संध्याकाळची वेळ होती…घरची पुरुष मंडळी शेतावरून येण्याची वेळ झाली…सासूबाईंनी हौसाला चपतीसाठी कणिक मळण्याचा आदेश दिला…सासूबाई भाजी चिरु लागल्या …हौसा गप्प होती…दुपारी तळ्यावरून पाणी भरून आल्यापासून एक शब्द काढला नव्हता तिने…नेहमी हसत खेळत असणारी हौसा आज गप्प कशी असा सवाल सासूबाईंना पडला होता…हौसेने अख्खी परात भरून पीठ घेतलं आणि जोर जोरात मळू लागली…सासूबाईला जरा विचित्र वाटलं ती म्हणाल्या” आग पोरी 6 माणसं जेवायची एवढं कणिक का मळते?” हौसा एक शब्द बोली नाही नुसता घुर्रर्रर्र घुर्रर्रर्र आवाज करत कणिक मळत होती…
सासूबाई आता घाबरल्या ती आता धावत धावत बाहेर बसलेल्या आपला मुलगा रामा आणि आपल्या नवऱ्याला बोलवून घेऊन आल्या…आणि तोपर्यंत समोरच दृश्य बघून सगळ्यांचा थरकाप उडाला…हौसा ते मळलेल कणिक बकाबक खात होतो…आपली बायको अस का करते हे रामाला समजत नव्हतं..तो हौसा जवळ हळू हळू जात होता त्याने तिला हात लावताच हौसाने त्याला जोरदार धक्का दिला…रामा दूरवर जाऊन पडला…इकडे सगळे घाबरले होते…अख्खा डबा कणिक हौसा ने खाऊन संपवली होती आणि ती जोरजोरात मान फिरवू लागली…आणि तिच्यातून एक पहाडी आवाज बाहेर पडला “ही बाई मला आवडली हाय..मी हिला घेऊन जाणार”
सगळे अगदी लांब उभे होते…सासरा आता जाणून होता..सूनबाईला भूत बाधा झाली आहे…सासऱ्याने आता रामा ला भगत बाबा ला बोलवायला लावून दिल तसा रामा पटकन निघाला…इकडे हौसा गरगर मान फिरवत होती..हिला आवरायचं कसं?? सासऱ्याने एकाला आवाज दिला “अरे बंडू जा लवकर तालमीतली पोर बोलवून आण” हिला आता बांधून घातलं पाहिजे..रामाला पडलेला फटका बघून सासऱ्याने त्या भुताचा अंदाज बांधला होता….तालमीतली 10-12 धिप्पाड पोर रामाच्या घरात आली…
तालमीतला नंबर 1 पैलवान जग्गु पुढे उभा होता…त्याला बघून हौसेचे मान फिरवणे बंद झाले…तशी ती पोरं पुढं आली पण हौसा ने हवेत कागद फेकवे तसे त्याना फेकणे चालू केलं… आणि ती जग्गु जवळ आली जग्गु पार घाबरला होता सगळी पोर खाली अंग चोळत पडली होती…हौसेने त्याला पकडलं आणि वर उचलून खाली आपटलं…जग्गु खाली पडला ..हौसा आता जोर जोरात हसू लागली…पडलेलं पोर तिला पकडण्यासाठी पुढं आलं की ती त्याला दूर फेकून देत होती..जग्गु मागे मागे सरकत होता..हौसा जवळ आली म्हणाली “काय रे जग्या जत्रत मला चितपट केलं हुतस आता काय झालं हा??..जग्गुला काय कळेना …अरे हा आवाज तर ओळखीचा ..ह्यो आवाज तर त्या भैरू पैलवानचा ज्याला मी 4 वर्षांपूर्वी देवाच्या जत्रेच्या कुस्तीत हरवलं होत आणि त्याने हरल्यामुळे निराश होऊन आत्महत्या केली होती..आता मात्र जग्गु पार घाबरला होता…तो ओरडून ओरडून लोकांना सांगत होता..”ह्यो भैरी पैलवान हाय..ह्यो भैरी पैलवान हाय…”
आता लोकं प्रचंड घाबरली भैरी कुणालाच ऐकेना…हौसा आता जग्गु च्या छातीवर बसून त्याचा गळा आवळू लागली…तोपर्यंत तिकडून भगत धावत आला..सोबत रामा सुद्धा होता…इकडे जग्गु तळमळत होता…भगतने पिशवीतला भांडारा हौसाला लावला …बिरोबच्या भांडाऱ्याने हौसा आता जागेवर कोसळली… तिच्या फक्त डोळ्यांची बुबुळे हळू लागली…आणि तिच्या तोंडातून घुर्रर्रर्र घुर्रर्रर्र आवाज चालू होते…भगतने तिला उठून बसायला लावलं… तशी ती झटकन उठून बसली… भगत आपल्या करारी आवाजत तिला म्हणाला…बोल..बोल..कोण हाईस तू??काय पाहिजे तुला??ह्या लेकराला का पकडलंस..बोल…!!!
हौसा एका विचित्र पुरुषी आवाजात बोलू लागली…मी भैरू हाय भैरू …पैलवान हाय मी…ह्या ह्या जग्या मुळ माझा गावभर अपमान झाला..माझी चांदीची गदा गेली..घुर्रर्रर्र घुर्रर्रर्र … भगत बोलला..आर भाड्या मग दिलास नव्ह जीव??ह्या पोरीला काय पकडलं सोड हिला नाहीतर…. हौसा जरा जोरातच म्हणाली…आर काय करणार तुम्ही??” “ह्या बाईवर माझा जीव आलाय… मी हिला आज राती घेऊन जाणार..घुर्रर्रर्र घुर्रर्रर्र”
भगताला आता राग आला…आर पैलवान नव्ह तू..बाई ला काय पकडतो..चल आता सोड नाहीतर तुझ्या बापापुढं उभं करतो. हौसा लालेलाल डोळा दाखवत म्हणाला…आर निघ मी नाही घाबरत कुणाला …तू माझं काय सुद्धा वाकडं करू शकत नाही… अस बोलून हौसेने आपल्या हातावर समोरच्या चाकूने वार केले…तसा भगत पुढे आला आणि त्या घावावर भांडारा लावला…पोरकडे बघून जोरात बोलला… आर आन ती दोरी बांधा हिला..पोरांनी दोरी आणली आणि…हौसेला घट्ट बांधलं आणि बैल गाडीत टाकलं रामा भगत आणि गावची पोर तिला घेऊन महारुद्र मारुती मंदिराकडे नेऊ लागली. त्या गावचं ग्रामदैवत म्हणजे महारुद्र मारुती…अतिशय पुरातन मंदिर म्हणून ह्या मंदिराची ख्याती होती…कुठलीही भूतबाधा झाली की इथे असणाऱ्या एका खांबाला ज्याला लोक “मारुतीची गदा” म्हणत त्याला बाधित व्यक्तीला मिठी मारायला लावली की भूतबाधा निघून जात असे…अश्या मंदिराकडे ही बैलजोडी चालली होती.
भगत, रामा हौसे जवळ बसले होते…भगत जरा लांबच होता…तशी हौसा रामाला आपल्या नेहमीच्या प्रेमळ आवाजात म्हणाली “आव धनी जरा पाणी द्या की..तहान लागलीय ओ…” होसेचा केविलवाणा चेहरा बघून रामाला दया आली आणि त्याने पाण्याची बाटली हौसेच्या तोंडाला लावली…तशी हौसा परत म्हणाली “आव डोकं लई गरम झालंय ओ…” रामाने भगताकडे बघितलं त्याला जरा डुलकी लागली व्हती…मारुती मंदिर अजून लांब हुत…. रामाने ती बाटली हौसेच्या डोक्यावर ओतली…आणि परत तो भयाण आवाज बैलगाडीत घुमला… “आर येड्या तुझ्या बायकोला इसर आता ती माझी हाय… घुर्रर्रर्र घुर्रर्रर्र”
त्या भयाण आवाजाने भगताला जाग आली त्याने बघितलं की पाण्याने भांडारा वाहून गेलाय…त्याची नजर पडताच हौसा हसत खिदळत तिथून पळून गेली. भगत रामाला बोलला “आर मर्दा काय केलंस हे..आज आमोश्या हाय..आज रात्री तिला पकडून मारुती समोर आणलं पाहिजे नाहीतर त्यो हैवाण तिला घेऊन जाईल. आता पोर आणि रामा हौसेला शोधत होती…बाहेर भयाण काळोख होता…शोधाशोध चालू होती…इकडून तिकडून ओरडण्याचा आवाज यायचे पण तिथे जाई पर्यंत हौसा त्या पोरांना रक्तबंबाळ करून पळून जायची. शेवटी पोर एकत्र जमली भगत सोबत होता…एका ठिकाणाहून बैलाचा हंबरडा ऐकू येत होता…पोर तिथं पोचली तर त्याची अवस्था वाईट बनली…हौसा अक्षरशः एक बैलाचे लचके तोडत होती…पोरांनी तिला घेरलं…आणि पकडलं..दोघांतिघांना चावून तिने रक्तबंबाळ केलं होतं…तश्याच अवस्थेत भगतने परत भांडारा लावला…परत हौसा तळमळत शांत पडली…तिला परत रामाने उचलून गाडीत घातलं आणि बैलगाडी जोरात हाकू लागला.

अखेर मारुतीचं मंदिर आलंच हौसेला देवळात आणण्याचा प्रयत्न होऊ लागला पण ती जोर जोरात ओरडू लागली, पोरांनी तशीच उचलून तिला देवळात आणली ..समोरचा प्रचंड आकाराचा हातात गदा घेतलेला महारुद्र बघून हौसेचे डोळे जळजळू लागले ..मारुतीला बघताच एक धूर तिच्या डोळ्यातून निघत होता. भगत करारी आवाजात बोलला..”बोल आलास ना बापासमोर…तुझ्यासारखी लई भुतं सम्पल्यात हित” “आणा रे फेका ह्याला त्या खांबावर” पोरांनि आणि रामाने हौसेला हाताला पकडून नेण्यास सुरवात केली…तशी ती गयावया करू लागली…रडू लागली…शेवटी तिला त्या पवित्र खांबाला चिटकवले …तशी ती तडफडू लागली आणि एका मोठ्या किंचाळी ने खाली कोसळली….समोरची लोकं आणि समोरचा विशाल मारुती बघून हौसेच्या तोंडून एकच वाक्य आलं “मी हित कशी काय आले??” तसा रामा झटकन पुढे आला आणि तिला जवळ घेऊन रडू लागला……..
लेखक – शशांक सुर्वे
लेखक – शशांक सुर्वे