अघोर भाग 14-Marathi Bhutachi gosht
लेखक:कनिष्क हिवरेकर
जयदेव गाडीच्या चाकाजवळच मानेवर कसलातरी जोरदार फटका बसल्याने बेशुद्ध होऊन पडला होता. गाडी पूर्णपणे लॉक होती आणि लॉकच्या आतमधून काचेच्या पलीकडून विश्वास आणि संध्या दोघेही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते...आपल्या आई बाबाच्या ओरडण्याने..अनुदेखील केविलवाणी होऊन सर्व पाहत होती. संध्याने तिला आपल्या छातीशी कवटाळले होते...ढगांचा गडगडाट होऊ लागला...विजांनी थैमान घातल होत.जयदेवची बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडला होता...तेव्हाच संधीचा फायदा घेऊन नाथ्याने तिथे पडलेला भला मोठा दगड आपल्या दोन्ही हातांनी उचलला आणि जमेल तेवढ आवसान गोळा करून तो पुढे सरसावला... “ आताsss.....मालक माझ्यावर खुश होणारsss....मालक तुमचा इमान ठेवलाय मालकsss....” तसाच नाथ्याने जयदेवाच्या मस्तकात प्रहार करण्यासाठी तो दगड उगारला होता कि...तोच कवटीचा कडकड फुटण्याचा आवाज झाला...आघात झाला, प्रहार झाला...कुणाची तरी एक वेदनादायी आर्त किंकाळी त्या संपूर्ण जंगलात पसरली...आणि पसरली एक निरव जीवघेणी शांतता...विश्वास मात्र आपले विस्फारलेले डोळे घेऊन समोर घडलेला तो प्रकार पाहतच राहिला...मस्तकातील कवटी फुटली परंतु झालेला प्रहार नाथ्याने जयदेवावर नाही तर.....“नाथ्याsss....भाड्य ाsss....ह्याsss.....” वेड्या गंगारामने छ्कीच्या पित्याने हातात लाकडाचा ओंडका घेऊन त्याचा आघात नाथ्याच्या डोक्यवर केला...नाथ्याच्या हातातला दगड तिथेच खाली सुटला..आणि धाडकन नाथ्याच ताठ शरीर तिथेच जमिनीवर कोसळले...विजांच्या कडकडाट सकट पावसांच्या धारा त्या जंगलात कोसळायला सुरु झाल्या... “छ्केsss....ए छ्केsss..आलो ग...पोरेsss ...आलो...अघोऱ्या...आता तुझी गत हाय...चांडाळाsss....” अघोऱ्याच्या नावाने चित्कार करतच वेडा गंगाराम तिथून जंगलाच्या वाटेने सैरभैर असा वाड्याकडे धावत सुटला... “जयदेव ?” “जयदेव?” विश्वास गाडीच्या काचावरतीच थापा मारत होता... अचानक सुरु झालेल्या पावसांच्या सरीनी जयदेवाच्या चेहऱ्यावर शिंतोडे उडाले...डोळ्याच्या पापण्या मीचवत जयदेव शुद्धीत आला...डोके उचलतानाच तो मागे मानेला हात लावून कन्ह्ला... जयदेवला जाग आलेली पाहून विश्वास ने धीराचा श्वास घेतला... पडल्या पडल्याच जयदेवने बाजूला पाहिले तसा तो दचकून जागचा उठला... त्याच्या जवळच अगदी नजरेसमोर नाथ्याच रक्ताने माखलेल मस्तक होत...
जयदेव गाडीचा आधार घेऊन उभा राहिला...नाथ्याच्या रक्ताने चिखलात लालसर असा चिकट द्रव पसरला होता... जयदेवने समोर पाहिले तसे त्याच्या नजरेस विश्वास आणि संध्या पडले...जयदेवने तिथेच गाडीचा दरवाजा उघडला... तोच विश्वासने जयदेवला गाडीमध्ये घेतले... “जयदेव...ठीक आहेस न ?”
“हो मी ठीक आहे विश्वास थोडीशी जखम झालीय....आणि कोण होता हा? काय झाल आता ? कोणी केल हे ?” अचानक झालेल्या आघाताने जयदेवला भांबावल्यासारखे झाले होते. “या व्यक्तीला मी हि एकदाच पाहिलं होत जेव्हा मी या गावात प्रथम प्रवेश केला होता...”
“तुम्ही दोघ ठीक आहात न ?” जयदेव म्हणाला.. “होय आम्ही दोघेही ठीक आहोत....चला आपण वाड्यावरती जाउयात...इथे राहणे धोकादायक आहे...” विश्वास म्हणाला...विश्वासने जयदेवला शेजारच्या सीटवरती बसवले...आणि गाडीची चावी फिरवली तशी गाडी चालू झाली..पावसाच्या रपरप पडणाऱ्या सरींनी जणू गाडीवरून धबधबाच वाहत होता खडकाळ दगडाच्या रस्त्यामुळे कदाचित गाडी हेलकावे घेत जात होती...संध्या मागे अनुला कुशीत घेऊन झोपवत होती...अनुचा ताप आणखीन वाढतच जात होता. पावसात आणखीन काहीवेळ त्यांनी जंगलामध्ये काढला असता तर गाडी चिखलात धसण्याची भीती होती....परंतु वेळ पाहता विश्वासने गाडी वेगात पळवली...आणि जंगलाचा रस्ता पार केला...व तिघेही वाड्याच्या जवळ येऊन पोहोचले...गाडी थांबताच क्षणी कसलातरी आवाज झाला...जसे कि एखादी जाडजूड भरदार गोष्ट एखाद्या पत्र्यावर पाय ठेऊन उभी राहिलीय....विश्वासने गाडी दरवाज्यातच उभी केली होती...परंतु तो आवाज हेरण्यास मात्र तो चुकला...विश्वासने गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीमधून बाहेर पाय ठेवला होताच कि जयदेवने त्याचा हात धरून त्याला आतमध्येच थांबवले... “विश्वास थांब...! गाडीतून बाहेर निघू नकोस.” विश्वासला आश्चर्य वाटले जयदेव असे का म्हणतोय गाडीतर अगदी वाड्याच्या जवळच येऊन थांबली आहे...अन बाहेर नाही निघायचं म्हटल्यावर.... “जयदेव वाडा आला आहे...अनुची तब्ब्येत ठीक नाहीये आपण आतमध्ये...” तोच जयदेवने आपल्या ओठांवर बोट ठेवले... “श्शश्स्स...!!” आणि तेच बोट गाडीच्या छताच्या दिशेने केले... “वरती.... कोणीतरी... आहे...!” जेव्हा विश्वासने जयदेवच्या इशाऱ्याकडे पाहिले तेव्हा मात्र विश्वास आणि संध्या दोघांच्याहि छातीत धस्स झाल....कारण गाडीचे छत एक इंच खाली धसले गेले होते असे जसे कुणीतरी त्याच्यावरती आपले दोन्ही पाय देऊन उभ आहे.... विश्वासने जयदेव आणि संध्याकडे पाहिल
आणि तसेच त्याने संध्याला खाली राहण्याचा इशारा केला...संध्याने अनुला सीट् च्या खाली झोपवले व स्वतःहि आपले डोके खाली झुकवले...संध्याचे डोळे मात्र अनुला होणाऱ्या त्रासामुळे रडून सुजून लालबुंद झाले होते. “जयदेव आणि विश्वास दोघांनीही आपले डोकी खाली झुकवून घेतली होती...वरती जे काही होत ते काहीक्षणाकरिता स्थिर उभ होत...पण हळू हळू त्याने जागेवरून हलायला सुरुवात केली...त्याच पाउल जसे जसे तो दुसऱ्या जागेवर छतावर मांडत होता तसे तसे गाडीची छत खाली खाली येऊ लागली होती....आता विश्वास जयदेव आणि संध्या तिघांनीही आपले श्वास रोखून धरले होते...गाडीचा एक दरवाजा फक्त उघडा होता तो देखील विश्वासच्या बाजूनेच... तोच विजेचा एक जोरदार तडाखा बसला..लवलवत्या विजेचा एक निळसर चंदेरी प्रकाश संपूर्ण वाड्यावर पडला..आणि त्याच उजेडात दिसून आली एक भयंकर सावली... एका प्रचंड आकाराच्या सैतानी , दानवी रुपाची सावली...जे आता सध्या गाडीच्या छतावरती उभ होत... विश्वास आणि जयदेव दोघेहि त्याच्या गुरगुरण्याचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू शकत होते संध्याने विश्वासचा हात आपल्या हाताने घट्ट पकडून ठेवला... तोच त्याच्या हालचालीमध्ये आणखीन बदल झाला...कारण आता ते गाडीवरून खाली उतरण्याच्या तयारीत होत. विश्वासने मनोमन स्वतःलाच दोष द्यायला सुरुवात केली... “माझ्या मुळे आज माझ्या बायकोचा ,माझ्या मुलीचा आणि माझ्या मित्राचा जीव धोक्यात आलाय...काय अर्थ आहे असे एखाद्याला मरणाच्या तोंडाशी ढकलून जगण्याचा..त्या पेक्षा मी त्याच्याशी दोन हात करून...” तोच मागून विश्वासला एक आवाज ऐकू आला...
“तो विचारसुद्धा मनात आणू नकोस....” हा आवाज जयदेवचा होता. त्याने जणू विश्वासच्या मनातील विचारच ऐकले होते आपला मित्र कसा आणि काय आहे हे त्याला चांगलेच ठाऊक होते गाडीवर असलेल्या त्या ...त्या भयंकर उपद्रव तात्पुरते स्थिर झाल्यासारखे वाटत होते...काही मिनिटे जयदेव, विश्वास आणि संध्या तिघांनीही आपली काहीएक हालचाल होऊ दिली नाही...तिघांचाहि असा समज झाला कि ते सुटले ...छतावरती जे काही होत त्याने आपल सावज , आपल भक्य् सोडल होत...गाडी अजूनही पावसातच उभी होती. संध्याने अलगद आपली मान वरती काढली आणि आजूबाजूला पाहिले...आणि नजर थेट मागच्या काचावरती टाकली....जेव्हा संध्याने आपली नजर मागच्या काचावरती टाकली तिथेच त्या क्षणात काचाच्या पलीकडे तिला एक भयंकर , विद्रूप , कुरूप सडलेला त्वचेचा...दाहक नजरेचा पांढऱ्याफकट बुभळ विरहीत डोळ्यांचा कानापर्यंत विखुरलेल्या केसांचा एक सैतानी चेहरा दिसून आला जो तिच्या चेहऱ्या पासून काही इंच अंतरावर होता. संध्या आपली किंकाळी अडवू शकली नाही...तोच विश्वासने तिला खाली ओढून घेतले...तोपर्यंत तो भयंकर चेहरा तिथून नाहीसा झाला होता...आणि त्याने गाडीच्या उघड्या दरवाज्याच्या दिशेने सरकत सरकत यायला सुरुवात केली होती विश्वास आणि जयदेव दोघांच्याहि नजरा आपल्या दिशेने वाढत येणाऱ्या मृत्यूवर थिजून राहिल्या होत्या आता कुठल्याहि क्षणी ते आतमध्ये येऊ शकत होत. आणि मग... डाव समाप्त....आणि तसेच झाले...उघड्या दरवाज्याच्या चौकटीत एक भयानक अनुकुचीदार नखांचा पंजा धडकन येऊन पडला...ते जे काही होत ते अदू होत..कदाचित विकृत शक्ती सोबतच त्याची शरीररचना हि विकृतच होती परंतु त्याच्या मागचा खरासूत्रधार...अजूनहि पडद्याआडच दडून हे सर्व जीवघेणे डाव मांडत होता...
“त्रिवार नंदना...रक्षाम भवतु....सैतान्ना....भस्म हो...” काही पावित्र्य रक्षकमंत्रांचा आवाज विजेच्या कडकडाटीसह वाड्याच्या आवारात घुमला...त्या आवाजाच्या कंपनाने जणू पावसाच्या थेंबाची आणि वाऱ्याच्या गतीची जणू कायापालटच झाली...थेंबात झुरत चिरत चडचडतच एक ज्वलंत ज्वालाग्राही मशाल....दुरूनच त्या सैतानाच्या त्या उपद्रवाच्या पंजावर येऊन थडकली...चीरग्या उडाल्या , ठिणग्या उडाल्या...अग्नीच्या पावित्र्याने त्या सैतानाच्या पंजावर आघात झाला....वेदनेच्या दैवाच्या अंशाच्या अग्नीने, ज्वालेने त्याला अत्यंत पिडा झाली...विश्वासने समोर पाहिले तेव्हा त्याच्या नजरेस दिसून आले कि त्याच विहिरीच्या मार्गांवरून जखोबा आणि त्याचे दोन साथीदार तिथे धावत येऊन पोहोचले होते.जखोबाचा चेहरा मात्र अगदी निर्भीड होता पण त्यांच्या सोबत धावत आलेले दोघे मात्र त्या उपद्रवाला डोळ्यासमोर नाहीस होताना पाहून बिथरले होते....जखोबा गाडीजवळ पोहोचेपर्यंत त्या सैतानाने त्या उपद्रवाने तिथून एका काळसर धुराच्या वलयात आपल रुपांतर करून पळ काढला... “ चला....उतरा लवकर गाडीमधून आतमध्ये चला...नाहीतर ते केव्हाही इथ येऊ शकत....चला लवकर बाहेर या...”
जखोबा विश्वास संध्या आणि जयदेव तिघांना गाडीचे दरवाजे उघडत बाहेर घेत म्हणाले...जयदेवची मान रक्ताने माखून गेली होती कदाचित रक्त प्रमाणाबाहेर वाहिले जात होते...इकडे संध्याच्या हातामध्ये अनुने देखील आपल्या वाड्याच्या दरवाज्यातून सर्वजण आतमध्ये शेवटी जखोबा आतमध्ये जाणारच होते कि त्यांना पाठीमागून कोणीतरी सदऱ्याला गच्च पकडले...आणि तो म्हणू लागला.... “मला...बी...मला बी...यायचं आतमध्यी....माझी छ्की हाय नव्ह आत..मला यायचं.....”
“जखोबा येऊदेत त्याला हि.....बाहेर त्याच राहण धोकादायक आहे....ते जे काय आहे त्याची कीव कशावरही नाहीये....आणि कुणावर हि नाहीये...” विश्वास म्हणाला...
संध्याने आतमध्ये आल्यावरती अनुच अंग तपासून पाहिले...तीच अंग तापेने फणफणत होत.... “ अनु ? ए अनु ? बाळा ? उठ न ए ? ए अनु ?” संध्या घाबरली होती कारण अनु काही केल्या आपले डोळे उघडायला तयार होत नव्हती... “विश्वास....अनुला बघ न काय झालय ? ती डोळेच उघडत नाहीये....तिला ताप भरलाय अंगात....प्लीज काहीतरी कर...” संध्या पाणावलेल्या डोळ्यांनी विश्वासकडे पाहत विनंती करू लागली... “ आपण तिला लवकरात लवकर खोलीमध्ये घेऊन जाऊ तिचे अंगावरचे सगळे कपे भिजले आहेत त्यानेच तिला ताप भरला आहे....विश्वास आपल्याला मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या कराव्या लागतील लवकर चल....” जयदेव उद्गारला....जखोबा तिथे उभा सर्व काही पाहत होता...जखोबाने त्यांच्या सोबत असलेल्या दोन्ही साथीदारांना बजावले... “हे बघा...तुम्ही दोघेही दरवाजाला राखण राहा....आणि कुणीही आले तरी कितीही आवाज आले तरीदेखील दरवाजा उघडायचा नाही...आजची रात्र फक्त इथे मुक्काम आहे...सावध रहा...”
“होय...हः होय मालक...” दोन्ही व्यक्ती जखोबाला होकार देऊन बंद दरवाज्याजवळ जाऊन बसले...जखोबाच्या जवळच वेडा छ्कीचा बाप कुडकुडत उभा होता...जखोबाने त्याच्या दोन्ही खांद्यांना धरून त्याला एका मशालीजवळ नेऊन बसवले... “इथून हलु नकोस....कुठे हि जाऊ नको....” असे सांगून जखोबा...तिथून निघाले व थेट अनुच्या खोलीच्या दिशेनी गेले...विश्वास आणि जयदेव दोघांनीही स्वयंपाकघरात शोधून मिठाच पाणी आणल.. वेडा गंग्या मशालीजवळ कुडकुडत बसलाच होता कि... “बाबा तू इथ हाय ? मी तर कवा पासून तुला शोधती हाय....तू इथ का बसला....?”
गंग्याने आपली मान आश्चर्याने अलगदपणे त्या आवाजाच्या दिशेने वळवली...समोर उभी छ्की पाहून त्याचा मात्र आनंदाचा पारावारच राहिला नाही....त्याचे डोळे आसवानी डबडबून निघाले.....त्याने आपला हात छ्कीच्या दिशेने वाढवला... “येsss....येsss....माझ्याज वळ ये ग माझे बायsss....” इकडे दरवाज्यात उभ्या त्या दोघांची हि नजर त्याच्यावर पडली... “आर तिथ तर कोणीच दिसत नाय...मग yo येडा नेमका.... कुणाला ये ये म्हणतोय... ?”
त्यावर दुसरा त्याच्याकडे पाहतच राहिला “हेहे...असल त्याची छ्की...” चुकून होईना पण ते वाक्य त्याच्या मुखातून निघताच त्या दोघांनी पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने एकमेकाकडे पाहिले भीतीची एक अनामिक लहर श्वासावाटे त्या दोघांच्या काळजातून आरपार झाली....त्यांनी समोर नजर फिरवली तेव्हा आणखीन एक धक्का त्यांना बसला...यावेळी गंग्या त्याच्या जागेवरून नाहीसा झाला होता.
क्रमश:
लेखक:कनिष्क हिवरेकर
जयदेव गाडीच्या चाकाजवळच मानेवर कसलातरी जोरदार फटका बसल्याने बेशुद्ध होऊन पडला होता. गाडी पूर्णपणे लॉक होती आणि लॉकच्या आतमधून काचेच्या पलीकडून विश्वास आणि संध्या दोघेही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते...आपल्या आई बाबाच्या ओरडण्याने..अनुदेखील केविलवाणी होऊन सर्व पाहत होती. संध्याने तिला आपल्या छातीशी कवटाळले होते...ढगांचा गडगडाट होऊ लागला...विजांनी थैमान घातल होत.जयदेवची बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडला होता...तेव्हाच संधीचा फायदा घेऊन नाथ्याने तिथे पडलेला भला मोठा दगड आपल्या दोन्ही हातांनी उचलला आणि जमेल तेवढ आवसान गोळा करून तो पुढे सरसावला... “ आताsss.....मालक माझ्यावर खुश होणारsss....मालक तुमचा इमान ठेवलाय मालकsss....” तसाच नाथ्याने जयदेवाच्या मस्तकात प्रहार करण्यासाठी तो दगड उगारला होता कि...तोच कवटीचा कडकड फुटण्याचा आवाज झाला...आघात झाला, प्रहार झाला...कुणाची तरी एक वेदनादायी आर्त किंकाळी त्या संपूर्ण जंगलात पसरली...आणि पसरली एक निरव जीवघेणी शांतता...विश्वास मात्र आपले विस्फारलेले डोळे घेऊन समोर घडलेला तो प्रकार पाहतच राहिला...मस्तकातील कवटी फुटली परंतु झालेला प्रहार नाथ्याने जयदेवावर नाही तर.....“नाथ्याsss....भाड्य
जयदेव गाडीचा आधार घेऊन उभा राहिला...नाथ्याच्या रक्ताने चिखलात लालसर असा चिकट द्रव पसरला होता... जयदेवने समोर पाहिले तसे त्याच्या नजरेस विश्वास आणि संध्या पडले...जयदेवने तिथेच गाडीचा दरवाजा उघडला... तोच विश्वासने जयदेवला गाडीमध्ये घेतले... “जयदेव...ठीक आहेस न ?”
“हो मी ठीक आहे विश्वास थोडीशी जखम झालीय....आणि कोण होता हा? काय झाल आता ? कोणी केल हे ?” अचानक झालेल्या आघाताने जयदेवला भांबावल्यासारखे झाले होते. “या व्यक्तीला मी हि एकदाच पाहिलं होत जेव्हा मी या गावात प्रथम प्रवेश केला होता...”
“तुम्ही दोघ ठीक आहात न ?” जयदेव म्हणाला.. “होय आम्ही दोघेही ठीक आहोत....चला आपण वाड्यावरती जाउयात...इथे राहणे धोकादायक आहे...” विश्वास म्हणाला...विश्वासने जयदेवला शेजारच्या सीटवरती बसवले...आणि गाडीची चावी फिरवली तशी गाडी चालू झाली..पावसाच्या रपरप पडणाऱ्या सरींनी जणू गाडीवरून धबधबाच वाहत होता खडकाळ दगडाच्या रस्त्यामुळे कदाचित गाडी हेलकावे घेत जात होती...संध्या मागे अनुला कुशीत घेऊन झोपवत होती...अनुचा ताप आणखीन वाढतच जात होता. पावसात आणखीन काहीवेळ त्यांनी जंगलामध्ये काढला असता तर गाडी चिखलात धसण्याची भीती होती....परंतु वेळ पाहता विश्वासने गाडी वेगात पळवली...आणि जंगलाचा रस्ता पार केला...व तिघेही वाड्याच्या जवळ येऊन पोहोचले...गाडी थांबताच क्षणी कसलातरी आवाज झाला...जसे कि एखादी जाडजूड भरदार गोष्ट एखाद्या पत्र्यावर पाय ठेऊन उभी राहिलीय....विश्वासने गाडी दरवाज्यातच उभी केली होती...परंतु तो आवाज हेरण्यास मात्र तो चुकला...विश्वासने गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीमधून बाहेर पाय ठेवला होताच कि जयदेवने त्याचा हात धरून त्याला आतमध्येच थांबवले... “विश्वास थांब...! गाडीतून बाहेर निघू नकोस.” विश्वासला आश्चर्य वाटले जयदेव असे का म्हणतोय गाडीतर अगदी वाड्याच्या जवळच येऊन थांबली आहे...अन बाहेर नाही निघायचं म्हटल्यावर.... “जयदेव वाडा आला आहे...अनुची तब्ब्येत ठीक नाहीये आपण आतमध्ये...” तोच जयदेवने आपल्या ओठांवर बोट ठेवले... “श्शश्स्स...!!” आणि तेच बोट गाडीच्या छताच्या दिशेने केले... “वरती.... कोणीतरी... आहे...!” जेव्हा विश्वासने जयदेवच्या इशाऱ्याकडे पाहिले तेव्हा मात्र विश्वास आणि संध्या दोघांच्याहि छातीत धस्स झाल....कारण गाडीचे छत एक इंच खाली धसले गेले होते असे जसे कुणीतरी त्याच्यावरती आपले दोन्ही पाय देऊन उभ आहे.... विश्वासने जयदेव आणि संध्याकडे पाहिल
आणि तसेच त्याने संध्याला खाली राहण्याचा इशारा केला...संध्याने अनुला सीट् च्या खाली झोपवले व स्वतःहि आपले डोके खाली झुकवले...संध्याचे डोळे मात्र अनुला होणाऱ्या त्रासामुळे रडून सुजून लालबुंद झाले होते. “जयदेव आणि विश्वास दोघांनीही आपले डोकी खाली झुकवून घेतली होती...वरती जे काही होत ते काहीक्षणाकरिता स्थिर उभ होत...पण हळू हळू त्याने जागेवरून हलायला सुरुवात केली...त्याच पाउल जसे जसे तो दुसऱ्या जागेवर छतावर मांडत होता तसे तसे गाडीची छत खाली खाली येऊ लागली होती....आता विश्वास जयदेव आणि संध्या तिघांनीही आपले श्वास रोखून धरले होते...गाडीचा एक दरवाजा फक्त उघडा होता तो देखील विश्वासच्या बाजूनेच... तोच विजेचा एक जोरदार तडाखा बसला..लवलवत्या विजेचा एक निळसर चंदेरी प्रकाश संपूर्ण वाड्यावर पडला..आणि त्याच उजेडात दिसून आली एक भयंकर सावली... एका प्रचंड आकाराच्या सैतानी , दानवी रुपाची सावली...जे आता सध्या गाडीच्या छतावरती उभ होत... विश्वास आणि जयदेव दोघेहि त्याच्या गुरगुरण्याचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू शकत होते संध्याने विश्वासचा हात आपल्या हाताने घट्ट पकडून ठेवला... तोच त्याच्या हालचालीमध्ये आणखीन बदल झाला...कारण आता ते गाडीवरून खाली उतरण्याच्या तयारीत होत. विश्वासने मनोमन स्वतःलाच दोष द्यायला सुरुवात केली... “माझ्या मुळे आज माझ्या बायकोचा ,माझ्या मुलीचा आणि माझ्या मित्राचा जीव धोक्यात आलाय...काय अर्थ आहे असे एखाद्याला मरणाच्या तोंडाशी ढकलून जगण्याचा..त्या पेक्षा मी त्याच्याशी दोन हात करून...” तोच मागून विश्वासला एक आवाज ऐकू आला...
“तो विचारसुद्धा मनात आणू नकोस....” हा आवाज जयदेवचा होता. त्याने जणू विश्वासच्या मनातील विचारच ऐकले होते आपला मित्र कसा आणि काय आहे हे त्याला चांगलेच ठाऊक होते गाडीवर असलेल्या त्या ...त्या भयंकर उपद्रव तात्पुरते स्थिर झाल्यासारखे वाटत होते...काही मिनिटे जयदेव, विश्वास आणि संध्या तिघांनीही आपली काहीएक हालचाल होऊ दिली नाही...तिघांचाहि असा समज झाला कि ते सुटले ...छतावरती जे काही होत त्याने आपल सावज , आपल भक्य् सोडल होत...गाडी अजूनही पावसातच उभी होती. संध्याने अलगद आपली मान वरती काढली आणि आजूबाजूला पाहिले...आणि नजर थेट मागच्या काचावरती टाकली....जेव्हा संध्याने आपली नजर मागच्या काचावरती टाकली तिथेच त्या क्षणात काचाच्या पलीकडे तिला एक भयंकर , विद्रूप , कुरूप सडलेला त्वचेचा...दाहक नजरेचा पांढऱ्याफकट बुभळ विरहीत डोळ्यांचा कानापर्यंत विखुरलेल्या केसांचा एक सैतानी चेहरा दिसून आला जो तिच्या चेहऱ्या पासून काही इंच अंतरावर होता. संध्या आपली किंकाळी अडवू शकली नाही...तोच विश्वासने तिला खाली ओढून घेतले...तोपर्यंत तो भयंकर चेहरा तिथून नाहीसा झाला होता...आणि त्याने गाडीच्या उघड्या दरवाज्याच्या दिशेने सरकत सरकत यायला सुरुवात केली होती विश्वास आणि जयदेव दोघांच्याहि नजरा आपल्या दिशेने वाढत येणाऱ्या मृत्यूवर थिजून राहिल्या होत्या आता कुठल्याहि क्षणी ते आतमध्ये येऊ शकत होत. आणि मग... डाव समाप्त....आणि तसेच झाले...उघड्या दरवाज्याच्या चौकटीत एक भयानक अनुकुचीदार नखांचा पंजा धडकन येऊन पडला...ते जे काही होत ते अदू होत..कदाचित विकृत शक्ती सोबतच त्याची शरीररचना हि विकृतच होती परंतु त्याच्या मागचा खरासूत्रधार...अजूनहि पडद्याआडच दडून हे सर्व जीवघेणे डाव मांडत होता...
“त्रिवार नंदना...रक्षाम भवतु....सैतान्ना....भस्म हो...” काही पावित्र्य रक्षकमंत्रांचा आवाज विजेच्या कडकडाटीसह वाड्याच्या आवारात घुमला...त्या आवाजाच्या कंपनाने जणू पावसाच्या थेंबाची आणि वाऱ्याच्या गतीची जणू कायापालटच झाली...थेंबात झुरत चिरत चडचडतच एक ज्वलंत ज्वालाग्राही मशाल....दुरूनच त्या सैतानाच्या त्या उपद्रवाच्या पंजावर येऊन थडकली...चीरग्या उडाल्या , ठिणग्या उडाल्या...अग्नीच्या पावित्र्याने त्या सैतानाच्या पंजावर आघात झाला....वेदनेच्या दैवाच्या अंशाच्या अग्नीने, ज्वालेने त्याला अत्यंत पिडा झाली...विश्वासने समोर पाहिले तेव्हा त्याच्या नजरेस दिसून आले कि त्याच विहिरीच्या मार्गांवरून जखोबा आणि त्याचे दोन साथीदार तिथे धावत येऊन पोहोचले होते.जखोबाचा चेहरा मात्र अगदी निर्भीड होता पण त्यांच्या सोबत धावत आलेले दोघे मात्र त्या उपद्रवाला डोळ्यासमोर नाहीस होताना पाहून बिथरले होते....जखोबा गाडीजवळ पोहोचेपर्यंत त्या सैतानाने त्या उपद्रवाने तिथून एका काळसर धुराच्या वलयात आपल रुपांतर करून पळ काढला... “ चला....उतरा लवकर गाडीमधून आतमध्ये चला...नाहीतर ते केव्हाही इथ येऊ शकत....चला लवकर बाहेर या...”
जखोबा विश्वास संध्या आणि जयदेव तिघांना गाडीचे दरवाजे उघडत बाहेर घेत म्हणाले...जयदेवची मान रक्ताने माखून गेली होती कदाचित रक्त प्रमाणाबाहेर वाहिले जात होते...इकडे संध्याच्या हातामध्ये अनुने देखील आपल्या वाड्याच्या दरवाज्यातून सर्वजण आतमध्ये शेवटी जखोबा आतमध्ये जाणारच होते कि त्यांना पाठीमागून कोणीतरी सदऱ्याला गच्च पकडले...आणि तो म्हणू लागला.... “मला...बी...मला बी...यायचं आतमध्यी....माझी छ्की हाय नव्ह आत..मला यायचं.....”
“जखोबा येऊदेत त्याला हि.....बाहेर त्याच राहण धोकादायक आहे....ते जे काय आहे त्याची कीव कशावरही नाहीये....आणि कुणावर हि नाहीये...” विश्वास म्हणाला...
संध्याने आतमध्ये आल्यावरती अनुच अंग तपासून पाहिले...तीच अंग तापेने फणफणत होत.... “ अनु ? ए अनु ? बाळा ? उठ न ए ? ए अनु ?” संध्या घाबरली होती कारण अनु काही केल्या आपले डोळे उघडायला तयार होत नव्हती... “विश्वास....अनुला बघ न काय झालय ? ती डोळेच उघडत नाहीये....तिला ताप भरलाय अंगात....प्लीज काहीतरी कर...” संध्या पाणावलेल्या डोळ्यांनी विश्वासकडे पाहत विनंती करू लागली... “ आपण तिला लवकरात लवकर खोलीमध्ये घेऊन जाऊ तिचे अंगावरचे सगळे कपे भिजले आहेत त्यानेच तिला ताप भरला आहे....विश्वास आपल्याला मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या कराव्या लागतील लवकर चल....” जयदेव उद्गारला....जखोबा तिथे उभा सर्व काही पाहत होता...जखोबाने त्यांच्या सोबत असलेल्या दोन्ही साथीदारांना बजावले... “हे बघा...तुम्ही दोघेही दरवाजाला राखण राहा....आणि कुणीही आले तरी कितीही आवाज आले तरीदेखील दरवाजा उघडायचा नाही...आजची रात्र फक्त इथे मुक्काम आहे...सावध रहा...”
“होय...हः होय मालक...” दोन्ही व्यक्ती जखोबाला होकार देऊन बंद दरवाज्याजवळ जाऊन बसले...जखोबाच्या जवळच वेडा छ्कीचा बाप कुडकुडत उभा होता...जखोबाने त्याच्या दोन्ही खांद्यांना धरून त्याला एका मशालीजवळ नेऊन बसवले... “इथून हलु नकोस....कुठे हि जाऊ नको....” असे सांगून जखोबा...तिथून निघाले व थेट अनुच्या खोलीच्या दिशेनी गेले...विश्वास आणि जयदेव दोघांनीही स्वयंपाकघरात शोधून मिठाच पाणी आणल.. वेडा गंग्या मशालीजवळ कुडकुडत बसलाच होता कि... “बाबा तू इथ हाय ? मी तर कवा पासून तुला शोधती हाय....तू इथ का बसला....?”
गंग्याने आपली मान आश्चर्याने अलगदपणे त्या आवाजाच्या दिशेने वळवली...समोर उभी छ्की पाहून त्याचा मात्र आनंदाचा पारावारच राहिला नाही....त्याचे डोळे आसवानी डबडबून निघाले.....त्याने आपला हात छ्कीच्या दिशेने वाढवला... “येsss....येsss....माझ्याज
त्यावर दुसरा त्याच्याकडे पाहतच राहिला “हेहे...असल त्याची छ्की...” चुकून होईना पण ते वाक्य त्याच्या मुखातून निघताच त्या दोघांनी पांढऱ्या पडलेल्या चेहऱ्याने एकमेकाकडे पाहिले भीतीची एक अनामिक लहर श्वासावाटे त्या दोघांच्या काळजातून आरपार झाली....त्यांनी समोर नजर फिरवली तेव्हा आणखीन एक धक्का त्यांना बसला...यावेळी गंग्या त्याच्या जागेवरून नाहीसा झाला होता.
क्रमश:
MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,