जानेवारी २०१२, पुणे शहर.
रोजच्यासारखी एक सकाळ, घड्याळात नऊ वाजले होते.. प्रभात रोडवरील 'अँडव्होकेट अनंत' यांच्या ऑफीस समोरच्या पार्किंग मध्ये एक पांढर्या रंगाची कार थांबते. अठ्ठावीस वर्षाचा तरुण वकील अनंत कारमधून बाहेर येऊन काहीशा घाईतच त्याच्या ऑफीसचा दरवाजा लोटून आत शिरतो..
आतमध्ये 'मोनाली' आणी 'शमा' या दोन मुली आपापल्या कॉम्प्युटर समोर बसलेल्या असतात..त्यापैकी शमा ही टाईपरायटर म्हणुन ऑफीसमध्ये याच महिन्यात जॉईन झालेली तर मोनाली ही गेल्या वर्षी एल.एल.बी पासआऊट होऊन वकीली पेशाची प्रँक्टीस करण्यासाठी अनंतची असिस्टंट म्हणुन गेल्या आठ महिन्यांपासून जॉब करत असते.. आँफिसबॉय कम ड्रायव्हर असणारा 'गणेश' आरामात एका कोपर्यातल्या सोफ्यावर बसलेला असतो..त्याला शक्यतो कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य जरा कमीच असते..

अनंत ऑफीसमध्ये येताच त्याला मोनाली बंद कॉम्प्युटर समोर हसर्या चेहर्याने हातातील मोबाईलमध्ये बोटे घालत असलेली दिसते..तो त्याच्या केबिनकडे जात असताना तिच्या डोक्यावर हळुच एक बोट टेकवून पुढे जातो..
"Nantar bolu apan ..Sir ale ata..Chal by"
मोनाली ने तिच्या मोबाईल वर टाईप करून मोबाईल टेबलवर ठेऊन दिला आणी समोरील पीसी स्टार्ट केला.📱
"Nantar bolu apan ..Sir ale ata..Chal by"
मोनाली ने तिच्या मोबाईल वर टाईप करून मोबाईल टेबलवर ठेऊन दिला आणी समोरील पीसी स्टार्ट केला.📱
अनंत आपल्या केबिनचा काचेचा दरवाजा लोटून आत जातो. केबिनमध्ये एका भिंतीवरील श्रीगणेशाच्या अगरबत्ती लावलेल्या फोटोला हात जोडून नमस्कार करतो आणी त्याच्या चेअरवर बसून आजच्या कामकाजाला सुरूवात करतो.
"काल दिवसभराच्या धावपळीमुळे कालची ती महत्वाची घटना पुर्ण समजलीच नाही" स्वताशीच बोलत अनंतने समोरील टेबलवरील फोन उचलून कानाला लावला.
"मोनाली, आजचे वर्तमानपत्रे घेऊन ये जरा केबिनमध्ये लवकर"
"मोनाली, आजचे वर्तमानपत्रे घेऊन ये जरा केबिनमध्ये लवकर"
मोनालीने गणेशकडुन आजच्या तारखेचा 'सकाळ, महाराष्ट्र टाईम्स आणी टाईम्स ऑफ इंडिया घेतला आणी ती केबिनमध्ये गेली. आणी टेबलसमोर ठेवलेल्या दोन चेअर पैकी एकावर बसली.
"हंम्म...स्वारगेट परिसरात म्रुत्युचे तांडव..पंधरा जण ठार, पंचवीस जण जखमी..मनोरूग्ण बसचालकास केली पोलीसांनी अटक"
वर्तमानपत्राचा मथळा मोठ्याने वाचत नंतरची पुर्ण बातमी अनंतने शांतपणे वाचून काढली. इतर दोन वर्तमानपत्रामधील सेम न्युज पण एकदा नजरेखालून घातली.📰
"ह्या अशा माथेफिरूला एस टी महामंडळाने ड्रायव्हर म्हणून कामावर कशासाठी घेतले होते पण..तो मनोरुग्ण असल्याचे आधी समजले नाही का ? व्यवस्थापकांना याचा जाब विचारला गेला पाहिजे..जेणेकरून पुन्हा अशा व्यक्तींना ते जॉबवर घेणार नाहीत"
मोनालीनेपण स्वताचे मत मांडले.
मोनालीनेपण स्वताचे मत मांडले.
"हो ..ते तर आहेच मोनाली, तसे पाहिले तर आपले पुणे शहर हे भारतातील इतर शहरांच्या मानाने काहिसे शांत समजले जाते पण कधीकधी येथे पण अशा पुर्ण देशाला हादरवणार्या भयंकर घटना घडतात... मला तरी असे वाटतेय की, मे बी तो माथेफिरू आधी आपल्यासारखा नॉर्मलच असावा त्यामुळे महामंडळ व्यवस्थापकांना त्याच्यावर संयश आला नसेल..आणी नंतर एखाद्या घटनेमुळे किंवा अपघातामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले असेल...पण जाऊदे आपल्याला काय करायचेय.. आरोपी गुन्हेगार पोलीसांच्या ताब्यामध्ये आहे..आता पोलीस आणी कोर्ट ठरवेल त्याला काय शिक्षा करायची ते"
अनंतने विषय सोडून देण्याचा प्रयत्न केला होता..पण हा विषय मात्र एवढ्या लवकर अनंतचा पिच्छा सोडणार नव्हता.
साडेअकराच्या सुमारास त्याच्या ऑफीसच्या बाहेर एक चकचकीत महागडी पॉश कार येऊन थांबली. महाराष्ट्र बार कौन्सिल चे अध्यक्ष ' सिनीयर अँडव्होकेट किल्लेदार' हे त्या महागड्या कारमधून उतरले..डोळ्यावरील गॉगलमधून अनंतच्या ऑफिसकडे पाहत अंगावरील चमकदार काळा कोट व्यवस्थित करत आत ऑफिसमध्ये शिरले.

"या सर...मला एक फोन केला असता तर मीच आलो असतो कि तुम्हांला भेटायला तुमच्या ऑफीसला"
किल्लेदार साहेबांना अचानक पाहताच अनंत जागेवरून उभा राहत म्हणाला.
"येथून जातच होतो तर म्हणल तुला भेटूनच जाऊ "
किल्लेदार साहेब समोरच्या चेअरवर बसत म्हणाले.
किल्लेदार साहेबांना अचानक पाहताच अनंत जागेवरून उभा राहत म्हणाला.
"येथून जातच होतो तर म्हणल तुला भेटूनच जाऊ "
किल्लेदार साहेब समोरच्या चेअरवर बसत म्हणाले.
"ऐ गण्या...दोन चहा आण रे" ☕️
अनंतने केबिनमधून आवाज दिला.
"हा..बोला सर काय काम काढले माझ्याकडे?"
अनंतने केबिनमधून आवाज दिला.
"हा..बोला सर काय काम काढले माझ्याकडे?"
"तुझ्यासाठी एक गुड न्युज आहे अनंता...संतोषच्या हाय प्रोफाईल केसमध्ये सरकारी वकील म्हणुन मी तुझी निवड करत आहे..काल संध्याकाळी याबाबत बार कौन्सिलचा निर्णय झालेला आहे"
टेबलवरील एक पेपर चाळत किल्लेदार म्हणाले.
टेबलवरील एक पेपर चाळत किल्लेदार म्हणाले.
"कोण हा संतोष? कोणत्या केसबद्दल बोलताय तुम्ही?"
"पेपरची हेडलाईनची बातमी व्यवस्थित वाचली नाहीस वाटत..कालच्या घटनेतील आरोपी 'मनोरुग्ण बसचालक संतोष'..ज्याने काल भर चौकात बेदरकारपणे गाडी चालवून अनेक लोकांना गाडीखाली चिरडले होते"
किल्लेदार शांतपणे म्हणाले.🚌
किल्लेदार शांतपणे म्हणाले.🚌
"काय..! पण..पण सर एवढी मोठी केस? तुम्हाला तर माहितीच आहे या केसकडे तर पुर्ण देशाचे लक्ष लागलेले असेल..आणी त्यामानाने माझा अनूभव तर.."
"म्हणुन काय झाले..धिस इज द ऑपोरच्युनिटी फॉर यू...या केसमुळेच तर देशभरात तुझे पण नाव जाईल...मी तुझ्या मागील केसचा पुर्ण स्टडी केला आहे..कोथरूडमधील वयोवृद्ध 'लोढा दाम्पत्य मर्डर केस' तु उत्तमप्रकारे हँडल केली होतीस..मोठ्या बंगल्यात एकटे राहणार्या मालकांचा खून करणार्या नोकरांविरुद्ध फारसे पुरावे उपलब्ध नसतानाही खरे गुन्हेगार गजाआड घालण्यासाठी तु मदत केली होतीस.. तुझ्या कार्यपद्धतीमुळे मी प्रभावित झालो आहे..आणी या केसमध्येपण तु तशाच प्रकारे काम करशील अशी माझी अपेक्षा आहे.."
आणखी थोडावेळ गप्पा मारून किल्लेदार अनंतच्या ऑफिसमधून बाहेर पडले आणी त्यांच्या कारमध्ये बसून पुन्हा रस्त्याला लागले.
इकडे ऑफिसमध्ये अनंतने रुमालाने चेहर्यावरील घाम पुसला.. आणी काही महत्वाच्या सुचना देण्यासाठी मोनालीला केबिनमध्ये बोलावले. अनंतकडे आता वेळ थोडा कमी होता.
थोड्याचवेळात अनंत त्याच्या केबिनमधून बाहेर पडला.
"गण्या चल ..आधी स्वारगेट बस डेपो आणी नंतर येरवडा जावून येऊ लवकर"🚗

"लंच टाईम होत आलाय सर..थोड्यावेळाने गेलो तर नाही चालणार का?" ऐनवेळी बाहेर जायचे ठरल्याने गण्या वैतागला होता.
"अरे जाताना मिसळ खायला घालतो तुला..उठ लवकर, वेळ नाही माझ्याकडे" अनंतने आवाज वाढवल्यानंतर गण्या त्याच्या जागेवरून उठला..आणी अनंतसोबत ऑफीसच्या बाहेर पडला.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
स्वारगेट चौकात पोहोचायला गणेश आणी अनंतला दूपारचे दीड वाजले होते..
चौकामध्ये रस्त्याच्या एका बाजूला कालच्या अपघातामध्ये चेंबलेल्या काही कार, रिक्षा आणी दुचाकी एकत्रित गोळा करून ठेवलेल्या दिसत होत्या..अनंतने काहीवेळ तिथेच थांबून थोडे निरीक्षण केले..सगळे म्रुतदेह केव्हाच हटवलेले असले तरी काही गाड्यांवर काही ठिकाणी अजूनही रक्ताचे लाल डाग अनंतच्या नजरेला जाणवत होते..🛵
"चल जरा डेपोमध्ये जाऊन येऊ आपण" अनंत गणेशला म्हणाला.
स्वारगेट चौकाला लागुनच असणाऱ्या एस टी बस डेपोमध्ये जाऊन
तिथल्या अधिकार्यांना भेटून अनंतने स्वताची ओळख आणी येण्याचे कारण सांगीतले आणी कालच्या घटनेसंबधी त्याच्या ज्या काही शंका होत्या त्या त्यांना विचारू लागला..

"मला कालच्या घटनेमधली बस पाहायला मिळेल का?"
अनंतने तेथील एका अधिकार्याकडे विचारणा केली.
अनंतने तेथील एका अधिकार्याकडे विचारणा केली.
"का नाही? डेपोमधील रिपेअर सेंटरला लावलेली आहे ती"
तिथल्या एका अधिकार्यासोबत अनंत डेपोच्या पाठीमागे असणार्या रिपेअर सेंटरकडे गेला..तेथे अनेक जून्या पुरान्या, गंजलेल्या गाड्यांसोबत काही अपघातग्रस्त नवीन गाड्याही होत्या..तिथेच एका बाजूला 'ती बसपण' उभी होती..हिरव्या- पांढर्या रंगाची एक निमआराम एशियाड गाडी होती ती..अनेक ठिकाणी ठोकल्यामुळे आणी धडका बसल्यामुळे त्या गाडीची अवस्था पण फारशी चांगली राहिलेली नव्हती.🚌

"या बसचे इंजिन आणी इतर ब्रेक्स सिस्टीम नॉर्मलच आहेत याची तपासणी केलीत ना तुम्ही ?"
बसचे निरीक्षण करत अनंतने विचारले.
बसचे निरीक्षण करत अनंतने विचारले.
"बिल्कुल.. आमच्या दररोजच्या वापरातील इतर बसेस सारखीच ही पण एक बस होती..कालच्या भयानक प्रसंगानंतर संध्याकाळी आमच्या टेक्नीशियनने परत एकदा पुर्ण गाडी चेक करून नॉर्मल असल्याचा रिपोर्ट सुद्धा दिलेला होता, हवी तर त्याची झेरॉक्स पण तुम्हाला देऊ शकतो मी."
अधिकार्यांनी अनंतचे शंकानिरसन केले. आणखी थोडावेळ तिथे थांबून अनंत आणी गणेश त्यांच्या कारमध्ये येऊन बसले.
अधिकार्यांनी अनंतचे शंकानिरसन केले. आणखी थोडावेळ तिथे थांबून अनंत आणी गणेश त्यांच्या कारमध्ये येऊन बसले.
"येथील काम झाले आता येरवडा जेलकडे चल"
अनंतने गणेशला सांगितले.
अनंतने गणेशला सांगितले.
#क्रमश...