मॉल ( पार्ट -5) ( आधीच्या सर्व पार्ट च्या लिंक्स खाली दिल्या आहेत . )
प्रत्येक मजल्या वर आठ जळणारी ती माणसे आणि मध्ये ते गुंड , त्या प्रत्येक गुंडाला ओरडायांचे होते , तेथून पळून जायचे होते पण आता खूप उशीर झाला होता . प्रत्येक मजल्या वर एक एक जण होता आणि प्रत्येक मजल्या वर ती 8 जण जळत होती . थोड्या वेळानी प्रत्येक मजल्या वर एक एक प्रेत होते . अनिल , रमेश , सचिन आणि किशोर आता परत कुणालाच त्रास देणार न्हवते . शेवटी त्यांना शिक्षा मिळाली.
त्या चौघाच्या जीवावर खामकर निर्धास्त होते , पण त्यांना कुठे माहित होते की त्या 4 जणांना त्यांच्या कर्माची शिक्षा काल रात्रीच मिळाली होती . असं म्हणतात ना कुणाचे आशीर्वाद घेता येत नसतील तर निदान कुणाचे तळतळाट तरी घेऊ नयेत . पण खामकर आणि त्या गुंडानी नेमके त्या खिलारे फॅमिली चा तळतळाटच घेतला होता . सकाळी खामकर निवांत होते , त्यांना वाटत होत आता सगळे ठीक होईल पण हा त्यांचा भ्रम होता . सकाळी मॉल चे गेट उघडे दिसले तेव्हा एक हवालदार आत गेला आणि त्याने त्या डेड बॉडीज पहिल्या , त्यांनी लगेच पोलीस स्टेशन ला फोन करून कळवले . आणि खामकराना त्या चौघान विषयी समजलं . आता मात्र खामकर पुरते घाबरून गेले . आणि त्याना 5 वर्षांपूर्वीचा तो दिवस आठवला .
खिलारे साहेब किती दिवस राहिले ओ तुमचे ? आणि राहिला ना इतका वर्ष या वाड्यात . आता बस की . वाटल्यास तुमच्या फॅमिली साठी मी गावा बाहेर मस्त बंगला बांधून देतो पण ही जागा सोडा ओ , ही जागा जाम आवडली मला ,ह्या जागी मला मोठा मॉल उभा करायचा आहे .
खूप दिवस गुंडाकडून धमक्या देऊन पण जेव्हा खिलारे फॅमिली ऐकत नाही हे समजलं तेव्हा खामकर स्वतः त्या 4 गुंडा बरोबर खिलारे च्या घरी आले होते . स्वतःच्या भाषेत समज द्यायला . पण स्वतःची वडिलोपार्जित जागा विकण्याचा खिलारे कुटुंबाचा विचार न्हवता . त्यामूळे ते तयार होत न्हवते . आता मात्र खामकर ईरेला पेटले होते , आता कोणत्याही परिस्थिती मध्ये त्यांना ती जागा हवी होती . " घी जब सीधी उंगली से नाही निकालती तब उंगली तेढी करनी पडती है " म्हणून खामकरानी त्यांचा पद्धतशीर पणे काटा काढायचा ठरवला . खामकरानी माघार घेण्याचे नाटक केले व अगदी भोळे पणाने खिलारे शी गप्पा चालू केल्या . साधे भोळे खिलारे त्यांना वाटले खरंच यांनी आपल्या जागेचा नाद सोडला . खामकर व खिलारे सहज गप्पा मारत बसले इतक्यात खामकरांचा ड्राईव्हर खिलारेच्या घरी आला आणि म्हणाला साहेब ताई साहेब देवाला जाऊन आल्यात हा प्रसाद वाटायला सांगितला आहे , आणि ऑफिस मध्ये पूजा ठेवायला सांगितली आहे . खामकरानी ड्राईव्हर ला सांगितले तो प्रसाद खिलारे साहेबांच्या घरी वाट आधी आणि मग आपल्या स्टाफ ला दे , खिलारे साहेब 2 दिवसात पूजा ठेवणार आहे ऑफिस मध्ये तेव्हा सहकुटुंब पूजे साठी यायचं तुमची इच्छा नाही ना ही जागा सोडायची , काही हरकत नाही , मी माझ्या मॉल साठी दुसरी जागा बघेन , पण तुम्ही काही राग मनात ठेवू नका . स्वभावने गरीब असलेल्या खिलारेनी खामकरान वर विश्वास ठेवला आणि इथेच त्यांचा घात झाला . खामकरांच्या ड्राईव्हर ने दिलेला प्रसाद खिलारे कुटुंबातील सर्वांनी खाल्ला . आणि खामकरांच्या त्रासातून आपल्याला देवाने सोडावले म्हणून सुटकेचा श्वास सोडला . खिलारे कुटुंबातील सर्वांनी प्रसाद खाल्ल्यावर खामकर बाहेर पडले . इकडे खिलारे कुटुंबातील सर्व सदस्यांना अचानक डोळ्या वर झापड येऊ लागली . 10 मिनिटात सर्व सदस्य बेशुद्ध पडली . खामकरांच्या गुंगीच्या प्रसादाने त्याचे काम केले होते . रात्री 12 वाजता खामकर व अनिल , रेशम , सचिन किशोर , कुदळ , रॉकेल आणि बाकीच्या साहित्या बरोबर हजर झाले . त्यांनी आधी खिलारे कुटुंबातील सर्वांचे , हात व पाय बांधले . त्यांच्या तोंडत कापड कोंबले . आता त्या वाड्यातील सर्वात आत असलेल्या खोलीत अनिल , किशोर , सचिन व रमेश मोठा खड्डा खणत होती . वाडा मेन रोड वर असल्याने शेजारी फक्त छोटी मोठी दुकानें होती , आणि खोदकाम वाड्याच्या आतील खोलीत चालू असल्यामुळे बाहेर आवाज पण जात न्हवता .खिलारे ची जमीन खामकरांच्या नावावर करण्याचे कागदपत्र आधीच बनवून ठेवले होते , खामकरानी हरिभाऊ चा अंगठा त्या कागदपत्रा वर उठवला . बऱ्यापैकी मोठा खड्डा खोदून झाल्या नंतर अनिल , रमेश , सचिन आणि किशोर यांनी खिलारे कुटंबातील सर्व सदस्यांना त्या खड्ड्यात फेकलं . हरिभाऊ खिलारे , त्यांची पत्नी सुजाता खिलारे , मोठा मुलगा हरीश खिलारे , त्याची पत्नी अंजली खिलारे , हरीश ची दोन लहान मूले चिन्मय आणि आकांशा , हरीश चा लहान भाऊ हेमंत आणि त्याची गरोदर बायको प्रिया अशा 8 जणांना हाता , पायाला बांधून , त्यांच्या तोंडात बोळा कोंबून त्यांना त्या खड्ड्यात फेकले . आता त्या खड्यात रॉकेल टाकले , रॉकेल च्या वासाने खिलारे कुटुंब जरा शुद्धीवर येत होते , समोर खामकर व त्याचे 4 साथीदार आपला काळ बनून उभे आहेत हे त्यांना कळून चुकले होते , त्यांनी त्या खड्यात धडपडत उभे राहायचा प्रयत्न केला .
क्रमश ......
मॉल ( पार्ट 1)
मॉल ( पार्ट 2 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/2_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/2_30.html
मॉल ( पार्ट 3)
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/3_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/3_30.html
मॉल ( पार्ट 4)
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/4.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/4.html