सत्य कथा.....
माझं गाव.. कशेळी, जिल्हा.. रत्नागिरी..
मे महिन्याची सुट्टी पडली होती.. छोटा भाऊ मुंबईला आला होता.. अचानक प्लॅन झाला आणि आम्ही आठ जण गावी जाण्यासाठी निघालो.. आयत्या वेळी reservation मिळाले नव्हते म्हणून भावाने आणि माझ्या मिस्टरांनी गाड्या काढल्या..
मस्त पैकी आमचा प्रवास सुरु झाला.. पहाटे निघून संध्याकाळी 6/6. 30वाजता आम्ही रत्नागिरीत पोहचलो. दोन दिवस तिथे काढून आम्ही कशेळीत जाण्यासाठी निघालो..
कशेळी यायच्या अगोदर स्वामी स्वरूपानंदांचं "पावस "लागतं... मुलांनी हट्ट केला आज आपण येथेच राहायचं आणि इथल्या समुद्रावर जायचं.. नाही /होय करता करता आम्ही तयार झालो.. आणि एका घरगुती हॉटेल ला सामान टाकून जवळच असणाऱ्या "गणेशगुळे "या बीचवर जाण्यास निघालो.. निघेपर्यंत खूप उशीर झाला होता... साधारण 1/2 तास लागले आम्हाला !!खूप बेकार रस्ते होते... शिवाय रस्ता सारखा चुकल्यासारखा वाटत होता... एकदाचे बीचला येऊन पोहचलो...
मुलं मस्त पैकी enjoy करीत होती पण आम्ही मोठी माणसे मात्र कधी एकदाचं येथून निघतोय असं मनात म्हणत होतो.. एकतर परतीचा प्रवास तितकाच वेळखाऊ होता आणि त्यात काळोख पडत चालला होता..रस्ता ही नीट माहित नव्हता... कोकणात रात्रीचे रस्ते जणू घाबरवून सोडतात असं ऐकलेलं आणि पाहिलेलं..
अखेर आम्ही तिथून निघालो... वळणावळणाचा रस्ता संपतच नव्हता... किती तरी वेळ रस्ता शोधण्यात गेला.. आजूबाजूला सगळं कसं भयानक वाटत होतं.. रस्त्यावर कोणीही दिसून येत नव्हते.. आणि अचानक
एका वळणावर आमच्या दोन्ही कार अचानक बंद पडल्या.. माझा भाऊ आणि मिस्टर दोघेही निष्णात ड्राईव्हर... पण कार काही तसूभर पुढे सरकत नव्हत्या.. ब्रेक, accelator यांचा प्रयोग करूनही काही उपयोग होतं नव्हता.. आम्ही सारे घाबरून गेलो... आता पुढे काय?? मुलं अगदी रडण्याच्या बेतात होती... असं वाटत होतं की जणू आमच्या कार कोणी अदृश्य शक्तीने जखडून ठेवल्या आहेत.. आजूबाजूला कोणीही नव्हतं तरी कोणीतरी असल्याचा भास होऊ लागला... यात किती वेळ गेला कोणास ठाऊक?? यातून सुटणार कसं असा मनात विचार आला इतक्यात पुढच्या गाडीत असणारी माझी वहीनी ओरडली.... "गणपती बाप्पा.... मोरया "आणि एका झटका लागावा तसं भावाची गाडी सुरु झाली आणि थोडी पुढे सरकली... आम्ही हे पाहतच होतो आणखीन जोरात आम्हीही बाप्पाचा गजर केला आणि आमचीही गाडी एक झटका लागून सुरु झाली . .
लगेच आम्ही तेथून काढता पाय घेतला थोडं पुढे जाताच मुले म्हणू लागली... आपल्या गाडीच्या एका बाजूकडून एक पांढरी आकृती विलक्षण वेगाने पुढे निघून गेली.. काही ते नक्की कळलं नाही पण तेथून मात्र आमची सुटका झाली...
दुसऱ्याच दिवशी सकाळीच आम्ही आमच्या गावी कशेळीला रवाना झालो... गावी देवळात जाऊन आम्ही देवाचे आभार मानले..
पुन्हा कधीच त्या ठिकाणी जायचं नाही हे मात्र आम्ही ठरवून टाकलं.... एक वाईट वेळ टळली होती... गणपती बाप्पाने आम्हाला तारलं... बोला "गणपती बाप्पा.... मोरया.. "

By... Shraddha Bhat...