले आतमध्ये आपल्या खोल्यामध्ये शिरले... जो तो आता दरवाजा लावून पलीकडे शांत बसून राहिला होता. केव्हा प्रोफेसर
गोडे येतील आणि त्यांच्याशी मुलांची नजरा नजर होईल अस झाल होत. सर्व मुले अगदी शांत होती. संपूर्ण हॉस्टेलमध्ये एक मृत शांतता पसरली होती. एखादी टाचणी जरी पडली तर तिचा सुद्धा टन टन आवाज एखाद्या पोलादा प्रमाणे ठ्न्न ठ्न्न असा येईल. तश्यातच प्रोफेसर गोडेचं आगमन झाल हॉस्टेलच्या दारवर येऊन त्यांनी थाप मारली तसा हॉस्टेलचा दरवाजा " क्र्रर्र्र.... " असा आवाज करीत उघडला..
त्या आवाजाची तीव्रता संपूर्ण शांततेला चिरत आरपार झाली. प्रोफेसर गोडेनी आपली बंद केलेली छत्री एका हातात व सोबत जळता कंदील घेतला... व दरवाज्यातून प्रवेश करत आतमध्ये आले... " एवढी शांतता कशी ? वार्डन नसताना देखील हे मुले अशी शांत राहतात ? " प्रोफेसर गोडेच्या मागेच आता भीतीमधून सावरलेला तो गार्ड उभा होता.
गोडे गुरुजींनी त्याच्या कडे वळून पाहिले व आपल्या मानेनेच दरवाजा बंद करण्याचा इशारा केला. तसा गार्डने देखील होकार देत तो दरवाजा बंद केला... " त्या मुलाची , प्रशांतची खोली हवीय आपल्याला. तोच नाहीसा झालाय ना ? " गोडे गुरुजीनी त्याला विचारले तसे फक्त मान हलवून त्याने होकार दिला...
गोडे गुरुजी पायऱ्या चढून मुलांच्या खोल्यांच्या दिशेने जाऊ लागले. हॉस्टेलवरून मुलगा नाहीसा झाला आहे म्हणजे प्रत्येकजनाला ठाऊक असेलच त्याची खोली कुठली आहे. प्रोफेसर चालत वरती पोहोचले. गार्ड खालीच दरवाज्यापाशी उभा राहिला... पायऱ्या चढून वरती येतानाचा आवाज विष्णू आणि मोहन दोघांनीही ऐकला होता.
त्याचाच अर्थ बाकीच्या मुलांनी देखील गोडे गुरुजीना वरती येताना ऐकल होत. वरती पोहोचल्यावर गोडे प्राध्यापकानी पहिल्याच खोलीच्या दारावर ठोठावले... आणि पायरीजवळची ती पहिली खोली होती ती म्हणजे मोहन आणि विष्णू दोघांची... आपल्या दारावर थाप पडली हे पाहून. विष्णू महेश दोघेही चपापले...
दोघांच्याहि मनात धडकी भरली. ना ना तऱ्हेचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले... " प्रशांत नाहीसा झाला याला कारणी भूत म्हणून आम्हाला तर नाहीत पकडणार ? पण आम्ही तर अस काही केल नाही... " दोघेहि विचारात होते तेव्हा बाहेरून एक उबदार आणि सौम्य असा आवाज आला... " बाळानो बाहेर या... मी आहे प्राध्यापक गोडे... "
तो आवाज अगदी मार्मिक होता. ना कसला धाक , न दाब न कसला कणखरपणा होता त्या आवाजामध्ये. अगदी विश्वास निर्माण करेल असाच तो आवाज होता. प्रोफेसर काही क्षण दाराबाहेर थांबले... पुढच्याक्षणीच तो दरवाजा उघडला. आतमधून दोन तरूण बाहेर आले. सडपातळ अंगात साधे कपडे.
एकाचा चेहरा अगदी तळहातप्रमाणे समान. दुसरा दिसायला मध्यम होता गोल चेहऱ्याचा आणि नाकावर जुनाट भिंगाचा चष्मा चढवलेला. तो मोहन होता. आणि दुसरा सडपातळ आणि उंच मानेचा तो विष्णू होता. दोघेहि बाहेर आले व त्यांनी समोर प्रोफेसर गोडे दोघांना उभ असलेल पाहिलं... " सर ? आपण इथे ? "
मोहन उद्गारला... विष्णू त्यांच्याकडे जणू एखाद्या प्रश्नावलेल्या चेहऱ्याने पाहत होता. एखाद्या उत्तराची वाट पाहत. " तुम्ही दोघ इथे कोणत्या प्रशांतला ओळखता का ? " प्रोफेसर गोडेनी विचारले तसे दोघेहि मोहन आणि विष्णू एकमेकांकडे पाहू लागले... " ओळखता का कोणत्या मुलाला तुम्ही दोघ ? ज्याच नाव प्रशांत आहे जो ; " प्रोफेसर गोडे बोलत होतेच कि तोच
" जो संध्याकाळी पासून नाहीसा झाला आहे. आणि ज्याला शोधण्यासाठी पानसे वार्डन गेले होते जे अजून हि परतले नाहीयेत... " प्रोफेसर गोडे विष्णूचे हे उद्गार त्याची हि हुशारजबाबी ऐकून थक्कच झाले. एक अनामिक देवाणघेवाण झाली जणू त्या दोघांच्या हि विचारांची... " म्हणजे माहिती आहे तुम्हाला ते? "
प्रोफेसर गोडे विष्णूकडे पाहत म्हणाले... "होय सर, शेवटची भेट त्याची आणि आमची क्लासच्या बाहेर झाली होती. जिथून तो लायब्ररीमध्ये त्या ग्रंथालयाकडे जात होता." प्रोफेसर गोडेना विष्णूच्या अश्या हजरजबाबीने अगदी थक्क करून सोडले होते. प्रोफेसर गोडे त्याच्या हुशारीस पाहून डोळ्यात चमक आणून त्याला पाहत होते.
एक वेगळीच आशा त्यांना विष्णूच्या डोळ्यांमध्ये दिसून येत होती... " त्याची खोली कुठे आहे ? " प्रोफेसर गोडे म्हणाले. तसे विष्णू आणि मोहन दोघांनी त्यांना प्रशांतची खोली दाखवली. खोलीमध्ये कोणीही नव्हते. बस टेबलावर काही एक डायरी चिठ्ठया आणि पेपरातील कात्रणे दिसून येत होती... तसे गोडे गुरुजी कंदील उचलून आतमध्ये गेले व त्यांनी त्याच्या टेबलावर ठेवलेल्या त्या डायरी पुस्तके
व काही कात्रणे पाहिली... " oh माय god हे सर्व याला कस माहिती आहे ? " प्राध्यापक ती सर्व कात्रणे हातात घेऊन पाहत उद्गारले. एक एक करून ते सर्व कात्रणे पाहत जात होते तसे प्रोफेसरच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि एखादे गुपित उघडेच पडले आहे जणू असे भाव उमटत असलेले दिसत होते.
बाहेर उभा विष्णू त्यांच्या सोबतच आतमध्ये आला... " हि कात्रणे...? हि कात्रणे कसली ? " गोडे गुरुजीनी विष्णूला पाहून विचारले.. " तो अगदी विचित्रच होता सर. आपल्या कॉलेजच्या संग्रहालयात जर एखादी नवीन काही गोष्ट आली तर तो वेड्या सारखा त्या गोष्टीच्या मागे त्याचा इतिहास बघ शोध घे असे काहीहि करायचा एक त्याचा छंदच होता तो... "
" काल परवा जेव्हा तो आम्हाला भेटला होता. तेव्हा देखील असच काहीस बरळत होता कि. आपल्या कॉलेजमध्ये कसलीतरी नवीन गोष्ट आलीय... कदाचित हीच ती गोष्ट असेल " विष्णू टेबलावर पडलेल्या कात्रणाकडे पाहत राहिला... आणि असे दाखवू लागला जसा त्याला त्यामधली एक हि गोष्ट समजली नाहीये.
विष्णूने प्रशांतची खोली नजर फिरवून पाहिली तशी त्याला प्रशांतच्या बेडवरती एक डायरी दिसून आली. प्रोफेसर गोडे त्या टेबलावरती असलेले कात्रण नोट्स पाहत होते तो पर्यंत विष्णूने हाताने ती डायरी हळूच बेडशीट खाली सरकवली... " प्रशांत ठीक तर आहे ना काही धोका तर नाहीये ना ? "
" आं ? काय ? " प्रोफेसर गोडे आपल्या विचारातून जागे झाले त्यांनी विष्णूकडे वळून पाहिले " धोका ? " काही क्षण स्वतःच विचार करत गोडे गुरुजी पुटपुटले.. " आता पर्यंत तर नव्हता. आता आहे... " ते विष्णूच्या कानी पडले... " काय सर ? " " नाही काही नाही... सर्व मुले तुम्ही वार्डन नसताना एवढी शांत कशी काय ? "
गोडे गुरुजींनी सहज विचारले... " अं आम्ही वेळेवर झोपतो सर्व, आज हि वेळेवरच झोपलो होतो पण; " विष्णू बोलता बोलता थांबला.... " पण प्रशांतच्या गायब होण्यामुळे झोप नाहीये ? " दोघेही विष्णू आणि गोडे गुरुजी प्रशांतच्या खोली बाहेर पडले. त्यातच प्रोफेसर पुटपुटले... " याचा अर्थ ती किंकाळी इथे पर्यंत आली नव्हती. मुलांना हि गोष्ट माहिती नाही हेच बर आहे... "
प्रोफेसर गोडे मुलाच्या खोल्या बाहेर उभे होते तेव्हा सर्वच्या सर्व दरवाजे बंद होते. बाहेर मोहन आणि विष्णू दोघेही गोडे गुरुजीशेजारी उभे होते. तोच विष्णू प्रोफेसर गोडेच्या पुटपुटलेल्या उद्गारांना तसेच एक प्रत्युत्तर देत विष्णू म्हटला... " ऐकू आला सर, तो भयंकर जीवघेना चित्कार इथपर्यंत ऐकू आला..."
ते ऐकून मात्र प्रोफेसर गोडेच्या पापण्या भुवया अगदी काटेकोर उडाल्या. गर्रकन मागे वळून त्यांनी विष्णूकडे पाहिले... एक आश्चर्याचा धक्का त्यांच्या अंगात लहरी दौडून गेला..." प्रशांत कुठे आहे सर ? काय झाल आहे त्याला ? " विष्णूने कणखरपणे पुढे येऊन प्रोफेसर गोडेना विचारणा केली....
" तो आवाज इथेपर्यंत ऐकू आला ? याचा अर्थ हॉस्टेलच्या सर्वांनी तो ऐकला असणार आहे.... " प्रोफेसर गोडे म्हणाले... " सर तुम्ही आम्हाला सांगाल का ? प्रशांत कुठे आहे ? आणि वार्डन कुठे आहेत ? " प्रोफेसर गोडेनी यावेळी डोळे वटारत विष्णुकडे पाहिले...कदाचित विष्णू त्याच्या स्थानापेक्षा जास्त विचारपूस करत होता...
अचानक बदललेली त्यांची मुद्रा पाहून विष्णूने आपले प्रश्न, आपले शब्द माघारी घेतले...
व गपचूप मान खाली घालून उभा राहिला... " उद्या सकाळी जो काय आहे तो सोक्ष मोक्ष लागेल. बाहेर धोका आहे. रात्रीच कोणीही बाहेर पडू नका.. उद्या कळेल काय ते ? " एवढ बोलून प्रोफेसर तिथून चालते झाले विष्णूने जाता जाता त्यांच्या हातातील कात्रणे पाहण्याचा प्रयत्न केला पण अंधारात त्यांनी
केव्हा आपली पावले झटपट टाकली व पायऱ्या उतरून खाली पोहोचले समजलेच नाही. " मुलांवर लक्ष ठेव... कोणीही रात्रीचा बाहेर पडता कामा नये.. उद्या पासून तू इथेच राहायचं... " गार्डला बजावून सांगत त्याला हॉस्टेलवर मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवले. बघता बघता रात्र उलटून जात होती चार वाजत आले होते..
सर्वत्र चिखल जमला होता प्रोफेसर गोडे कॉलेजच्या आवारात आले.. जाता जाता त्यांनी एकवेळ मागे वळून पाहणे गरजेचे समजले व मागे पाहता त्यांची नजर हॉस्टेलच्या खोल्यावरती फिरली.. तिथे एका खोलीच्या खिडकी मध्ये उभा तो मुलगा अर्थात विष्णू प्रोफेसर गोडेना एकटक पाहत होता...हातात बंद केलेली छत्री व एका हाती कंदील घेऊन प्रोफेसर गोडे तिथे उभे त्याला पाहत राहिले...
विष्णूने काही क्षणात आपळी खिडकी बंद करून घेतली आणि माघारी वळताच त्याने प्रशांतच्या खोलीकडे धाव घेतली. व त्याची डायरी बाहेर काढली जी त्याने तिथे असताना बेडशीटखाली सरकवली होती. आतमध्ये आपल्या खोलीत प्रत्येकजन दबा धरून बसलेले प्रोफेसर जाताच सर्व बाहेर विष्णूच्या खोलीच्या दिशेने येऊ लागले. सर्वाना तेव्हा विष्णू बाहेरच उभा असलेला दिसून आला...
त्यांना बाहेर पडलेले पाहून " श्श्श्श... खाली गोडे गुरुजीनी गार्ड आणून ठेवला आहे. आपण सर्व सकाळी बोलूयात. जा झोपा आता... " एवढे बोलून झाल्यावर विष्णूहि आपल्या खोलीमध्ये परतला. यावेळी त्याने आपल्या हातामध्ये एक डायरी आणली होती ती डायरी प्रशांतची होती. आपल्या दोन्ही बेडच्या मधोमध कंदील पेटवून विष्णू खाली बसला...व सोबत मोहन देखील..
प्रशांत कुठल्या नवीन गोष्टीवर शोध करत होता ? ती काय गोष्ट होती? याची माहिती त्या दोघांनाहि याच डायरीमध्ये मिळणार होती. विष्णूने कंदिलाच्या प्रकाशामध्ये ती वही खोलली. त्या मध्ये विष्णूला काही नोट्स आणि आणखीन एक दोन कात्रणे दिसून आली यावेळी ती कात्रणे एका वेगळ्याच मंदिराची दिसत होती.
त्याखालील दोन चार ओळीत लिहिलेली बातमी विष्णूने पहिल्यांदा वाचायला सुरुवात केली. " अनुबिसच श्रापित मन्दिर म्हणून प्रचलित असलेल्या या ऐतिहासिक वास्तुचा एका दुर्मिळ जंगलात असण्याचा दावा इतिहासकारांनी केला आहे. अस मानल जात कि आज पर्यंत त्या मंदिराच्या शोधात गेलेले बरेच इतिहासकार व शोधकर्ते त्याच अभयारण्यामध्ये नाहीसे झाले असल्याची वार्ता समजली जाते.
तब्बल वीस वर्षापूर्वी फक्त एकच असा शोधकर्ता इतिहासकार होता ज्याने हे मंदिर आपल्या डोळ्यांनी पाहिले असल्याची तो कबुली देतो. व त्याच नाव' प्रमोद एकावडे'. त्यांच्या माध्यमातून आम्हाला भेटलेले त्या मंदिराचे एक दुर्मिळ छायाचित्र..."
"काय आहे म्हणायचं हे ? " मोहनने विचारले... आपल्या हातात ती कात्रणे घेऊन त्यांना चाळत प्रशांतने लिहिलेल्या नोट्स वाचत विष्णूचा चेहरा गोंधळून गेल्यासारखा दिसत होता. त्यावरच त्याने जेव्हा त्या मंदिराच्या फोटोखाली दिलेलं नाव त्या बातमी मध्ये असलेल नाव वाचताच विष्णूला काहीसा सुगावा लागला..
आपण काही मोठे गुप्तहेर नाही किंवा कोणी हुशार तर्कशास्त्र लढवणारे विद्वान नाही हे तो चांगलेच जाणून होता. परंतु अचानक आपल्या मित्राच्या गायब होण्यामागे काय कारण असू शकेल ? याची त्याला उत्सुकता तशीच चिंता लागून राहिली होती. " हे नाव? प्रमोद एकावडे कुठेतरी ऐकल्यासारख वाटत आहे... "
विष्णू विचारात गुंग उद्गारला.... " अरे आपल्या प्राचार्यच आडनाव तर एकावडेच आहेना आणि ते देखील एक इतिहासकार च होते त्यांच्या तरुणपणी. त्याचं नावाच इनिशील पण तर हेच आहे न पी . एकावडे म्हणजे " मोहन बोलता बोलता थांबला व त्याने विष्णूकडे पाहिले. दोघांनाहि त्या
नावाचा खुलासा जाणवला.." पी. एकावडे म्हणजेच प्रमोद एकावडे... म्हणजेच आपले प्राचार्य.. याचा अर्थ वीस वर्षाखाली जो व्यक्ती या कुठल्या श्रापित मंदिराच्या शोधात जाऊन एकटा जिवंत परतला म्हणजे तो दुसरा तिसरा कोणी नसून आपले खुद्द प्राचार्यच आहेत... " विष्णू उद्गारला... "होय
विष्णू अगदी बरोबर बोललास... "" मला तर वाटतय प्रशांतच्या गायब होण्या मागे खूप वेगळीच आणि मोठी गोष्ट दडली आहे. आपण याचा शोध घ्यायला हवा आहे. आता जे काही आहे ते उद्या सकाळी कळेलच मला वाटतय... " विष्णू म्हणाला... " अजून काही आहे का यामध्ये ? आपल्या प्रशांतच्या नोट्स मध्ये काही दिसतय का ? "
मोहन म्हणाला तसा विष्णूने परत एकदा त्याची नोट्सची ती वही झाडली. पण त्यातून काही बाहेर पडले नाही अथवा वेगळ अस काही मिळाले नाही. काही भेटत नाहीये हे पाहून विष्णूने ती वही हातातून खाली फेकून दिली " नाहीये या मध्ये अजून काही मला सापडत नाहीये मोहन...आपण उद्या
कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जाउयात... "मोहन आणि विष्णूने ती नोंदवही तशीच खाली फेकली होती तिचे काही पाने कंदिलाच्या प्रकाशात उघडे पडले होते वाऱ्यांच्या मंद झुळुका खिडकीमधून आतमध्ये येत होत्या त्यामुळे सररर सररर करत त्या वहीतील पाने बंद व्हायला येऊ लागली...असे करत ती
सर्व पाने एकमेकावर लादली जात होती.शेवटी पाठपृष्ठवर येऊन ती सर्व थांबली अर्थात त्या वहीच सर्वात शेवटचा पुठ्ठा. तो पुठ्ठा वजनाने जड असल्या कारणाने हवेने हलणे मुश्कील दिसत होते. त्याच पुठ्ठ्यावरती प्रशांतने कदाचित आणखीन काहीतरी चिकटवले होते.एखाद्या पुस्तकातील फाटलेले
पान दिसत होते ते. जे प्रशांतने कदाचित लायब्ररीमधल्याच पुस्तकातून फाडून
आपल्या वहीमध्ये चिकटवले होते. त्यावरती अगदी विचित्र आकृती दिसत होती कसले तरी चिन्ह होते ते जणू एखादय राक्षसाचे खुले मुखच होते ते भयंकर डोळे व त्याच्या माथ्यावर आखूड दोन शिंगे... मात्र ते पाहण्याआधीच विष्णू व महेश दोघेही निजून गेले होते. आणि ती वही जशीच्या तशी
उघडी राहिली होती.
बघता बघता संपूर्ण रात्र उलटून गेली. हॉस्टेलच्या बाहेर मुलांचा सकाळचा कल्ला सुरु झाला घाईगडबडित उठून आवरून सर्वजन कॉलेजच्या दिशेनी निघाले होते. " अरे बापरे उशीर झालाय वाटत... " डोळे चोळतच विष्णू उठला... खिडकीतून बाहेर पाहिले तसे सकाळच्या धुक्यानी नेहमीप्रमाणे सूर्याचा
गोळा अगदी झाकून टाकला होता..
थंडी तेवढ्याच प्रमाणात वाढलेली होती. रात्री पडून गेलेल्या पावसामुळे बाहेर चिखलाचा बरबटा झाला होता. आपल्या जागचा उठून विष्णूने महेशला उठवले.. " महेश उठ लवकर. कॉलेजला जायचं आहे उशीर झालाय... आज कळेल कॉलेजमध्ये काय चालू आहे... चल चल उठ... " तसा महेशहि त्याच ऐकून उठला...
" अरे हो कि...! चल लवकर आवरून घेऊ.. " दोघांनीही आपल्या अंघोळी न्याहारी उरकली. विष्णू रूममध्ये परतला पटापट त्याने आपली रजिस्टर पुस्तके उचलली आणि बँगमध्ये भरायला सुरुवात केली. रात्रीची ती प्रशांतची वही कंदिलाजवळ तशीच उघडी पडलेली होती. विष्णूने घाई गडबडमध्ये तिला
न पाहताच
आपली अभ्यासाची वही समजून उचलली व तशीच बँगेत कोंबली... दोघेहि बाहेर पडले तेव्हा बाहेर बरेच मुले आवरून निघण्यासाठी तयार उभे होते. पण रात्री घडलेली ती घटना तो आवाज त्या नंतर प्रत्येकाच्या मनात एक अनामिक भीती बसली होती. कॉलेजची जागा देखील अगदी विचित्र ठिकाणी
होती.
चहूबाजूनी वेढलेले जंगल. एकाच दिशेने बाहेर येण्याजाण्यासाठी वाट होती ती देखील दूर शहराच्या दिशेने जायची... रात्रभर त्या भयंकर चीत्काराने सर्वजन आपल्या भीतीशी लढत कसेबसे झोपले होते. " चला...! कॉलेजला चला... जे काही आहे ते तिथे जाऊन कळेलच... " विष्णूच्या मागोमाग सर्व
मुले
हॉस्टेलमधून बाहेर पडली. त्यांच्या पैकी काही आधीच कॉलेजवरती जाऊन पोहोचली होती. कॉलेजच्या गेटवरतीच मुलांना पोलिसांची गाडी दिसली व त्या सोबतच एन्बूलेंस देखील. लायब्ररीच्या बाहेरच रुग्णवाहिकेचे काही लोक स्ट्रेचर घेऊन उभे होते. ग्रंथालयाचा दरवाजा बंद होता. तिथेच एक दोन
शिक्षके आणि प्रोफेसर गोडे उभे होते.
काही क्षणानंतर ग्रंथालयाचा दरवाजा उघडला गेला व आतमधून एक इन्स्पेक्टर बाहेर आला व त्याच्या सोबतच एक लुकडासा हवालदार. " इंटरेस्टिंग.... ! " तो इन्स्पेक्टर बाहेर आल्यावरच उद्गारला... " ते आतमध्ये बॉडीज आहेत कि हाडांचे तुकडे ते जे काही आहे ते गोळा करून घ्या.... आणि
एन्बूलेंस मध्ये टाका.. "
तिथे उभे विष्णू आणि मोहन त्यांच्या सोबतच बाकीचे मुल त्यांनी देखील हे ऐकले... " अरे बाप रे..! काय झाल असेल आतमध्ये ? " जो तो कुजबुजू लागला... मोहन तर चकित होऊनच विष्णूकडे पाहत दबक्या आवाजात म्हणाला.. " विष्णू ऐकलस ? हाडामांसाचे तुकडे म्हणतायत हे ! "
विष्णू देखील ते ऐकून थक्क झाला होता... " आणि त्या मुलाचा काही पत्ता लागला ? " प्रोफेसर गोडे उद्गारले. " नाही आम्हाला आतमध्ये फक्त या दोनच बॉडीची अवशेष सापडले आहेत. बाकी त्या मुलाच अजून काही सापडायला नाही हा बस आतमध्ये काही पुस्तके उघडी पडलेली आहेत बस
त्यांना कुणाला हात लावू देऊ नका ते
पुराव्यासाठी आहेत. " बोलता बोलता अचानक तो इन्स्पेक्टर थांबला व त्याने प्रोफेसर गोडेना पाहून जमलेल्या मुलांकडे इशारा केला गोडे गुरुजींनी तसे मागे वळून पाहिले " का थांबला आहात इथे ? चला क्लास मध्ये चला पटकन... " गोडे गुरुजींनी त्यांना दाब टाकला तसे सगळे मुले तिथून
आपल्या क्लासच्या दिशेने निघाले... " मोहन तू ऐकलस ते ? इन्स्पेक्टर म्हणत होते आतमध्ये काही पुस्तके उघडी पडली आहेत... "
" हो ऐकल पण त्याच काय ? " मोहन म्हणाला... "अरे त्याच काय ? अस काय बोलतोय नक्कीच ती पुस्तके प्रशांतने काहीतरी शोधण्यासाठी उघडली असणार आहेत. जे आपल्याला त्याच्या त्या नोंदवही मध्ये भेटले नाही ते आपल्याला तिथे नक्कीच भेटेल. नेमक काय अस रहस्य आले आहे
आपल्या या विद्यालयात कुठली अशी गूढ गोष्ट आहे. जी च्या आगमनाने हे सर्व विपरीत घडत आहे. त्या दिवशी आपण प्रशांत सोबत लायब्ररी मध्ये जायला हव होत.
एकतर आपण नाहीसे झालो असतो नाहीतरी समजले तरी असते काय आहे नवीन आलेली गोष्ट.." त्यावर मोहन त्याची खिल्ली उडवत म्हणाला.. " हा म्हणजे आपण पण त्या स्ट्रेचर वरती असतो आता.. चल निघायला हव.. " दोघेही तिथून निघाले तेव्हा घाई गडबडीत जाता जाता अचानक
कोणाला तरी ते धडकले...
" ए सांभाळून चालता येत नाही का रे ? " तो आवाज अगदी उग्र रानटी होता. समोर हाताची मुठ गच्च आवळत दात खात त्या दोघांना शिंदे मास्तर वटारून बघत होता. जणू काही आता आपला जबडा उघडेल आणि त्यांना गिळूनच टाकेल... " अहं...! " तोच शिंदे च्या मागून कोणाचा तरी
खेकसण्याचा आवाज आला...
तिथे उभा मुलांच्या पावलांनी जागीच थांबा घेतला सर्वजणांच्या चेहऱ्यावर एक कुतूहल दिसून येत होते. शिंदे प्रोफेसरने गर्रकन मागेवळून पाहिले तेव्हा मात्र त्याची बोबडीच वळली... " माफ करा सर...! " एवढच बोलून त्याने त्या इसमाला जायला वाट दिली...तो गृहस्थ दुसरा तिसरा कोणी नसून
खुद्द प्राचार्य एकावडे होते.
विष्णू व मोहन सोबत इतर मुले देखील त्याचं पहिल्यांदाच दर्शन घडल्यासारख जणू एखादा देवच दिसला असे पाहू लागले... " ग्गगुड मोर्निग सर.... " विष्णू उद्गारला तसे प्राचार्य त्याच्याकडे पाहत एका ठिकाणी थांबले विष्णूच्या मागोमागच इतर मुलांनी प्राचार्यना गुड मोर्निंग विश केले... आपल्या हातातली ती
छबीदार काठी टेकवत प्राचार्य ग्रंथालयाच्या दिशेने निघू लागले... " नमस्कार सर..! मी इन्स्पेक्टर कदम..! या एरियाचा इन्चार्ज हे हवालदार सुकडे व हे इथले फॉरेस्ट ऑफिसर सावंत. " आपल्या दमदार आवाजामध्ये प्राचार्यांनी त्यांना नमस्कार घातला... " जे काही झाल आहे त्याची आम्हाला
काहीएक कल्पना नव्हती.. हे कस झाल ? कुणी केल? याचा पत्ता तर तुम्हीच लावू शकता.. " प्राचार्य आपल्या वृद्ध आवाजात उद्गारले...
" होय सर..! आम्ही याची कसून तपासणी करू जो कोणी आहे तो आमच्या तावडीतून सुटणार नाही. पण सर हे... " बोलता बोलता इन्स्पेक्टर कदम थांबले... " पण ? पण काय ? " प्राचार्यांनी विचारले... " हे काम कुण्या साधारण माणसाने केला आहे अस वाटतच नाही. आम्ही तीच शहानिशा
करण्यासाठी. फॉरेस्ट ऑफिसर सावंत यांना बोलावून घेतल आहे... त्यांना शिकारी प्राण्याच्या हल्ल्यामुळे
मेलेल्या लोकांची तपासणी येते... " इन्स्पेक्टर कदम बोलता बोलता थांबले... " होय सर...मी याची तपासणी केली पण माझ्या आजवरच्या करियर मध्ये मला कधीच असा एखाद्या प्राण्याने हल्ला केलेला दिसून आला नाही हे काहीतरी वेगळच आहे... " प्राचार्यांनी प्रोफेसर गोडेकडे पाहिले...
" हम्म...! "
" मला वाटत सर तुम्ही काही दिवसासाठी कॉलेज बंद ठेवाव.. जो पर्यंत याच्या मागे कोण आहे हे कळत नाही तो पर्यंत मुलांनी इकडे फिरकू नये अस मला वाटत. बाकी तुमचा निर्णय..." त्यावर प्राचार्य म्हणाले... " त्याची काळजी आम्ही घेऊ कोणी इकडे फिरकणार नाही... ग्रंथालय बंदच राहील.."
प्राचार्यांनी पोलिसांना आश्वासन दिले. त्यावेळी स्ट्रेचरवरती आतमधून दुसऱ्या बॉडीचे अवशेष बाहेर काढण्यात आले. त्या स्ट्रेचरवरती एक पांढरा कपडा झाकलेला होता हळू हळू त्या कपड्यावर आतमधल्या मांसाचे रक्ताचे डाग उमटून येऊ लागले होते.. " घेऊन जा हे लवकर इथून..." गोडे गुरुजी
ते पाहताच म्हणाले..
" भयंकर आहे हे तर..! आम्ही करू काहीतरी यावरती निर्णय घेऊ मुलांची सुरक्षा महत्वाची आहे..." प्राचार्य एकावडे म्हणाले... " साहेब आतमध्ये या लवकर... " आतमधून एका तपासणी करणाऱ्या फोरेन्सिकच्या माणसाचा आवाज आला.. तोच पोलीस इन्स्पेक्टर कदम हवालदार सुकडे व बाकी सर्व
आतमध्ये दरवाजा उघडून गेले..
तसे त्यांना समोरच त्या तपासणी करणाऱ्या माणसाच्या हाताकडे लक्ष गेले त्याचं ग्लोव्ज वरती काहीतरी हिरवट असा द्रवपदार्थ लागला होता. त्याचे काही थेंब इकडे तिकडे पडलेले होते रक्तामध्ये मिसळून काळसर असा त्या द्रवाचा रंग झाला होता. सर्वात शेवटी प्राचार्य एकावडे तिथे पोहोचले
त्यांनी दुरूनच दरवाजामधून तो पदार्थ पाहिला...
ते पाहताच क्षणी प्राचार्य एकावडे मात्र जागीच थक्क झाले... त्याच वेळी तिरक्या नजरेने पोलीस इन्स्पेक्टर कदमने त्यांच्याकडे पाहिले..." काय झाल सर ? तुम्हाला माहिती आहे का याच्या बद्दल काही ? " सुकडे हवालदार देखील पोलीस कदम जवळ येऊन उभा राहिला... आणि आपल्या काठीवर
दोन्ही हात टेकवून प्राचार्यचे निरीक्षण करू लागला.." नाहि... मला याच्या बद्दल काही माहिती नाहीये...त्या मुलाचा काही तपास लागला ? " प्राचार्यांनी पाहता पाहता विषय बदलला होता. त्यांच्या अश्या वागण्याने पोलीस कदमना तेव्हा संशयाची सुई टोचली... " नाही अजून तरी नाही आम्हाला
काही भेटले त्याच्याबद्दल...आमचा तपास चालू आहे. " " लवकरात लवकर कळवा कृपया.. निघतो मी.." एवढच बोलून प्राचार्यांनी तिथून आपला काढता पाय घेतला आणि आपल्या केबिनच्या दिशेने निघाले.." चला सर आम्ही पण निघतो. आमचा एक हवालदार रात्री पहाऱ्यासाठी आम्ही इथे पाठवतो...काळजी नका करू निश्चिंत रहा.. " पोलीस
इन्स्पेक्टर कदम आणि सुकडे हवालदार तिथून निघाले व कॉलेजच्या गेट पासून बाहेर आले.दोघेही बाहेर पडताच इन्स्पेक्टर कदमने एकवेळ मागे वळून पाहिले. त्या लायब्ररीजवळ प्रोफेसर गोडे त्यांना निरोप देण्यासाठी उभे होते. पोलीस इन्स्पेक्टर कदमने त्यांना हसून हात दाखवला... तिकडून गोडे
गुरुजींनी हि त्यांना हात दाखवला व चालते झाले.... " सुकडे ? " तेव्हा सुकडे आपल्या खिशातून तंबाखू काढून चोळत होता "काय साहेब ? " सुकडे आपली तंबाखू चोळतच म्हणाला.. " इथे काहीतरी वेगळाच घोटाळा दिसतोय. पोलिसाच्या नजरेतून काही सुटत नाही. पाहिलं नाही मघाशी ते प्राचार्य कसे हडबडले... नक्कीच काहीना काहीतरी घोटाळा आहे इथे. संध्याकाळी तुम्हीच या पहाऱ्याला.."
"पण साहेब ! मी ? "
" होय तुम्हीच आज रात्रीचा बंदोबस्त करा तुमचा इथे आणि प्रत्येकावर लक्ष राहुद्या..."
" साहेब ते बघून तर मला सगळ भूताखेताचा प्रकार वाटतोया...! अन रात्री मी एकटाच कसा आधीच अमावस्या आली साहेब ."
" शट अप सुकडे ! तसा काहीहि नसत.. वाटल्यास कोणाला तरी सोबत घेऊन या रात्री इथे...चला आता... "
***
" विष्णू विष्णू... समोर बघ कोण येतय..? " मोहन विष्णूला डिवचत म्हणाला " काय रे कोण आहे ? " विष्णूने आपली नजर उचलून समोर पाहिलं समोर पाहताच त्याचा चेहरा जणू खुलला..." हि तर पूजा येतेय ! पण तिच्या सोबत ती ? संजना ? " विष्णूला पूजा समोर येताच न जाणे कितीतरी तारा छेडल्यागत व्हायचं...जणू त्याची क्रशच होती ती..
पण पूजा सोबत आणखीन कोणीतरी होत तिची एक मैत्रीण मेघा नाव होत तीच. विष्णू जसा तिला पाहत होता त्याला मेघाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच भीतीदायक भाव दिसून येत होते तिने पूजाचा हात घट्ट पकडला होता. तिचे ओठ थंडीने थरथरत होते. पूजा तिच्या माथ्यावर आपले हात टेकवून तिचा जणू ताप पाहत होती...
पूजा जवळ येताच विष्णूला बोलायला जमेना झाले तोच मोहनने पेहल केली व " HI पूजा...! HI मेघा ? " " हेल्लो मोहन...! " आपल्या मधुर आवाजात पूजाने उत्तर दिले. परंतु तिच्या आवाजामध्ये क्षीणपणा होता. मोहन ने परत तिला विचारले... "काय झालेय ? ARE U ALRIGHT ? मेघाला काही झालेय का ? "
त्यावर मेघा मोहनकडे पाहून चिडली.. "सांगितल्यावर विश्वास ठेवशील का? आला मोठा विचारणारा ? " त्यावर विष्णूने आपले शब्द बाहेर काढले... " होय ठेवू आम्ही विश्वास...! काय झालेय कळेल ? " त्यावर पूजाने विष्णूकडे पाहत स्मित हास्य केले व ती बोलायला सुरु झाली...
" काल रात्री आम्ही शेवटचा टोल पडल्यानंतर झोपायच्या तयारीस लागलो होतो दिवे मालवून आम्ही दोघी निजणारच होतो. मेघा तिच्या असाईनमेंट्स करत होती... पडल्यावर इकडे मला डोळा लागला आणि अचानक मला मेघाची किंचाळी ऐकू आली. आणि मी जागी झाले. पाहिले तर मेघा आपले डोळे हातानी बंद करून रडत होती. आजूबाजूच्या मुली देखील धावत आल्या काय झाल आहे पाहायला... "
" मी तिथे त्या मनोऱ्यावर एक भयंकर गोष्ट उभी असलेली पाहिली. त्याचे ते भयंकर पिवळे डोळे त्याने माझ्याकडे पाहिलं व दात विचकत तो हसत होता. त्याचा भयंकर चेहरा विजांच्या प्रकाशात मला स्पष्ट दिसला..... तो आणखीनच... विदुप्र होता. काही क्षण तर मला...मला अस वाटल तो .... तो एका झेपेमध्ये ....खिडकीमध्ये�