माझ्या तांत्रिक जीवनातील हा दुसरा अनुभव सांगताना मला खुप आनंद होत आहे कारण अशा अनुभवाने मी खुप प्रगती केली सर्वाना नमस्कार आदेश
मी नाथपंथात नवीन होतो सुरवात होती माझी मी त्यावेळी माझ्या गुरूजीं जवळ ही विद्या शिकायला सोमवारी जायचो पण त्यांची वारी मंगळवार ची असल्याने मग तिथेच सेवेला रहायचो प्रत्येक वेळी काहीतरी वेगळे शिकायला मिळायच म्हणून मी जास्त गुरूजींच्या सहवासात रहायचो असाच एक सोमवार मंगळवार गुरू स्थानावर होतो आमचे गुरू महाकाली उपासक आहेत साक्षात शिव स्वरूप आहेत तर मंगळवार ची वारी दरबार भरला सकाळी चालू झालेला दरबार संध्याकाळी सहा वाजता संपला बाकी आवरा आवरी करे पर्यंत सात वाजले मी निघण्यासाठी आज्ञा घेण्यासाठी गुरूंन जवळ गेलो बोलले थांबा थोडा वेळ असा अजून अर्धा तास गेला शेवटी निघालो त्यांच्या घरा पासून दोन किलो मिटर चालत हायवेला आलो मला माझ्या घरी जायला चिपळूनवरून शेवटची गाडी दहाची होती पण चिपळूनला पोचण्यासाठी मला कोणतही वहान मिळण गरजेच होत मी येणाऱ्या प्रत्येक गाडीला हाथ दाखवत होतो कोणी थांबेना आसा तासभर जास्त वेळ गेला आता शेवटची गाडी चुकणार अस वाटू लागल मनातून आई महाकालीचा धावा सुरू केला थोडा वेळाने एक सुमो गाडी थांबली गाडीत चालक एकटाच होता मी त्यांच्या बाजूच्या शीटवर बसलो गाडी चिपळूनला निघाली ईकडतिकडच्या गप्पा मारता कधी चिपळूनला पोचलो मला कळलच नाही स्टँण्डला उतरलो त्याला पैसे द्यायला गेलो तो ड्रायव्हर बोलला भाऊ पैसे नको फक्त मला सांगा की तुमच्या बरोबर जी बाई होती ती कुठे गेली मी म्हणालो दादा मी एकटाच होतो तो बोलला नाही हो तुमच्या बरोबर बाईने पण गाडीला हाथ दाखवला म्हणून मी गाडी थांबवली अशी चर्चा झाली त्याला ही नवल वाटले आणि मला ही पण नंतर लक्षात आले की आई महाकाली च माझ्या मदतीला आली होती एस टी स्टँण्डला गेलो चिपळून गुहागर गाडी उभीच होती मी पटकन गाडी पकडली एका सीटवर बसलो आता पुढचा विचार चालू झाला की आता शृंगारतळी बाजारपेठेत उतरणार पण तिथून साडेचार किलो मीटर चालत घरी जायच आहे ते पण रात्री साडे अकरा बारा वाजता आणि २५ वर्षापूर्वी तो प्रवास म्हणजे भयानक होता संध्याकाळी सात नंतर त्या रस्त्याला कोणी जायच नाही असे चमत्कार पावलोपावली व्हायचे अशी काही ठिकाण त्या रस्त्यावर होती की भर दुपारी जरी कोणी एकटी व्यक्ती भेटली तर ती झपाटली म्हणून समजा तर माझी अवस्था काय झाली असेल विचार करा तरी शृंगारतळीला उतरलो मी एकटाच असल्याची मला जाणीव झाली सोबतीला कोणी नाही धीर धरून रस्ता धरला आता आधार फक्त गुरूनामाचा नामस्मरण करत निघालो जवळ जवळ तीन किलो मीटर रस्ता कापला आता शेवटचा टप्पा बाकी होता भीतीने मी घामाघूम झालो होतो हातात बँटरी ही नाही आता खरी परीक्षा शेवटच्या टप्यात होती ती अशी ब्राम्हण वाडी सोडली तर पुढे साधारण १ किलो मीटरवर माझी वाडी येते पण तो मधला पट्टा असा की तिथे वस्ती नाही आणि तेंव्हा छोटी गल्लीसारखा रस्ता होता आणि तिथे पिशागत जोरात फिरायची अस ऐकून होतो तिथे अर्ध्यावर कोकंबीचे झाड होत तिथे ही हमखास भुताडकी असून त्रास देते हे मला ही माहीत होते तरी चालत राहीलो त्या गल्लीत आलो तशी माझ्या अवती भलती खेळ चालू झाले कोण ओरडत होत कोण नाचत होत कोण मला भीती दाखवत होत माझी पाचावर धारण बसली पण मला कोणी स्पर्श करत नव्हते मुखात गुरूमंत्र चालू होता प्रसंग बाका दोन मिनिट थांबलो गुरूना आवाज दिला पाठिवर थाप पडली चल मी आहे डोळे उघडले ते रूप आज ही डोळ्या समोरून जात नाही आतिशय तेजपुंज जटाधारी शरीर भस्मांकीत माथ्यावर त्रिपुंड घनदाट दाढीमिशी हातामध्ये एक दंड होता तो पुढे झाला मी मंत्र मुग्ध होऊन पाठी मागून चालू लागलो त्याला पाहताच भुताडकी बाजूला होऊ लागली मी चालत चालत घरा जवळ आलो तो थोडा मागेच थांबला मी दरवाज्याची कडी वाजवली आई उठली बाहेरची लाईट लावली आवाज आला निघतो मी मागे पाहील तो नव्हता घरात गेलो आता माझ्याशी काय घडले कुणाला सांगणार पण आता कळलत ते पहीले भैरव दर्शन होते आदेश
सदगुरू असता पाठीशी मग कशाची भीती हाच अनुभव मला आला आदेश आदेश आदेश
श्री सुरेंद्रनाथ महाराज शिंदे (नाथांचा दास )