टिक् टिक्, टिक् टिक्, टिक् टिक्... अलार्म वाजला आणि विकी ची झोप मोड झाली. एकतर याला झोप म्हणजे जीव की प्राण...
विकी इज इक्वल टू झोप अॅन्ड झोप इज इक्वल टू विकी...
हेच काय ते एक समीकरण, याला पफेक्ट लागू पडायचं...
म्हणून मग काहीसा त्या अलार्मवर रागवत हा जागा झाला. रात्रीचे बारा वाजले होते. आणखी एक 10 मि. झोपावे. या उद्देशाने हा तसाच बेडवर पडून होता. तितक्यात ट्रिंग ट्रिंग फोन ची रिंग झाली. याने फोन पाहिला, तर त्याच्या मित्राचा धीरजचा फोन होता. मिसड् काॅल म्हणजे, धीरज घरून निघाला होता.
विकी ही मनात नसताना, पट्कन उठला. आणि आवरून घेऊन आॅफिसला जायला तयार झाला.
धीरज विकीचा शाळेपासूनचा मित्र. दोघेही जिवलग मित्र होते. आजपर्यंतची एकमेकांची सुख दुःख दोघांनीही वाटून घेतली होती. एकत्र काॅलेज संपवून विकी आणी धीरज दोघेही एकाच ठिकाणी, एका काॅल सेंटर मध्ये कामाला लागले होते. नविनच नोकरी लागलेले विकी आणि धीरज रोज धीरज च्या बाईकने ऑफिसला जायचे. त्यामुळे ते दोघे, कामाच्या शिफ्ट्स् देखील सारख्याच घ्यायचे. आज पासून त्यांची नाईट शिफ्ट होती.
तर मग झोपेच खोबर झालेला विकी, सार काही आवरून धीरज ची वेट करत आपल्या रूमवर बसला होता. जेवण तर 10 वाजताच झाल होत त्याच. असेच टाईम पास करत बसला असता, विकीला परत झोप येऊ लागली. आज सुट्टी काढू का? एकवेळ मनात असा विचारही आला. मग डोळ्यांसमोर पेंडींग वर्क आलं, मग काय ऑफिसला जाणे भाग होते. पण का कोण जाणे, विकी ला आज ऑफिसला जाऊच नये, असे वाटत होते. पण कामाचा नाईलाज...
12.30 वाजत आले होते. 1 वाजता चं रिपोर्टींग होत. "कुठे राहिला हा धीरज?", असे स्वत:शीच पुटपुटत विकी ने धीरजला काॅल लावला.
तेवढ्यात बाहेरून हाॅर्नचा आवाज आला.
धीरज बाहेर विकीची वाट बघत बाईक घेऊन उभा होता.
विकीने फोन घेतला. डोअर लाॅक करून धीरजच्या बाईकवर बसला. "चल भाऊ" म्हणत त्याच्या खांद्यावर हात टाकला. धीरज बाईक सुरू करणार इतक्यात, बाजूने एक काळा कुत्रा जोरजोराने भुंकताना यांनी पाहिला. जणू काही त्या कुत्र्याला यांना काही सांगायचे आहे. असे वाटत होते. विकी तर त्या कुत्र्याला चांगलाच ओळखत होता. तो त्याला खायला प्यायला नेहमीच घालायचा. पण आज त्या कुत्र्याची वागणूक वेगळीच वाटत होती.
"चल, भाऊ चल..." म्हणत विकीने पुन्हा धीरजला हालवले, मग भानावर येत त्याने बाईक सुरू केली. जशी यांची बाईक धाऊ लागली. तसे तो काळा कुत्रा जोरजोराने रागाने भुंकत यांच्या बाईक मागून पळत येऊ लागला.
"अरे जोरात पळव बाईक", म्हणत मागे बसलेला विकी ओरडू लागला. तशी धीरजने बाईक जोरात पळवली. व ते त्या कुत्र्याला मागे टाकत बरेच पुढे आले. 12.30 वाजून गेले होते. रस्त्यावर भयंकर काळोख पसरला होता. वारा गारगार दोघांनाही बोचत होता. पावसाळ्या नंतरचे सप्टेंबरचे अखेरीचे दिवस होते ते. त्या कुत्र्याच्या विचित्र वागण्यामुळे विकी बुचकळ्यात पडला होता.
थोड्याच अंतरावर एक गार्डन वजा जंगल लागत असे. त्या भागातून जाताना खूप गारठा लागायचा. पण आज उलटच होत होते. ते बाईकवरून त्या भागात पोहोचताच, तिथे कमालीची शांतता पसरली होती. मोठमोठ्या झाडांच्या सावल्या विचित्र दिसत होत्या, थोडाफार उजेड होता. तो म्हणजे पथदिपांचा...
धीरज हळूहळू सांभाळून बाईक मारत होता.
तिथे खूपच विचित्र वाटत होतं या दोघांना...
वारा नाही की कसला आवाज नाही...
झाडाची पाने देखील हाताची घडी तोंडावर बोट घेऊन, बाईक वरून जाणा-या धीरज आणि विकीला न्याहाळत आहेत. असेच त्यांना वाटत होते... शांतता ही शांततेत विलीन झाल्यासारखी सामसूम त्या रस्त्यावर पसरली होती.
दोघांच्याही मनात भिती दाटून आली होती. पण दोघेही काहीच न बोलता, गुपचुप बाईकने चालले होते...
कसा बसा तो रस्ता संपवून ते ऑफिसच्या इमारती बाहेर पोहोचले. त्या इमारती बाजूलाच स्मशान होते. धीरजचे लक्ष तिथेच त्या स्मशानाकडे गेले. तेव्हढ्यात विकी म्हणाला, " धीरज, आज विचित्र वाटत आहे ना... सगळ्यात आधी तो काळा कुत्रा, मग तो सामसुम रस्ता...." धीरजने फक्त मान हलवली... आणि म्हणाला, " आच वाॅचमन नाही दिसला ना गेटजवळ...?? "
मग विकीने होकारार्थी मान हलवली. आणि म्हणाला, "चल बाईक पार्क करू..."
तसे धीरज पार्किंग साठी जागा शोधू लागला... पण काय होत होते, देव जाणे, ते फिरून फिरून त्याच जागेवर येत होते... असे चार - पाच वेळा झाल्यावर वैतागून धीरजने तिथेच बाईक पार्क केली...
"चल विकी, चल लवकर " म्हणत तो विकी ला घेऊन ऑफिसच्या इमारतीत शिरला. यांचे ऑफिस 7 व्या मजल्यावर होते. त्यामुळे लिफ्ट समोर जाऊन, धीरज ने बटन दाबले. काही केल्या लिफ्ट खाली येईना, दोघांनीही 10 - 15 वेळा बटन दाबल्यावर लिफ्ट खाली आली... पण काय दुर्भाग्य ती लिफ्ट उघडत नव्हती...
मग हे दोघे, बाजूच्या लिफ्ट जवळ जाऊन प्रयत्न करू लागले...
तर मध्येच घुरररर घुरररर आवाज येई पण ती लिफ्ट काही केल्या खालीच नाही आली...
लेट मार्क तर पडणारच होता, शिवाय बाॅस च्या शिव्या...
म्हणून मग यांनी पाय-यांनी वर जायचे ठरविले... पण पाय-या चढता चढता यांना मागून कोणीतरी पाय खेचत असल्याचा अनुभव आला. विकी ने तसे धीरजला बोलून दाखविले.. तर त्याने ही असेच अनुभव आल्याचे कबूल केले.
दोघेही घामाघूम होत 5 व्या मजल्यावर आले असतील, तेव्हढ्यात पॅसेजमधील बल्ब ठळ् कन् फुटला... सा-या काचा यांच्या अंगा खांद्यावर उडाल्या... अंधार अंधार पसरला... " Oh no...!!" असे विकी जोरात ओरडला...
धीरजने स्वतःला सावरत पटकन् मोबाईल ची टाॅर्च ऑन केली. आणि विकी ची विचारपूस करू लागला. विकी ठीक आहे हे समजताच, त्याने विकीचा हात धरून थेट वर पाय-यांवर धावत सुटला. दोघेही थेट ऑफिसच्या दारात येऊन थांबले.
दोघेही धापा टाकत होते. विकी भिंतीला टेकून उभा रहात जोरजोरात श्वास घेत होता... तर धीरज दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून वाकून जोरजोरात श्वास घेत होता.
दोघेही घाबरले होते. दमले होते...
जे काही चालले होते, ते दोघांच्याही कळण्यापलिकडचे होते.
पण यापुढे जे काही होणार होते... त्यापासून हे दोघे मित्र अनभीज्ञच होते...
दोघेही आता ऑफिसमध्ये आत शिरले, तर आणखी एक आश्चर्याचा धक्का...
पुर ऑफिस सामसुम... ना रिसेप्शनिस्ट, ना इतर लोक... सुपरवायझरची केबिन सताड उघडी. हे सर्व पाहून धीरजच्या डोक्यातून एक वीजेची सळक गेली. विकीने त्याला सावरले... आणि तो त्याला ऑफिसच्या रेस्टरूम मध्ये घेऊन गेला. थोडे पाणी पिऊन धीरजला बरे वाटले. त्याला वाॅयशरूम ला जायचे होते. म्हणून दोघेही वाॅशरूम मध्ये गेले. तिथे त्यांना विचित्र अनुभव आले. पाण्याचा नळ आपोआप चालू बंद होऊ लागला. रूम मधील लाईट ही चालू बंद.. होऊ लागली. धीरजने घट्ट डोक्याला पकडले आणि तो खाली बसला. विकीला काय करावे सुचेनासे झाले होते... तेव्हा विकी धीरजला उठवून उभा करून, त्याला घेऊन रूम बाहेर पडू लागला...
तेव्हढ्यात गार वा-याची झुळुक आली... आणि ही ही ही ही हा हा हा हा..असा एक घोगरा हसण्याचा आवाज आला... विकी ने जोरात ओरडले..., " कोण आहेस तू? समोर ये... हिम्मत असेल तर समोर ये..." मग काय वातावरणात एकदम कायापालट झाला... एक पांढरासा धूर, त्यात मानसाची सावली, चित्र विचित्र आकार, चित्र विचित्र आवाज... असा तो पांढरट धुसर धूर इकडून तिकडे, यांच्या अवती भवती फिरू लागला. जळका किळसवाणा वास तिथे पसरू लागला. या दोघांना काय चाललंय याची काहीच कल्पना नव्हती...
दोघेही एकमेकांना घट्ट धरून उभे होते. तेव्हढ्यात ती धुसर आकृती दोघांच्याही डोळ्यासमोर आली, या दोघांत आणि त्या आकृतीत एक इंचाचा फरक असेल. या अंतरावर ती थांबली... आणि विजेचा झटका लागल्याप्रमाणे मागे उडून पडली. त्या भयानक आकृतीच यांच्यासमोर एक इंचावर येणं आणि मागे उडून पडणं. हे एका क्षणात घडलं की, विकी ला आणि धीरजला काहीच समजले नाही...
ती आकृती मागे उडून पडताच, जोरजोरात घोग-या आवाजात रडू लागली, ओरडू लागली... आणि म्हणू लागली, " काय आहे तुझ्या गळ्यात, काढून फेक ते... काय आहे ते... का....यययययययय..... ?" असे ती धुरसट पांढरी आकृती जोरजोरात हात पाय डोक...जमिनीवर आपटल्यासारखी करू लागली... काहीच स्पष्ट दिसत नव्हते...
विकी काय ते समजून गेला, त्याने धीरजला धरून बाहेर पडू लागला. ते वाॅशरूमच्या दरवाज्यात पोहचले अन् तेव्हढ्यात त्या दोघांच्या कानातून काही शब्द आरपार गेले... ते थंड शब्द एका कानातून आत जाऊन, दुस-या कानातून बाहेर आल्याचा अनुभव दोघांनाही एकाचवेळी एकाच क्षणी आला... आणि ते थंड भितीदायक शब्द होते...
" याबद्दल बोललासससससस, तर संपलासससससस...."
हे ऐकून दोघेही एकमेकांकडे पाहू लागले, दोघांच्याही जीवाचं पाणी पाणी झालं होतं. प्रसंगावधान राखून विकीने वाॅशरूमचा दरवाजा उघडला...
आणि पाहतात तर काय? ऑफिसमध्ये सारे कर्मचारी आपआपल्या जागेवर बसून, आपापले काम करत होते. धीरज ही अवाक् झाला होता... हे दोघेही आपआपल्या जागेवर जाऊन बसले... दोघांना काहीच समजत नव्हते. विकीने गळ्यात असलेल्या रुद्राक्षाच्या माळेला हात लावला आणि मनोमन आभार मानले... धीरजला पाणी आणून दिले... तो ही स्थिर झाला. धीरज म्हणाला, "विकी, ती पांढरी आकृ..." तेव्हढ्यात विकी त्याला थांबवत म्हणाला, " श श श् श्... काही बोलू नको, शेवटचे वाक्य आठवं, याबद्दल बोललास तर संपलास" हे ऐकून धीरज शांत झाला.
या सा-या गोंधळात, 2 वाजले होते... 2 ते 3 वाजेपर्यंत दोघांनीही थोडे काम केले... पण दोघांचेही कामात लक्ष नव्हते... भास की आभास...?? खरे की खोटे काहीच पत्ता लागत नव्हता... आता आपण ऑफिसमध्ये काम करत आहोत, हे खरे की मघाशी जे घडले ते खरे...?? दोघेही गोंधळून गेले होते. 3 वाजता ब्रेक झाला. धीरज ला चहा प्यावासा वाटत होता. विकी यायला तयार नव्हता, कसतरी धीरजने त्याला राजी केले. नाखुशीनेच, थोडे घाबरत दोघेही लिफ्टने खाली गेले. बाहेरच्या टपरीवर दोघांनीही चहा घेतला, जरा फ्रेश वाटल्यावर दोघेही परत ऑफिसला वर निघाले. लिफ्टने वर जात असताना, दोघांनीही एकमेकांकडे पाहिले... "चल जाऊ, dont worry" असे विकी म्हणाला, मग दोघेही लिफ्टने वर जाऊ लागले. लिफ्ट सूरू केली. थोड्या वेळात अचानक लाईट बंद झाला... क्षणात लाईट सुरू झाला. आणि जोराचा आवाज करत लिफ्ट एकाच जागी थांबली... जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला. आणि लिफ्टमध्ये भयानक वातावरण झाले. ते दोघे एकमेकांकडे बघत उभे होतेच की, अचानक धीरज लिफ्ट च्या एका कोप-यात फेकला गेला. आणि त्याच कोप-यात वर उचलला गेला... आणि धाडकन् खाली आपटला गेला. हे सारे विकी पहातच राहिला. चटकन् त्याला काहीतरी आठवले. त्याने आपल्या गळ्यातील रूद्राक्षाची माळ धीरजच्या गळ्यात घातली. आणि रागाने जोरात ओरडू लागला. "तुला जे करायचय, ते माझ कर, माझ्या मित्राच्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी..." अचानक लिफ्ट धडाधडा हलू लागली, विकी जाऊन धीरज शेजारी पडला. धीरजने आपल्या गळ्यातील रूद्राक्षाची माळ काढून विकीच्या हातात दिली. आणि म्हणाला, " पकड विकी, आपण दोघही वाचू शकतो.... पकड ही माळ" दोघांनीही ती एकच माळ आपआपल्या हातात पकडून धरली. लिफ्ट परत सुरू झाली. आणि 7 व्या मजल्यावर लिफ्ट जात असल्याचे बाण दिसू लागले. लिफ्ट धडाधड करत वर जाऊ लागली. लिफ्ट स्टेनलेस स्टिलने कोटेड होती. त्यामुळे ते नेहमी आपले प्रतिबिंब लिफ्ट मध्ये पाहू शकत होते. पण यावेळी मात्र त्यांचे प्रतिबिंब लिफ्ट मध्ये दिसत नव्हते, हे पाहत दोघेही एकमेकांना घट्ट धरून, माळही घट्ट पकडून उभे होते. अचानक भसकन् त्या लिफ्टच्या समोरच्या स्टिलच्या भिंती मध्ये एक विदृप चेहरा दिसू लागला. जो कधी पांढरा तर कधी काळा... धुसर, पुसट... चित्र विचित्र आकृती.... जी त्यांनी वाॅशरूम मध्ये पाहिली होती. तीच विदृप आकृती... बघता बघता त्यांना लिफ्ट च्या सा-या भिंतीमध्ये दिसत होती... पण यावेळी स्पष्ट दिसत होती... कधी हसत होती.... कधी रडत होती... कधी दात विचकत होती... कधी ओरडत होती... कधी चिडत होती. विकी आणि धीरजला रडू येत होत. ते आवाज, ती दृष्ये असहाय्य होत होती. तरी खंबीरपणे ते दोघेही तिथे उभे होते. अचानक त्यांच्यावर वार होऊ लागले. कधी विकी वार झेलत तर कधी धीरज... दोघांनाही खूप दुखापती झाल्या होत्या. पण ते एकमेकांपासून वेगळे नाही झाले. ना की त्यांनी रूद्राक्षाच्या माळेला वेगळ होऊ दिल. अचानक 7 व्या मजल्यावर लिफ्ट धाड्कन् आपटल्यासारखी थांबली. सगळ शांत झालं... अन् अचानक खर् खर् खर् करत दरवाजा उघडला. दोघंही झटापटीने बाहेर पडणार, तेव्हढ्यात ते दोघेही अचानक पाठीमागून कोणीतरी जोराचा धक्का दिल्याप्रमाणे लिफ्ट च्या बाहेर ढकलले गेले आणि लिफ्टच्या दारा बाहेर जाऊन पडले. धडपडत उठुन उभे राहतात, न राहतात तोच... अचानक तो घोगरा आवाज दोघांच्या ही कानातून आरपार गेला जस की वाॅशरूम मध्ये झालं होतं. पण यावेळीच्या आवाजाची तीव्रता अतिशय क्रूर अशी होती. आणि यावेळीच्या आवाजातील शब्द होते...." कोणाला सांगशील, तर प्राण गमावशीलललल...." असे म्हणत तो आवाज कुठे तरी विलीन झाल्यासारखा गायब होत गेला...
दोघांनीही मागे वळून न बघता, ऑफिसच्या दिशेने वाटचाल केली. काम तर काहीच न करता... दोघेही डेस्कवर झोपी गेले. सकाळी उठून धीरजच्या बाईकने घरी गेले. त्यांनी परत त्या ऑफिसमध्ये कधीच पाऊल टाकले नाही... आणि इतरांशी तर दूरच... आजपर्यंत दोघांनी एकमेकांशीही कधीच या विषयावर बोलले नाही...
समाप्त...
सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक असून... यातील पात्रे, घटना किंवा ठिकाणांशी कोणाचेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
धन्यवाद
- Vicky Ghodake