राखणदार
फु फुस फु.....
फु फु फुस ......
फु फु फुस ......
एक विषाची लांब पिचकारी मारून मी... माझे तोंड मोकळे केले.....
आजकाल कोण भेटतच नाही चावायला.... हे विष पुन्हा कसे जहाल होईल... त्या देवालाच माहित....
होय बरोबर ओळखलं तुम्ही ... मी
.अर्थातच जहाल नाग.... तुमच्या भाषेत राखणदार.... गुप्तधनावर राखण करणारा नाग....
.अर्थातच जहाल नाग.... तुमच्या भाषेत राखणदार.... गुप्तधनावर राखण करणारा नाग....
गेली सुमारे शंभर एक वर्षे मी येथे वावरतोय...
माझ्या डोक्यात अर्थातच नागमनी तयार झालाय... मिशा फुटून.. थोडेफार पंख ही फुटले आहेत....मला.... होय सापाला पंख... अहो मी काही साधासुधा नाग नाही.. राखणदार आहे मी....
पूर्वजन्मी एक अट्टल दरोडेखोर होतो मी.. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडून सोने, दागिने, पैसे लुटायाचे... त्यांना जीवे मारायाचे... कुठेतरी खड्डा खणून त्यांना पुरायाचे... खुप माया जमवली होती मी.... गावात मला खुप मान होता.. होय आता तुम्ही म्हणाल दरोडेखोरला कसला मान.... अहो गावातील दिवसा माझे सज्जन रूप एक.... रात्री माझे लुटारूच रूप एक...
गोरे साहेब आणि पाच शिपाईची तुकडी मला गावात पकडायला आली होती.... पूर्ण घर शोधले त्यांनी...... काहीच सापडले नाही त्यांना..
सापडेल कसे... मागच्या नदी जवळील ओसाड जमिनीत पाच हांडे भरून सोने, चांदी, मोहरा पुरल्या होत्या..... म्या...
हल्ली छोटीमोठी लूटमार करणे सोडून दिले होते मी... एका मोठ्या दरोडेखोर टोळीत सामील झालो होतो... जेवढी मोठी टोळी तेवढीच मोठी लूट... काल रात्रीला लय वंगाळ घडले..... मोठी लूट झालिया....... अगदी एक कुर्हाडीचा घाव मुडदे पचास................ सकाळच्या प्रहरी मी माझा वाटा घेऊन घराकडे निघालो होतो....
आज परत एक नवीन हंडा भरला.. आता रातीला परत नेऊन शेतात पुरला पाहिजे...
थोडी सावधगिरी बाळगायाला हवी... हल्ली गोरे शिपाई थेट बंदूकीतुन गोळ्या डागतात.... काय करावे धंदा सोडून द्यावा म्हणतोय मी....
रातीला टिकावं घेऊन परत शेतापलीकडे नदीवर गेलो... तीच माझी गुप्त जागा...
दोन एक हात खड्डा खनला.... आज मोजून सहा हांडे झाले...
नदीच्या रस्त्याने पुन्हा गावाकडे वळून घरी येण्यास निघालो.. टेकडीपलीकडे कोणतरी मला पाहतायात असे दिसले .... अरेच्चा आता पळायला हवे.. गोरे शिपाई.... दिसतायत....
उर फाटेपर्यंत जंगलात पळालो.... पळतच होतो..थांबलो की संपलो.... काहीतरी विपरीत घडनार आता .. हो कोणीतरी फितूरी केलीय वाटते....
तसें हे पहिलेच लक्षात आले पाहिजे होते... गेली कित्येक दिवस मी गावात अनोळखी लोक पाहत होतो.....
फुकट मारला तिला... बाई अगदी मोठ्या घरातील दिसत होती... कुऱ्हाड दाखवताच तिने सर्व सोने... चांदी... पैसे हाती दिले होते...
पण आमच्या दरोडेखोरांचा धर्म म्हणा.. लूट केली.. की मूडदा पडायलाच पाहिजे..... आज मारताना भीती वाटली... बाई गाभन होती..
पण आमच्या दरोडेखोरांचा धर्म म्हणा.. लूट केली.. की मूडदा पडायलाच पाहिजे..... आज मारताना भीती वाटली... बाई गाभन होती..
एका घावात सुद्धा मुंडकं उडालं नाय म्हणजे काय... कुऱ्हाड घासायला हवी.. धार गेली वाटते.. बाई ला धरून दोन मुडदे पाडले... गाडीवानाचे व तिच्या अंगरक्षकाचे....
घोडे दिले सोडून.... असेच... जंगलात.. अरे पण या वक्ताला एक घोळ झाला.. नक्कीच आपल्याला पाहिले गेलेय.. ज्यांनी पाहिले नक्कीच ते आता वर्दी देणार... शिपायांना.. आता पकडले जाऊ शकतो आपण.....
सावध राहायला पाहिजे...हर वेळेला..
सावध राहायला पाहिजे...हर वेळेला..
धावून धावून उर फुटायची पाळी आली होती...
झाडाच्या ढोलित दम घेण्यासाठी थांबलो... आता हातात पण हत्यार न्हवते... घाईघाईत टिकावं पण खनले तिथेच राहिले र...
.काय करावे पळावे...की थांबावे... आता सकाळ झाली की आपण पकडले जाणार... पळायला हवे..
झाडाच्या ढोलित दम घेण्यासाठी थांबलो... आता हातात पण हत्यार न्हवते... घाईघाईत टिकावं पण खनले तिथेच राहिले र...
.काय करावे पळावे...की थांबावे... आता सकाळ झाली की आपण पकडले जाणार... पळायला हवे..
टाप टाप..
घोड्याचं आवाज जवळ आयकू येऊ लागला...
बंदूकीतुन बार टाकल्याचा आवाज झाला..गोळी थेट डोक्यात टाकली गेली माझ्या... लय गरम गरम भाजलेल्या गत झालंय.... कोणी पाणी देताय काय..
एक जोरदार कळ आली डोक्यात.... रक्त वाहू लागले... हळूहळू डोळ्यापुढे अंधार येऊ लागला... खेळ खल्लास.... झाला...

चार एक जाडजूड अगडबंब पैलवान मला एका रेड्यावर बसून नेते व्हते.. गळ्यात रस्सीचा फास पळू हि शकत न्हवतो.... पण कुठं माहित नाही.. वरच्या वर चालत हुतो... अगदी वर जाताना शेत..नदी छोटी दिसत होती... हर वेळेला...
पांढुरके ढग दिसू लागले..... त्यासमोर एक मोठा राजवाडा दिसू लागला...... नक्की कुठं आलोया.
होय यो स्वर्गच आहे...
मोठंमोठ्या दोराने मला बांधून त्या सभेत उभे केले गेले... दोन बाजूला मोठ्या रांगा होत्या... उजवीकडे असलेली लोक चेहऱ्याने सज्जन दिसत असावेत.. माझ्यामागे माझ्यासारखेच..राकट दिसनारे
कित्येक जण उभे होते....
कित्येक जण उभे होते....
माझ नाव पुकारले गेले.. डोळे बंद करायची मला आज्ञा दिली गेली....
मोठ्याने संस्कृत मधेय काहीतरी माझ्या नावाने वाचले गेले.. मला बोलायची पण आज्ञा न्हवती...
एकशे दहा वर्षे... काल सर्प योनी... असे काही उच्चरले गेले.... त्या आवाजात जरब होती... मी नकळत हात जोडले...
एकशे दहा वर्षे... काल सर्प योनी... असे काही उच्चरले गेले.... त्या आवाजात जरब होती... मी नकळत हात जोडले...
पुढच्या क्षणाला मी माझ्या सोन्याच्या हंड्यापाशी वावरु लागलो....
सर्पयोनीत असलो तरी मी तुम्ही समजताय तसा मी नाग नाही....
ते वेगळे.. आम्ही वेगळे.... ते जोडी बनवू शकतात.. फिरू शकतात... कात टाकू शकतात आम्ही नाही...आमच्या योनीला शाप म्हणावा तर फक्त आणि फक्त आम्ही पुरलेल्या गुप्त धनाच्या आसपास वावरयाच.... इतकच हाती राहिलेय....

नदीकाठी रात्री हल्ली खुप जण तांत्रिक साधना करण्यास येतात... हल्लीच मी त्या नदी वर नवीन बांधलेल्या पुलाच्या खालोखाल बसलेल्या गिर्या भूतास एक मृत मानवी शरीर खाताना पाहिले.... लयच खाप खाप खात होता तो... अधाशी कुठला....
माझ्या जवळ कोणीही येत नाही... रात्रीच्या चंद्रप्रकाशात मी रोज माझा नागमनि चमकावून लोकांचे लक्ष वेधत असतो.... जेणेकरून कोणीतरी तांत्रिक जानकर येईल.. व माझे गुप्त धन काढून मला मुक्ती देईल.....
होय अर्थात मी चावणार नाही अगदी फना शपथ.. जर माझी दौलत कोना सज्जन व्यक्तीच्या हाती लागली तरच मुक्ती लवकर भेटेल... होय अशी आज्ञा आहे देवाची.......
नदीकाठी धरन बांधले जात आहे... गाव हळूहळू रिकामी होत आहेत.... एक ना एक दिवस माझ्या वावरातील जमीन... माझ्या गुप्त धना सोबत कायमची पाण्याखाली जाईल ओ....
न जाणो किती वर्षे मी परत याच अवस्थेत इथे अडकेल... दहा वर्षे आहेत तुमच्यापाशी.. मला शोधायला.... या मला शोधा.... हो.. हो
अर्थातच तुम्ही सज्जन असाल.. मिळालेले धन लोक कल्याणांनासाठी खर्च करणार असाल तर माझे धन..तुम्हाला विनासायास मिळेल... माझा नागमनी घेऊन मला या शापातुन.. योनीतुन मुक्त करा.... मी वाट पाहतोय तुमची....येताय ना...

समाप्त..
काल्पनिक भय?? (अतृप्त आत्म्याची कथा )
समुद्रकिनाऱ्यावरचा चकवा.....
समुद्रकिनाऱ्यावरचा चकवा.....