🙏वेड लावी बावरी नजर🙏
भाग::-- दुसरा
त्यानंतर दररोज कँटीन ला भेटल्या शिवाय चैनच पडेना .पण तो सहसा जास्त बोलतच नसे. फक्त निळ्या नयनाच्या सागरात पाहत राही.एव्हाना एकमेकाचं नाव माहीत होऊन तो बी.टेक करतोय हे समजलं होतं.एके दिवशी सहज " निलेश तुझं गाव
कोणतं रे?,आई-वडील काय करतात?"याबाबत विचारलं .
"करिश्मा मी माझं नाव हिच पुरेशी ओळख समजतो,गाव घराणं याच्या कुबड्या नकोत मला,कारण यांचा आधार घ्यायची सवय जडली कि माणुस स्वतःची ओळखच विसरतो।"इतकं सांगुन तो विषयच त्यानं टाळला.
त्यानंतरच्या बोलण्यात महत्प्रयासानं त्याचं गाव नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा काठावर सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात
कुठं तरी आहे इतकंच कळालं.त्यानंतर त्यानंही कधी ओळख विचारली नाही व सांगितलीही नाही.
स्वतःभोवती कोष गुंडाळुनच तो वागे.विशेष म्हणजे कालेजच्या,अभ्यासाच्या वेळा तो कधीच टाळत नसे.मधल्या सुटीत कँटीन मध्ये वा काँलेज संपल्यावरच भेटे.म्हणुनच तो काँलेजात टाँपर होता.
पण जेव्हा जेव्हा भेटे तेव्हा अगदी वेड लागावं असा पाही ."का पाहतोस रे असा?"
"सारेजण माझे डोळे पाहतात व गुंगुन जातात पण मलाच माझे निळे डोळे पाहता येत नाही, म्हणुन तुझ्या डोळ्यात पाहतच रहावं असं होतंय"
अगदी आपल्याला ही असंच होतय याला पाहिल्यावर. का होत असेल बरं असं?
"निलेश आपल्या दोघांच्या डोळ्यात इतकं साम्य का रे?"सहज विचारल्यवर तो म्हणाला कि मला नाही सांगता येणार पण माझ्या आजीच्या(वडिलांची आई)वडिलांचे ही डोळे असेच होते असं सांगतात.इतकं बोलुन त्यानं विषय पालटला.
त्यानंतर भेटणं बोलणं सुरुच पण पाहण्या पलिकडं तो पुढं काहीच पुढाकार घेत नसे .कधीकधी तर वाटे कि आपल्याप्रमाणं याचं मन बावरलंच नसावं ,फक्त आपणच.......पण जे काही होईल ते होवो .तो सतत भेटतोय हे ही कमी नाही असा विचार करत दिवस जात राहिले.ताईलाही प्रश्न पडला कि आपलं वागणं बदललंय.एके दिवशी तिनं 'तुझं अभ्यासावर हल्ली लक्ष नाही'म्हणुन विचारलंच.पण टोलवाटोलवी करत आपण ते टाळलं.
नंतर इनामदार कँपसची ट्रिप निघणार अशी सुचना निघाली.तो भेटल्यावर त्याला सहलीबाबत विचारल्यावर"तु जात असलीस तर मी ही नाव देतो नाहीतर मला इंट्रेस नाही त्यात"तो इतकच बोलला.
मी जातेय म्हटल्यावर तो ही तयार झाला.
"निलेश,मी जरी आले व रुट सारखा असला तरी बसेस तर वेगळ्याच राहतील मग? "
"पाहु काय होतय ते पण आता सतत जवळच राहावं असंच काहितरी होतंय."त्याच्या या वाक्यासरशी एकदम रोमांच उभा राहिला नी आपल्या तोंडातुन अचानक "निलेश एक विचारू?"प्रश्न बाहेर पडला.
"काय विचार?"
छाती धडधड करायला लागली.यानं नकार दिला तर......
"जाऊ दे असंच होतं,विचारेन नंतर "असं म्हणताच"मलाही काही सांगायचं य तुला पण पाहू " तो ही उत्तरला.
सहलीस जाण्याअगोदर आपण सारं ताईला सांगितलं व त्याला पाहुन मला सांग म्हणजे मी प्रपोज करते हे ही सांगितलं.मला खात्री होती कि ताई त्याला पाहिल्यावर नकार देणारच नाही. सहलीला निघतांना ताईची परवानगी मिळताच सहलीत प्रपोज करायचंच म्हणुन खुशीत निघालो.
राजस्थानच्या वाळवंटात रात्र मुक्कामाला folk musical night च्या कार्यक्रमात सारी मुले दंग होती.हिवाळी चांदण्या रात्रीत स्थानिक कलाकार आपल्या जादुई आवाजानं कैफ आणत होती.निलेश व आपण तेथुनच थोड्या दुर अंतरावर एकमेकांना सारे अंतर मिटवत प्रपोज करत होतो. त्यानंतरचा सारा प्रवास स्वर्गीय होत होता.मनाली ला तर सोबतच पँराग्लायडिंग,रिव्हर राफ्टिंग ...किती किती मजा केली.हे दिवस संपुच नयेत असंच वाटायचं.ताईला दररोज फोनद्वारे सारं कळवत होतो व त्याचा होकार असल्याचंही कळवलं होतं.
परतीच्या प्रवासात अहवा डांगजच्या जंगलात सारी थांबली व आपल्यालाच मोह आवरला नाही. आपण निलेशला मागं थांबवलं.वर उंच कडा खाली दरी,सारे जण बरीच पुढे व आपणच दोघं तिथं .तितक्यात दडदडदडदडदडखडाडखडाडदड आवाज आला.काय होतय हे कळायच्या आत निलेशनं मिठीतुन जोरात आपल्याला त्या प्रपाताच्या बाजुला ढकलंलं व स्वत:मात्र त्या दरडीच्या ढिगासोबतच खोल खोल दरीत गेला.पुढचं काय झालं काहिच कळालं नाही.
हे सारं आठवताच करिश्माला जोराचा हुंदका फुटला.'निलेश!का केलस रे असं?मला वाचवुन निघून गेलास .आता माझं काय?"
दिवसामागुन दिवस जाऊ लागले.ताई मनातुन काढण्याचा प्रयत्न करी पण आपण शुन्यात पाहत रात्रीच्या रात्री रडतच घालवू लागलो.निलेशचे नुसते भास,आभास.......

🌑🌘🌗🌖🌖🌕🌕🌕
निशांत सुर्वेला आज पिलाणीच्या ग्रामीण रुग्णालयात रुजू होऊन चार महिने झाले होते.गेल्या चार महिन्यात डाँ. सुर्वेनी ग्रामीण रुग्णालय सांभाळत अवघ्या पिलाणीला ही जोखलं होतं .महाराष्ट्र व मध्यप्रदेश राज्याच्या सिमेवरील नंदुरबार जिल्ह्यात अगदी नर्मदा काठावर पिलाणी चारेक किमीच्या परिघात वसलेलं.सातपुडा पर्वताच्या उंचच उंच रांगा, खोल दऱ्या,नर्मदेचं सदोदित अथांग भरलेलं पात्र, वाघ अस्वलाचा कायम सुळसुळाट,आंबा,महु साग शिसव,अर्जुनसातड्याच्या गर्द वनानं वेढलेल्या या भागात सारी आदिवासी वस्ती पाड्या पाड्यांनी विखुरलेली.सारी पिलाणी परमाराच्या गढीवरूनच ओळखली जायची.सिदाजी परमाराची भव्य गढी व तिचा आब,सिदाजी व उदाजी यांच्या दहशतीनं अख्खा नर्मदा काठ थरथरायचा.गेल्या चार पिढ्यापासुन हे चालत आलेलं.ह्याच दहशतीची झळ दोन वर्षापुर्वी रुग्णालयाच्या जागी असलेल्या प्राथ. आ.केंद्रानंही सोसली होती.पुर्ण केंद्रांची तोडफोड झाली. अवघ्या जिल्ह्यात प्रकरण गाजलं.शेवटी याच दहशतीनं प्रा.आ.केंद्राच्या जागी ग्रामीण रुग्णालय मंजुर झालं व नविन तीस खाटाचं चार डाँक्टरांचं भव्य चकचकित रुग्णालय बांधलं जाऊ लागलं.त्याचाच भाग म्हणुन डाँ. निशांत सुर्वे यांची नियुक्ती पिलाणीला झाली.पण परमाराची हि दहशत पुढे चालवणार कोण हाच प्रश्न गढीसोबत साऱ्या पिलाणीला सलत होता.उदाजी पवाराला मुलबाळच नव्हतं तर सिदाजी परमारांना निलेश व उन्मेश हि दोन मुलं झाली.दोन वर्षापुर्वी निलेशरावासोबत दरड अपघात झाला .ही बातमी ऐकुन बेभान झालेले उन्मेशराव सिदाजी,उदाजीला घेऊन कारनं निघाले.पण गावाजवळच्या घाटातच कार अपघात झाला.सारं गाव धावलं व तिघांना परत गावातल्या प्रा.आ.केद्रात प्रथमोपचाराकरिता आणलं तास उलटला तरी केंद्रात डाँ. चा,अँम्ब्युलन्शचा तपास नाही परमाराची सारी माणस बिथरली त्यातच रक्तस्रावानं उन्मेशराव गेले नी गर्दीनं सारं केंद्र तोडलं फोडलं.कर्मचाऱ्यांना बेदम मारलं.काही माणसांना निलेशकडं पाठवत उन्मेशरावाचा अंत्यसंस्कार उरकण्यात आला.व स्वतः सिदाजी उदाजी पुण्याला धावले.तेथून निलेशरावांना मुंबई दिल्लीला नेलं पण सारं फोल ठरलं.निलेशराव कोमात गेल्यानं आज नुसते पडुन आहेत.बोलणं फिरणं काही काहीच नाही.अगदी यंत्रागत पलंगावर.एक वारस गेला व दुसरा शर्थीचे सारे प्रयत्न करुनही असून नसल्यातच जमा.म्हणुन उभी गढी नुसती हंबरतेय .इतकं ऐश्वर्य,संपन्नता असुन पुढे वारस कोण यातुनच सिदाजी,उदाजी उन्मळुन पडलेत.
डाँ.निशांत सुर्वेंनी रुजू होताच सर्वांना हाताशी धरत व गढीशी सलोख्याचे संबंध ठेवत कामाचा सपाटा लावला.सतत निरनिराळे कँप लावुन रुग्णसेवा सतत सुरु ठेवली.व कमी कालावधीत पिलाणीत प्रसिद्ध झाले व ग्रामीण रुग्णालयालाही वरिष्ठ पातळीवर प्रकाशझोतात आणलं.त्याचाच परिपाक म्हणुन विभागानं मागच्याच आठवड्यात निलम शिंदे व करिश्मा शिर्के ह्या नविन डाँक्टर्स रुग्णालयात नेमले.मात्र तरी अजुन ही एक जागा रिक्तच होती.पण आधीपेक्षा भराच वर्कलोड हलका होणार असल्यानं डाँ. सुर्वे आता जोमानं कामाला लागले.डाँ. साठी रुग्णालयाच्या पाठीमागे अगदी नदी काठाला लागुनच क्वार्टर्स होते.व सर्व कर्मचारी देखील तेथेच राहत.रात्री सारा भाग जंगलानं ,दरीखोऱ्यानं,जंगली श्वापदानं व्यापल्यानं भिती वाटे.कधी कधी नदीतल्या मगरी अगदी काठावर बिनधास्त येऊन बसत.डाँ. शिंदे व करिश्मा शिर्के रुजु व्हायला आले तेव्हापासून एकसारखा पाऊस कोसळतोय.नर्मदा तट्ट फुगुन रवंदाड पाणी सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात घुसुन दऱ्या सबडबायला लागल्या.सारं नर्मदेचं खोरं चिल्लारलं.जणूकाही निसर्गात मोठं मिलन घडणार असच वाटत होतं.डाँ. निशांत सुर्वे तर गेल्या आठ दिवसापासून करिश्माला पाहिल्यापासुन हवेतच तरंगत होते.वयाची तिसी गाठण्याच्या बेतात असलेले डाँ.सुर्वे अविवाहित होते.शिक्षण घेत असतांना,मेडीकल काँलेजात त्यांचा संपर्क सतत अनेकाशी आलापण अशी प्रसन्नता त्यांना कधीच जाणवली नाही. आताच मात्र असं का व्हावं हे कोडं त्यांनाही समजत नव्हतं.डाँ.शिर्केची निळी बावरी नजर त्यांना आठ दिवसापासून दिलात नर्मदा खोऱ्यात पडणाऱ्या पावसाप्रमाणच घमासान धुमशान निर्माण करत होती.डाँ. करिश्मा शिर्के मात्र त्यांना निळ्या सागरात चालुच वादळ येऊन गेलं असावं किंवा सागरतळात मोठं वादळ येणार असावं अशाच भासल्या.कदाचित त्यांची आत्या नुकतीच वारली असल्यानं ही त्या तसं वागत असतील.
रुग्णालयात सुर्वेसोबत कधी शिंदे असत तर कधी शिर्के. तर कधी रात्री डाँ. सुर्वे एकटे असत.तिघांनी मिळुन नियोजन करुन अनेक कुटुंब कल्याण शिबीरे, रोगोपचार शिबीरे,नर्मदा काठा्रील रुग्णांकरिता आधुनिक तंत्रसामग्रीयुक्त सुसज्ज तरंगता दवाखाना या करिता आरोग्य विभागाकडुन बार्जची मागणी पाठवली.करिश्मा शिर्के या सतत कामात निपुण. सतत कामात गढलेल्या.सहसा कुणाशीच बोलणं नाही. सुर्वेंनी काही विचारलं तेवढच बोलत.स्वतःहुन कधीच कुणाशी बोलणं नाही. पण रुग्णाकरिता नविन असुनही रात्री अपरात्रीही तयार.त्यांच्या सोबत काम करणं सुर्वेना आवडे.त्या जरी काही बोलत नसत पण त्याच्या निळ्या डोळ्यात जाणता अजाणता पाहत सुर्वे सतत काम करत.म्हणुन साऱ्या नर्मदा काठावरील रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत होती.त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व प्रा.आ. केंद्रांनाही ते तशीच समज देत व रुग्णांना तात्काळ रेफर करायला लावत जेणेकरून त्वरीत सेवा मिळेल.
एके रात्री बऱ्याच उशीरापर्यंत शस्त्रक्रिया चालल्या.सर्व आटोपल्यावर कर्मचारी आपपल्या ठिकाणी पांगले.शिर्केही जायला लागल्या तेवढ्यात सुर्वेनी त्यांना "प्लिज थांबता का थोडं?मला तुमच्याशी खाजगी बोलायचं य काही?अर्थात तुमची परवानगी असेल तर...."
करिश्माला जी भिती होती तेच घडत होतं.तिला ती जाणीव ही झाली होती पण इतक्या लवकर घडेल हे माहीत नव्हतं.
"बोला सर"तिनं निर्वीकारपणा आणत म्हटलं
"शिर्के मँडम मी मुळचा जळगावचा.सुखवस्तु घराण्यातला.आजपर्यंत अनेक स्थळं चालुन येताहेत पण लग्नाचा विचार शिवतच नव्हता.घरच्यांचा तर दोन वर्षापासून तगादा चाललाय.पण तरीही मन जुमानतच नव्हतं.पण खरं सांगु कदाचीत मी बोलतोय ते तुम्हास रुचेल की नाही ते मला माहित नाही. तुम्हाला प्रथमतः पाहिलं नी तुमच्या निळ्या डोळ्यांनी सपशेल गारदच झालोय.शांत सागराच्या खोल गर्तेत वादळ निर्माण करते तुमची बावरी नजर.तुमचा होकार असेल तर मी घरी लग्नाचं कळवेन"
करिश्मा थरथरायला लागली.डोळ्यात निलेशच्या आठवणीनं टचकन पाणी आलं.व ती उभ्या उभ्यानच हमसुन रडायला लागली.
प्लिज रडू नका .तुमची इच्छा नसेल तर हे मँटर इथंच क्लोज करा.कदाचित मि त्या लायक नसेल असं समजुनमी ही विसरण्याचा प्रयत्न करीन.पण प्लिज रडू नका व गैरसमज करू नका.
"सरजी काही जखमा या वर दिसत नसल्या तरी त्यांचे घाव आतुन असतात.त्या कधीच भरुन येत नाही."प्लिज समजण्याचा प्रयत्न करा.
"तुमच्या दिलात काय सल आहे मला माहीत नाही पण एक नक्की तुम्ही नकार दिला तरी हा निशांत सुर्वे तुमची जागा आयुष्यात कुणाला देणार नाही"
सुर्वेसरणावर जळणाऱ्या दिलाशी इष्क लावताय तुम्ही.जळण्यावाचुन काहीच हासील होणार नाही. सुखवस्तू घराण्यातले आहात प्लिज सुखानं एखादी निवडा उगा सरणावर जळणाऱ्या दिलाचा नाद सोडा.इतकं बोलुन करिश्मा शिर्के चालत्या झाल्या....।।।

क्रमशः
🙏🙏VSDV🙏🙏