The vampire
"निलू.. निलू... लवकर दरवाजा उघड. ." वैशूने माझ्या नावाचा घोषा लावला होता...
बऱ्याच वेळा हाका मारून झाल्यावर तिने एक कागदाचा बोळा घेतला आणि तो नेम धरून तो मारणार इतक्यात मला जाग आली..
बऱ्याच वेळा हाका मारून झाल्यावर तिने एक कागदाचा बोळा घेतला आणि तो नेम धरून तो मारणार इतक्यात मला जाग आली..
खरोखरच वैशूच दरवाजा बडवत होतं.. मी चट्कन उठले. तोंडावर पाणी मारलं आणि दरवाजा उघडायला धावले..
दरवाजा उघडताक्षणी वैशू... वैशाली तरातरा आत शिरली..
"म्हशी... एवढं झोपतात का?? केव्हा पासून दरवाजा बडवतेय. " अर्थात हे मलाच उद्देशून होतं..
"अगं... पुस्तक वाचत होती.. जरा डोळा लागला "
"चल...आता... आटप, माझं प्रोजेक्ट submit करायचं आहे "काही न बोलता मी तिच्या बरोबर निघाले... पर्याय नव्हता... माझी मैत्रीण होती ती !!

मी... नीलम प्रधान आणि ती... वैशाली खाडे.. माझी कॉलेज friend ... दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी..मी दिसायला बुजगावणं... तर ती गोरी, घारे डोळे, लांब चाफेकळी नाक !! फायनल year होतं दोघींचं.. fine आर्ट्सचं !! प्रोफेसर जगदीशनी प्रोजेक्ट दिले होते.. नेहमीप्रमाणे मी लगेच ते सबमिट केले होते आणि वैशाली अजूनही प्रोजेक्ट submit करत होती.. Finally आज ती ते submit करणार होती.. आज हॉस्टेलचाही शेवटचा दिवस होता म्हणून तिची घाई चालली होती... मला नाइलाजानं तिच्या सोबत जावं लागलं.. कसला मूड होता माझा झोपण्याचा !!!! कसलं मस्त स्वप्न पडलं होतं..जिवाच्या आकांतानं धावताना हरीण दिसलं होतं आणि त्याच्या मागे धावणारा तो बिबटया !!! तो हरिणाला पकडून त्याचा लचका तोडणार.. एवढ्यात या बयेने मला उठवलं होतं.. माझा जरासा विरस झाला... का कोणास ठाऊक, पण असली स्वप्न बघायला मला खूप आवडतात आणि हेच जर मी वैशूला सांगितलं असतं तर तीने पाठीत धपाटा घालून मला शिव्यांची लाखोली वाहिली असती..... काय करू?? असते एखाद्याची आवड !!
आम्ही प्रोजेक्ट सबमिट केलं.. कॅन्टीन मध्ये non-veg चापलं...दुपारी मस्त picture पाहिला... Horror movie.. एकदम fantastic !! हिरोईनला रक्ताची चटक... एक.. एक करत सगळयांना तीने कसं संपवलं त्याची कथा म्हणजे हा movie..! "The vampire "
वैशू डोळयांवर हात घेऊनच बसली होती आणि मी मात्र तिच्या मूर्ख पणाला हसत होते..पण मजा आली..!! वैशू खूप घाबरली होती आणि मी तिची खिल्ली उडवत होते. Picture संपवून आम्ही होस्टेलला निघालो..हॉस्टेल जरा आडवळणाला होतं... ऑटो मिळेपर्यंत खूप उशीर झाला होता.. उद्या सकाळीच हॉस्टेल सोडायचं होतं.. वैशू खूप घाई करत होती तिची अगदी भल्या पहाटे गाडी होती.. सगळं पॅकिंग राहिलं होतं.. माझ्यामुळे तिला उशीर झाला होता कारण movie बघण्याचा माझा हट्ट होता !!

घरी परतलो... सगळीकडे अंधार झाला होता.. बरेचसे रूम vacant झाले होते.. त्या floor वर फक्त आम्ही दोघी उरलो होतो... मी सामानाचे पॅकिंग केले.. उद्या पासून मोठी सुट्टी !!! जरा जडच जाणार होतं ते !!परत भेटू न भेटू.. नकळत डोळे पाणावले.. जवळ जवळ सर्व मैत्रिणी आपापल्या घरी परतल्या होत्या.. वैशू मला सोडून जाते म्हटल्यावर मला खरंच वाईट वाटले..खरी मैत्रीण होती ती माझी.. !!खूप काही मजा केली होती दोघीनी...!! हॉस्टेल गाजवलं होतं.. आणि कॉलेजही... सगळे आम्हाला सीता और गीता म्हणायचे.. काय मस्त दिवस होते... कधीही न विसरता येण्या सारखे !! पण आज रुखरुख लागली.. माझी घरी परत जायची अजिबात इच्छा नव्हती. पण जाणे भाग होते.. येथूनच आयुष्याची दिशा ठरणार होती. कशी असेल ती दिशा?? मला उगाच परत "The vampire "आठवला...
रात्रीचे बारा वाजून गेले होते.. वैशू अजूनही पॅकिंग करीत बसली होती आणि त्या बरोबर तिच्या तोंडाची टकळीही चालू होती !! मला फार कौतुक वाटत होतं तिचं !!प्रत्येक गोष्ट कशी परफेक्ट !! मी मात्र पुढे काय करायचं.. काहीच ठरलेले नव्हतं.. तिच्या गप्पा ऐकतच मी मस्त पैकी चहा केला... हॉस्टेल मध्ये तेवढं तरी करता येत होतं.. रात्र बरीच झाली होती.. सगळीकडे अंधार आणि शुकशुकाट !... बाहेर पाहिलं.., मजल्यावर कोणीही नव्हतं... मला मजा वाटली.. वैशूला जाता जाता थोडं घाबरवूया !! मस्त आयडिया होती डोक्यात... "The vampire "काही डोक्यातून जात नव्हता.. आधीच चारीबाजूला पाहून घेतलं.. rector ही जागेवर नव्हती.. आम्ही आज राहिलो काय किंवा तेथून गेलो काय कोणीही विचारणार नव्हतं.. उद्या पासून हॉस्टेलही बंद राहणार होतं.
मी हळूच फ्युज काढला... क्षणात काळोख झाला अगदी मिट्ट काळोख!! वैशू आपल्याच नादात होती.. !! मी विचित्र हसतच अलगद वैशूच्या खांद्यावर हात ठेवला.. त्या बरोबर वैशूने ओरडण्या साठी तोंड उघडलं आणि ती एकदम माझ्याकडे वळली..
तिचे घारे डोळे त्या अंधारातही विलक्षण चमकत होते... पण त्या पेक्षाही चमकत होते तिचे ते "दोन सुळे "!!
अंधारात ती आता बिलकुल घाबरत नव्हती.. तिचं ते रूप पाहून माझी मात्र भीतीने गाळण उडाली... मी मागे सरकणार इतक्यात तिने आपला जबडा वासला...
"The vampire"माझ्या समोरच होती...वैशूच्या जबड्यात माझी मान होती.. माझं मरण आता अटळ होतं...

काल्पनिक कथा by.... Shraddha Bhat