( मी सायली कुलकर्णी . माझ्या दुसऱ्या कथेसाठी तुम्ही दिलेल्या प्रतिसादा बद्दल खूप खूप आभार . माझी पुढील कथा सादर करत आहे . काही चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करा .काही सुधारणा असतील तर अवश्य सुचवा .ह्या कथेतील सर्व पात्रे , घटना व स्थळे काल्पनिक आहेत .ह्या गोष्टीतून कोणतीही अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही .कथचे 7 पार्ट आहेत .चित्र -सौ .गुगल )
स्वातंत्र्या पूर्वीचा काळ . काहीच आधुनिकीकरण न झालेला . लोक जुन्या चालीरीती , रूढी , परंपरा यांना मोबाईल सारखी चिकटून बसलेली . काही नवीन , प्रगत , विचार - बदल अवलंबणं म्हणजे खूप मोठे पाप करण्यासारखे . लोकांना तरी कसा दोष द्यायचा , जे पूर्वापार चालत आलं होते ते असं अचानक कस बदलायच . शेवटी संस्कृती नावाची एक गोष्ट होती ना . शहरेच अजून कासवाच्या गतीने बदलत होती . मग खेडी- पाडी तर खूप लांबची गोष्ट . लोकांच्यात माहिती चा अभाव असल्याने लोक देव , देवरुशी यांच्या आहारी जाणारे . स्वतःच्या शरीरा बद्दल व्यवस्थित माहिती नसल्यामुळे रोग- राई चे प्रमाण खूप होते . दवाखान्यात जाऊन डॉक्टर कडे जाऊन तपासणी करणे त्यांना कमीपणाचे वाटे . " चार बुक शिकून आला म्हणून लई शाना झाला का तो डागतर अशी उच्च विचारसरणी असलेले . " त्या डागतर च्या कडू गोळ्या खाऊन कोण बर होत नाय . त्या पेक्षा त्या वडाच्या पारा वर लई मोठा बाबा आलाय त्याला दाखवूया . तो 10 मिनिटात बर करतोया बघ" असा विश्वास असणारी लोक . साथीचे रोगला पण गावावर देवीचा कोप झाला म्हणून माणसे मेली असं समजणारी . थोडक्यात काय तर जुन्या रूढी , परंपरा स्वतःच्या जिवा पेक्षा मोठी समजणारी . कुठे जायचे झाल्यास बैलगाडी चा प्रवास किंवा पायी प्रवास .
सांजगाव . आधुनिक विकासा पासून खूप दूर असणारे गाव . गावात सुंदर नदी . त्या नदी वरून संध्याकाळी सूर्य मावळताना खूप सुंदर दिसत असे . म्हणून गावच नाव सांजगाव . दिवसभर सूर्याच्या अस्तित्वात गाव खूप प्रसन्न वाटे . पूर्ण आसमनंतात चैतन्य दाटे . पण रात्री नदी कडे पाहता त्या अंधारात पण त्या जंगलातील पानाची सळसळ ऐकू येई . नदी पार करताना असं वाटे हे जंगल आपल्याला गिळायला बसले आहे. गावातील लोक खूप चांगली होती . लोकांना अडी-अडचणीत मदत करणारी . नदी च्या पलीकडे थोड्या अंतरावर गावाचे स्म्शान . गावात कुणी मेले की गावातील लोक होडी ने प्रवास करून , नदी ओलांडून ते प्रेत जाळायला आणत . आणि स्म्शाना पासून थोड्या अंतरावर एक जंगल . अनेक झाडें असल्याने हिरवेगार . असं वाटायचं ते जंगल माणूस गिळायला बसले आहेत . लोक त्या जागेला एवढे घाबरत की प्रेताला सरणा वर ठेवले आणि भाडाग्नी दिला की लोक घाबरून पळून जात . कवटी फुटायच्या आत लोक गावात जात . कारण गावातील लोकांना माहित होत ती आधी तिकडेच राहत होती . नदीपालिकडचा तो भाग लोकांनी वाळीत टाकल्या सारखाच होता . त्या जंगलाच्या पुढे 6-7 तास चालत गेले की पुढचे गाव माजगाव लागायचे . पण त्या माजगावातील लोक सांजगावात येत नसत आणि सांजगावातील लोक माजगावात जात नसत . कारण जंगल पार करावे लागत .नदी पुढच्या त्या स्म्शाना पासून पुढे जिथून ते जंगल चालू होई ते त्या जंगलाच्या शेवट पर्यंत तिची दहशत होती . तिची दहशत एवढी भयानक होती की त्या गावातील लोक ह्या गावात लग्नासाठी मुली पण देत नसत , कारण गावात जाण्यासाठी जंगल पार करावे लागे . अर्थात ती आता कुठे आहे , ती कशी दिसते हे कुणालाच माहित न्हवते . पण तिची वचक कायम होती . शेवटी विषाची परीक्षा कोण घेणार ना . नदी पार करण्यासाठी 2 नाव होत्या . गावातील लोक स्वतः वल्हवत .
ती म्हातारी बहुतेक नुकतीच गावात नवी आलेली कारण कुणी तिला या आधी कधीच पाहिले न्हवते . म्हातारी नदीपलीकडच्या त्या गर्द झाडीत असलेल्या त्या बंगली मध्ये राहायची . मस्त छान कौलारु घर होते . खाली 3 मोठ्या खोल्या , वर माडी वर मोठ्या 3 खोल्या . वरच्या तीन खोल्याना जोडणारी ती गॅलरी त्या गॅलरी मध्ये आले की समोर दिसणारी ती शांत नदी . त्या गॅलरी मध्ये उभे राहिले की वेळ कसा जायचा ते समजतच नसे . तशीच गॅलरी मागच्या साईड ला पण होती . समोरच्या गॅलरी मधून दूर असलेले ते गाव दिसें . आणि मागच्या गॅलरी मधून ते जंगल दिसे . त्या घराच्या अंगणात कसली कसली झाडें होती . घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पायावाटे वर उंच च्या उंच मोठे गवत होते . बरीच झाडें होती . नदी ओलांडून तिच्या घरी जाताना खूप भीती वाटायची . पण पर्याय नसायचा . वेळच अशी यायची की तिला रात्री अपरात्री बोलवावे लागे . म्हातारी स्वतःच नदी ओलांडून सांजगावात येई . म्हातारी 60-70 वर्षाची होती पण अंगात उत्साह असा की तारण्या माणसाला पण लाजवेल . त्या म्हातारी चे नाव गुणाक्का...
क्रमश ....