अघोर भाग ८
लेखक : कनिश्क हिवरेकर...
“ए थांब....” विश्वास ओरडत त्या माणसाच्या मागे मागे धावत होता तो जणू काही त्या जंगलाचाच वासी रानातलाच राहता असल्यासारखा ढांगवर ढांग टाकत धावत सुटला होता. आणि विश्वास त्याच्या मागावर होता. अनु त्या माणसाच्या खांद्यावर हेलकावे खात रडत होती. विश्वासला तो सापडणे अवघड वाटू लागले....तरीही त्याने आपले पाय थांबवले नाही...इकडे आवाज ऐकून सखाराम सुद्धा धावत आला...संध्याने घाई घाईतच बकुळाला उठवून उभे केले घाबरलेल्या डोळ्यांनी विश्वासकडे अनुकडे आणि त्या धावणाऱ्या विद्रूप माणसाकडे पाहू लागली...सखारामहि त्याच्या मागो माग धावू लागला...तो माणूस आख्या रानावनात आरोळी ठोकत धावत होता. “ माझी छ्की सापडली.... माझी छ्की सापडली....” आणि तोच आवाज सखारामच्या कानावर पडला...तसे धावता धावता अचानक त्याच्या पावलांचा वेग मंदावला...कारण हा आवाज त्याच्या ओळखीचा होता वीस वर्षापूर्वी हाच आवाज त्याने वाड्याच्या वऱ्हांड्यात ऐकला होता. छ्कीच्या नावाने हाका मारत तो आला होता
इकडे धावता धावता विश्वास आता त्याच्या जवळ पोहोचला होता. अचानक तो माणूस दगडाला ठेसकाळून अडखळला...आणि त्याच क्षणी विश्वासचा हात देखील त्याच्यावर पडला..विश्वासने त्याला कोसळण्यापासून वाचवले आणि त्याच्या सोबत अनुला देखील अनु अजूनहि त्याच्या खांद्यावर रडतच होती. विश्वासने अगदी संधी पाहून अनुला त्याच्या तावडीतून सोडवून घेतल आणि त्या विद्रूप माणसाला धक्क्याने दूर केले. दिसायला त्याचे काळेपांढरे वाढलेले केस अंगात फाटका मळका चिखलाने माखलेला सदरा होता बाह्याच्या गुंड्या उघड्या तुटलेल्या होत्या दाढी वाढलेली आणि म्हातारा होता तो एकंदरीत...तो विश्वासला पाहून ओरडला... “ए माझी पोरगी दे...छ्की दे माझी...दे...” असे म्हणत परत विश्वासवर धावत आला....तोच इकडून मागून सखाराम तिथे पोहोचला त्याने झटक्यासरशी त्या माणसाला मागे सरकवले सखारामचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर होते सखाराम त्याचा चेहरा पाहायचा प्रयत्न करत होता पण तो माणूस झटपट करत अनुच्याच दिशेने कुण्या छ्कीचे नाव घेत झेपावत होता...सखाने त्याला समोरासमोर धरले आणि चेहरा पाहताच त्याच नाव सखा च्या ओठावर आले... “ गंग्या....?” ते नाव ऐकताच तो माणूस तिथेच शांत झाला त्याने आपल्या केसांच्या झिपऱ्यामधून सखाकडे बघितले... “ गंग्या ? गंग्या ? मी गंग्या ? हा ! हा ! हा.... ! मी.. मी... मी गंग्या आहे ! तू मला वळखला? ए ए तू माझ्या छ्कीला वळखतो का ?” तिथे आता संध्या हि आली होती विश्वासकडून अनुला घेत तिने तिचे मुके घेतले...पण विश्वास त्या माणसाची अवस्था पाहून शांत झाला होता. त्याला कळून चुकले कि तो एक माथेफिरू एक वेडा होता. सखारामला त्याच्या प्रश्नांना देण्यासाठी काहीएक उत्तर नव्हत तब्बल वीसवर्षांनतर त्याने गंगारामला पाहिलं होत आणि ते देखील अश्या अवस्थेत...
“मामा कोण आहे हा ? आपल्या अनुच्या मागे का लागला आहे हा ? कोण आहे हा मामा ?” संध्या काहीक्षण घाबरली होती. तिचा थरथरता आवाज ते स्पष्ट सांगत होता कारण काळजाचा तुकडाच तिच्या पासून दूर जात होता. भीती.... तर साहजिक होती.
संध्याचा आवाज ऐकून त्या वेड्याने तिच्याकडे पाहिले.... “ तू....?” त्या वेड्याने संध्याला पाहूनच आपले दोन्ही बाजूचे केस पकडले.... आणि दात खातच बरळू लागला... “ निघून जाsss .....इथून निघून जाsss ....तुझीच वाट बघतोय त्यो...तुझीच वाट बघतोय त्यो.....ए सावित्रे ताये....पोरगी आली ए तुझी.....” त्या सर्वापासून मागे सरकत सरकत वाड्याच्या दिशेने पाहत तो सावित्रीच्या नावाने ओरडू लागला वाड्याच्या भिंतीना खिडक्या दारांना पाहून सांगू लागला....वेड्या सारखा उड्या मारत काट्या कुट्यात शिरू लागला...संध्या विश्वास बकुळा अन सखाराम त्याच्याकडे एकटक बघतच जात होते...तो वेडा जसा जसा सावित्रीचे नाव घेत होता तसा तसा जंगलाच्या पानापानात सळसळांट सुरु झाला...सर्वांच्या नजरा त्या जंगलाच्या भयान कृत्यावर फिरू लागल्या... संध्याने विश्वासच्या खांद्यावर हात ठेवत त्याचा शर्त गच्च पकडला.... “ सावित्रेsss...... आली गsss....तुझी पोर आली....” बघता बघता वाऱ्याचा वेग वाढत जाऊ लागला भूतासारखा व्हुई व्हुई करत वारा इकडून तिकडून वाहू लागला....
“ तो आलाsss...” हातांच थरथरत बोट वाड्याकड दाखवत तो वेडा बरळू लागला...विश्वासने त्याच्या बोटाच्या दिशेने वाड्याकडे पाहिले...गावात पाउल टाकल्या पासून एका मागून एक संदिग्ध्ये निर्माण होऊ लागली होती. अनु त्याच्या आवाजाने ओरडण्याने अजून रडत होती.पण त्याच्या अश्या भयानक उद्गारांनी मात्र बकुळा बिथरून गेली होती. तोंडावर हात ठेवतच ती त्या वाड्याकडे तिरकस नजरेन बघू लागली...
“ निघून जाssss.....इथून नायतर तो नराधम तुझ्या पोरीला सोडणार नाय.....तो बघ तो त्या वाड्यात....वाड्यात बघ सख्या तिथून बघतोय....हसतोय तोत्या खिडकीत हाय सख्या.....कुणाला सोडणार नाय त्यो कुणाला नाय...” ओरडत बरळतच तो तिथून रानवाटेने झाडामधून धावत गेला...पण इथे उभ्या या सर्वांच्या चेहऱ्यावर तो जाता जाता एक चेतावणी आणि एक भय सोडून गेला...
संध्याचा हात खांद्यावर पाहून विश्वासने तिच्या हातावर हात ठेवला... “ काही नाही....बस वेडा होता तो...दुर्लक्ष कर...”
आणि अखेरीस संध्या आणि विश्वासने त्या वाड्याच्या अंगणात पाय ठेवला...तिथल्या भिंती ते दरवाजे त्या खिडक्या....तिथले एक न एक पान जणू संध्याच्या येण्याने सक्रीय झाल होत.. विश्वासने संध्याच्या हातातल्या चाव्या घेतल्या आणि वाड्याच्या मुखदरवाज्याच कुलूप त्याने हातात घेतले...काळेभोर गंज चढलेल...विश्वासने हातातल्या किल्ल्या पैकी त्या टाळ्याची किल्ली शोधायला सुरुवात केली...एखाद चुंबक दुसऱ्या चुंबकाकडे आकर्षित व्हावे तसेच झाले आणि त्या जुडग्यातून सटकन एक चावी बाहेर निघाली...आणि त्या टाळ्याच्या छेदात शिरली विश्वास मात्र ते बघून दचकलाच...कदाचित भास झाला असेल नजरेला विचार करत विश्वासने चावी फिरवली तसे टाळे कार्र्र कर्र कट कट असा आवाज येत उघडले...आतमध्ये पाउल ठेवल्यानंतर संध्याच्या स्वप्नातील एक न एक दृश्याचा तिच्या नजरेसमोर वास्तविक देखावा उभा होता. बर्फाळ वाळवंटच वाटत होत ते...स्वतःमध्येच त्या वाद्याचा एक स्वतंत्र ऋतूच होता. पण अस म्हणतात हा ऋतू त्यांच्यासाठी अगदी अनुकूल...अगदीच हवेच्या झुळके झुळकेत त्याचं वास्तव्य होत कोणे एके काळी गुलाम , हुकुम, आज्ञा, साखळदंड या सर्वांची महत्ती होती तिथे.
सखारामला देखील क्षणभरासाठी असे वाटले जसे घड्याळातल्या सुया भूतकाळाच्या दिशेने फिरल्या तिथली एक न एक गोष्ट तो ओळखून होता दुमजली तो चिरेबंदी वाडा...संध्या ने जणू ती जागा तिथल्या पायऱ्या सर्व ओळखीचे असल्याप्रमाणेच एक एक खोली उघडून उघडून पाहिली...तशीच ती एका बंद खोलीजवळ पोहोचली तिने हाताने अलगद तो दरवाजा उघडला...संपूर्ण वाड्यात ती एकच अशी खोली होती जिची चौकट ओलांडून आतमध्ये गेल्यावर संध्याला एक उब जाणवली. एक मायेची उब होती त्या खोलीमध्ये बघता बघता तिला समोरच ते स्वयंपाकघर तिथे माय लेकीची एक जिवंत आकृती तिला दिसून आली नजरेला कधी कधी मेंदू जे हव ते दाखवतो...भास किंवा एक मिराज देखावा....समोर त्या चुलीपाशी संध्याला सावित्री दिसली जी चुलीवरती कढाईमध्ये तिच्यासाठी कुरवड्या तळत होती. संध्या तिला एकटक पाहतच राहिली तसे सावित्रीने अगदी तिच्याकडे पाहिले चेहऱ्यावर तेच ओळखीचे हसू तिने हळूच हात वरती केला आणि “ ये ये...बघ तुझ्या आवडीच्या कुरवड्या केल्या आहेत बाळा ये..” संध्याला वाटले जणू आई तिलाच बोलावतेय तिने दोन पावले पुढे वाढवलेच होते कि तिच्या बाजूनेच एक लहान मुलगी धावत पुढे आली संध्या स्वतःलाच आपल्या आईजवळ पाहू शकत होती...त्या इवलुश्या संध्याने इथे उभ्या संध्याकडे पाहिले आता मात्र तिची नजर अगदी सरळ संध्यावर पडली होती तिने आपला हात उंचावला आणि संध्याच्या पाठीमागे इशारा केला.. संध्याने तिच्या बोटाच्या दिशेने अगदी बेसावधपणे मागे वळून पाहिले तर समोर साक्षात भयंकरचेहऱ्याचा गोविंदपंत उभा होता. डोळे वटारून अगदी चेहऱ्यावर क्रूर हास्य आणत झपकन दोन्ही हात त्यांनी संध्याच्या गळ्यावर आणले संध्याने किंचाळत आपल्या डोळ्यांवरती आपला उजवा हात उलटा ठेवला....काही सेकंद मात्र संध्या तशीच उभी राहिली...चेहऱ्यावरचा हात बाजूला काढत तिने समोर पाहिलं तर समोर कोणीच नव्हते आणि मागेही कुणीच नव्हत. “ हुश्श...” एक दीर्घ श्वास घेत संध्या त्या खोलीतून बाहेर पडली बाहेर येताच तिला बकुळा अगदी दाराशी लागुनच उभी असलेली दिसून आली... “ अग बकुळा ? काय झाल ?”
“ काही नाही बाईसाएब....बस इघ्न दिसायला लागलंय मला...आपण इथ उगच आलोसा वाटायला लागलय बघा...असा कुठ वाडा असतय व्ह्य..एकदम गावाच्या बाहेर...बाईसाहेब असा वाडा गावाबाहेर तवाच असत्य जेवा त्या माणसाला गावान वाळीत टाकला असल नाहीतर....” एवढ बोलूनच बकुळा थांबली...
“ नाहीतर काय बकुळा ?” बकुळा संध्याच्या कानाजवळ आली आणि म्हणाली... “ नाहीतर या माणसापासून समद्या गावाला धोका असल तरच...”
संध्याने तिच्याकडे आपोआप नजर उचलून पाहिले...कारण बकुळाच्या दोन्हीही गोष्टीमध्ये तथ्य होत.
छोटी अनु एवढ मोठ अंगण बघून त्यात बागडायला लागली होती खेळायला लागली होती...सखाराम मामाने आपल्या भाचीने तिच्या जन्मस्थळी इतक्या वर्षांनी पाउल ठेवल होत आणि सोबत सावित्रीची नात अनुदेखील. सरपंचाने जेवणाचे डबे त्यांच्या सोबतच पाठवले होते कारण वाड्यात काही मिळणार नव्हत...विश्वास आणि संध्याला सखारामने शोधून एक व्यवस्थित खोली दिली...
दिवसभर दमून थकून भागून गेल्या कारणाने विश्वासने आणि छोटूश्या अनुने दोघांनी आपले अंग टाकून दिले अनुला थोपटवत विश्वासने झोपी घातले...बकुळा मावशीने आणि सखामामा ने अंगणात आणि स्वयंपाक घरातच आपल अंथरून घातले...
हातपाय धुवून आणि अंघोळ करून संध्या आपल्या खोलीत आली तेव्हा तिने पाहिले कि अनु झोपी गेली आहे आणि विश्वास तिच्याकडेच पाहत होता. संध्याने त्याच्यासमोरच आपले कपडे बदलले...विश्वास तीच गोर अंग हालचाल करताना आपल्या डोळ्यांनी टिपत होता.
***
“ मालक ? दशा अनुकूल दिसतेय....अजूनतरी काही हालचाल नाही किंवा कसली त्रुटी दिसून आली आहे..कदाचीत त्याच्या मृत्यूसकटच त्यावेळी ते देखील नष्ट झाले असेल...” जखोबा सरपंचाच्या हातात पानाचा विडा देत उद्गारला....
“ नाही जखोबा...खरा धोका तर आता आहे...दृष्टचक्र सुरु झालय...सावध राहायला पाहिजे आता..”
“ हं...! मालक एक आज आपल्या पत्त्यावर तार आली होती एक...तुम्हाला दुपारी दाखवायची राहून गेली...”
“कुणाची आलीय..नाव काय लिहीलय त्याच्यावर...”
“ मालक शहरातून आलीय...अन नाव लिहीलय.... ‘ज..य..देव’...”