'झटेतलं चांदणं'
🔖 भाग ::-- दुसरा
" पमन उठ. आज पहिला दिवस आहे शाळेचा! शनिवार असल्यानं पहिला पिरीयड मास ड्रिलचा आहे; उठ पटकन" माया अंगावरची गोधडी ताणत म्हणाली नी पमन अंघोळीला पळाला.
मायानं दोघांचं टाईमटेबल नुसार सारी वह्या पुस्तकं काढली. प्रतापराव पेरू तोडणीसाठी माणसांना कॅरेट व इतर सामान काढून देत होते.
" माया, पमन! सकाळची शाळा सुटताच दुपारी या मळ्यात पेरू तोडायला. मारत्याच्या भाचीला-पद्माला ही घेऊन ये माया!" प्रतापराव मायाला बोलले.
" मामा पहिल्या दिवशी काही शिकवणार नाही! आम्ही आताच येतो पेरू तोडायला!" कपाटातल्या आरशात बघून केस विंचरणारा पमन पद्मा ही आहे म्हणून बोलला.
" पमन उगामुगा चल आधी शाळेत! बापू दुपारून सांगत आहेत!" माया नं खडसावलं.
माया तिचं व त्याचं ही दफ्तर घेत गल्लीत पुढे घर असणाऱ्या पद्माकडं निघाली. लहानपणापासून शाळेत सोबत असल्यानं पमनच दफ्तर कायम मायाच घेऊन जाई व आणी. हा बहादर मस्त तिच्या मागे पुढे आरामशीर खुला चाले. मायानं वर्गात पहिला नंबर कधीच सोडला नाही तर पमन टक्केवारीत पस्तीस ते चाळीस या पंचकातून कधीच बाहेर पडला नाही. पण नापास ही झाला नाही. परीक्षा काळात पेपराच्या रात्री जागून महत्वाचं तेवढं पास होण्याइतपत अभ्यास इतकंच याला माहीत. पण असं असलं तरी उतारा करणं वा कुणाचं पाहून लिहीणं हे ही त्यानं कधीच केलं नाही. मायाची या वर्षी वर्गात नविन नाशीकहून आलेल्या शिल्पा पोवारशी स्पर्धा होती. म्हणून मामा मामी समोर मुद्दाम हा तिला
" मायडी ,नीट अभ्यास कर! त्या शिल्पीला टक्कर द्यायचीय तुला!" म्हणायचा. लगेच प्रतापराव मायाला दटावत पण ताराबाईला पमनची चलाखी समजे व त्या गालात हसत म्हणत.
" पमन तुझा झाला का सगळा?"
" माय माझा? मला कुठं नंबर आणायचाय! पास तर व्हायचंय!" मग माय शब्द ऐकला की त्याही विरघळत व त्याला जवळ घेत गालाचा पापा घेत.
नणंद एक दिड वर्षाच्या पवनला टाकून गेली. ताराबाई छोट्या पवनला एका बाजूला तर मायास दुसऱ्या बाजूला घेऊन झोपवत.रात्री झोपेत ताराबाई ची पाठ पवनकडं झाली की पवन उठत मायाला बाजुला करत ताईबाईच्या छातीला लागे. लहानी माया मग झोपेत कधी पायाशी तर कधी खाली पडे. मायाची माय ती पमनची ही मायच झाली. पुढे कळायला लागलं तरी मायची मामी झालीच नाही. पमननं माय म्हटलं की तिला ही भरून येई.
माया, पद्मा,पमन केसा(केशव) नदीकाठानं नाल्याच्या फरशीवर आले नी कानावर टण टण टणsssss घंटा ऐकू आली. पलिकडच्या नाल्याच्या फरशीवरून वरच्या आर्डीची मुलं येत होती. खालच्या व वरच्या आर्डीच्या मुलांची गाठ ग्राम पंचायतीच्या कार्यालयाजवळ पडे. तेथुन शाळेचं पुढचं आवार लागे. मग गोलाकार चंद्रकोरीकृती तीन मजली शाळेची इमारत. इमारतीच्या मागे दूर दूर पर्यंत पसरलेलं मागचं पटांगण.त्याला लागून सरकारी दवाखाना.
मायानं दोघाची दफ्तर ठेवत मागच्या पटांगणाकडं सारे निघाले. सुटीनंतर आज पहिलाच दिवस . शनिवार असल्यानं सामु. कवायतीला सारे रांगा करू लागले. पाचवी सहावी पुर्वमुखी, सातवी आठवी समोर पश्र्चिम मुखी तर नववी दहावी दक्षिणमुखी उभी राहिली. आठशे नऊशे मुलं.साऱ्यांच्या समोर मध्यभागी बॅण्ड पथक व मागे सारे शिक्षक. बॅण्ड पथक च्या अवती भोवती गाईड म्हणून उभ्या राहणाऱ्या मुलांना दोन दोन टेबल. नववीची रांग मोठी होत होती म्हणून मागच्या काही मुलींना दहावीच्या अ तुकडीत उभं केलं. नी पद्मा पमनच्या डाव्या हाताजवळ आली व तिच्या मागं उंच शिल्पा पोवार. पमनची चुळबूळ वाढली. त्याच्या रांगेत पुढे केसा, बाल्या नी मग चंदू व सुरेश.
पुढे माईकवर दिवाळीच्या सुटीनंतर नाशीकच्या संस्थेतून बदलून आलेल्या नविन सरांचा परिचय घुमाने सर करून देत होते. शास्त्री म्हणून पी. टी. चे सर आले होते.शिस्तीचे भोक्ते.खेळाची जाण, ध्येयवेडे.घुमाणे सर काही बाही सांगत होते.
" केसा?"
" बोल पमन?"
" कापुस कोंड्याची गोष्ट सांगू?"
" काय?" केसाला पम्या काय बडबडतोय कळेना.
" अरे कापुस कोंड्याची गोष्ट सांगू का?"
पमन शिल्पाकडं तिरकस पाहत जोरात बोलला नी चंदू व सुराला सुटीपूर्वी पेटवलेला कापूस आठवला. नी त्यांनी मागे वळत पमनच छाताडं धरलं. तशी पमननं सुऱ्याच्या कानफटीत छपाकदिशी दिली. चंदूची खाकी पॅन्ट हातात धरली.
" चंद्या तुम्ही कमरेला फटाके बांधलेत! पण जास्त वाजला ना तर सुतळी बाॅम्ब पेटवून चड्डीत टाकीन! मी त्या केसाला टि.व्हीवर नवीन सिरीयल सुरू होतेय ते सांगतोय!"
सारी मुलं फिदीफिदी हसायला लागली.
" शाळा सुटू दे, दुपारून भेटतो तुला!" चंदू दम भरू लागला.
" दुपारुन मी पेरू तोडायला जातोय, घरी भेटणार नाही. दम असेल तर मळ्यात ये! गल्लीत एकट्याला गाठून फटाके काय बांधता.शिल्पा फक्त रागात बघत होती पण एक ही शब्द बोलेना.
तोच समोरून नवीन आलेल्या सरांचं लक्ष गेलं असावं. मागच्या रांगेत काय गडबड म्हणून पहायला आले.
शास्त्री सरांनी चंदू, सुरेश, केसा यांना पुढे जायला लावलं. पमनचं मानगुट मागून पकडत
" काय रे नाव काय तुझं?" विचारलं.
" प्वन!" पमन बोलला नी सारे हसायला लागले.
" तुम्ही ड्रिलवर लक्ष द्या रे! " सरांनी जरब भरली.
”पूर्ण नाव सांग?"
" पमन!"
" कळत नाही का? पूर्ण नाव सांगायला लावलं ना?"
" सर, पवन मदन नकाशे! आम्ही त्याला प.म.न. म्हणतो!" एकानं मध्येच पुस्ती जोडली नी बदल्यात मध्ये बोलला म्हणून शास्त्री सरांची सणकन कानात खाल्ली.
" काय करतात वडील तुझे?"
" नाही माहीत!" पमन मानगुट सोडण्याचा प्रयत्न करत बोलला.
" वडील काय करतात ते माहीत नाही, शहाणा समजतोस का?"
" सर वडील नाहीत त्याचे!" माया रागानं बोलली नी सरांची पकड ढिली झाली.
" काय नाव बोलला?" पुढे जाता जाता सर विचारात थबकले.
" मदन नकाशे!"
शास्त्री सरांच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले. त्यांना चौदा पंधरा वर्षांपूर्वीची आपली इथली बदली आठवली.
" वडिल इथेच सर होते का?"
" होय"
होय शब्द ऐकला नी त्यांनी चेहऱ्यावरील भाव लपवत पवनकडं पुन्हा पुन्हा पाहिलं. त्यांना आपला मित्र मदन आठवला. पण या नविन सरांना वडिल इथं होते हे कसं माहित हे पमनला कळलं नाही.
" सर त्याच्या नादी नका लागू ,तो एकदम बेरकी आहे!" मागून येत घुमाने सर बोलले.
शास्त्री सरांनी पमनला ही पुढं नेलं.
केसा ,चंदू सुरा यांना गाईड म्हणून उभं केलं. पमनला टेबलवर चढायची खूण केली पण पमनने " सर मी ढोल बडवतो!" सांगताच त्यांनी खुणेनं होकार दिला.
उरलेल्या तीन टेबलावर घुमाने सरांनी नेहमीप्रमाणे माया, शिल्पा व सातवीतल्या विद्याला बोलावलं.
कवायत सुरू झाली.
बॅण्ड घुमू लागला, ढोल वाजू लागला, विसल (शिटी) घुमत माया, विद्या, शिल्पाकडं पाहत रिदममध्ये हात होऊ लागले. शिल्पाच्या टेबल मागेच पमन ढोल बडवत होता. बऱ्याच हातात तिचं तोंड फिरलं की पमन चंद्याकडं पाहत ढोल बडवी.नी चंदू दात ओठ खाई.

कवायत संपली. सारी आपापल्या वर्गात पांगली. पाचव्या पिरीयडचे गर्गे सर विज्ञान प्रदर्शनात मुलांना घेऊन गेलेले. खर तर हे प्रदर्शन सुटी आधीच होणार होतं पण काही कारणानं लांबलं. त्यांचा आॅफ पिरीयड घ्यायला नविन आलेले शास्त्री सरच आले. त्यांनी आल्या आल्या साऱ्यांची नावं विचारली. शिल्पा उठली.
तिला ते ओळखत होते. नववीपर्यंत ती नाशिकलाच शिकत होती. व तिचे आत्याचे मिस्टर चिंतामण कदम सरांशी त्यांचा परिचय होताच.
परिचय झाल्यावर त्यांनी त्यांचा तास नसल्यानं गप्पाच मारायला सुरुवात केली.
"या वर्षी पहिला क्रमांक कोण येईल ?"
त्यांनी प्रश्न फेकला नी वर्गात एकच गलका उठला. चार पाच नावं समोर येऊ लागली. त्यात बहुमताने मायाचंच नाव होतं. तर दुसऱ्या पसंतीस शिल्पाचं नाव. सरांनी मायाला विचारलं ." तुझं मत काय कोण येईल प्रथम क्रमांक?"
"सर कुणीही येऊ शकतं पण माझा प्रथम क्रमांक यावा म्हणून मी शर्थीचे प्रयत्न करेन!" माया शांतपणे म्हणाली.
" शिल्पा तू सांग!" सरांनी विचारलं
" सर , मी नाशिकसारख्या शहरात स्पर्धा केलीय! इथल्या ग्रामीण भागातील कोण माझ्याशी स्पर्धेत टिकेल! प्रथम क्रमांक आणणाऱ्यांनी आता मागचा इतिहास विसरायचा!"
शास्त्री सरांनी टाळ्या वाजत तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक केलं.
"सर मी सांगू का?" पमननं मागून खाली मान घालत विचारलं.
" सांग. खाली मान का घालतोय."
" सर या वर्षी दहावीच्या चार ही तुकड्यात शिल्पाच प्रथम क्रमांक पटकावेल!" पमन असं बोलला नी चंदू शिल्पा रागात त्याच्याकडं पाहू लागले.
" का ? तुला असं का वाटतंय? तुला तु स्वत: यावा असं का नाही वाटत?"
" सर ती नाशीकला शिकलीय, या खेड्यातल्या मुली तिच्यासमोर टिकूच शकणार नाहीत. !"
" तू का नाही ते सांग?"
" सर मी त्या स्पर्धेत उतरलोच नाही. प्रत्येक स्पर्धेत पुढंच असावं असं थोडं असतं!मला अभ्यासात प्रथम येता येत नसेल पण गायनात मी सर्वांना आवाहन नाही तर आव्हान करु शकतो!"
शिल्पाला कळून चुकलं हे वेडपट आहे.
मायाला मात्र पमन काय आहे हे माहीत असल्यानं ती हसू दाबू लागली.
सरांनी " ठिक आहे कधी तरी ऐकू तुझं गाणं" सांगत विषय बदलला.
" मुलांनो तुमचा तास भुमितीचा आहे. माझा विषय शा. शिक्षण. पण तरी आपल्या बहुतेक खेळात भुमितीतल्या रेषेचा संबंध असतोच. मग खो खो असो कबड्डी असो! मध्य रेषा निदान रेषा संबंध येतोच.मला सांगेल का कुणी या रेषेचे गुणधर्म?"
तशी मुलं पटापट उत्तरं देऊ लागली.
" रेषा अनंत बिंदूंनी बनलेली असते" बालू.
" रेषा सरळ असते." निता
" रेषेच्या दोन्ही बाजूस टोके असतात" संत्या.
" जाडी नसलेली लांबी म्हणजे रेषा" माया.
त्याबरोबर शिल्पा कुत्सीत हसू लागली.
तिला एक प्रकारचा अहंम होता व पश्चात्ताप ही. वर्गातली सारी मुलं तिला गावंढळ वाटत. आपण नाशीक सोडून यायलाच नको होतं असं तिला वाटे. माया हुशार जरी असली तरी ती तीला भिगी बिल्ली वाटे.
" सर बिंदू बिंदू नी बनलेला अमर्याद पथ म्हणजेच रेषा. रेषा दोन्ही बाजूस अमर्याद असते" शिल्पा बोलली.
" अरे व्वा ,साऱ्यांनी रेषेच्या छान व्याख्या सांगितल्यात. मला वाटतं तू
'माया' ना? तर तू आणि शिल्पा यांनी अचूक व्याख्या सांगितल्या.
"सर, दोन्ही बाजूंनी मर्यादित बिंदूपथ रेषाखंड असतो.
एका बाजूस अमर्याद तर दुसऱ्या बाजूस मर्यादित बिंदूपथ ' किरण' असतो. तर रेषा ही दोन्ही बाजूस अमर्याद असते" शिल्पा आपली हुशारी दाखवू लागली.
" सर मी सांगू?" पमन मध्येच बोलला नी साऱ्या वर्गात खिचडी पकली.
" सांग. काय सांगतोय" सरांनी विचारलं.
" सर ज्या अर्थी वर्तुळ मर्यादित असतं, त्याअर्थी रेषा ही दोन्ही बाजुंनी मर्यादितच असली पाहिजे!" पमन बोलला नी शिल्पा चंदू व इतर सारी हसू लागली. मायानं कपाळाला हात मारला!
" कसं काय? स्पष्ट करून दाखव!"
सर भुवया ताणत म्हणाले.
तर शिल्पास हा आपणास विरोध म्हणून काही तरी बरळून गेलाय .
" सर , समजा मी जमिनीवर दिशा न बदलता सरळ चालत गेलो तर एक रेषा तयार होईल. पृथ्वी प्रदक्षिणा करणारे जेव्हा दिशा न बदलता सरळ चालत गेले तर ते जेथून निघाले त्याच ठिकाणी येत एक प्रदक्षिणा म्हणजे वर्तुळ तयार होत. जे मर्यादित असतं.म्हणून रेषा मर्यादितच म्हटली पाहिजे!" पमनचा फसवा युक्तिवाद सरांना कळाला पण त्यांनी तसं न भासू देता माया शिल्पा व वर्गात बोलणाऱ्या इतर मुलांकडं पाहत
" सांगा हा काय म्हणतो ते पटतं का? नाही पटत असेल तर का नाही? ते सांगा."
शिल्पाच्या कपाळावर आता दोन्ही भुवयामध्ये जी चंद्रकोर व्हायची त्यात आठ्यांचा व प्रश्नाचा गोल चंद्र तयार होतोय असं पमनला वाटू लागलं.
आपण याला येडं गाजर समजतोय पण हे बांदर तर....! ती डोकं खाजवू लागली.
" सर त्याला काय म्हणायचं ते नविन सांगा?" ती सरांनाच विचारू लागली.
" मुलांना त्याचं म्हणनं साधं सरळ आहे.जर एखादी व्यक्ती जमिनीवर दिशा न बदलता सरळ चालत गेली तर रेषा तयार होते. जी अमर्याद असते. पण त्याच व्यक्तीनं असंच सरळ चालत राहिली तर पृथ्वीप्रदक्षिणा होऊन ती व्यक्ती जेथून निघालीय तिथेच पोहोचत वर्तुळ तयार होतं जे मर्यादित असतं म्हणजेच रेषा मर्यादित असते!"
शिल्पा डोकं खाजवत विचार करत सुन्न झाली. पमननं मायाकडं पाहत डोळा मिचकावत तिला चूप बसायला लावलं. त्यानं वर्षाच्या सुरुवातीला च हा प्रश्न मायाला विचारला होता. मायानं त्याला एकाच प्रलात असणारी रेषा व भिन्न प्रतलातील रेषा समजावून देत पृथ्वीप्रदक्षिणा करणारा माणूस सरळ चालतो पण पृथ्वी सपाट नसून गोल असल्यानं तो दिशा कशी बदलतो हे समजावलं होतं. जर माणसानं दिशा बदललीच नाही तर त्याचा प्रवास सरळ अवकाशात होईल व अवकाश अमर्याद असल्यानं रेषा ही अमर्याद असते हे सिदध होते हे समजावलं होतं.
पण माया काहीच बोलली नाही. चर्चेत प्रतल बाबत कुणीच काही बोललं नाही म्हणून त्यानं तो प्रश्न टाकला होता. शास्त्री सरांचा विषय भुमिती नसल्यानं घंटा होताच नंतरच्या तासाला पाहू सांगत ते सुटले व नंतर त्यांनी गणिताच्या शिक्षकांकडून तो भाग नव्यानं समजून घेतला. शिल्पा मात्र दोन तीन दिवस विविध पुस्तकं हाताळत राहिली.
शास्त्री सरांनी पटांगणात सर्व खेळाची मैदानं आखून घेतली. शाळेत खेळाचं बरंचसं साहित्य असलं तरी त्यांनी मोठ मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या आपल्या माजी विद्यार्थांना मदतीचं आव्हान करत बरीच व्यायामाची व खेळाचं साहित्य आणलं. संस्थेकडून मदत मिळणार नाही हे त्यांना माहित होतं. म्हणून जसजशी मदत येऊ लागली तसतसे भाले, थाळ्या, हथोडे, बांबु, मल्लखांब, लेझीम, गोळे, वेटलिंफ्टींगचं सामान, क्रिकेटचं साहित्य आणि व्यायामाची महागडी इक्विपमेंट येऊ लागली.
आधी त्यांनी वैयक्तिक खेळावर लक्ष द्यायचं ठरवलं. कारण खो-खो, कबड्डी या खेळात संघ बांधणी व कौशल्ये ही बाब लगेच शक्य नव्हती.तसं पाहता पंधरा वर्षांपूर्वी पेक्षा शाळेची लक्षणीय प्रगती होतीच.खेळातही मुलांना बेसीक्स बाबी तयार आहेत हे त्यांना महिन्यातच कळून चुकलं. पण तरी तयारी तालुका लेव्हलवर खेळू शकतील इतपतच होती. त्यांचे विद्यार्थी तर विभाग राज्य पातळीवर चमकत. म्हणून तर नाशीकच्या अडकमोल मॅडमाशी वाद झाल्यानंतर त्यांनी स्वत:च माघार घेत जिथं काही नाही अशा आर्डीच्या शाळेत बदल करून दाखवेन असं आव्हान स्विकारत ते आर्डीत आले होते. नी दुसरं महत्वाचं कारण त्यांच्या उमेदीतल्या काळातीलमित्राचं अपुरं स्वप्न त्यांना पूर्ण करायचं होतं. गेल्या पंधरा वर्षात 'गाळात रुतत असतांनाही मुलांना वाचवत जबाबदारी निभावणारा मदन' मित्र कायम प्रेरणा देत आला होता. व त्याचं अधुरं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते तळमळत होते.
नाशीकला असतांना शिल्पाचं खो खो खेळणं त्यांना माहित होतं. किंबहुना त्यांनीच तर तिला उत्कृष्ट खो खो पटू तयार केलं होतं. पण इथं तिच्या तोडीचं कुणी खेळणारे नव्हतेच. चंदू, सुरेश तिची भावंडं बरी खेळत. बाकी पूर्ण संघ उभारणं अवघडच होतं.
पाचला शाळा सुटली की तेसारं सामानं त्या त्या खेळाचू मैदाना जवळ ठेवून देत. ज्यांना ज्यांना आवड होती ती मुलं थांबत व सराव करत. कुणी भाला फेकी तर कुणी थाळीफेकी. कुणी लांब उडी मारी तर कुणी उंच वा बांबू उडी मारी. कुणी अडथळ्याची शर्यत धावे तर कुणी शंभर ,चारशे मीटर. शास्त्री सर फक्त निरीक्षण करत पटांगणात फिरत. एखादा चांगला गोळा फेकतांना दिसला की त्याचं नाव लिहून लक्षात ठेवत व त्याला त्यातली कौशल्ये समजावत. भाल्यावाल्यास अंतर कसं वाढेल या दृष्टीने समजावत.
दहावीचं वर्ष असल्यानं माया शिल्पा अभ्यासातच गडल्या होत्या