शिकार.........(भाग क्र - २)
वरून गळणार्या पाण्यामुळे त्याला काहीशी जाग येत होते....एक उग्र दर्प वातावरणात पसरला होता.....स्वप्नीलचे डोळे उघडले तेव्हा त्याला वरचे काळसर लाकडी छत दिसलं.....त्या चहामुळे त्याचं डोकं जड झालं होतं....तो किती तास बेशुद्ध होता काही कल्पना नव्हती....त्याने मान थोडी वर केली वरच्या बाजूला एक लोखंडी गोलाकार अँगल लावले होते त्यावर शेकडो मेणबत्या एकाच वेळी पेटत होत्या असे चार अँगल चारी कोपऱ्यात लावले होते....त्याच्या उजेड त्या खोलीत पसरला होता....मेणबत्तीच्या वितळता मेन खाली लोम्बत होता मेणबत्या स्तब्धपणे पेटून सगळा हॉल प्रकाशमान करत होत्या....स्वप्नीलची नजर डाव्या बाजूला गेली त्याचे डोळे विस्फारले...एक भलंमोठं कपाट...त्यात वेगवेगळ्या आकाराच्या काचेच्या बरण्या ठेवल्या होत्या....त्यात काहीसं पिवळसर द्रव होतं...पण त्या पिवळसर द्रव्यातून मानवी मुंडकी...हातापायाचे अवशेष स्पष्ट दिसत होते....एका मोठ्या बरणी मध्ये फक्त आणि फक्त मानवी ह्रदय कोंबून भरून ठेवली होती....एका एका बरणी मध्ये मानवी शीर बघून स्वप्नील प्रचंड शहराला....त्याच्या लक्षात आलं की त्याच्या तोंडावर एक कापडी पट्टी बांधली आहे.....स्वप्नीलने आपले अंग हलवले एक तीव्र कळ त्याच्या अंगात संचारली...त्या चहाची नशा आता जवळपास उतरत आली होती....त्याने आपले हातपाय हलवायला सुरू केले पण त्याने हा प्रयत्न करतात तीव्र वेदनांनी तो तळमळू लागला त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले....गळ्याच्या शिरा ताणल्या गेल्या.....त्याचे हात काटेरी तारांनी बांधले होते पाय रस्सीने आवळले होते..गळ्याभोवती एक काटेरी तार गुंडाळली होती.....हात हलताच त्या काटेरी तारा हातात घुसून रक्त काढत होत्या.....मान जास्त फिरवली तर मानेला त्या काटेरी तारा लागत होत्या..हाताला आणि गळ्याला त्या काटेरी तारे मुळेथोडं फार ओरबाडल..स्वप्नील सावरला...आपण कोणत्यातरी मोठ्या संकटात सापडलो आहोत ह्याची त्याला जाणीव झाली....तो आता ज्यूलीच्या जादूतून बाहेर आला होता
"काय चालू आहे हे??......हे काय करत आहेत माझ्यासोबत??....समोर कापून बरणीमध्ये ठेवलेली मुंडकी...काय प्रकार आहे हा??...माझी पण अशीच हालत होईल का??"
अनेक प्रश्न....शारीरिक विरोध करू शकत नव्हता नाहीतर त्या तारांनी आपलं काम केलंच असत.....सगळा प्रकार अमानवी अघोरी वाटत होता....त्याने बघितलेली ती मोठी हवेली...त्यातलं वैभव....आणि ती सुंदर ज्यूली.....जिला बघून स्वप्नील कालसर्प सारख्या भयानक जंगलात आला होता....झटक्यात एका झोपेत तो सगळा स्वर्ग आता नरक झाला होता....आणि त्याला आता शिक्षा चालू होती त्याच्या हाताला काटेरी तारा बांधल्या होत्या.....ज्यूलीची मोहिनी त्याला ह्या नरकात घेऊन आली होती.....पण ती कुठे आहे??...तिला शोधून तिच्याकडे आपल्या प्राणांची भीक मागावी....पण ती कुठे दिसत नव्हती....स्वप्नीलने आपली मान उजवीकडे फिरवली......भयाण.....हाडांचे सांगाडे पडले होते....काही मोठ्या बाहुल्या रोखून त्याच्याकडे बघत होत्या....चार पाच फुटाच्या बाहुल्या...त्यांच्या अंगावरचे जीर्ण झालेले कपडे....त्याचे ते रंगवलेले पांढरे डोळे भयानक वाटत होते.....बाजूला कसल्या तरी राखेचा ढीग पडला होता....त्या बाहुल्याच्या वरती छोट्या छोट्या बरण्या होत्या काही झाडाची वाळलेली खोडे वरती लटकवली होती.....त्या बाहुल्या कधीही धावत येऊन स्वप्नीलला संपवतील अश्या आविर्भावात त्याच्याकडे रोखून बघत होत्या....कुबट वास तर श्वास गोठवणारा होता....स्वप्नीलने परत मान सरळ केली....डोळ्यातून अश्रू वाहत होते....असह्य होता....कदाचित ही त्याची शेवटची रात्र असेल....ज्यूली आणि ऍडम कोण आहेत?? नक्कीच ते चांगले नाहीत....आपण फसलो गेलो आहे....कदाचित हे लोक काळा जादू करणारे असतील....पण त्यांनी मलाच का पकडले?? अनेक अनेक प्रश्न....पण प्रश्नांना उत्तरे देणारं कोणीच नव्हतं.....अचानक कसला तरी आवाज आला....लाकडी फ्लोरवर कुणीतरी पाय आपटत येत होतं.....स्वप्नीलने शक्य तितकी मान उचलली....एक काटेरी तार त्याच्या गळ्याभोवती होती त्यामुळे त्याने शक्य तितके डोके उचलले.....धिप्पाड शरीरयष्टीचा ऍडम येत होता.....कदाचित त्यानेच स्वप्नीलला इथे ह्या काटेरी तारांनी बांधले असेल....तो स्वप्नीलकडे बघत स्मितहास्य करत येत होता....स्वप्नीलची असह्य नजर आपल्या डोळ्यांची बुबुळे फिरवून त्याला ह्या बंधनातून मुक्त करायला विनंती करत होती....थोडी दयनीय वाटत होती.....त्याच्या असह्य डोळ्यातील अश्रू त्या ऍडमला अजून खुश करत होते....त्याने स्मितहास्य करत बाजूच्या बरणीत हात घातला आणि....त्या बरणीमध्ये भरून ठेवलेलं ह्रदय ...त्यातलं एक घेऊन निर्दयीपणे खाऊ लागला....त्याचे पांढरे दात रक्ताने लाल होत होते....हे सगळं बघून स्वप्नीलचे डोळे विस्फारले....आपलं पुढे काय होणार हे स्वप्नीलला कळून चुकलं होतं....त्याने एकवार डोळे घट्ट मिटून घेतले.....कुठे आपण ह्या नरभक्षक माणसाच्या तावडीत सापडलो.....आता इथून सुटका नव्हतीच.....अजून काही पावलांचा आवाज येऊ लागला स्वप्नीलने मान वर करण्याचा प्रयत्न केला पण त्या मोठ्या हॉल मध्ये ती कुठेच दिसत नव्हती.....तो पावलांचा आवाज कधी ह्या कोपऱ्यातून कधी त्या कोपऱ्यातून येऊ लागला....ऍडम मात्र स्वप्नील कडे बघत हसत राहिला.....भीतीने स्वप्नीलचे अंग घामाने भिजले होते.....तो नाजुक पावलांचा आवाज नक्कीच ज्यूलीचा होता.....कदाचित ती आपल्याला इथून सोडून देईल....आपण गरीब अनाथ....आपल्याकडून तिला काय मिळणार होते??तिला विनवणी करू.....म्हणून स्वप्नीलची भिरभिरती नजर तिला शोधू लागली....पण ती त्या मोठ्या हॉल मध्ये दिसत नव्हती....अचानक कसलं तरी संगीत सुरू झालं....ग्रामोफोन जोरात वाजत होता....त्यामधून एक कर्कश मंत्र आणि एक कर्कश संगीत वाजत होते.....स्वप्नील आपल्या डोळ्यांनी गयावया करत होता.....अचानक त्याच्या समोर ज्यूली आली.....तिने स्वप्नीलकडे बघत स्मितहास्य केलं....तिला बघून स्वप्नीलचे डोळे विस्फारले.....ज्यूलीने स्वप्नीलच्या कपाळावर किस केलं....आणि त्याच्या तोंडाला बांधलेले कापड खोलले....ते कापड खोलताच स्वप्नीलचा गयावया करणारा आवाज बाहेर पडला......
"plz....मला सोडा....मी तुमचं काय बिघडवल आहे...."
स्वप्नील एवढंच बोलू शकला आणि ज्यूलीने परत त्याच्या तोंडावर कापडाची पट्टी लावली
"शू ssssssss......तू आता माझ्या मालकाच्या शरीराचा एक भाग बनणार आहेस......"
एवढं बोलून ज्यूलीने त्या पलंगाच्या खाली हात घातला आणि काहीतरी फिरवू लागली.....कर्रर्रर्रर्रर्रर्र कर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज घुमू लागला तसा तो बेड वर वर येऊ लागला.....हॉस्पिटलप्रमाणे तो बेड वर वर येत सरळ झाला.....
"ते बघ माझे मालक.....तुझे सुंदर आणि तगडे पाय त्यांना जोडायचे आहेत.....म्हणून तू इथे आहेस"
ज्यूलीचे बोट समोर होते....स्वप्नीलला सगळं बघून फक्त हार्ट अटॅक येणं बाकी होतं....समोरच्या लाकडी फ्लोरवर रक्ताचा सडा पडला होता....लालभडक असा तो लाकडी फ्लोर आणि समोर एक अमानवी गोष्ट.......एका राखेच्या ढिगाला मानवी देहाचा आकार दिला होता.....त्याचा अर्धा देह राखेने बनवल्यासारखा होता.....त्या राखेच्या ढिगाऱ्याला एक मानवी कवटी जोडलेली होती.....त्या कवटीच्या डोळ्याच्या खोबण्या रिकाम्या नव्हत्या त्यात कुणाचे तरी डोळे काढून बसवले होते त्या डोळ्यांची हालचाल होत होती......त्या राखेच्या देहाचे दोन्ही हात मानवी होते आणि थोडीफार हालचाल करत होते.....ते हात कमालीचे बलदंड आणि कसलेले वाटत होते जणू एखाद्या बॉडीबिल्डरचे हात कापून त्या राखेच्या देहाला शिवले असावेत....छाती आणि पोटावर सिक्स पॅक ....जणू कुण्या एका धिप्पाड व्यक्तीची त्वचा त्या राखेच्या देहाला शिवली होती..एक पुरषी लिंग देखील त्या राखेच्या देहावर शिवले होते....पण त्याचे पाय मात्र रिकामे होते म्हणजे पायाच्या जागी आधाराला एक हाड होते....म्हणजे.....म्हणजे तिथे स्वप्नीलचे तगडे पाय बसणार होते??.....स्वप्नीलचे डोळे विस्फारले तो त्या तोंडाला बांधलेल्या जाड कापडी पट्टी मधून ऊऊ ऊऊ ऊऊ करत गयावया करू लागला
ज्युलिचे बोट खाली झाले....ती त्या अमानवी राखेच्या देहासमोर झुकली तिने हाताची विशिष्ट मुद्रा करून त्या अर्धवट देहाला वंदन केले....तो राखेचा देह जिवंत होता त्याने आपली बोटे उंचावून तिचे अभिवादन स्वीकारले
सन 1868.....तेव्हापासून आमचे गुरू राख होऊन पडले होते.....वुडू विद्या ज्यांनी आमच्या पूर्वजांना शिकवली असे आमचे पूर्वज आज जागे होणार....आज पौर्णिमेचे ग्रहण आहे....शेकडो वर्षे आज ह्या दिवसाची आम्ही वाट बघितली.....राख पिढ्यानपिढ्या जपली....आमच्या पूर्वजांनी ह्या राखेचे पावित्र्य आणि आमच्या गुरुचे अस्तित्व जपण्यासाठी अनेक लोकांची बळी दिली....आणि ही राख जिवंत ठेवली अश्या आमच्या सर थॉमस यांना नवजीवन देण्याचे काम आम्हाला मिळाले....आणि ते आम्ही पूर्ण करत आहोत.....त्या राखेला जिवंत ठेवण्यासाठी 67 जणांचा जीव दिला त्या राखेचा कण कण जिवंत ठेवला....आज ह्या लाल पौर्णिमेला तुझे हे सुंदर पाय जोडून आम्ही सर थॉमस यांचा एक परिपूर्ण देह बनवणार आहोत......आज रात्री नंतर ते परत जिवंत होतील....आम्ही आमचं वचन पूर्ण केलं...(ज्युलिच्या हातातील घड्याळात गजर वाजला...तो बघून ती ताडकन उठली)...ऍडम खूप वेळ झाला आहे....आपल्याला अजून दोन विधी करायचे आहेत आधी ह्याचं काम घे"
"अरे आवर पटकन.....चंद्र लाल होईल लवकरच"
ज्यूलीच्या ह्या आदेशाने ऍडम धावत आतल्या खोलीत गेला आणि त्याने आतून एक मोठी धारदार कुर्हाड आणली.....आणि कसलाही विचार न करता.....जिथून पाय सुरू होतो म्हणजे मांडीच्या वरती कुर्हाड तिरपी करून घाव घालू लागला.....रक्ताची चिळकांडी उडत होती....त्या उडत्या रक्ताने ऍडम आणि ज्यूली न्हाऊन निघत होती....झाडाच्या खोडावर घाव घालावेत तसा ऍडम स्वप्नीलच्या पायावर घाव घालत होता.....स्वप्नील जिवाच्या आकांताने किंचाळत होता......सर थॉमसच्या कवटीचा जबडा हालत होता....त्यांना मानवी किंचाळीचे आवाज प्रचंड आवडत असत.....ज्यूलीला आपली चूक लक्षात आली तिने स्वप्नीलच्या तोंडावरील कापड बाजूला काढले.....तो जोरात किंचाळत होता.....त्या जोराच्या किंचाळण्याने ती खोली घुमली होती.....स्वप्नीलचे ते जोराचे ओरडणे ज्यूलीला सहन होत नव्हतं....तिने कानात हेडफोन घालून मोठ्या आवाजात गाणी ऐकायला सुरवात केली.....मोठ्या कुऱ्हाडीचे पाच सात घाव....स्वप्नीलचा पाय वेगळा शरीरापासून वेगळा झाला होता.....वेदनेने तो इतक्या जोरात ओरडत होता की हेडफोन मधील गाण्याच्या मोठ्या आवाजातून देखील तो आवाज ऐकू येत होता.....स्वप्नील किंचाळत होता ....त्याचा पाय तुटून गेला होता....ज्यूलीने त्या पायाची रस्सी खोलली आणि तो तुटलेला पाय सर्व ताकतीने आपल्या खांद्यावर लादला आणि ऍडमला म्हणाली
"हा दुसरा पाय पण तोडून आण लवकर....वेळ कमी आहे आपल्याकडे"
ऍडमने मान हलवली.....ज्यूलीने तो पाय घेतला आणि थॉमसच्या राखेच्या शरीराजवळ आली.....त्या राखेच्या शरीरातून एक टोकदार हाड बाहेर आलं होतं त्यात तिने तो पाय घुसवला....त्यावर एका निळ्या झाडाच्या पानाचा लेप लावला..तिच्या तोंडून अविरत मंत्रविधी सुरू होता....स्वप्नीलचा पाय तिने नीट बसवला त्यावर तिने बाजूच्या बाटलीतले रक्त ओतले थॉमसचे राखेचे अंग थोडं फार मानवी होत होत....काहीसा चामडी आकार आला होता त्या चामड्याच्या पकडून आणि स्वप्नीलच्या पायाचे चामडे पकडून ज्यूली एका मोठ्या सुईने टाके घालू लागली....तिने आपल्या दातात एक मानवी हाड पकडले होते.....ग्रामोफोनचा आवाज आणि स्वप्नीलची आर्त किंचाळी सहन न झाल्याने तिने कानात हेडफोन घातला होता आणि ती तोंडावर स्मितहास्य ठेवून काम करत होती जाड चामडी धाग्याने तो पाय आणि नवीन बनलेल्या राखेच्या त्वचेला शिवून एक करत होती......विधी नुसार 4 मानवी अवयव दहन राखेच्या आकृतील जोडायचे होते.....हात,छाती,लिंग आणि आता हे स्वप्नीलचे पाय.....सगळ्या अटी पूर्ण झाल्या होत्या...ह्या विधीनंतर पूर्ण शरीराने सर थॉमस जिवंत होणार होते....चंद्र पूर्ण लाल व्हायला फक्त काही वेळ बाकी होता.....थॉमस जिवंत होणार होता.....18 व्या काळातला तो सगळ्यात प्रसिद्ध आणि गूढ वुडू जाणकार होता थॉमस....थॉमस आणि त्यांची विद्या सोबत असली म्हणजे अमर्याद आयुष्य..... फक्त काही तास.....अमानवी अमाप शक्ती आणि पुरातन काळी विद्या आपल्या आधीन होणार....हा विचार करत असताना ती कमालीची खुश होती..अनेक वर्षाचे कष्ट आज सफल होणार होते....आपल्या मुख्य गुरूंना जिवंत करण्याचा मान ज्यूलीचा मिळणार होता.......तिने स्मितहास्य करत सुटकेचा निश्वास सोडला
अचानक तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या.....तिचा शिवणारा हात जागेवर थांबला.....एक मानवी कवटी दोन तीन टप्पे खाऊन तिच्या पायाशी येऊन पडली होती.....काय झालं तिला समजलच नाही.....तिने त्या पलंगाच्या दिशेला गर्रकन मान फिरवली....तिकडूनच ती कवटी तिच्याकडे कुणीतरी फेकली होती.....तिने समोर बघितलं......थॉमसच्या कवटीची दातं एकामेकावर कडकड वाजत होती......ज्यूली प्रचंड घाबरली होती
समोर स्वप्नील उभा होता.....एका पायावर....दुसऱ्या पायाच्या जागून रक्त वाहत होतेच....त्याने त्या काटेरी तारातून आपले हात ओढून काढले होते आणि नंतर आपली मानदेखील त्या काटेरी तारांमधून सोडवून घेतली होती.…...त्याने अक्षरशः त्या काटेरी तारातून आपले हात ओढून काढले होते हात अगदी रक्तबंबाळ झाले होते.....मगाशी पाय कापल्यामुळे विव्हळणारा स्वप्नील एका पायावर स्तब्ध स्मितहास्य करत उभा होता.....त्याने ज्यूली कडे बघून शिळ घालायला सुरवात केली...ज्यूली पुरती हादरून गेली होती हा नेमका काय प्रकार सुरू आहे हे तिला कळत नव्हतं
"ऍडम कुठे गेला???"
क्षणभर हा प्रश्न तिच्या मनात आला पण त्याच उत्तर तिला मिळालं होतं....खाली ऍडमचे कपडे पडले होते....जळत होते.....एक राखेचा ढीग बाजूला पडला होता......त्या ढिगाच्या बाजूला स्वप्नील उभा होता.....एकापायावर अगदी स्थिर.....एखाद्या योध्यासारखा आपल्या जखमी हाताच्या रक्ताळलेल्या मुठी आवळून......वेदनेची एक रेष त्याच्या तोंडावर दिसत नव्हती......उलट काही तरी जिंकल्याचं विजयी समाधान स्वप्नीलच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.....स्वप्नीलच्या अंगातून हलकासा धूर निघत होता आणि त्याच्या हाताला काटेरी तारांच्यामुळे ज्या जखमा झाल्या होत्या त्या गायब होत होत्या......बाजूला पडलेली राख बघून ज्यूली प्रचंड घाबरली....ही राख तिला परिचित होती....तिनेच काही वर्षांपूर्वी सर थॉमसच्या अश्या राखेवर विधी करून त्यांना जिवंत करण्याचा प्रयत्न चालवला होता आणि तोच प्रयत्न आज शेवटच्या टप्प्यावर होता.....पण आता मात्र बाजी पलटली होती.....स्वप्नीलने धिप्पाड निर्दयी ऍडमला क्षणात राख करून टाकलं होतं.....कदाचित अश्याच एका ताकतीने सर थॉमस यांना सण 1868 साली राख केलं असावं.....तीच विद्या घेऊन स्वप्नील इथे आला असावा.....पण हा इथे कसा आला आता?? म्हणजे हा सर थॉमस यांना धोका पोहचवू शकतो......नाही नाही.....कित्येक पिढ्या आम्ही सर थॉमस यांना जिवंत करण्यात घालवल्या आहेत.....सर थॉमस यांची वुडू विद्या आमच्या काळ्या जादूच्या संप्रदायाला नवसंजीवनी देईल....असे अनेक विचार झटक्यात ज्यूलीचा मनात येऊन गेले.....तिने बाजूच्या टेबलाकडे हात नेला आणि तिथून एक आधुनिक पिस्तुल उचलली.......स्वप्नीलने धिप्पाड अश्या ज्यांच्याकडे 10 पुरुषांची ताकत होती अश्या ऍडमला संपवलं होतं त्यामुळे आता स्वप्नीलला संपवायला असे आधुनिक हत्यारच कामाला येणार होत.....ज्यूलीने पिस्तुल स्वप्नीलच्या दिशेने रोखलं.....स्वप्नील शांत उभा होता.....मागून सर थॉमस यांच्या कवटीच्या दातांचा आवाज सुरू होता.....त्यावरून तर ज्यूलीला कोणता तरी आदेश देत होते....ज्यूलीने पिस्तूलाचा चाप दाबला पण बंदुकीतून गोळी सुटायच्या आत स्वप्नीलने पूर्ण ताकतीने एक एक लाल भडक तप्त असा छोटा खडा तिच्या अंगावर फेकला......तिकडून ज्यूलीची गोळी सुटली होती पण काही अंतरावर हवेतच स्थिर झाली होती....ज्यूली देखील एखाद्या दगडी पुतळ्याप्रमाणे जागेवरच गोठली होती.....तिला त्या अवस्थेत बघून स्वप्नील आपल्या एका पायाने लंगडत लंगडत तिच्याजवळ येत होता.....स्वप्नील त्या हवेतच स्थिर झालेल्या गोळीकडे बघत बघत लंगडत तिच्या समोर पोहोचला...त्या जादुई मंत्रीत खड्याने आपलं काम केलं होतं....ज्यूली जागेवरच गोठली होती...आतापर्यंत त्याच्या अंगावरचे सगळे घाव भरून गेले होते.....स्वप्नीलने जागेवरच गोठलेल्या ज्यूलीच्या गालावरून ओठावरून हात फिरवायला सुरू केले
"उफफ्फ काय दिसतेस तू.......पण मला माहित आहे हे सगळं नकली आहे....आतून तू 100 वर्ष्याच्या पुढची आहेस....सगळं काही बनावट.....वरून सुंदर दिसणारी तू...आतून तू एखादी कृश विद्रुप अशी चेटकीण असशील.... "
स्वप्नीलने ज्यूलीच्या कपाळावर बोट ठेवले आपले डोळे बंद केले....जणू तो ज्यूलीचा इतिहास तपासात होता.....
"आतापर्यंत तू 148 पुरुषांना आपलं शिकार बनवलं आहेस.....त्याचा देह त्यांच्या आत्म्याची ताकत आपल्यात ओढून चिरतरुण राहिली आहेस....आता तुला अमर व्हायचं आहे...म्हणून तू ह्या थॉमस अँडरसनला जिवंत करत आहेस त्याच्या विद्या शिकण्यासाठी.......गुड.....पण आता ते शक्य नाही कारण सगळ्यात मोठा शिकारी आता इथे आला आहे.....तुमच्या थॉमसला विचारा मी कोण आहे.....वास्तविक.....तू माझी नाही. मी तुझी शिकार करत होतो....कित्येक दिवस मी एका ताकतवान शक्तीच्या शोधात होतो....माझ्या मंत्र विद्येने तुला कधीच हेरलं होतं.....आणि तुझा आणि थॉमसचा काही संबंध आहे हे माझ्या विद्येने जेव्हा लक्षात आलं तेव्हा तू जेव्हा पुण्याच्या एका ब्युटी पार्लर मध्ये आली होतीस तेव्हाच मीच तुझ्या मनात माझ्याबद्दल आकर्षण निर्माण केलं.....आणि आज मी इथे आहे.....तुम्ही हे ट्रान्ससेलव्हेनियाचे घर आपल्या जादुई ताकतीने सोबत घेऊन फिरता कुठेही ह्या पूर्ण घराबरोबर स्थलांतर करता ज्याचा पत्ता माझ्या सारख्या अघोरीला सुद्धा सगळी ताकत लावून लागत नाही...कमाल आहे..हीच विद्या मला शिकायची होती....पण आता त्याची काही गरज नाही...तुझ्या देहाबरोबर ही सगळी विद्या आता माझी होईल.....आता ह्या शापित घराचा नवीन मालक मी होईन......आता तुझी वेळ आलीय ह्या घराच्या कागदपत्रावर सही करायची...आणि इथून कायमची जायची"
अस बोलून स्वप्नीलने तिची खाली झुकलेली हनुवटी वर केली.....तो तिच्या डोळ्यात बघून लागला...त्याच्या तोंडून काहीसे अघोरी मंत्र निघू लागले..स्वप्नीलचे डोळे लालसर होऊ लागले......डोळ्यातून काहीसा हिरवट धूर निघू लागला......तिकडे ज्युलिच्या देहातून धूर निघू लागला.....तीच अंग गरम होऊन पेट घेऊ लागलं.....त्या पेटत्या आगीचा सगळा धूर स्वप्नीलच्या आ केलेल्या तोंडात जाऊ लागला....तिच्या शरीराने पूर्णपणे पेट घेतला होता.....तिच्या शरीराची राख होत होती.....खाली पसरत होती....एखादा कागद पेटवा तसा तिचा देह पेटून खाक होत होता......अनेकांचे देह खाऊन बसलेली ती....तिचा देह धुररूपी खाताना स्वप्नीलचे डोळे जळजळत होते......पण चेहऱ्यावर एक स्मितहास्य होते ज्युलिच्या अनेक विद्या तो आत्मसात करून बसला होता......धूर वेगाने स्वप्नीलच्या तोंडात जात होता खाली ज्युलिची राख पडत होती.....अखेर राखेचा एक ढीग आणि त्यावर ज्युलिची कवटी पडली होती...स्वप्नीलने डोळे बंद केले....एक अद्भुत ताकत त्याच्या अंगात संचारली आहे असं वाटत होतं...ह्या अमाप ताकतीमुळे त्याचा तोडलेला पायही परत उगवला होता....नवीन पाय झटकून..तो आता बाजूच्या सोफ्यावर बसला आणि एक कुस्सीत स्मितहास्य करत अंगावर वेगवेगळे मानवी अवयव शिवलेल्या थॉमसकडे बघू लागला....स्वप्नीलने खिडकी मधून बाहेर बघितलं.....चंद्रग्रहण सुरू झालं होतं....आकाश जवळपास लालभडक झालं होतं.....ह्या रक्त चंद्रग्रहणाची वाट अनेक अघोरी लोक करत असायचे......आता त्या भयानक खोलीत दोघेच होते......स्वप्नील चंद्र पूर्ण लाल होण्याची वाट बघत होता......सर थॉमसच्या कवटीत बसवलेले निळे डोळे भेदरल्यासारखे वाटत होते......स्वप्नील समोरच बसला होता
"थॉमस अँडरसन.......वुडू विद्येचा बेताज बादशाह.....तू 17 व्या शतकात एका राजाला आपल्या जाळ्यात ओढून आफ्रिकेत जो नरसंहार घडवला होतास तशी हिंसा आजपर्यंत कोणीच घडवली नसेल....1868 साली मी भुकेने व्याकुळ होऊन जेव्हा आफ्रिकेत आलो तेव्हा तुझ्या क्रूरतेचे अनेक किस्से मी ऐकले होते....तुझा देह खाऊनच मी आतापर्यंत जिवंत आहे....खरच तू खूप ताकतवान आहेस... तेव्हा पण अशीच पोर्णिमेचे ग्रहण होते....काही मिनिटात मी तुला राख केलं होतं.....त्यामुळे जास्त ओळख नाही झाली.......माझं वय तस 1200 वर्षे आहे..आधीच नाव विनायक होतं...आमच्या मठात दैवी विद्येचा वापर करून त्याला स्वतःच्या स्वार्थासाठी अघोरी विद्येत रूपांतरित करणारा मी..खूप स्वार्थी होतो....मी राक्षसी साधना करत आहे हे माझ्या गुरूंना कळलं..तेव्हा माझ्या गुरूंनी मला मठातून बेदखल केलं.....पण अमाप विद्या....आणि अमर्यादित आयुष्य जगण्याची चटक लागलेला मी.....अघोरी साधना करू लागलो.....त्यात थोडं फार यश मिळवल्यानंतर पूर्ण मठाला राख करून सैतानाला खुश केलं..माझ्याच गुरूंना मारून टाकलं....अप्रतिम अनुभव असतो तो....आपल्याच लोकांना ठार करणे त्यांची विद्या आपल्यात ओढून घेणे.....खरोखर अमर्यादित जीवन खूप सुंदर असत....तू आणि मी त्याच अमर्यादित आयुष्यासाठी लोकांचे जीव घेत असतो....हा अनुभव दोघांनाही आहे.....पण तू सामान्य लोकांची शिकार करतो आणि मी तुझ्या सारख्या शिकार्याची......तुमच्यासारख्या क्रूर आत्मा मला निरोगी दीर्घायुष्य देतात......."
आपला शब्द थांबवत स्वप्नीलने आकाशाकडे बघितलं आकाश पूर्ण लाल झालं होतं.....रक्तचंद्रग्रहण सुरू झालं होतं.....लाल उजेड थॉमसच्या देहावर पडला होता......थॉमसच्या गळ्याभोवती ज्या निळ्या रंगाचा वनस्पती लावल्या होत्या त्या विरघळत होत्या थॉमसच्या अंगात शिरत होत्या.....थॉमसचा देह मानवी होत होता.....लालचंद्राच्या प्रकाशाने प्रत्येक अवयवात त्या राखेच्या देहात जीव येत होता....त्याचं शरीर आकार घेत होत.....कवटी भोवती मास गोळा होऊन चेहरा आकार घेत होता....थॉमसच्या अंगाला बांधलेल्या निळ्या वनस्पती लाल चंद्राच्या उजेडाने आपलं काम करत होत्या.....थॉमसच्या देहाला आकार देत होत्या......थॉमसच्या तोंडून किंचाळी निघत होती.....राखेचे रूपांतर एका देहात होत होते....ज्यूलीने जोडलेले बलदंड हात,छाती ह्यामुळे थॉमस एक धिप्पाड आणि आकर्षक देह वाटत होता....स्वप्नीलचा एक पाय तो ही आकर्षक वाटत होता.....नवीन मिळालेला देह थोडा अशक्त होता.....एकच पाय असल्याने आणि अंगात अशक्तपणा आल्यामुळे थॉमस खाली कोसळला.....मानवी शरीरात थॉमसचा प्रवेश झाला होता....स्वप्नील थॉमस जवळ गेला त्याच्याकडे बघून म्हणाला
"पूर्वी जसा होतास तसाच आहेत......अमर्याद अमर आयुष्य खरच कमाल आहे....मला दिसतंय माझं आयुष्य फक्त 80 वर्षे राहील आहे पण आज तुझ्या शक्तीने ते 580 होईल....मानवाची उत्क्रांत त्याची बदलत चाललेली सुखी जीवनपद्धती मला जगता येईल.....आणि......"
पुढे काही बोलायच्या आधी थॉमसने सर्व ताकतीने बाजूला पडलेला एक चाकू घेऊन स्वप्नीलच्या कवटीतून आरपार घुसवला होता.....प्रश्नार्थक नजरेने तो स्वप्नीलकडे बघत होता.....तो स्तब्ध उभा होता डोक्यातून रक्त वाहत होत.....थॉमस स्वप्नीलकडे बघत होता....स्वप्नीलने थॉमसचा हात घट्ट पकडला.....हाताची पकड मजबूत होती त्यामुळे अशक्त थॉमसला ती पकड सोडवता आली नाही.....स्वप्नीलने हसत हसत तो चाकू आपल्या डोक्यातून ओढून काढला.....रक्ताची चिळकांडी उडत होती
"थॉमस.....मला नाही रे वेदना होत...मी माणूसच नाही उरलो आता..तुला मी लढायला पूर्ण संधी दिली असती पण मी हे आता करू शकत नाही....हे ग्रहण संपायला फक्त 5 मिनिटे बाकी आहेत.....आणि तुला माझ्यात घेतलं तर मी माझं अमर्याद जीवन जगू शकेन.....आणि धन्यवाद बरं का....तू इथे आलास आणि मला अजून 200 वर्षे तरी आयुष्य देऊन गेलास"
स्वप्नीलचे डोळे परत लाल झाले....ओठांची हालचाल सुरू झाली.....कसले तरी मंत्र तो पापणी न मिटता म्हणू लागला.....चंद्र आपला लाल रंग सोडत होता.....ग्रहण संपत होतं.....स्वप्नीलने डोळे मोठे केले....सर थॉमस तडफडू लागला...पण स्वप्नीलच्या घट्ट मजबूत पकडीमुळे त्याला हलता येत नव्हते.....त्याच्या नग्न अंगातून धूर निघू लागला.....आग पेटत चालली होती...थॉमसच अंग लाल होऊन करपू लागलं होतं.....निघणारा धूर आणि थॉमसने गिळंकृत केलेली सगळी ताकत स्वप्नीलच्या तोंडात जात होती......काही क्षणात थॉमस ची राख झाली.....अमाप ताकत आणि ऊर्जा आपल्या शरीरात खेचून स्वप्नील धापा टाकू लागला....अनेक काळ्या वुडू विद्या डोक्यात घुमत होत्या....त्या विद्याना नवीन घर मिळालं होतं.....स्वप्नीलचं डोकं जड होऊन दुखत होतं.....काही वेळातच तो सामान्य झाला.....त्या कुबट कुजक्या खोलीतून बाहेर आला....आता एक मोठं अमाप आयुष्य आणि ही मोठी सुंदर आलिशान हवेली.....आज त्याने खूप मोठा हात मारला होता.....त्या अलिशान हवेलीचा प्रत्येक कोपरा न्याहाळत होता....चेहऱ्यावरचे स्मितहास्य काही केल्या कमी होत नव्हते....अचानक त्याच्या मोबाईलची रिंग वाजली
"हॅलो स्वप्नील.....सावंत सर बोलतोय.....उद्या आपण प्रॅक्टिस साठी लवकर जायचं आहे लक्षात आहे ना??"
"ओहहह....सॉरी.....हा ज्याचा मोबाईल आहे त्याचा आताच अपघात झाला आहे....बॉडीचा चेंदामेंदा झाला आहे....तो ह्या जगात नाही आता...तुमचा स्वप्नील"
"क...क...काय??.....कुठे.....कुठे झालाय स्वप्नीलचा अपघात?? तुम्ही कोण बोलताय??"
"मी एक वाटसरू आहे...हायवे नंबर 17 वर हा अपघात झाला आहे.....माझं माझं नाव"
ह्या आलिशान हवेलीत विनायक उर्फ स्वप्नील एक राजेशाही आयुष्य जगणार होता....नवीन आयुष्याला सुरवात करणार होता.....नाव सुद्धा नवीन....
"माझं नाव ..स...सर्वेश....."
अस बोलून त्याने मोबाईल आपटून फोडून दिला....आता रूप बदलणारी...चिरतारुण्य राहणारी वुडू विद्या त्याला ज्यूली आणि थॉमस कडून आत्मसात झाली होती....त्यातल्या एका वुडू विद्येचे मंत्र तो पुटपूटु लागला....त्याने डोळे अर्धवट बंद करून काहीसे मंत्र म्हंटले....त्याची त्वचा काहीशी लूज पडू लागली....त्या त्वचेला तो आपल्या अंगावरून ओढून काढू लागला....साप आपली कात टाकून ज्याप्रमाणे आपल्या सगळ्या व्याधी दूर करतो त्याप्रमाणे स्वप्नील आपली त्वचा ओढून काढू लागला......कागद फाडल्याप्रमाणे ती त्वचा फाटून आत एका वेगळ्याच रंगाची त्वचा दिसत होती....त्याने आरश्यात बघितलं....पूर्णपणे वेगळं रूप....अगदी सुंदर...जशी ज्यूली होती तसाच काहीसा सुंदर आणि राजस स्वप्नील उर्फ सर्वेश दिसू लागला.....एक नवीन आयुष्याला सुरवात करायची होती एका नव्या जागेत...तो हॉल मध्ये उभा होता...अंगावरची त्वचा काढून टाकल्यामुळे त्याच्या अंगावर कपडे नव्हते...तो एका कोपऱ्यात गेला...ज्यूलीच्या त्या शिलाईमशीन जवळ....ज्यूलीच्या सगळ्या विद्या आता त्याला आत्मसात होत्या...अगदी तिच्याप्रमाणे टेलरकाम सुद्धा.....त्याने आधी आपल्यासाठी छानशी पॅन्ट शिवून घेतली.... अंगावर ज्यूलीने सर थॉमस साठी शिवलेला कोट चढवला..आणि ही आलिशान हवेली मालकाच्या इच्छेने कुठेही स्थलांतरित होते हे स्वप्नीलला माहीत होते....त्याने परत डोळे बंद केले आणि ह्या आलिशान हवेलीला स्थलांतरणाचा आदेश दिला.............(समाप्त)
लेखन :- शशांक सुर्वे

पहिल्या भागाची लिंक