ही सत्यघटना मला माझ्या एका ऑस्ट्रेलियन मैत्रीणी ने सांगितली होती तिच्या भावाच्या बाबतित घडलेली.मित्रांनो खुप लोकांना एंटिक पिस जमावन्याचा छंद असतो पण कधी कधी हाच छंद आपलीच वाताहात कशी करतो ह्याच एक उदाहरण देतोय , ह्या मुलाच नाव डिमेलो एक भूगर्भतज्ञ ह्याला एंटीक पिस जमा करण्याचा भारी छन्द होता त्याच्या कड़े कैक अश्या जुन्या 16व्या 17व्या अगदी त्याहुन ही अधिच्या शतकातील वस्तु होत्या,देश विदेशात जाऊन जमा केलेल्या खुप कीमती आणि ऐतिहासिक वस्तुचा त्याने सङ्ग्रह केला होता.ग्रामोफोन,दिशादर्शक,हत्यार,अत्तर,घड्याळ,सिगरेट लाइटर,बंदूक,पेटया,विविध प्रकार च्या बॉटल्स,बटन्स,भांडी,वाद्य,रत्ना च्या अंगठ्या,ज्वेलरी,त्या काळातील दिवे(कंदील),सिगरेट पाइप,त्या काळातील चलन(मोहरा) तेहि बहुसंख्य देशातील,काही लुप्त झालेल्या प्राण्यांचे सांगाड़े,इजिप्त मदुन एका उत्खननात पिरैमिड मधिल एका ममी च्या शेजारी ठेवले ला मध, अंड आणि मद्य पेय व त्याचा ग्लास , त्याच्या कड़े 15- 16-17 व्या शतकातील मद्याच्या बटल्या काही व त्याही अर्धवट भरलेल्या अश्या,त्या काळात वापरण्यत येणारी सौंदर्य साधन व त्याचे डबे,लिपिक साधन आणि कागदपत्रे,सुघन्दी अत्तर व पेटिबंद अत्तर ऐवज मौलिक हार रिंग्स, कडे,अश्या कितीतरी वस्तु अजुन सांगत राहिलो तर कित्येक दिवस जातील पण वस्तु सम्पणार नाहीत,त्याचा अर्टिफाक्ट रिकवरी चा बिजनेस होता.जमिनीत बऱ्याच वर्षा पूर्वी गाडल्या गेलेल्या वस्तु शोधून काढणे व त्याचा योग्य भावात लिलाव करणे वा कुणा अश्या जुन्या वस्तुंच्या दर्दी व्यक्तिस विकणे तर त्यातील काही वस्तु आवडल्यास आपल्या कड़े जतन करून ठेवणे असा छंद . आपल्या बंगल्यात त्याने मिनी संग्रहालय बनवला होता.पण त्या मधील त्याला सर्वात जास्त प्रिय असलेल्या वस्तु याने आपल्या बेडरूम मधील शोकेस मधे ठेवलेल्या होत्या त्यात एक 16व्या सेंचुरी मधील अर्धवट भरलेली मद्य बाटली, एक सिगरेट लाइटर , टोले देणार चाविवर चालणार भिंती वरील घड्याळ आणि एक लेडीज अंगठी.पण ह्या वस्तू जश्या त्याने आपल्या बेडरूम मधे ठेवल्या त्या सरशी त्याच्या आयुष्यात, फॅमिली लाइफ मधे अघटित घटना घड़णयांस सुरुवात झाली ती अंगठी त्याच्यासाठी घातक ठरली इतकी घातक की त्याने आपल्या जवळील सर्व गमावून बसनयाची वेळ आली त्याच्या नाशास कारणीभूत झाल्या त्याच्या च प्रिय वस्तु !!!
मित्रांनो प्रत्येकाला आपली अशी एक तरी वस्तु अति प्रिय असते की जी तो कोणाला ही द्यायला शेयर करायला तयार नसतो.माणसाची आपल्या अवडत्या वस्तुवर प्रेम असते,आस असते अगदी तो ह्या जगातुन गेला तरीही ती आस त्या वस्तुवर चिटकुन असते. आणि स्त्रियांच् आपल्या ज्वेलरी वर अत्यंत प्रेम आणी आस असते आश्यातच ती कोण्या प्रिय वक्तिकडुन मिळालेली असेल तर विचारुच नका😊. अश्याच आस असलेल्या प्राचीन काळातील वस्तुंचा ह्या डीमेलोने सङ्ग्रह केला होता आणि काही वस्तु तर बेडरूम मधे ठेवल्या होत्या.जेव्हा पासून ह्या वस्तु बेडरूम मधे आणल्या होत्या तेव्हा पासून काही अदृश्य शक्तिचा घरात वावर होत होता,कारण घरात वस्तु आल्या पासून त्याच्या घरात निगेटिविटी आली होती ,आनन्दी हसत खेळत वातावरण आता सुस्तावत चालल होत,घरात तो त्याची मिसेस आणि एक 5 वर्षांची मुलगी छोट कुटुम्ब होत,एकदा रात्रि हे तिघे झोपलेले असताना अचानक ह्या मुलीला तहान लागली म्हणून पाणी पिण्या साठी उठली असताना तिला त्या वस्तुंच्या भोवती काही सावल्या घुटमळत असताना दिसल्या तशी ती घाबरून पाणी न पिता झोपली.दुसर्या दिवशी तिने रात्रि ची घटना सांगितली पण तिच्यावर त्या दोघानी फारस लक्ष दिल नाही.असेच दिवस जात होते, एकदा त्या कुटुंबाला एक फंक्शन ला जायचे होते डेमोलो ची पत्नी रोझी आज जरा जास्तच सजली होती मुळात सूंदर असणारी तीला का कुणास ठाऊक पण घरातून निघताना ती 16 व्या शतकातील कुण्या तरी राणी ची अंगठी घालण्याचा मोह झाला म्हणून ती डेमेलोला ती अंगठी घालू का आजच्या दिवस असे म्हणाली,त्यात आज सजल्या मुळे आधीच सुंदर दिसत असलेली त्या अंगठी ने अजुन चार चांद लागतील व जरा मित्र मैत्रीनीना ही 16th सेंचुरी ची अंगठी दाखवून थोड़ जळवायला मिळेल म्हणून तो ही घाल म्हणाला.आणि सुरु झाला एक जीवघेणा तमाशा, आणि पहिला घात ह्या अंगठिने केला.
रात्री पार्टी वरुन ते तिघ घरी आले आणि फ्रेश होऊन झोपायला गेले, झोपायच्या आधी डिमेलो ने रोझी ला अंगठी काढून शोकेस मधे ठेवायला सांगितले, आणि रोझी अंगठी काढ़ायला गेली पण अंगठी काही केल्या बोटातून निघत नव्हती,खुप प्रयत्न करून अंगठी निघत नव्हती डिमेलो ने ऑइल, सोप चा सुद्धा उपाय केला प्रथम दर्शनी जे जे उपाय करता येतील ते दोघे करत होती आणी त्यांची छोटुली(जेनी) घाबरून गेली होती रडत रडत सांगत होती कि mom च्या back side ला कोणी तरी लेडी आहे,आधीच बोटातन अंगठी निघत नव्हती म्हणून ते दोघे वैतागले होते त्यात ही मुलगी अस बोलून गेल्यावर हे अजुन घाबरले, रात्रीचे 2:50 वाजले होते तिघे ही ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करत होते पण ती काही निघत नव्हती उलट ती अंगठी अजुन टाइट होत होती रोझिच्या बोटाच्या नसा अवळू लागल्या आणि बोट ही सुजू लागल हळू हळू हाथ सुजू लागला.रोझी ला असह्य वेदना होत होत्या पण अंगठी बोटात अजुन टाइट होत चालली होती डिमेलो रोझी ला ताबड़तोब हॉस्पिटल मधे घेऊन आला,डॉक्टरांची एक टीम ती रिंग काढायचा शर्थीचा प्रयत्न करत होती पण यश येत नव्हते रोझी चा संपूर्ण हाथ काळानीला पडत चालला होता शेवटी डॉक्टरनी त्यांना बोट कापल्या शिवाय आता पर्याय नाही असे सांगितले आणि रोझी व डेमेलोच्या सम्मतिने ते बोट ऑपरेशन करुन कापून टाकले.पण ती अंगठी काही त्या बोटातन निघत नव्हती तरीही छंद वेडा डिमेलो ते बोट परत घरी घेऊन आला ह्या विचाराने की आज न उद्या ते बोट सडून जाईल व त्यातून ती अंगठी परत मिळेल म्हणून ते रोझी च कापलेल बोट त्याने तिला आग्रह करून पुन्हा शोकेस मधे ठेवल आणि ते बोटाचा कधी पिंजर होतो व अंगठी मिळते याची वाट पाहू लागला पण आज एक महीना उलटुन गेला तरी ते बोट जसच्या तस आणि अंगटी सुद्धा त्यात घट्टच बसलेली .
काही केल्या ते बोट सड़त नवत आणि ति अंगठी निघत नव्हती रोझी च त्या अंगठी मुळे तोड़ाव लागलेल बोट पाहुन डिमेलोला खुप वाइट वाटे काय करावे असा विचार करत असताना त्याने ते बोट पुरुन टाकणयाचा निर्णय घेतला पण परत जर ती अंगठी कोणाला मिळाली तर त्यावर असे संकट यायला नको म्हणून त्याने ति अंगठी समुद्रात फेकून दिली,इथे बोट काढल्या मुळे रोझी चा हाथ खुप विचित्र दिसत होता तिच्या सूंदरतेला गालबोट लागल होत अस तिला सतत वाटे त्यामुळे ति सदा नर्वस रहात असे,तरी डिमेलो तिला तीच मन डाइवर्ट वहाव म्हणून खुप प्रयत्न करीत.पण ति आता खुप डिप्रेशन मधे होती,सतत हाता कड़े पाहुन रडत असे, असेच काही दिवस गेले जरा घराची विस्कटलेली घड़ी परत बसते न बसते तोच दूसरा घात झाला,तो घात केला होता अत्तराच्या कुपिने.एकदा डिमेलो ची मुलगी जेनी खेळता खेळता त्या शोकेस जवळ गेली अत्तरची कुपि पाहुन ति उघडण्याचा तिला मोह आवरता आला नाही शेवटी तिने ति कूपी उघड़ली आणि काय , त्यातून एक कधीच न अनुभवलेला मंद गन्ध सुगंध संपूर्ण बंग्लोभर पसरला ज्याला हा सुगंध आला तो वेगळीच दुनिया अनुभवत होता , रोझी आणि जेनी तर हिप्नोटाइज़ झाल्या होत्या त्या सुगंधाने कसलिच शुद्ध नव्हती कुठल्या जगात वावरत आहोत हेच त्यांना कळत नव्हते पण जेनिला एक स्त्री आकृति स्पष्ट जाणवत होती त्यातही ति आईला म्हणजे रोझी ला दाखवत होती खूण करून की ति बघ क्वीन किती सूंदर पण रोझी हिप्नोटाइज़ झाली होती त्या सुगंधाने त्यामुळे तिला काहीच सुधरत नव्हत.ति छोटी परत सम्मोहित होऊन त्या आकृति कड़े पाहू लागली त्यावेळी डिमेलो ऑफिस मधे होता,या सर्व प्रकारा पासून वंचित, आता तोहि घरी यायला निघाला होता पण इथे त्या सुगंधाने दुर्घंतीत परावर्तित व्हायला सुरुवात केली होती त्या दुर्गंधाने सर्वांची सम्मोहित अवस्था मोडून कढायला सुरवात केली होती, कामावरन घरी आलेला डिमेलो त्या उग्र वासाने गेट पाशीच थांबला त्याला आत येववेना इतका उग्र आणि घाण वास बंगलो तुन येत होता तोही त्या वासाने तिथेच बेशुद्ध होऊन पडला,
अत्तराच्या कुपितन येणाऱ्या दुर्गंधित वासाने गेट पाशी बेशुद्ध पडलेला डिमेलो पहाटे वासाची उग्रता कमी झाल्या वर शुद्धित आला,तबड़तोब धावत बंगल्यात जाऊन रोझी आणि जेनी ला आवाज देत होता पण काहीच प्रतिउत्तर येत नव्हते, शेवटी तो बेडरूम मधे आला तेव्हा त्याला त्या दोघी सोफ्यावर बसून एक टक छता कड़े हिप्नोटाइज़ होऊन बसलेल्या दिसल्या त्यात जेनी च्या हाता जवळच ती कूपी झाँकण उघडी असलेली दिसताच त्याने प्रथम ति कूपी बंद केली आणि दोघिंच्या चेहऱ्यावर पाणी मारले, थोड्या वेळान त्या शुद्धित आल्या,पण शुद्धिवर येताच जेनी खुप रडायला लागली अचानक तिच्या शरीरावर भाजल्या सारखे डाग दीसायला लागले त्यामुळे तिच्या हळू हळू तिचे शरीर जळायला लागले होते त्या छोट्या निरागस पोरीची एक चूक तिला महगात पडली ति म्हणजे त्या कुपिला उघडल्यावर त्यातून प्रथमदर्शनी जो कधीच अनुभवला नव्हता असा सुगंधाने मोहीत होऊन त्यातील अत्तर तिने गळ्याला, मानेला,कानापशी आणि थोड़ मनगटा वर लावल होत आणि आता तेच अत्तर तिला पोळून काढत होत,तिच्या अंगाची लाही लाही होत होती ति सैरभैर होऊन धावत होती शॉवर खाली जाऊन शॉवर घेत होती तर फ्रीज़ मधील कोल्ड वॉटर घेऊन अंगावर टाकत होती पण हे सर्व करताना एक काळी सावली सतत तिच्या भोवती घिरटया घालत होती,ज्याप्रमाणे घोडेस्वार घोड्याला चाबुक मारून पळवत असतो त्याप्रमाणे ति सावली जेनी पाण्या पाशी गेली की तिथुन तिला पिटाळून लावत पूर्ण बंगल्यात पळवत होती हे आता डिमेलो आणि रोझीने बघितल ते ही खुप घाबरले त्याने आपल्या बहिणीला फोन करून सर्व वृतांत सांगितला, ति लगबगिन त्यांच्या चर्च मधे गेली आणि fathar डिकोस्टा यांना घडलेला प्रकार सांगितला, फादर ने तिला एक क्रॉस आणि हॉली वॉटर देऊन ते अभिमन्त्रित पाणी जेनी वर शिम्पडून तो क्रॉस जेनिच्या गळ्यात घालायला सांगितला आणि लवकरात लवकर पोहोच असे सांगितले पण दुर्दैव डिमेलो ची बहिण(मार्था) येई पर्यन्त जेनिची प्राणज्योत मावळली होती दूसरा घात कुपिने केला
एक एक वस्तु एक एक घात करत होती आणि तीसरा घात केला त्या मद्याच्या बाटलिने, घरात घडत असलेल्या विचित्र घटनानी डिमेलो त्रासुन गेला होता त्यात त्याच्या छोट्या मुलीचा ही बळी गेला होता रोझी तर शून्यात हरवलेली असे घरात त्या भयंकर सावल्या मुक्त पणे संचार करत होत्या,त्यात डिमेलो ने फादर डिकोस्टा ने मार्था कड़े एक क्रॉस आणि हॉली वॉटर जे पाठवले होते ते त्याने रागात न घेता परत तिला चर्च मधे देऊन ये अस सांगून घरी जायला सांगितले.डिमेलो पूर्ण दारुच्या आहारी गेला होता दिवस रात्र पिन्यात जात होती.एक दिवस मध्यरात्रि त्याच्याकडील दारू संपली पण त्याला झिंग काही चढ़त नव्हती, आणि इतक्या रात्रि पण रोझिला एकट सोडून बाहेरुन आणन शक्य नव्हतं अश्यात त्याची नज़र त्या 16-17व्या शतकातील त्या मद्याच्या बाटलीवर गेली जशी बाटली त्याने उघड़ली एक काळी आकृति त्या बाटली भोवती व डिमेलो भोवती फिरायला सुरुवात झाली, त्याने तिकडे लक्ष न देता ग्लास भरला आणि गटा गट पिऊन मोकळा झाला पण आता त्याला एवढी झिंग कधीच चढली नव्हती जी एक प्याला ने चढली पण त्याला अचानक उल्टयानचा त्रास व्हायला सुरुवात झाली त्याने मार्था ला फोन करून मला हॉस्पिटल मधे एडमिट कर म्हणून सांगितले तात्काळ मार्था ने त्याला एडमिट केले पण उपचारा दरम्यान त्याला एक रक्ताची उल्टी होऊन त्याचे प्राण गेले रोझी ला हे समजताच ति पार खचुन गेली व महिन्याभरात ती पण गेली अश्या प्रकारे त्या एंटिक पीसेस ने त्या हसत्या खेळता घरच्या माणसांचा बळी घेतला. डिमेलो ने जमा केलेल्या सर्व एंटिक पिस मार्था ने एका म्यूज़ियम ला दान केल्या,काही काळा ने तेथील एका इंडियन च्या सांगण्या वरुन मार्था भारतात हरिद्वार येथील एक आश्रमातील मनःशांति केंद्रात भेटली तेव्हा तिने संगीतलेले हे भयंकर वास्तव ऐकून सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले होते.एक नवी ऊर्जा नवी उमेद घेऊन मार्था परत ऑस्ट्रेलियाला गेली.
लेखन प्रथम वाडकर