अंधारकोठडी भाग 1-Marathi Katha-Horror
सायंकाळच्या वेळी लवकरच थंडी सुटली होती. आजूबाजूला असलेला परिसर देखील अगदीच धुक्याच्या चादरीने झाकून जायचा. एक इंचांच्या अंतरावरून कोणी गेले त्याचा हि पत्ता लागत नसायचा. विद्यालयाचे क्लास एक एक करत सुटले... विद्यालयातून बाहेर पडणाऱ्या मुलांची वर्दळ वाढली. विष्णू आणि मोहन दोघे हि मस्ती मस्करी करत आपल्या वर्गातून बाहेर पडले. " यार आज काय जाम मजा आली क्लास मध्ये...! शिंदे सर तर पार बिथरूनच गेले बघ.. त्यातल्या त्यात वैजोगे मेडम तिथून जाताना तर आणखीनच मज्जा.. सर ची तर लाजून लालच झाली..."
मोह्न्या विष्णूशी बोलत दोघही चालत होते तोच मागून
"अरे यार ! तुम्ही लोक थोडस अभ्यासाकडे लक्ष द्या. मी म्हणतो चला माझ्या सोबत लायब्ररी मध्ये. तिथे आजकाल नवीन बुक्स आले आहेत. " तो प्रशांत होता. विष्णूच्याच वर्गात त्याच्याच बँचमधला...
"अरे तस काही नाहीये प्रशांत , इथे आपल्या कॉलेजमध्ये तुला तर चांगलच ठाऊक आहे काही मजेशीर नाहीये. गेली तीन वर्षे झाली यांनी आपल्याला कुठल्या उत्खननात नेले नाही. जे काय करयचं ते हेच लोक करतात आणि त्या वस्तू आणून
आपल्याच संग्राहलयात सजवून आपल्याला दाखवतात. " विष्णू म्हणाला. " अरे माझ्या कानावर नवीनच काहीतरी उडत आलय; आपल्या कॉलेजमध्ये काहीतरी विलक्षण गोष्ट आलीय. अजून त्याच गुपित नाही उलगडल पण लवकरच कळेल..संग्रहालयात ठेवणार आहेत म्हणे" प्रशांत अगदी दबक्या आवाजात सांगत होता. " अस मग पहायला मिळेल आणि तू बस गुपित उलगडत . आम्ही निघतो उशीर होतोय. वेळेवर ये तुझ्या रूममध्ये. "
." चल थंडी वाढतेय." विष्णू आणि मोहन तिथून चालते झाले... " विलक्षण गोष्ट काय ? कदाचित ते आलय... "
तिथेच वर्गाबाहेर खांबाआड उभे प्रोफेसर शिंदे या दोघांच बोलन ऐकत होते. आणि आपली मुठ अन दात गच्च आवळत होते. मानवाच्या वृत्तीवर किती विद्वान शास्त्र लिहून गेले. काही जणांची असते अगदी कुत्सित कपटी. शिंदे प्रोफेसर त्यांच्या पैकीच एक असे म्हणता येईल.
या कॉलेजमध्ये त्याच्या सारखा इसम कसा थरा देऊन बसलाय देवच जाणो. प्रत्येक दुसरा प्राध्यापक एका वेगळ्याच स्तरावर रुजलेला होतकरू. शिंदेच्या बाबतीत सांगायचं म्हटल तर त्याच्या आधी त्याच्या जागेवर जोशी मेडम होत्या. प्रोफेसर शिंदेला त्यांची जागा हवी होती. त्याने बऱ्याच शिफारशी आणल्या ओळख आणली...
पण कुठे काही काम बनेना. न जाणे एके रात्रीमध्ये त्याने काय मंतर मारला. दुसऱ्या दिवशी जोशी मेडम नौकरी सोडून निघाल्या. त्यांनी त्या संपूर्ण विद्यालायाशीच आपला संबंध तोडून टाकला आणि कधी न परत येण्याची जणू एक शपथच घेतली... जात जात त्यांचा घाबरून पांढरा पडलेला चेहरा
सर्वांच्या नजरेत घर करून गेला...रात्री त्या आपल्या खानावळीतून परतून खोलीच्या दिशेने जात होत्या तेव्हा अंधारात सोबतीला म्हणून त्यांनी एक कंदील हातात घेतला होता. चालता चालता कंदिलाच्या प्रकाशात त्यांच्या एका सावलीच्या मागे दोन सावल्या दिसू लागल्या. भिंतीवर काना डोळा करून त्यांनी पाहिले तेव्हा त्यांच्या मनाचा थरकाप उडाला.
अंग हात पाय लटलट करू लागले. भीतीने त्या चळचळ कापत होत्या. पुढे उभ्या जोशी मेडमची सावली अंगात स्वेटर सारी व हातात दिवा असलेली. आणि ठीक त्यांच्या मागेच दोन पावलावर त्यांच्या उंचीच्या दोन फुट जास्त उंच ,एक कुबड निघालेलं. काटकुळे पाय लांबसडक हात व त्यांची भयंकर टोकदार नखे जी जोशी बाईना त्या सावलीत दिसत होती.
तोच जोशी बाईना आपल्या जागच हलता येईना झाल जणू पाय जमिनीवर चिकटून गेले आहेत जमिनीमधून दोन पंजानी बाहेर येऊन त्यांचे पायच आवळले आहेत. त्या मागे उभा असलेल्या जनावरने आपला हात केव्हाच वाढवून जोशी बाईंच्या मानेपर्यंत आणला होता तो थंडगार अनुकुचीदार नखांचा हात त्यांना आता आपल्या मानेच्या त्वचेवर जाणवत होता. मागे उभे ते खसखसत्या आवाजात काहीतरी पुटपुटत होते.
तसे तसे त्याच्या नखांची त्वचेवर होणारी जाणीव आता वेदनेमध्ये बदलून जात होती. जोशी बाईंच्या ह्रदयाची धडधड वाढू लागली. ते काय होत ? जनावर ? श्वापद ? कि आणखी कुठली अमानवी गोष्ट.. ? कुठून आले होते ? आता मरण पक्क ,अस त्यांनी निश्चित करून आपले डोळे मिटूनच
घेतले तोच मागून एक मानवी आवाज आला. " जोशी मेडम? " तो आवाज चिरपरिचित होता. अगदीच ओळखीचा. पण त्या आवाजाने त्यांना धीर नाही आला उलट मनातली भीती आणखीच वाढली. त्या आवाजाने काहीतरी म्हटल ते हे " आता तरी हट्ट सोडा...जोशी मेडम" त्यावेळी जोशी मेडमने संधी साधली. हातातला कंदील तसाच खाली सोडून त्या
धावत सुटल्या धावता धावता त्यांनी मागे वळून पाहणे टाळलेच कारण त्यांच्या पाठी अजून ते लागल होत जे झपाझप माकडासारख्या उड्या मारत येत होत. जोशीबाई आपल्या केबिनमध्ये शिरल्या व शिरताच त्यांनी धाडकन दरवाजा लाऊन घेतला सकाळी उठल्यावर त्यांचे डोळे न झोपल्यामुळे लालबुंद रक्ताळून गेले होते. एक एक शीर ताठून गेली होती.
चांगल्या होत्या जोशी मेडम दुसऱ्या दिवशी सर्व सोडून त्या चालत्या झाल्या. शिंदे चा हेतू वेगळाच होता इथे येण्याचा एका वेगळ्याच कारणस्तव त्याने इथे आपले पदार्पण केल होत. ***
प्रशांत त्या दोघांना बोलून आपल्या वाटेने चालू लागला सायंकाळची वेळ आली होती ढगाळ वातावरणात अगदी काळेकुट्ट मेघ दाटून आले होते. कॉलेजच्या क्लासचा वर्दळीचा रस्ता सुटताच तो लायब्ररीच्या अगदीच निर्जन रस्त्यावर अवतरला... वरती असे भयान सांकेतिक वातावरण त्याच्या मनाला कुठे तरी " थांब जाऊ नकोस.. जाऊ नकोस थांब " अस मोठ्या आवाजात ओरडून सांगू पाहत होत.
परंतु विरंगुळाच्या व्यसनाने त्याला तिकडे ओढत नेलेच कोरीडोर चालत असताना त्याला जसे जसे लायब्ररीच दार जवळ येताना दिसले तसे तसे पावलागणिक त्याला एक अनामिक हुरहूर जाणवली अस जस त्याच्या व्यतिरिक्त अजून हि कोणी आहे त्या कोरीडोरमध्ये जे त्याच्या समतल चालत आहे. परंतु वातावरणाच्या अभद्र आणि विचलित करून टाकणाऱ्या स्थिती मुळे त्याने हा मनाचा भ्रम आहे अस गृहीत धरला आणि पुढे चालू लागला
बांधकाम जुनेच म्हणून त्याची चौकट , दार हि तशीच.. " आज थंडी जरा जास्तच वाटतेय.. " प्रशांतला आपल्या उघड्या हातावर गारठून टाकणाऱ्या थंडगार हवेची झुळके जाणवत होती.थंडी पासून वाचण्यासाठी त्याच्या जवळ एका पांढऱ्या झोताच्या कंदिलाशिवाय दुसरी कुठलीच गोष्ट नव्हती.
आजकालचे आधुनिक कंदील. आगेची जळती नाचणारी ज्योत नव्हती त्यात विजेची लुकलुकणारी नेओन धातूची तार व चमकणारा पारा होता. त्याची काच तशी गरम व्हायची. प्रशांत वऱ्हांड्यातून चालत शेवटी लायब्ररीच्या दरवाजाजवळ पोहोचला. जवळ जाताच त्याला चकित करून टाकणारी गोष्ट दिसली.
लायब्ररीच्या दरवाज्याला त्याच्या किल्ल्या तश्याच लटकवल्या होत्या. नेहमीप्रमाणे त्याची दरवाज्यावर थाप मारायची सवय होती. प्रशांतने अलगद स्पर्श केला तोच तो भव्य दरवाजा... " कर्रर्रर्रर्र... " आवाज करीत उघडला... ' क्रां ... क्रां... " प्रशांतच्या दरवाजा उघडण्या सोबतच सौन्दाडीच्या झाडावर बसलेला. तो काळाभोर कावळा
आपली मान वाकडी करून एका डोळ्याने प्रशांतकडे पाहून ओरडत झपझप पंख फडफडत तिथून फांदीवरून उडून गेला. फडफड करीत धुक्यातून उडत असताना त्याच्या एकदृष्टी नजरेला. नीट दिसेनासे झाले... आपल्या केबिनमध्ये प्राचार्य एकावडे खिडकीच्या काचांवरती नजरा टिकवून कुठल्या तरी विचारात गुंग होते.
विचारात गुंतल्यावर त्यांना केव्हा त्यांचा डोळा लागला समजलेच नाही.प्राचार्य आपल्या खुर्चीतून उठून उभे खोलीभर नजर फिरवून पाहू लागले, तो दूरवरून त्यांना कसला तरी चीत्कारण्याचा आवाज ऐकू आला. काहीतरी ओरडत आहे. काहीतरी ओरडत त्या बाहेरच्या गाढ धुक्यामध्ये घिरक्या घेत आहे. प्राचार्यांनी आपल्या खिडकीजवळ जाऊन तावदानावर जमलेली वाफेची दव पुसून काढली.
काहीतरी काळसर धुक्यात घिरक्या घालत होत अचानक त्याचा आवाज हि शांत झाला प्रोफेसर अगदी बारीक नजरेने पाहत होते. बाहेर आणि केबिनमध्ये पुरतीच शांती होती. एक दोन सेकंदाचा अवधी गेलाच होता कि तोच समोरच्या झुरक्यामधून एक भयंकर काळभोर कावळा थेट प्राचार्यांच्या दिशेने उडत आला." परमेश्वरा... हे काय ? "
"या परिसरात कावळे कुठून यायला लागले..." प्राचार्य जास्त काही विचार न करता आपल्या कामात गुंतून गेले. परंतु बसल्या बसल्या अचानक जस माणसाच्या मेंदू मध्ये जमलेल्या काही आठवणीच्या तारांपैकी निदान एखादी तरी हळूच छेडली जाते तसेच एकावडे यांना देखील काहीसे आठवले त्यांनी आपला ड्रोव्हर बाहेर ओढला त्यातून एक लाल कपटची डायरी बाहेर काढली.
ते एकावडे प्राचार्यचे तरून पणाचे दिवस होते.उत्खनन क्षेत्रामध्ये बरेच विविध ना ना तर्हेचे शोध लावलेला पहिला तरून म्हणून त्यांची ख्याती पंचक्रोषित पसरली होती. त्यांचे सहयोगी त्यांना प्रमोद म्हणून पुकारायचे... त्या वेळी हि नवीन टिप मिळाली होती कि एका पुरातन काळातल्या कुख्यात मंदिराचे अवशेष एका जमिनीखाली असल्याचा दावा तिथले लोक करत आहेत.
प्रमोद व त्यांचे सोबत मित्र व सहकारी टीम मिळून त्या मिळालेल्या भिल्लोड गावात येऊन पोहोचले. गाव कसले ते अगदी जंगल एरिया होता तो. आदीवास, भिल्ल, रानटी माणसे यांची जमात राहायची तिथे. त्यातल्या त्यात प्रमोद आणि त्यांचे सहकारी यांना ती जमात अगदी नवीन होती. त्यांच्या पैकी कुणीच पुढे येऊन त्यांना त्या मंदिराचा पत्ता सांगत नव्हत...
ते कदाचित घाबरत होते कि कशाच्या दबावाखाली होते देव जाणो. पण हे लोक तिथे येताच त्या जमावामध्ये कुजबुज सुरु झाली. प्रमोद आणि बाकीच्यांना यांच्याशी संपर्क तरी कसा करावा समजेना तोच शिर्के प्रमोदचे मित्र पुढे आले. व हातवारे करतच शिर्के त्या जमावाला विचारू लागले...
इथे... या जागेत... मन्दिर (दोन्ही हातांचा कोन करून ) कुठे आहे ? " " यार प्रमोद या लोकांना काही समजणार नाही मला वाटत आपणच शोधाशोध सुरु करयला पाहिजे... यांना काही माहिती देखील नसेल.. चला.. "
" चला मला देखील तसच वाटतय " असे बोलून प्रमोद ,शिर्के आणि बाकीचे त्यांचे मित्र त्या लोकांना ओलांडून पुढे जाऊ लागले तोच त्यांच्या पैकी एक भिल्ल पुढे सरसावला... " साहेब थांबा ! " कुणीतरी आपल्या भाषेत बोलतय हे पाहून हे सर्वजण जागीच थांबले. मागे वळून पाहिलं तेव्हा त्या लोकांच्या गर्दीतून एकजन बाहेर आला.
त्या सर्वांचा पोशाख वेगळाच रंगीबेरंगी गुडघ्या पर्यंत विविध रंगाच्या पट्ट्या असलेले वस्त्र अंगाभोवती गुंडाळलेले. जे पुरुष दिसत होते त्या सर्वांच्या हातामध्ये दगडी लोखंडी भाले होते. तर आयाबायांच्या काखेला फुल-औषधीच्या पाट्या तर मुलबाळ होती. " चला कोणीतरी आहे ज्याला आपली बोली समजते. पण तू समोर का नाही आलास ? आम्ही एवढ विचारत होतो तेव्हा."
" साहेब तुम्ही लोक परत जाल अस वाटल होत पण तुम्ही लोक स्वतःच शोध घेण्यासाठी जातंय म्हणून मला पुढ याव लागल.. साहेब तुम्ही लोक परत जा इथून. त्या मंदिराकडे जाऊ नका." तेव्हा शिर्के पुढे आला व म्हणाला " का रे ? सरकारी कामामध्ये अडथळा आणतोयस का ? "
" तस नाही साहेब, तुमच्या भल्यासाठी बोलतो आहे. ते मन्दिर श्रापित आहे." " काय ? कसला श्राप ? " प्रमोद एवढावेळ शांत उभे होते श्राप शब्द ऐकताच ते बोलायला लागले. त्यांना रहस्यमयी आणि अश्या रोमांचित गोष्टीमध्ये बराच रस होता. आणि जर त्या गोष्टी आव्हानत्मक असतील तर मग
दुधावर सायच म्हणव लागेल त्यांच्यासाठी. "कसला श्राप आहे त्या मंदिराला ? " प्रमोदने विचारले... " साहेब आजवर त्या मंदिरात गेलेला कुणीसुद्धा परत आला नाही. त्या मंदिराच्या कालोख्यात कुणी पाउल ठेवले तर तो त्या कायमच्या अंधारात नाहीसा होऊन जातो. महाकांडच मंदिर आहे साहेब ते. जाऊ नका तिथे. "
" हे बघ तिथे जे काही आहे तेच शहनिशा करण्यासाठी आम्ही जातोय. धोका असेल तर आम्ही तो काढूनहि टाकू जेणेकरून तुमच्या इथल्या लोकांना सुरक्षा भेटेल..." " नाही नाही साहेब.. ते आमच दैवत आहे त्यापासून आम्हाला धोका नाही. आम्ही पुजतो त्याला. म्हणून आम्हाला तो काही करत नाही. तुम्ही लोक परत जा..."
" चल बाजूला हो...आमच्या कामात अडथळा अनु नकोस..." " साहेब संध्याकाळ होतेय. नका जाऊ. ऐका माझ.... साहेब... साहेब.... " त्या भिल्लास ढकलून त्यावेळी मी आणि माझे सहकारी तिथून दूर चालत आलो तो ओरडत राहिला त्याचे लोक आम्हाला अडवू पाहत होते पण बंदुकीच्या धाकावर आम्ही तिथून निसटलो.
... रात्र व्हायला आली होती. आणि पाहता पाहता आम्ही गाढ जंगलात शिरलो आजूबाजूला घनघोर काळोख होता रातकिडे किरर्र किरर्र करत होते. जंगलाच्या दुसऱ्या तिसऱ्या टोकावरून श्वापदांच्या विव्हळण्याचे आवाज कानी ऐकू येत होते. परंतु आम्ही सर्व मी शिक्रे आणि बाकीचे आमचे मित्र सहकारी तसेच चालत राहिलो..
अखेरीस आम्ही जंगल पार करून त्या ठिकाणी पोहचलो.. आम्हाला आमच हव असलेल ठिकाण भेटल होत मी आणि माझे सहकारी खुश झालो होतो. ते मन्दिर एवढ पुरातन त्याचा शोध लागला हे आमच्या साठी जग जिंकल्यासारख होत. परंतु जेव्हा आम्ही विजयनशेमध्ये धुंद त्या मंदिरात प्रवेश केला. पुढचा मागचा कसलाच विचार न करता. आणि त्या नंतर ते विचित्र आवाज त्या माझ्या मित्रांच्या किंकाळ्या माझ्या कानात आजवर घुमत राहिल्या. मी तिथून कसाबसा निसटलो. आणि जंगलात हरवून गेलो...
जंगलात पोचता मी आपली शुद्ध हरवून जमिनीवर कोसळलो. कुणीतरी माझे हातपाय धरून मला ओढत खांद्यावर उचलत कुठल्यातरी वेगळ्याच ठिकाणी नेल. तिथ भिंती होत्या छपरे होती. माझा इलाज झाला व हि तीच लोक होत आदिवासी ज्यांना ओलांडून आम्ही पुढे निघालो होतो. कदाचित आधुनिक शहरातील माणसाने गमवलेली माणुसकी यांना भेटली होती. कि आधी पासूनच हे माणुसकीचे होते माहित नाही.
त्यांनीच माझे प्राण वाचवले व मला तिथून रवाना केले... प्रचारी आपली डायरी हातात घेऊन तोच किस्सा वाचत होते. डायरी बंद करून त्यांनी आपल्या ड्रोव्हर मध्ये ठेऊन दिली. " टंगSSSS टंगSSSSSS टंग .... " प्राचार्यच्या केबिनवर असलेल्या त्या मनोऱ्यातल्या घड्याळामध्ये सायंकाळचा टोल पडला..थंडीचे दिवस सुरु झाले होते. सहा वाजताच सर्व धुक पसरून गाढ व्हायचं.
हॉस्टेलमध्ये हजेरी घ्यायची वेळ आली. वार्डन पानसे एक एक करत प्रत्येक खोलीमध्ये जाऊन सर्वांची हजेरी घेत होता." विष्णू गोडसे ? मोहन पालवे ? " विष्णू आणि मोहनच्या खोलीत येऊन त्याने त्यांची हजेरी घेतली तसा वार्डन यांचा अगदी तिरसट स्वभावाचा मुलांना अगदी दाबाखाली ठेऊन असायचा पण मुले हि त्याला सव्वाशेर होते. असो पानसे शेजारच्या खोलीजवळ गेला व खोलीच दार ठोठावल... " प्रशांत गुरव ? "
" ठक ठक ... " पानसेने प्रशांतच्या खोलीच दार परत ठोठावल पण आतमधून काही कुणाच उत्तर नाही आले. वार्डनने दरवाजावर अजून एक थाप मारली कि तोच दरवाजा पूर्णच उघडला...आणि समोर खोली त्याच्या नजरेला अगदी रिकामी पडलेली दिसली... " हा कुठे गेला ? " पानसे स्वतःशीच \
पुटपुटला... आतमध्ये कोणीच नाहीये हे पाहून पानसे शेजारच्या खोलीत आला व त्याने बाकीच्या मुलांना विचारपूस करायला सुरुवात केली... " प्रशांत गुरव त्याच्या खोलीमध्ये नाहीये कुणाला काही माहिती आहे का तो कुठ गेलाय ? " हॉस्टेलमध्ये मोजून २०० एक मुले होती. सर्वाना सर्वांची ओळख. पण आता काहीतरी झाल होत.
एक एक करून सर्वजन आपापल्या खोल्यांमधून डोकी बाहेर काढून पाहू लागली. कुणालाच काहीच माहित नव्हते. तोच विष्णू बसल्या बसल्या मोहनला म्हणाला.. " काय रे ? प्रशांत अजून आला नाही ?" " नाही वाटत बहुतेक...मघाशी तर तो लायब्ररी मध्ये गेला होता न ? "
" कुणाला काही माहिती आहे का ? कुठे गेलाय हा ? " वार्डनने एकदा जोरात ओरडून विचारले तोच विष्णू आपल्या जागेवरचा उठला व बाहेर आला. " हो मी पाहिला आहे त्याला.. " " एवढा वेळ मी काय कीर्तन करत होतो का ? कुठ आहे तो ? "
" त .. तो वर्ग सुटल्यावर त्या लायब्ररीमध्ये गेला होता. " " काय ? लायब्ररी ? एवढ्या उशिरा तो तिकडे काय करतोय ? ग्रंथपालने त्याला अडवले नाही का ? " " पोरानो... तुम्ही सगळे आतमध्ये व्हा. कुणीहि बाहेर फिरकायचं नाही. वातावरण ठीक नाहीये बाहेर पाउस पडतोय. मी जाऊन पाहून येतो त्याला तो कुठे राहिलाय? "
एवढ बोलून पानसेने आपली लांबसडक छत्री घेतली व एका हातामध्ये कंदील घेऊन तो वसतिगृहातून बाहेर पडला. हॉस्टेलबाहेर पाउल ठेवताच भूतासारखा व्हू व्हू करत सुटलेला वारा त्याच्या अंगातून आरपार झाला. वाऱ्याच्या झोताने त्याच्या हातातल्या कंदिलाने हेलकावे घ्यायला सुरुवात केली...
कंदिलाच्या पिवळ्या तांबड्या उजेडात त्याला आपल्या पायाखालची वाट फक्त दिसून येत होती. वाऱ्याच तापमान बदलल होत कोरड्या हवेमध्ये ओलावा आणि थंडगार झोत शिरला होता. कुठल्याहि क्षणाला पावसाचे थेंब कोसळणार याची जाणीव झाली. म्हणून तिथेच पानसेने आपली छत्री उघडली...तसा चालत विद्यालयाच्या दिशेने निघाला.
कॉलेजच्या आवारात दोन तीन वळण घेऊन एका मोठ्या कोरीडोरला ओलांडून जात भल्या मोठ्या ग्रंथालयाच भव्य दार होत. पानसेनी कॉलेजच्या दिशेने पावले वळवली. कॉलेजमध्ये काही ठिकाणी अश्या राहण्यासाठी हि खोल्या केबिन होत्या जिथे सर्व प्राध्यापकांची सोय केलेली होती. विद्यालयाच्या त्या मुख्य इमारतीवर झुलत्या मनोऱ्याच्या टोकाला भल मोठ
पेंडूलम सह लटकलेल घड्याळ एका वेगळ्याच क्षणाची साथ देत आहे अस वाटत होत. कॉलेजच दृश्य आज भलतच विचित्र दिसत होत. जसा एखादा दगडाचा टोकदार शिंगाचा एखादा दानव उभा आहे ज्याच ते पांढरशिपट घड्याळ त्याचा एक राक्षसी डोळाच आहे. विजाना कडकडाटी यायला सुरुवात झाली...मुलांना आपल्या खोलीतच राहायला सांगून पानसे एकटाच बाहेर
आला होता. कोलेजच्या फाटकाजवळ येताच तिथून एक दोघजन येऊन त्याला भेटले. हे सर्व विष्णू आपल्या खोलीच्या खिडकीतून पाहत होता. " काय पानसे ? आज इकडे कुठे स्वारी चाललीय? " त्या दोन इस्मापैकी एक सिक्युरिटी गार्ड होता आणि दुसरा ग्रंथपाल स्वतःच. ग्रंथपाल त्याला ऐनमोक्याला भेटला हे पाहून त्याला आपले कष्ट वाचल्यासारखे वाटले...
" ग्रंथपाल अहो हॉस्टेलचा एक मुलगा संध्याकाळी लायब्ररीमध्ये आला होता. आता रात्र होतेय तो काही अजून परत आलेला नाहीये.." " काय ? काय बोलताय? हे कस शक्य आहे ? " ग्रंथपाल मोठ्याने उद्गारला त्याच्या बोलण्यामध्ये अगदी आश्चर्य दिसत होत. " काय कस शक्य आहे ? मुले वाचायला रोज जातात तिथे..."
" अहो ते नाही हो... आज सकाळीच मी नोटीस लाऊन गेलो होतो कि लायब्ररी आज बंद राहणार आहे. आणि तो मुलगा तिथे गेलाच कसा ? आणि चाव्या तर ; " एवढ बोलून ग्रंथपालने आपल्या कंबरेला हात लावला आणि चाव्या तपासून पाहिल्या तेव्हा आश्चर्याचा मोठा धक्काच बसला...
" अरे देवा... चाव्या? " " काय !? " पानसे आणि तो दुसरा उभा गार्ड दोघेहि आश्चर्याने एकसाथ उद्गारले.. " अहो ग्रंथपाल हे काय करून बसलात ? चाव्या हरवल्या तुम्ही, कि ? " तिघांच्या चेहऱ्यावरती एक अनामिक भीती उमटली होती. तिघे एकमेकात उमजून गेले. कि ग्रंथपालने चाव्या....ग्रंथालयाच्या कुलुपावरच विसरल्या होत्या.
" याचा अर्थ प्रशांत सायंकाळी तिथे गेला असेल आणि त्याला दरवाजा उघडा दिसला असेल म्हणजे तो अजूनहि तिथेच असणार... आणि तिथे तर..."बोलता बोलता पानसेचे डोळे एका वैचारिक भीतीने विस्फारून गेले. " ओ ...! ओ!! पानसे पुढच काही बोलू नका आधीच नाईट ड्युटी आणि त्यात तुम्ही .." हातवारे करत गार्ड उद्गारला...
" अरे मग आता चावी च काय करायचं आपल्याला तिथे जाव लागणार नाहीतर त्या शिवाय पर्याय नाहीये. आणि हि जर बातमी प्राचार्यच्या कानी पडली तर मग तर देवच वाचवो आपल्याला..."
"आता आपल्याला तिकडे जाव लागणारच ; आता दुसरा मार्ग नाही राहिला... " ग्रंथपाल घश्याखाली आवंढा गिळत उद्गारला...
" विष्णू काही दिसतय का खाली काय चालू आहे ? " मोहन म्हणाला " नाही रे पानसे वार्डन अजून आला नाहीये परत बहुतेक गेलाय तो कोलेजमध्ये... "विष्णू खिडकीतून खाली पाहतच उत्तरला " काय रे विष्णू आजवर अस कधी झाल नाही ना ? कि कुणी मुलगा वेळ झाल्यावर परत आला नाही...
काहीतरी वेगळंच घडण्याची आशंका येतेय मला मोहन, काहीतरी वेगळंच...!"
षडयंत्र तंत्रमंत्र येई वाटे त्या रहस्या
न जाणे कोण तो अजाण असा
भूतपूर्वाचा दर्शवतो आरसा त्यांची दशा..!