🙏ही ओढ रक्ताची 🙏
भाग ::--दुसरा
बुराई व गावदेवीचं पुजन होताच दुसऱ्या दिवशी लिंबर्डीला गावभंडारा झाला. दुपारनंतर अनेक बोकड मारण्यात येत होते. हीच धांदल सुरू असतांना आजुबाजुच्या चार पाच खेड्यातील लोकं आपापल्या गावाला पाण्याचा वेढा पडल्यानं व घरे बुडाल्यानं उंचावरील लिंबर्डीला जत्थ्या जत्थ्यानं येऊ लागले. तिसऱ्या प्रहर पावेतो शाळा, जुनी चावडी पूर्ण भरली. उरलेले काही लोक सूर्यकांतरावाकडं गेली. तर काही कृष्णा अण्णाकडं गेली. सूर्यकांतरावानी चावडीतून सर्कलकडनं किल्ल्या मागवत त्यांना सचिवालयाकडं पिटाळलं. पावसानं व थंडीनं काकडलेल्या लोकांना जागेची भ्रांत असल्यानं पंधरा अठरा वर्षापासून बंद सचिवालयाची लोकांनी स्वतःच साफसफाई करत आपला बिस्तरा मांडला. कृष्णाअण्णाला हे कळताच ते घाबरले. त्यांनी भंडाऱ्यात आधी दोन चार बोकडं आणखी वाढवायला सांगत त्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय केली. आलेल्या लोकांना सचिवालयात न पाठवता शाळेत व चावडीत दाटीवाटीने रहायला विनवलं. पण लोकांनी चावडीत व शाळेत जागा नसल्यानं सूर्यकांतकडं जाणं पसंत केलं. आता तर बुराई बंगलाही खोलण्यात आला. सर्कल भांबावला.ग्रामसेवक तर रजा टाकून गायबच होता. त्यानं आजुबाजुच्या खेड्यातील तलाठ्यांना बोलावलं एम. डी. (मुकुंद माने) ही होताच. साऱ्यांच्या मदतीनं दोन्ही ठिकाणी पाणी व जनरेटरच्या साहाय्यानं लाईटची व्यवस्था केली. तलाठ्यांनी हजेरी लावून तोंड दाखवत गुंगारा दिला. सर्कल रिपोर्टींग करायला तालुक्याला गेला. उरला फक्त मुकुंदा. कृष्णा अण्णाकडून साऱ्यांना भंडाऱ्यातलं मटनाचं जेवण आलं. जेवण आटोपता आटोपता अकरा वाजले. भिमा शिपाई ही सटकला. भितीनं गावातली लोकं तर इकडं फिरकली सुद्धा नव्हती. सूर्यकांत - चंद्रकांत तर बिलकूल नाही. मुकुंदानं दोन्ही ठिकाणच्या लोकांच्या जेवणाचं बघितलं. तर अण्णानं चावडीतल्या व शाळेतल्या लोकांचं. मुकुंदाला आता कडकडीत भूक लागली होती. खरं तर एरवी काल पूजनाच्या वेळी कुंदा भेटली तेव्हा पासुन तिच्याच विचारात तो गढला असता पण सकाळपासूनच तो इतक्या दगदगीत होता की त्याला कुंदा आठवलीच नाही. आता तो जेवण करुन सचिवालयात आला. लोकं मटणाचा रसा वरपुन पाऊस, वाऱ्यानं थकल्यानं पेंगत होती तर बाकी घोरायलाही लागली होती. मुकुंद झोपायला जागा शोधू लागला. कारण आज त्याला इथंच थांबावं लागणार होतं.कारण सर्कल रिपोर्टींग करून परत आल्यावर बुराई बंगल्यावर थांबणार होते. सचिवालयात ग्रामपंचायत कार्यालय, एक मोठं सभागृह, चार इतर खोल्या व तलाठ्याचा सजा होता. आता सर्व उघडलं होतं व त्या ठिकाणी लोकं झोपली होती. पण तलाठ्याचा सजा बंदच होता. भिमा शिपाई संध्याकाळी गडबडीत, "अप्पा, सचिवालय उघडलं पण काही झालं तरी आता सज्याची खोली मात्र उघडू नका! " असं लोकांना इथं आणलं तेव्हा सांगत होता. पण लोकांची सोय लावण्याच्या धांदलीत मुकुंदानं त्याकडं लक्षच दिलं नव्हतं. आता झोपायला जागा नाही म्हणुन तो तिकडं वळला. बारा वाजण्यात आले होते. त्यानं त्या सज्याच्या दरवाज्याचं गंज लागलेलं कुलूप पाहिलं. आता हे उघडणं शक्य नाही. व तोडलं तर आवाजानं झोपलेली लोकं नाहक उठतील. म्हणून तो त्याचा नाद सोडून दुसरीच जागा शोधु असा विचार करत मागे फिरणार तोच त्याला आतून बोकड ओरडल्याचा ¬'बे-बे'चा आवाज आला. त्याला वाटलं दिवसभर भंडाऱ्यात बोकडं कापले जात होते ते आपण पाहिलेत म्हणुन तोच भास होतोय. तो माघारी फिरणार तोच पुन्हा तसाच जोराचा आवाज आला. आता तो तिथेच थबकला व भिंतीला कान देऊ लागला. मधून त्याला बोकडाच्या ' बे-बे'चा आवाज व कुणीतरी फिरत असावं त्याच्या पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. त्याची धडधड वाढली.तो घाबरला. सभागृहात येत एका मोडक्या खुर्चीत बसला व कुंदाच्या गुलाबी विचारात हरवू लागला.पण मन स्थिर होईच ना. सचिवालय जर बंदच होतं तर मग त्या खोलीत बोकड कसा शिरला असेल? पावलांचा आवाज कुणाचा? कुलुप तर गंजलेलं इतकं की उघडल्याच्या खाणाखुणा नाही. काही तरी गरबड तर नक्कीच आहे. कारण कदम तलाठी, भिमा शिपाई ही काही तरी सांगत, लपवत होते तर सर्कल व अण्णा चिंतेत होते. नेमकं काय? हे विचार त्याला स्वस्थ बसू देईनात. तोच दिवसाच्या थकवा ही डोळ्यात दाटू लागला व डोक्यात कुंदाची भेट गुलाबी गिरकी घेऊ लागली. सर्व चलबिचल, खिचडी झाली व त्यात खुर्चीवर त्याचा डोळा लागला.
दिड दोनच्या सुमारास अचानक गलका कोलाहल वाढला. त्याला जाग आली. गलका सज्याच्या खोलीकडंनच येत होता. तो डोळे चोळत तिकडे धावलाआणि समोरच्या प्रकारानं एकदम पळापळी व धांदल उठू लागली. मुक्कामाला असणाऱ्या काही बेवड्यानी आपलं जेवण वाढून घेत गुपचूप लपवलं व गावात दारू प्यायला निघून गेले होते. मुकुंद झोपल्यावर ते टल्ली होऊन आले. जेवण घेत ते जागा शोधू लागले. त्यांना ही सज्याची बंद खोली दिसली. दगडानं कुलूप तोडलं तोच मधून धूळ व फडफड करत वटवाघळं व काचोया भुर्रकन उडाल्या. सावरत ते मध्ये घूसले. आणि एकच कोलाहल उठला सारे आरोळ्या ठोकू लागले. त्यानंच लोक व मुकुंदा उठला व त्या खोलीकडं धावला. सजात खुर्चीवर एक विचित्र आकृती बसली होती. मानवी धडावर बोकडाचं शीर होतं व ते आदळआपट करत होतं"साल्यांनो तुम्ही मटंनाचं रस्सं वरपलं दारू ढोसली आता पुन्हा कुणाला तरी सुळ्यात(कडबा काटण्याचं अवजार) मारणार. असंच केलं होतं त्या हरामींनी. थांबा उचकवतोच तुम्हाला एकेकाला" म्हणतच ती आकृती उठली व खोलीतच धावत काहीतरी शोधू लागली.
मुकुंदानं व लोकांनी मानवी धडावर बोकडाचं शीर असलेली ती विचित्र आकृती पाहताच एकदम हुल्लड करत पळ काढू लागलेत. चेंगरा चेंगरी होऊ लागली. मागून ती आकृती एकच गिल्ला करू लागली. बाहेर जोराचा पाऊस व वादळ तर मध्ये थरथराट व थैमान. तोच कुणाच्या पायात वायर अडकली व जनरेटर बंद पडलं आणि अंधार झाला. मग काय अंधार, वादळ, पाऊस, गलका व गोंधळ पळापळी चेंगराचेंगरी एकच हैदोस. पुढच्या पाच दहा मिनीटातच सचिवालय खाली झालं. मागून किंकाळी येतच होती. "सिंच्यानो!, साल्यांनो! पळताय काय? माझं मुंडकं कुठं ते तर दाखवा रे"......
सारी गर्दी वाट फुटेल तिकडं, पुढा तिकडं मुलुख थोडा करू लागली. मुकुंदानं उरलेल्यांना कृष्णा अण्णाच्या घराकडं नेलं.
सर्कल तालुक्याला रिपोर्टींग करत साडे अकरा-बाराला परत फिरत सचिवालयात मुकुंदा थांबणार होता म्हणुन बुराई बंगल्यावर परतले होते. बुराई बंगला हा ही गावाबाहेर सचिवालयापासून काही अंतरावर स्मशानाला लागुनच सुनसान जागेत होता. तिथंही लोकं रस्सा वरपुन व थकून झोपले होते. सर्कल आले व त्याच लोकात झोपले. एरवी अशा जागेत ते कधीच झोपले नसते. पण वरिष्ठांनी साऱ्या पुरग्रस्तांची जबाबदारी त्यांच्यावरच सोपवली असल्यानं नाईलाज होता. त्यांच्या डोळ्यात झोप दाटू लागली. झपकी लागली. मुक्कामाला आलेल्या लोकात एक म्हातारा दमा असल्यानं सारखा खोकत बसला होता. पावसाळी कुंद हवेनं त्याची छाती भात्यासारखी हाफत होती. म्हातारा खोकत खोकत बाहेरच्या पावसाकडं व दुरच्या अंधाराकडे पाहत होता. तोच त्या म्हाताऱ्याला बंगल्याच्या उजळलेल्या बगिच्यात मटण शिजल्याचा वास येऊ लागला. त्यानं विचार केला कि जेवणं तर केव्हाची आटोपली मग आता वास कसा? तो उठला व बगिच्याकडं चालू लागला. त्याला अंधारात खूसपूस जाणवली. जनरेटरच्या लाईटचा प्रकाश पुरेसा इथपर्यंत येत नव्हता वा म्हाताऱ्याला वयोमानानं दिसत नव्हतं. तो डोळे ताणून ताणून पाहु लागला. खुसपुस त्याच्याकडं सरकत वाढू लागली. तोच म्हाताऱ्यानं भाता फुटल्या छातीनं आरोळी ठोकली. सर्कलसह सारे उठले व आवाजाच्या दिशेनं धावली. त्यांना मटनाचाच पण उग्र कुजकट दर्प जाणवू लागला. तोच समोरचा प्रकार पुढच्या लोकांना दिसला. दमेकरी म्हाताऱ्याच्या छातीतला श्वास तर पाखरू बनून भूर्र कापरासारखा उडून गेला होता पण तिकडं पहायला कोणीच तयार नव्हतं. मातीच्या ढिगाऱ्यावर एक आकृती बसली होती. स्त्रीच्या धडावर माणसाचं शीर लागलेलं होतं व हातात स्त्रीचच शीर पकडलं होतं. हातातल्या शीरातुन रक्त टिपकत होतं. त्या आकृतीचे दोन्ही हात जळून शिजल्यागत दिसत होते व त्यातून उग्र दर्प येत होता.
"मेल्यांनो बऱ्या बोलांनं हे शीर न्या! नाही तर मी सोडणार नाही. याच सुळ्यानं एकेकाची शीरं खांडेन" आणि ती आकृती उठून लोकांच्या अंगावर धावली. लोकं पळू लागली.
"हर्रामी कुठं जाणार पळून! येईल माझा मुकुंद येईल. आता नाही पण केव्हा तरी येईलच आणि तो आमचा बदला घेईलच"
सर्व गर्दी धूम पळाली व सचिवालयाकडून येणाऱ्या गर्दीत मिसळली. तर काही धांदलीत बुराई च्या पाण्यात पडून गटांगळ्या खात वाहुन गेली. काही बुडालेल्या गावाकडंच पळाली.
कृष्णा अण्णा भांबावून उठले. सारा प्रकार समजताच" आता झोपा नंतर काय करायचं ते पाहू. "म्हणत गावातील लोकांना उठवत त्यांच्या प्रत्येकाच्या घरात जबरीनं आठ दहा लोकांना घालू लागले. साऱ्यांची सोय लावत उरलेल्या लोकांना मुकुंदाला व सर्कलला आपल्या घरी नेलं. कुंदानं मुकुंदाकडं पाहताच डोळ्यात अश्रू तरळले. तीनं त्याला व सर्कलला चहा ठेवला. धीर देत अण्णा आहेत काही तरी मार्ग काढतील असा दिलासा दिला. यात कुंदाच्या हातात मुकुंदाचा हात केव्हा गेला हे दोघांना समजलंच नाही पण सर्कलला ते अंधारातही जाणवलं . त्या स्पर्शानं मुकुंदाला पुन्हा दोन तीन महिन्यापुर्वीची सुखद रात्र आठवली. कुंदा आहे मग जे होईल ते पाहिलं जाईल,असा विचार करत सचिवालयातला प्रकार विसरत तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला.
सर्कलला मात्र आपण सचिवालय व बुराई बंगला सूर्यकांतरावांना नकार देत किल्ल्या न देता उघडायला नको होतं याची राहून राहून खंत व भिती वाटत होती. काय असावा हा प्रकार? कोण उलघडेल हे प्रकरण? यातच पूर्वेला उगवणारा सूर्य जरी उगवला नाही तरी सकाळ झालीच पण झोप मात्र आलीच नाही.

क्रमशः....
✒वासुदेव पाटील.