रहस्यमयी मंदिर:एक षडयंत्र (भाग 6)
.....ते दुसरे तिसरे कुणी नसून त्याचे काका आणि मंदिराचे पुजारीबाबा होते ,समर्थचा दिमाग चालायचाचं बंद होतो ,एवढ्या मोठया धक्क्याने तो खाली कोसळतो ,त्याचे सख्खे काका जो त्यांना आपल्या वडिलांच्या जागी बघायचा ,ते एवढ्या खालच्या थराला जातील असं त्याला कधीच वाटलं नव्हतं ,आणि दुसरे ते पुजारी बाबा ,ज्यांच्या पायावर पूर्ण गाव डोकं ठेवतं ,देवाचा दूत ज्याला सर्वजण मानतात ,तो असल्या काळ्या शक्तीचा उपासक निघावा ,ज्यांच्या वर डोळे झाकून विश्वास ठेवावा तेच पाठीत खंजीर खुपसणारे निघावेत आणि एवढ्यादिवास आपण त्यांच्या सोबत राहून आपल्याला ,आपल्यात राहणारे गाईचं कातडं पांघरलेले लांडगे ओळखू न यावेत,ह्यावून मोठं दुर्दैव काय असू शकतं ,समर्थ स्वतःलाच कोसत बसतो, वयाने मोठे असल्यामुळे तो त्यांच्यावर हातही उचलू शकत नव्हता म्हणून तो त्यांना जाब विचारतो कि ,का तुम्ही असं केलात ,का पूर्ण गावकऱ्यांच्या भावनांशी खेळालात ,स्वतः च्या स्वार्था साठी का मंदिराला बदनाम केलं ,भरपूर प्रश्नांची उत्तरं समर्थला त्यांच्याकडून घ्यायची होती,आणि मुख्य म्हणजे त्यांच्यासोबत ह्या मध्ये आणखी कोण शामिल आहे हे देखील माहिती करायच होतं, तो आणखी काही बोलणार तोच त्याच्या डोक्यावर मागून कुणीतरी जोरात प्रहार करतो आणि तो खाली पडून बेशुद्ध होतो ,जेव्हां तो शुद्धीवर येतो तेव्हा त्याला दोरीने बांधलेले असते ,त्याच्या आजूबाजूला त्याचे साथीदार सुद्धा बांधलेल्या अवस्थेत असतात ,आणखी 3,4 लोकं त्याला तिथे त्याच पद्धतीने बांधलेले दिसतात ,त्यांच्याकडे बघून असं वाटत होत की खूप दिवसांपासून ह्यांना काही खायला नाही दिल्या गेलं आणि त्यांच्याकडून शारीरिक कष्टाचे काम देखील करून घेण्यात आले असावे ,समर्थला ती दोरी काही सुटत नव्हती ,कसला तरी चमत्कारिक पाश होता तो ,खूप ताकत लावूनही सुटत नव्हता ,इकडे मल्हार हरतर्हेचे प्रयत्न करत होता समर्थ आणि त्याच्या मित्रांची सुटका करण्याचे ,पण त्याला दुसरी पूजा सुद्धा अर्धवट सोडता येत नव्हती,इकडे आड ,तिकडे विहीर अशी त्याची स्थिती झाली ,शेवटी त्याने भगवान शंकरानाचं साकडं घातलं ,आणि मन घट्ट करून पूजेला बसला ,इकडे मंदिरात त्याचे गुलाम त्याला बाहेर काढण्यासाठी जोरजोरात मंत्र म्हणत होते ,समर्थला जमिनी मधून धक्के जाणवायला लागले होते ,तसे त्याचे भक्त खुश होऊन आणखी जोर जोराने ते विचित्र ,कर्णकर्कश मंत्र म्हणत होते ,इकडे मल्हार ने त्याच्या साधनेच्या बळावर यज्ञातून एक अस्त्र मिळवलं ,जे त्या शैतानाला काही काळ तरी रोखून ठेऊ शकणार होतं ,तो आणखी एका महास्त्राच्या प्राप्ती साठी यज्ञ करत होता ,जे साक्षात प्रभू शंभोंकडून त्याला मिळणार होतं,आणि त्याच अस्त्रामुळे त्या शैतानाचा कायमस्वरूपी अंत होणार होता ,पण ते अस्त्र मिळवणं एवढं सोप्प नव्हतं ,सैतान आणि त्याचे गुलाम ह्या कामामध्ये खूप अडथळे आणणार होते ,मल्हार च्या जीवावर बेतणार होतं हे सर्व ,पण त्याला पर्वा नव्हती ,कोणत्याही हालातीत त्याला त्या शैतानाचा अंत करायचा होता ,ते काम प्रभू शंभो करू शकले असते ,पण त्याच्या गुलामांनि त्यांना बंध घातला होता ,त्यामुळे हे काम मल्हार ला करायचं होतं ....(क्रमश:)