अमावस्येचा थरार
"आणि जोपर्यंत त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही लोक त्याला साफ थोतांड, खोटं मानतात,...!"
"किंवा हसतात देखील ..!"
"पण आज मी जो माझ्या आयुष्यात घडलेला सत्य अनुभव सांगतेय!
यावर कोणी किती विश्वास ठेवायचा!
किंवा ठेवायचाच नाही!!
हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे."
"सगळ्यांनाच माहीत आहे ३१मार्च२०२२ रोजी दर्श अमावस्या प्रारंभ झाली...!"
"आणि माझ्यासोबत तो प्रसंग घडला १एप्रिल२०२२
त्या दिवशी फाल्गुन अमावस्या सकाळी पर्यंत ११:५३
होती..."
"अर्थात हे सगळे डिटेल्स देण्याचा उद्देश हाच की अमावस्या तिथीचा,पौर्णिमेचा किंवा तत्सम इतर दिवसांचा व्यक्तीच्या जीवनावर काही प्रमाणात चांगला वाईट प्रभाव दिसून येतो हे आज विज्ञानानेही सिद्ध केले आहे..!
त्याच उत्तम उदाहरण म्हणजे अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात प्रचंड उलथापालथ घडवून आणणारी भरती आणि ओहोटीची प्रक्रिया..!
पूर्वीच्या काळी ग्रीस आणि रोम मधील तत्ववेत्त्यांना असे वाटत असे की,"
"ज्याप्रमाणे सागराला भरती ओहोटी येते त्याचप्रमाणे आपल्या मेंदूतील द्रवाला देखील भरती ओहोटी येत असावी...",
.... "म्हणूनच जेंव्हा केंव्हा चंद्र आकाशात येतो तेंव्हा
चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे समुद्राला भरती ओहोटी येते अन् मनुष्य प्राण्याच्या वर्तनात अचानक विचित्र बदल दिसून येतो….!"असे या तत्ववेत्त्यांचे मत होते.
असो,
"अधिक विषयांतर न करता मी तुम्हाला आजच्या अमावस्या दिवशी मला आलेल्या सत्य अनुभवाबद्दल सांगते...!"
"आज माझ्या दिवसाची सुरुवात तशी रोजसारखीच प्रसन्नतेने झाली...!
घरातले सगळे काम आवरून मी माझ्या शॉपमध्ये आज दुपारी थोड लवकरच आले....,
कारण उद्या गुढी पाडवा..!;
मराठी नूतन वर्ष प्रारंभ होणार...!!
म्हणून मी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शॉपमध्ये साफसफाई करायला घेतली...
सर्व साफसफाई पूर्ण होईपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते,
सर्व स्वच्छ अवरून जरा निवांत बसले,
"आता घरी जाऊन मस्त फ्रेश होऊन जेवण वगेरे करू अस मनात ठरवले..!"
"मी शॉप मध्ये होते तोपर्यंत सगळे काही नॉर्मल होते...!"
तेवढ्यात काही वेळात माझ्या भावाचा मला कॉल आला...!
तो म्हणाला,
"ताई आत्ता मला अर्जंट एक मशीनची डिलिव्हरी द्यायला जायचं आहे ...गावी!(म्हणजे माझ्या सासरी जे इथून १२ किलो मीटर अंतरावर आहे...)
उद्या पाडवा असल्याने माझी धावपळ राहील,म्हणून उद्या इतक्या लांब यायला जमणार नाही.
मग ते उद्याच काम आजच कंप्लीट करून घेतोय मी,
अनायासे मी तुझ्या सासरी जातोच आहे तर मग तुलाही सासरच्या मंडळींना भेटायला यायचं का?
येणार असशील तर मला कळव तसे लगेच...!"
अस म्हणून त्याने कॉल कट केला.
"पण आता रात्रीचे नऊ-सव्वा नऊ वाजले होते.... !"
"अन् त्यातल्या त्यात आजची दर्श अमावस्या पण असल्याने मी थोडं विचारात पडले की, जावे की न जावे...?"
"एक मन ठाम नकार देत होते की,मी असे अवेळी रात्रीचे बाहेर जाणे योग्य नाही...!"
परंतु,
"मी माझ्या लहान पुतण्यासाठी काहीतरी भेटवस्तू खरेदी केली होती कालच, नवीन वर्षाच्या निमित्ताने त्याला देण्यासाठी...!"
"ती वस्तू त्याला आत्ताच देऊन टाकू म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता येईल अश्या विचाराने मी सासरी जाण्याचं निश्चित केलं.!"
...."तरीपण एकदा कॅलेंडर मध्ये खात्री करून घ्यावी म्हणून पाहिले तर...!"
"काल ३१ मार्च २०२२ रोजी अमावस्या प्रारंभ पहाटे १२:२२ वाजता अन्
आज १एप्रिल२०२२ रोजी फाल्गुन अमावस्या प्रारंभ सकाळी ११:५३ असे लिहिलेले दिसले..."
"अमावस्या समाप्ती विषयी स्पष्ट उलगडा होत नव्हता..!"
"मी हा विचार केला की,आता अमावस्या तर संपलेली आहे आज दुपारी अकरा वाजता..!,
म्हणजे मग आत्ता तिकडे जायला काही हरकत नाही...!"
"म्हणून लगेच कॉल करून भावाला मी त्याच्या सोबत येण्याबद्दल होकार कळवला...!"
"वीस-तीस मिनिटाचा प्रवास होता...!"
"कार मध्ये जायचं अन् यायचं....!"
"त्यामुळे इतकं काही घाबरण्याचे कारण नव्हतच...!!"
रात्रीच्या दहा वाजता आम्ही गावात येवून पोहचलो...
नेमकी काहीतरी शॉर्ट सर्किटमुळे त्यांच्या घरातील वीजप्रवाह खंडित झाला होता..
त्यामुळे घरात सर्वत्र अंधार असल्याने सासरची मंडळी बाहेर ओट्यावर येऊन निवांत बसलेले होते.
माझा पुतण्या आम्हाला पाहून धावतच आला...
"मी लगेच त्याच गिफ्ट त्याच्या हातात दिले...!"
"अन् खरचं गिफ्ट पाहून माझा पुतण्या खूप आनंदी झाला...!!
त्याच्यासाठी खास इतक्या रात्री येण्याचा माझा निर्णय सफल झाला होता...!"
"माझा भाऊ त्याची मशीन द्यायला गेला त्याला परतायला साधारण एक तास लागणार होता,
तो येईपर्यंत बाहेरचं ओट्यावर गप्पा मारत बसलो आम्ही सर्वजण..."
सासूबाई पण खाटेवर झोपलेल्या होत्या...!
"त्यांच्याशी मी बोलत असताना अचानक मला थंडी वाजून आली...!"
"मी सोबत शाल आणली होती ती पांघरूण घेतली ..!"
"अचानक मला खूप खोकला यायला सुरू झाला..."
"बहुतेक मी आज दिवसभर धुळीत काम केल्याने असे होत असावे....!"
"जणू आता मी हळू हळू खूप आजारी पडतेय की काय असेच मला वाटायला लागले...!"
"मी थोडावेळ तशीच शांत बसून राहिले.."
"मध्ये मध्ये खोकल्याची उबळ सारखी येत होतीच."
"काहीतरी विचित्र घडतेय याची जाणीव मला झाली होती."
"पण तरीही मी यामुळे आश्वस्थ होते की आपल्या गळ्यात रुद्राक्ष आहे त्यामुळे बाहेरील नकारात्मक शक्तीचा त्रास आपल्याला होणार नाही..."
"भाऊ एक दीड तासाने परतला...
आता रात्रीचे साडे अकरा वाजले होते...
मला अजूनही थंडी वाजत होती...
पण तरीही मी स्टेबल राहण्याचा प्रयत्न करत होते..."
"काहीतरी चुकीचं अन् विपरीत आपल्यासोबत घडत आहे हे स्पष्टपणे जाणवत होते."
"अमावस्येच्या दिवशी, भूत, पूर्वज, पिशाच, निशाचर प्राणी आणि भुते अधिक सक्रिय आणि मुक्त असतात. अशा दिवसाचे स्वरूप जाणून विशेष काळजी घेणे आवश्यक असते पण मी त्याकडे साफ दुर्लक्ष करून प्रवास करायचा खूप चुकीचा निर्णय घेतला होता...!"
"भावाने मला घरी ड्रॉप केल तेव्हा रात्रीचे बारा वाजत आले होते...!"
"माझा फ्लॅट थर्ड फ्लोअर वर असल्याने पायऱ्या चढताना प्रचंड थकवा आणि ताण मला आला होता."
"अगदी घराजवळ येवून पोहोचले पण खूप थकून गेल्याने डायरेक्ट खाली पायरीवरच बसून घेतल मी...!"
"घरात येण्याचं पण धाडस होईना;इतकी मरगळ शरीराला आली होती."
"काहीवेळाने मी घरात आले पण माझी अवस्था आणखीच गंभीर होत चालली होती.
मी लागलीच आमच्या गुरुजींना संपर्क साधला...!"
"गुरुजींनी माझ्या त्रासाच्या लक्षणांवरून मी चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी गेल्याबद्दल खूप संताप व्यक्त केला."
"नेमकी परिस्थिती अशी होती की काही तांत्रिक प्रयोग,रक्षा किंवा इतर दैवी उपाय पण करणे योग्य नव्हते काही कारणाने..."
"तरी मी उठून हात पाय धुवून दत्त महाराजांचे नामस्मरण करावे असे त्यांनी मला सुचवले!"
"त्याप्रमाणे मी उठले बाथरूम मध्ये जाऊन हात पाय धुवायला लागले...!"
"पण त्याच वेळी अक्षरशः कडकडुन थंडी भरून आली मला,
थडथड उडत होते मी...!
हातपाय थरथरत होते...!!
एकदम दातखिळी बसली माझी तर...!!!
अगदी जोरजोरात उसासे टाकू लागले मी...!
ओले पाय पुसण्याचे पण भान नव्हते...!"
तशीच मटकन खाली बसले..
माझे मिस्टर माझा तो भयानक अवतार पाहून घाबरलेच...!"
"अचानक असे का करतेय ही...?"
"काय होत होते क्षणभर काहीच कळत नव्हते...!"
"एकदम झपाटल्यासारखे मला झाले होते
स्वतःवरचा ताबा सुटत होता...!"
"मग मी मोठ्याने मंत्र जप सुरू केला...!"
"पण माझ्यात संचारलेल्या त्या नकारात्मक शक्तीचा आणखीच जोर वाढत होता...."
"परंतु मी नेटाने दत्त महाराजांचा मंत्रजप अखंड सुरूच ठेवला...(ओम् द्रां दत्तात्रेयाय नमः)
स्वतःशीच माझी लढाई आता सुरू होती...!"
"माझ्या पायातल्या वहाणाने मिस्टरांनी माझी दृष्ट काढली,
मग शिराईने काढली ..!"
नंतर खडे मीठ सात वेळा ओवाळून फ्लश केले...!
आणि काय आश्चर्य ते सर्व नजर उतरवताच...
"क्षणार्धात मी एकदम श्रांत झाले अन् कोसळलेच...!" "अचानक एकदम अंगातून झटक्यात काहीतरी विजेच्या गतीने बाहेर पडल्याच जाणवले...!"
थंडीने थरथर उडत होते मी तेही एकदम शांत झालं...
मंत्र जप एकसारखी पुटपुटत होते मी...!!
पण अजूनही खोकल्याची उबळ येत होतीच..
माझे संपूर्ण अंग पण फणफणले होते तापाने..."
"काही वेळाने आमच्या गुरुजींनी मला रेकी दिली...
आणि एक वाजता मी नॉर्मल झाले...!
एकदम शांत झोपी गेले.."
"माझ्यासोबत आज जो काही प्रकार घडलाय तो प्रकार काही साधा सुधा नव्हता!!"
"ह्या झपाटलेल्या प्रकारातून अनेकांचे आयुष्य कायमचे उध्वस्त होताना;
आणि अगदी कोवळ्या वयात मृत्युमुखी पडलेले व्यक्ती मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे...!"
"पण आज मी मात्र आमच्या गुरुजींची खंबीर साथ आणि दत्त महाराजांच्याच असीम कृपेने मी सुखरूपपणे या भयंकर प्रकारातून बचावले आहे...!!"
"पहाटे ३:४६ला मला जाग आली..
माझा खोकला पूर्णतः बंद झालेला होता,फक्त डोक तेवढं जड जड वाटत होते..."
"आता सर्व नॉर्मल होते..!",
"हा माझा स्वतःच्या बाबतीतला सत्य अनुभव आहे..!"
"यावर कुणाचा विश्वास असो वा नसो...;पण ह्या जगात निगेटिव्ह एनर्जी पण अस्तित्वात आहे याची मला चांगलीच प्रचिती अमावस्येच्या रात्री आली होती..."
याशिवाय सकारात्मक एनर्जी किती प्रबळ आहे याची पण उपरती झाली...!"
"आपला आपल्या इष्ट देवतेवरील प्रगाढ विश्वास आणि निरपेक्ष श्रद्धाच आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेण्याचे बळ आणि सामर्थ्य देत असते..!"
"माझा हा पॅरानॉर्मल संदर्भातला थरार अनुभव लगेच मी जसाच्या तसा लिहून पोस्ट केलाय...!"
"तुम्हालाही कधी असा थरार,भयानक अनुभव आला आहे का?"
"असल्यास जरूर कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा...!"
"जय गुरुदेव दत्त"