*भुताचा माळ*!💀☠👽🎃👹👺😈
बँक संध्याकाळी चक्क सहा🕧 वाजता बंद केली. शाखेतील काम संपले होते. खरं म्हणजे पूर्ण काळोख पडल्यानंतरच बँकेतील कामे पूर्ण करून कसेबसे आठ वाजेपर्यंत बँक बंद करायची ,अशी परिस्थितीजन्य प्रथा आहे. बँकेतील कर्मचारी पूर्वजन्मी वटवाघुळ असावा. संध्याकाळी पूर्ण काळोख पडल्यानंतरच ढोलीतून बाहेर पडणारा.खरंतर बँकेचं काम अजूनही संपलेलं नव्हतं. वसुलीसाठी आणि तपासणीसाठी जवळच्या एका खेडेगावात जायचं होतं, आणि हे काम आज संध्याकाळी सात नंतर करायचे होते. अनेक वर्षाच्या अनुभवावरून लक्षात आले होते की, खेडेगावात गावकरी सकाळी ८ पर्यंत आणि संध्याकाळी ७ नंतर खात्रीने भेटतात. अर्थात काही निवडक पट्टीचे शौकीन ,संध्याकाळी बोलण्याच्या स्थितीत नसतात ही गोष्ट वेगळी. रात्री प्रवासात सोबतीला पाहिजे म्हणून ,बँकेतील क्लार्क (कार्यालयीन शब्द लिपिक, अजून असाच एक शब्द शिपाई या पदाला आहे. 'अधीनस्थ कर्मचारी', कदाचित बँकेतील इतर सारे, या पदाच्या अधीन असतात म्हणून हा अधिनस्थ कर्मचारी असावा) असुदे! तर लिपिक जॉन याला बरोबर घेतले. जॉन ख्रिश्चन असला तरी छान मराठी बोलणारा, कामात एकदम हुशार, मनमिळावू आणि प्रामाणिक होता. सहा फूट उंची आणि पेहलवाना सारखी तब्येत असलेला हा तरुण, कोणतेही काम करायला तयार असायचा.रात्रीच्या वेळी खेडेगावात जायचे तर, जाॅन रूपी संरक्षक आघाडी जोडीला असलेली बरी! हा माझा अंतस्थ हेतू होता.
एस. टी .बस ने दोघे, दहा किलोमीटर लांब असलेल्या मेळुसके बुद्रुक च्या फाट्यावर उतरलो. तिथून गाव, तीन किलोमीटर आत होते. फाट्यावर वडाप गाडी मिळाली. ग्रामीण भागात जीपला वडाप म्हणतात🚖 कारण, ती, कितीही प्रवाशांना कोंबून ,वडत, वडत (ओढत ,ओढत ) घेऊन जाते म्हणून वडाप!) गावात पोहोचलो, तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. गावात पंधरा-वीस जणांकडे बँक कर्जवसुलीचे आणि कागदपत्रे नूतनीकरणाचे काम होते.घरात चौकशी केल्यावर "मालक शेतात गेलेत " "तालुक्याला गेलेत " अशी उत्तरं ,रात्र झाल्याने देता येत नव्हती ,त्यामुळे कर्जदार तावडीत सापडत होते. जॉन जोडीला असल्यामुळे, मी थोडीफार उसनी जरब दाखवत होतो. रात्रीचे अकरा वाजत आले होते आणि कामही संपले होते. संध्याकाळी निघताना खाल्ल्यामुळे भूकही नव्हती. आता घरी लवकर जायची ओढ लागली होती, पण अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. नाईलाजाने, पाऊस जाण्याची वाट बघत ,जवळच्या मारुतीच्या देवळात आश्रयाला थांबलो. देवळात दहा , बारा, गावकऱ्यांच्या ,मारुतीरायाच्या साक्षीने गावगप्पा चालू होत्या.पुष्कळ वेळ झाला पण पाऊस काय थांबत नव्हता आणि सोबत छत्री पण आणली नव्हती, कारण असा अचानक पाऊस येईल असे वाटले नव्हते. सोबत जमलेल्या मंडळीत, बँकेची काही कर्जदार मंडळी पण होती. थकबाकीदार कर्जदाराच्या दृष्टिकोनातून, बँकेचा साहेब म्हणजे शत्रुपक्ष असतो पण तरीही मी हिम्मत करून एकाला विचारले,"कोणाकडे छत्री आहे का ? पाऊस काही थांबत नाही, घरी तर गेलेच पाहिजे .दोन-तीन दिवसात बँकेत कोणी आले की छत्री परत करीन."☂☔
अगतिक झालेला बँकेचा साहेब बघून मंडळी खूष झाली. एकाने दया दाखवत म्हटले "साहेब आम्हा गरीब गावकर्याकडे ,कुठल्या आल्यात छत्र्या ! पण तुम्हाला एक घोंगडी देतो .डोक्यावर घेऊन चालत गेलात तर भिजणार नाहीत. मी नंतर बँकेत येईन तेव्हा मात्र ती घोंगडी परत करा."
चला ! सोय झाली ,म्हणून मी खूष झालो .तेवढ्यात एक म्हातारा फेटा सावरत, डोळे बारीक करीत म्हणाला" घोंगड घेऊन पावसात जाताय, ठीक आहे .साहेब ,पण फाट्यापर्यंत एक कोस चालायचं आणि गण्या(शेजारी बसलेल्या गावकऱ्यांला उद्देशून), त्या फाट्याला' भुताचा माळ💀👹 'म्हणतात हे साहेबाला माहित नाहीये वाटत."मी दचकून कान टवकारले. दुसऱ्या कर्जदाराने चेहऱ्यावर भाबडेपणाचा आणत, सांगायला सुरुवात केली." आमच्या आजा, पंणजा पासून पुष्कळ जणांनी या भुताच्या माळावर लई डेंजरसअनुभव घेतलेत. तिथं जवळच मसंनवट हाय, आणि आता माळावर पोहोचायला तुम्हाला रात्रीचे🕕 बारा वाजणार."मी घाबरलेल्या चेहऱ्याने जॉन कडे पाहिले.त्याने नजरेनेच मला धीर देत म्हटलं" साहेब घाबरू नका. जाऊया आपण भुताच्या माळावर, मी आहे ना सोबत?"
साहेबाची फजिती होतेय, साहेब घाबरतो, हे बघून जमलेले गावकरी अजून उत्साहीत झाले. एकाने चुना तंबाखू मळत म्हटले ."साहेब! जपून जा बरं! भुताचा माळ, भुता साठी लई फेमस हाय ! कधी चकवा घालतात, कधी वेगळ्या रूपात समोर येतात,( जॉन कडे बोट दाखवत) कधी याच्यासारख्या पेहलवान गडी दिसला, तर त्याला कुस्ती खेळायचं आव्हान देतात आणि एकदा मानगुटीवर बसली ही भूत! तर काय खरं नाही! आता तरी देखील तुम्ही जातो म्हणता, तर काळजी घ्या." एक जण विडी पिता पिता, वर बघत म्हणाला "व्हय साहेब ! माग, एकदा मुंबईचा पावना आला होता .त्याला या माळावर भूतान झपाटलं. बिचारा पंधरा दिवसात झिजून झिजून गेला."पहिला पागोटे वाला हळूच पचकला ,"नाय ठीक आहे! तुम्ही जाताय तर , जा ! पण आज अमोशा( अमावस्या) हाय ,त्यात तुम्ही तिथे पोचेपर्यंत, रात्रीचे बारा वाजणार ,म्हणजे काय हाय,आजच्या रातीला भुतांना लई ताकद येते.त्यात हा मरणा सारखा पाऊस पडतोय."तेवढ्यात एकजण लांबून बारीक आवाजात पुटपुटला "होय !नाहीतर ,उद्या बँकेला सुट्टी मिळायची " ऐकून न ऐकल्यासारखं करीत मी जॉनला विचारले "काय रे ? जाऊया ना? घरी बायको वाट बघत असेल !काळजी करत असेल." " साहेब जाऊया, ते बघा घोंगडे पण आलं."
आम्ही दोघांनी मिळून, एक घोंगडे, डोक्यावरून घेतले आणि भर पावसात🌧🌧 देवळातून बाहेर पडलो. निघताना काही गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर, शेवटचा निरोप घ्यावा असे आर्त भाव आहेत ,असं उगाचच वाटून गेले.
आणि आमचा ,दोघांचा ,भुताच्या माळाच्या दिशेने प्रवास सुरू झाला. दोघांच्या डोक्यावरून एकच घोंगडे, वरून मुसळधार पाऊस, अमावस्येचा काळाकुट्ट🌑 अंधार! सोबत बॅटरीही नाही .विजा चमकल्या की☁⚡ काही वेळ समोरचा रस्ता दिसायचा. काळोखात आजूबाजूचे झाडांचे आकार अक्राळ विक्राळ भासू लागले. पिंपळाचे झाड दिसले' मुंजा 'आठवायचा ,नाला दिसला की, 'सात आसरा' आठवायच्या तेवढ्यात बाजूच्या शेतात पांढऱ्या साडीत कोणतरी चमकले🧟♀ 'हडळ' की काय ?अशी शंका येताच, मी जॉनचा हात घट्ट पकडला .तो मोठ्या हिमतीने म्हणाला ,"साहेब ते बुजगावणे असेल .घाबरू नका" मी केविलवाणे हसलो.
आता भुताचा माळ जवळ आला होता. पाऊस वाढतच चालला होता .रातकिड्यांचे🕷🕸🦟🦗 विचित्र आवाज येत होते. दूरवरच्या कोल्हेकुईने🦇🦇 भीषणता अधिक वाढत होती. शेवटी जॉनने थरथरत्या आवाजात मला विचारले," साहेब! भूतांना पळवून लावण्यासाठी, तुम्ही कोणता तरी मंत्र म्हणता ना?" मला चटकन मारुतीस्तोत्र आठवले. मारुती स्तोत्र कसे असते हे म्हणून दाखवण्यासाठी मी "भीमरूपी महारुद्रा" म्हणायला सुरुवात केली .आता माझ्या लक्षात आले होते की माझा आधारस्तंभ जॉन सुद्धा मनातून घाबरला आहे. आम्ही दोघे उसने अवसान गोळा करीत भुताच्या माळावर फाट्यावर येऊन पोहोचलो होतो.
समोर नाशिक सटाणा मेन रोड दिसत होता .एकही⬆ वळण नसलेला सरळ रस्ता !थोडासा उतारही होता .समोरच्या उतारावरून वाहने येत होती आणि बाजूने पुढे निघून जात होती 🚗🚙🚛🚚🚐.मी जॉनला म्हटले "मिळेल त्या वाहनाने जाऊ! पण आता इथे थांबायचे नाही" " होय साहेब !"जॉनलाही तेच हवे होते.
पाऊस चालूच होता. आम्ही दोघे उत्साहाने ,दोन्ही हात दाखवून गाड्या थांबवण्याचे प्रयत्न करीत होतो. गाडी यायची. आमच्या समोर आली की दुप्पट वेगाने पुढे निघून जायची. पुन्हा दुसऱ्या गाडीचे लांबून दिवे दिसले, की हात दाखवण्यासाठी🕺 आम्ही सरसावून पुढे यायचो, पण कोणतीच गाडी थांबत नव्हती. जॉन हताश होऊन म्हणाला," साहेब ! कोणतीच गाडी थांबत नाही .बहुतेक त्यांनाही हा भुताचा माळ माहीत असावा .त्यात आज अमावस्या !आता काय करायचे?" तेवढ्यात माझ्या डोक्यात वीज चमकली. "अरे ,हा भुताचा माळ! एका घोंगडी तुंन, आपण दोघेजण गाडी थांबवण्यासाठी,
आपले दोन्ही हात बाहेर काढतोय .एका घोंगडी तून चार हात, बघितल्यावर, या भुताच्या माळावर कोण गाडी थांबणार?" सर्व गाड्या 🚗🚙🚐दुप्पट वेगाने पुढे का निघून जात होत्या ,त्याचे कोडे आम्हाला उमगले होते. मी जॉनला म्हटले ,"आता भिजलो तरी चालेल! एका घोंगडीतून बाहेर येऊ या म्हणजे, आपण दोघे दिसलो की, येणारी गाडी थांबेल ".तेवढ्यात दूरवर एक गाडी उभी🚛 असल्यासारखी दिसली.ती, हळूहळू आमच्या जवळ येऊ लागली. बहुदा मोठा टेम्पो असावा .मी जॉनला म्हटले "मी चालत्या गाडीत चढावे लागले तरी चढतो, तू पण भिजत पटकन गाडीत चढ. आता इथे थांबायचे नाही " थोडा सावकाश चालणारा टेम्पो समोर आला आणि मी भिजतच ,धावत धावत ,केबिनचे दार उघडून पटकन आत शिरलो .जॉनला हात देऊन त्यालाही आत घेतले आणि सुटकेचा निश्वास सोडत, ड्रायव्हरच्या सीट कडे बघितले.
ड्रायव्हरच्या सीटवर कोणीच दिसत नव्हते आणि गाडी तर चालत होती .क्षणार्धात घाबरून मी जॉनला कसेबसे सांगितले "जॉन, पटकन खाली उतर. हे काहीतरी भयानक आहे ." त्याच्या पाठोपाठ मीही खाली उडी मारली. जॉनचा हात धरून म्हटले "चल ! या भुताच्या माळावरून धावत पुढे, लांब जाऊन उभे राहू पण इथे नको."जोरदार पाऊस चालू होता. हातात भिजलेलं घोंगडे होतं .गाडीच्या उजेडात भुताच्या माळावरचा सुन्न रस्ताही दिसत होता. मी वेगानं पुढचं पाऊल टाकणार, तेवढ्यात पाठीमागून माझ्या मानेवर एक हात आला. मुसळधार पावसातही, मला घाम फुटला आणि भलत्याच धारा वाहू लागल्या.
मागून आवाज आला "थांबा ! म्हणजे ,आम्ही आमची गाडी बंद पडली आहे, म्हणून ताकद लावून ढकलतोय आणि तुम्ही दोघे साहेबावानी, आरामात गाडीत बसत आहात?" मागे वळून बघितले तर टेम्पोचे ,बंद गाडी ढकलून दमलेले ड्रायव्हर आणि क्लीनर दिसले.👳👳♀
कधीकधी भुतं असतात ती ही अशी असतात!😈👹🤡👺💩 कॉपी-पेस्ट.

*लेखक: प्रमोद टेमघरे, पुणे*✒
🚩🚩🚩🚩🙏🌹🙏🚩🚩�