कथेचं नाव :- मी गिरीजाची मैत्रीन
लेखक :- मंदार साखरकर
भाग ;- ७
सुरेख संध्याकाळी ६.०० च्या सुमारास उठत गिरीजला बोलते. अग ईथे बसून तू मला अशी का बघत आहेस तुला मी तुझ्या रूममध्ये सांगितले होते ना राहायला मग ईथे माझ्या रूममध्ये काय करते आहेस.
...
गिरिजा घोगऱ्या आवाजात हसत बोलते. हो तू गिरिजाला सांगितले होतेस ग मुली मला नाही.
पहिले मला सांग राघवला का मारले आणि त्याचे शरीर कुठे आहे ते. तुम्हाला काय वाटले हे सगळे संपले नाही हे आता कुठे चालू केलास तू आणि तुझ्या आईने जर तुझ्या आईने राघवला संपळवले नसते तर मी मध्ये आलो नसतो. त्या मुलांचे आत्मे आजून माज्याकडे आहेत आणि आता ते मी हिच्या मित्रांच्या शरीरात टाकणार बघतो मी. ती कशी त्यांना वाचवते ते बोलून गिरीजच्या अंगातून रघुनाथ ते बोलून बाहेर निघतात.
...
सुरेखा उठून लगेच गिरीजला पकडून आईला हाक मारत बोलवत बोलते हिला सांभाळ मी आलेच बाबाना भेटून बोलून अदृश्य होते.
...
आई लगेच गिरीजाच्या आईला हाक नारात बोलते जरा लवकर पाणी आना.
...
ईथे
सुरेखा रघुनातच्या म्हणजे तिच्या बाबांच्या घरी येत बोलते.
बाबा राघव ने जे केले ते चुकीचे केले. त्याने करार तोडला आहे बरोबर ना तुम्हीच हा करार केला होता ना. मग का नाही त्याला रोखले बोला.
..
रघुनाथ बोलतात हो तोडला त्याने करार म्हणून काय त्याला मारावे. तेंव्हा पण तू लेखाला मारण्याचा प्रयत्न केला होतास.
...
सुरेखा बोलते हो केला होता कारण ती चुकली होती आणि हा पण. मला माहिती नव्हते हा माझा भाऊ आहे ते. त्याने ही तेच केले ते लेखा ने केले आणि तिने स्वतःची सेना बनवली होती.
...
मी फक्त तिला मदत केली आणि माझी एक शक्ती गमावून. आईने पण तेच केले तेंव्हा.
पण तुम्हला काय ते बोलून.
....
रघुनाथ कालचक्रात घेऊन जात बोलतो. बघ अशोकला आम्ही इथंच मारले होते. पण बोलून अदृश्य होत बोलतात या कालचक्रातुन बाहेर आलीस तर भेटूया परत.
....
सुरेखा हसत बोलते बाबा कालचक्रात बदल होऊ शकत नाही.
...
घरी
गिरीजाची आई पाणी आणत बोलते हे घ्या अरे ही कुठे गेली.
...
सुरेखाची आई बोलते द्या ईथे पाणी आणि स्वातीला बोलते जा सगळे नीट कर मी आलेच बोलून ती आपल्या रूममध्ये जाते.
..
स्वाती, गिरीजच्या रूममध्ये जात रुपालीला बोलते बाहेर जा आता जरा वेळ.
...
आई गिरिजाच्या रूममध्ये येत गिरीजच्या कपाळावर आणि छातीवर हात ठेवत डोळे बंद करत एक मंत्र बोलून. स्वातीला बोलते दरवाजा बंद करून बाहेर जा आणि तिच्या आईला बोल भाताची पेज तयार करायला.
...
स्वाती बाहेर येत दरवाजा बंद करून आईला सांगते भाताची पेज तयार करा.
....
रुपाली बोलते हे काय चालू आहे कशाला तो दरवाजा बंद केला, काय करत आहे. आत मध्ये गिरिजा बरोबर बाबा तुम्ही काहीच बोलत नाही आहेत.
..
जर वेळाने सुरेखाची आई बाहेर येत बोलते. स्वाती आपले काम कर जा फक्त ऑक्सिजन नळी राहूदे बाकीचे काढ.
..
रुपाली बोलते का कशाला काढायला सांगत आहेत बाबा काय केले ह्यांनी तिच्या बरोबर.
...
आई स्वातीला बोलते अजून तू इकडेच उभी असे बोलून त्या आपल्या खोलीत जाऊन ध्यानात जाऊन सगळे बघत रघुनाथशी संवाद साधून बोलते. परत चुकलात आणि विसरलात पण ती कोण आहे आणि काय करू शकते तुम्ही तेंव्हा पण हरलात होतात आणि आता पण हरलात.
तुम्ही तिला तिथे घेउन गेलात खरे. पण तुम्ही सगळी शक्ती हरवून आलात आता तुम्ही फक्त रघुनाथ राहिलात. पहिले पिशाच्च नाही राहिलात, एक सामान्य माणूस राहिलात.
...
रघुनाथ हसत बोलतात हो मी कुठे नाही बोलतो. तू पण विसरली आणि तुझ्या दोन मुली मला नाही मारू शकत विसरली की काय.
...
सुरेखा परत त्याच नरभक्षकाना मारत आहे तिने पहिलेच त्यांना संपवले आहेत. ती त्यांना मारणार आणि ते परत जीवित होणार म्हणजे तू समजले ना ती तेच करत राहणार तिथे.
....
आई हसत बोलते तुम्हीच विसरलात तिथे कोण आहे ते.
...
रघुनाथ बोलतात माहीत आहे. कसे त्यांना विसरीन तू पिशाच्च असून त्यांनी सगळी शक्ती तुला दिली आहे ते सहरत्र स्वामी.
त्यांच्या शक्तीने तू ही कोण गिरिजा तिला तू वाचवले, सुरेखाच्या साहायाने परकाया प्रवेश
वापरून.
....
कालचक्रात सुरेखा प्रत्येक नरभक्षक मारत असते. तिला माहिती असते जे काय ती करत आहे ते परत तेच घडत आहे.
...
तेवढ्यात एक लख्ख प्रकाश होत तिथून सुरेखा त्या प्रकाशात खेचली जात ती आपल्या घरी पडते.
...
घरी सगळे तिचे रूप बघून स्थब्ध होत तिच्याकडे बघत पाठी जात होते.
...
सुरेखा घुरघुरात त्यांच्या वर झडप घालणार तेवढ्यात सुरेखाची आई आपल्या रूपात येत तिच्या समोर उभी राहून तिला शांत करते आणि गिरिजाला बोलते चादर आणायला सांगते.
..
गिरिजा आपल्या रूममधून येत चादर आणून सुरखाला झाकत आईला बोलते हिला आत ने हिच्या रूममध्ये घाबरू नकोस ये पकड हिला.
गिरिजा आई जवळ जात बोलते तू ठीक आहे ना चल तुझ्या रूममध्ये आराम कर नंतर बोलू सगळ्यांना बघत बोलते.
...
रुपाली गिरिजाला बघत बसते आणि बाबाना बोलते बाबा हे कसे शक्य आहे आता पर्यंत ही कोमात होती अचानक कशी शुद्धीत आली.
...
आई सुरखाला तिच्या रूममध्ये झोपवून येत किचनमध्ये जाऊन भाताची पेज आणत गिरीजला देत बोलते पी.
...
गिरिजा बोलते आई नको ना तुला माहिती आहे ना. माझ्या नरड्या खाली ही उतरत नाही. ही म्हशी अशी का बघते आहे मला कधी बघितली नाही तशी अग कोमातली माणसे कधी न कधी येतात शुद्धीत कधी टेकनिकली कधी अदभुत शक्ती वापरून. फक्त मेडिकली ते प्रूव नाही करू शकत. जाऊदे कशाला माझ्या डोक्याला त्रास देऊ तुला ते समजणार नाही आणि ते कोणालाच समजणार नाही.
घे ग आई संपला ग्लास आता बोल जेवायला काय केलेस आहेस बोल.
...
आई बोलते डॉक्टरीन बाई शुद्धीत येऊंडे मग सगळे बसूया.
...
रात्रीचे १२.३० वाजले होते सुरेखा बाहेर येत बोलते आई भूख लागली आहे जेवण देते का ग.
...
गिरीजाची आई बोलते हो बस सगळे जेवायला स्वाती चल मदतीला स्वायपांक खोलीत.
...
स्वाती सुरेखाकडे बघत हो बोलून स्वयपांक खोलीत जात सगळ्याना जेवण आणत बोलते गिरिजा आईला उठव जर जा.
..
सुरेखा रुपालीच्या बाजूला बसत बोलते असे काय बघते आहेस.
...
आई येत बोलते काही नाही तुझे रूप बघितले सगळ्यांनी म्हणून.
....
सुरेखा बोलते ठीक आहे आता समजले सगळ्यांना की आम्ही कोण आहेत आणि कसे आहेत. ती कुठे आहे दिसत नाही.
...
गिरिजा बोलते मी कुठे जाणार मी आहे इकडेच बोल अजून काय पाहिजे तुला ग.
एक बोल तुम्ही पिशाच्च असून हे जेवण कसे खातात ग.
...
सुरेखा बोलते गप्प जेवण करू देते का येऊ परत रूपात. अग आई सगळे तिथे होते ग कसे शक्या आहे ते. म्हणजे होते ते तिथे पण पुसट छायेत.
...
रुपाली तेवढ्यात बोलते नको परत येऊ तुझ्या रूपात आहे तशीच रहा. गिरिजा गप्प बस काही प्रश्न नको विचारू जेव ग तू बाई.
...
गिरिजा हसत बोलते अग हिला तू अजून बिना मकेअप ची बघितली तरी तू घाबरशील ग.
...
आई पण हसत बोलते तू कधी बघितले हिला.
...
गिरिजा सुरेखाकडे बघत बोलते गोवाला मीच घाबरून ओरडली ना. मला वाटले आता मी कायम स्वरूपी गेली.
...
सुरेखा गिरिजाचा हात पकडत बोलते आता पण जाऊ शकते तू बोल जायचे आहे का आणि हो तू काय हस्ते आहेस तुला काय वाटले माझे लक्ष नाही तुझ्याकडे आईच्या बाजूला उभी राहून मगास पासून हसते आहेस नमस्कार पाहिजे वाटते.
...
मुग्धा बोलते तुला पाहिजे वाटते काय बोल. गप्प पने जेव समजले का. आईकडे बघत बोलते देऊ का मी हिला एक तिपुस तू फक्त हो बोल मग बघच कशी देते मी.
...
आई मुग्धाला जवळ घेत कानात हळू आवाजात बोलते उडू नकोस ती घरी नाही आहे.
...
सुरेखा जेवण होउदे मग बघते तुला.
....
मुग्धा हात पकुडून ओरडत बोलते आई ग.
...
सुरेखा उठत मुग्धाकडे जाऊन बोलते काय झाले हात पकसून ओरडायला दाखव हात जरा.
...
स्वाती बोलते काही नाही ग इंजेकॅशन दिले असणार अजून काय.
...
मुग्धा स्वातीला जीभ काडून दाखवत बोलते हिलाच रात्री नमस्कार देते.
...
सुरेखा बोलते तिला तू कुठे दिसते आहेस आणि कशी तू तिला नमस्कार देणार ग. माझा वापर नाही करायचा समजले.
...
गिरीजाची आई बोलते झाले असेल तर उठा म्हंटले आणि हो सुरेखा ती तर आम्हाला दिसत नाही आहे विचार तिला ती जेवली का.
..
सुरेखा, मुग्धाकडे बघत बोलते नाही आई पण लवकरच जेवन करेल ती आपल्या बरोबर आणि आईकडे बघते.
...
तेवढ्यात मुग्धा बेशुध्द होहून अदृश्य होते.
...
सुरेखा, स्वातीला बोलते फोन लाव हॉस्पिटलमध्ये गीताला लवकर.
...
स्वाती, गीताला फोन लावत बोलते मुग्धाची तिबेट ठीक आहे ना.
...
गीता बोलते हो ठीक आहे आताच डॉक्टर तपासून गेलेत.
...
सुरेखा बोलते कोण डॉक्टर आले होते.
....
गीता बोलते अवधूत डॉक्टर होते.
...
स्वाती बोलते ठीक आहे.
..
गिरीजाची आई बोलते झाले का सगळ्यांचे बोलून नाही म्हंटले रात्रीचे १.३० वाजले आहेत झोपायचे आहे की नाही.
...
रुपाली बोलते हो ना झोपायचे आहे. चल ग गिरिजा झोपायला.
..
सुरेखा बोलते नाही ती आपल्या रूममध्ये झोपेल काही दिवस. जा तुला दाखवलेल्या रूममध्ये.
...
एक एक करून सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला जातात.
...
सकाळी ६.०० च्या सुमारास आईग मेले मी बोलून आवाज येतो.
...
तसे गिरीजाची आई-बाबा धावत रूपालीला बघायला जातात तर रुपाली आपल्या जागेवरून उठत बोलते कोण ओरडले ग.
मला वाटते हा आवाज सुरेखाच्या रूममधून आला आहे. गिरिजानी सुरेखाला तर लात मारली वाटते चला बघुया असे बोलून तिघे बाहेर येत बघतात तर सुरेखाची आई बाहेर उभी राहून सुरेखाच्या रूमकडे बघत असते.
...
रुपाली सुरेखाच्या रूममध्ये बघून चक्कर येऊन पडते.
...
आई-बाबा बोलतात हिला काय झाले बोलून सुरेखाच्या रूमकडे बघतात तर ते पण आश्चर्य होत सुरेखाच्या आईकडे बघून बोलतात ते कोण आहे.
..
आई बोलते आता फक्त मजा बघा बस. ती आली आहे ना कालच आणि ही दिसत नाही आहे कुठे गेली.
...
अं अं मी इथे आहे ग किचनमधून खात बाहेर येत बोलते. व्हा मस्त आहे ग किती चांगले वाटते बोलू ग खाल्यावर. मला बोलते के नमस्कार देऊ का. अरे माहिती नाही मी कोण आहे.
हा आई मी तीच जेवली का तुम्ही विचारायला सांगितलेना ती मीच मुग्धा कशी वाटली मी मस्त ना.. गप्प बसा येते आहे बाहेर कंबरडे पकडून. मी बाई लपटे नाही तर मला चावेल.
...
सुरेखा बाहेर येत बोलते अरे हिला उठव अगोदर आणि काय ग ही कधी आली मेली. मी देते ना हिला मग हिने मला का दिली. दिली तर दिली एवढे जोरात.
...
गिरिजा डोळे चोळत बाहेर येत बोलते. कोण ग आई म्हशीं सारखे ओरडले सकाळी सकाळी.
आई म्हशी घरात कधी आली.
...
सुरेखा बोलते गप्प बस आणि हा ही ही हसण्याचा आवाज कुठून येतो आहे. तू इथे के करते आहे.
...
खोलीतून बाहेर येत सुरेखाचे कान पकडत बोलते. काय केले बोलते तिकडून बाहेर यायचे सोडून त्यांना मारत बसली होती. जर मी आली नसती तर अजून तिकडेच असती.
ह्या माठ मुळे ती ह्या युगात आली आणि सुरेखाचा कांन सोडून ती गिरिजाकडे जातं बोलते हीच काय ती. हिच्या मुले हे सगळे घडत आहे…
..
बघितले ना काय घडले ते दुसऱ्यांच्या कामात नाक घुसवले तर काय होते ते. किती त्रास झाला ह्यांना काय भेटणार होते तुला पारितोषिक भेटलेना आणि ती कुठे गेली दुसरी बाहेर ये दोघींची लाडकी बाहेर येते की नाही.
...
मुग्धा बाहेर येत बोलते मी काय केले ग.
...
हो तू काय केले, तू काय केलेस तुला तर उलटे टांगून मिरचीची बुकींचा धूर ध्यायचा. मित्र करायचे ना पण चांगले असे मित्र केलेस बघितले ना किती त्रास झाला आईला. येईल ती संध्याकाळ पर्यंत ती. पण ह्या पुढे लक्षात ठेव समजले.
..
स्वातीला बोलते ऐ राईट हँड कॉफी बनव मस्त. करतो कोण भोगतो कोण इकडे ये जरा तू बस बाजूला बस नाही कांन पकडते ग.
...
गिरिजा आईकडे जात हळू आवाजात बोलते ही कोण ग.
...
मी खुशी हिची मोठी बहीण तुला काय प्रॉब्लेम.
...
गिरिजा बोलते छे छे नाही सहज आईला विचारत होते मी.
..
खुशी बोलते चल राघवला भेटायला येते का.
. .
सुरेखा खुशीच्या बाजूला बसून बोलते. ही तिच्या रूममधून बाहेर आली मग मला कोणी दिली असे बोलून गिरीजकडे बघते.
. ..
गिरिजा बोलते मी तर तुझ्या समोर तर आली ना तू सांगितलेल्या रूममधून बोलून मुग्धाकडे बघते.
..
मुग्धा बोलते ए बाई माझ्याकडे काय बघते आहे. मी कशी देईन विचार आईला मी किचन मधून खात बाहेर आली ना.
..
सुरेखा रागात मुग्धाकडे बघून बोलते बस. इकडे ये जवळ पहिली हात दाखव मला. ये बोलते ना बघूडे मला.
..
मुग्धा जवळ जात बोलते बघ पण मी नाही दिली समजले ना. खुशी ताई तू बोल ना. मला हिच्यावर भरोसा नाही आहे,
....
सुरेखा हात पकडून दोघांच्या मध्ये बसवत बोलते.
खुशी दोन्ही हात पकड तिचे आणि स्वाती तो खंजीर आणते का. हिचे पाय कापायचे आहेत.
...
मुग्धा बोलते हो मीच दिला नमस्कार काय ग पलटी मला बोललीस दे मी आहे म्हणून.
..
खुशी बोलते ए चिरकूट मी कधी बोलली ग. ए ताई मी नाही तसे काही बोलली ग. उठत बोलते मी फक्त पाठीशी आहे एवढेच बोलली.
...
स्वाती बोलते हा घे खंजीर काप तिचे पाय आणि हिची जीभ. दोघे काय करतील त्याचा भरवसा नाही.
...
क्रमश