दिपु -Small Marathi bhutachi gosht
https://marathighoststories.blogspot.com/2019/06/small-marathi-bhutachi-gosht.html |
मी दिपेंद्र अन माझी बायकु दिपाली
आम्ही दोघ पुण्याला आमच्या नविन फ्लॅट मध्ये राहायला आलो होतो.
लग्नाला २ वर्ष पुरी झाली होती
बायको अधन मधन माहेरी जायाची ४-५ दिवसांसाठी
मग काय ऐकटाच असायचो फ्लॅटमध्ये
ऐके दिवशी तिने माहेरी किती दिवस राहायचे या विषयावरुनच तुंबळ भांडण झाली अन दुसर्या दिवशी मैडम गेल्या माहेरी, तशाही जानारच होत्या त्या फकस्त भांडन करुन गेली एवढच

ती माहेरी गेल्यानंतर मी तिच्याघरी फोन करायचो पन ती अकडीची वाकडी काय फोनवर येत नसं. अन स्वताचा फोन पण रिसीव करत नसं, म्हनल येईल तिला जितके दिवस राहायचे तेवढ दिवस राहुन.
असाे
असच एके दिवशी मी तिच्या घरी फोन केला कुणी रिसिवच केला नाय. २-३ वेळा केला तरी रिसीव केला नाय कुणीच, मग तिच्या मोबाईलवर केला पण आपल नेहमीचच नाय उचलला. ती तर रागात असल्यामुळे फोन घेतच नव्हती पण तिच्या घरातलेही आज फोन घेत नव्हते. तेव्हा थोड संशयास्पद अन वाईट मनात येवुन गेले.

त्याच दिवशी रात्री फेसबुक, वाॅट्सअपवर हुंदडुन झाल्यावर १ वाजता झोप लागली. टू बिएचके फ्लॅट त्यात मी एकलाच... दोन दिवस आधी रात्रीचे काहितरी धपाक धपाक आवाज आले होते परंतु मनानेच मनाला समजवल वरच्या फ्लॅटमधले हरामखोर काहितरी धुडगुस घालत असतील. पण आज परत २ वाजता वेगळाच आवाज आला जोराचा डोळ पाढंर पडायची वेळ आली माझ. पण हनुमान चालिसा तोंडपाठ असल्याने चालिसेचा जाप सुरु केला अन झोप लागली..(स्वता अनुभवतोय असा विचार करुन पहा कशी टरकतेय)
रात्रीच्या तीन वाजताचा टाईम अन परत कानावर आवाज येवु लागला दिपू... दिपू... दिपू.... दिपू
अन मग एका क्षणात बायकू आठवली ( कारण आम्ही दोघही एेकमेकांना प्रेमान दिपूच म्हणायचो कारन दोघांच्याही नावात मोठ दीवं लावल होत घरच्यांनी) अन तिच ते भांडणावेळीच बोलन...

मी भांडनाच्या वेळी बोललो होतो रागाच्या भरात तिला, की मर तिकड जावून... (तस कायमच्या भांडणामध्येही हेच बोलायचो तोंडवळणी पडलेल होत माझ्या ते), अन तिच नेहमीच वाक्य हेच असायच की मेले तरी तुला सोडणार नाही दिप्या
तुह्या मानगुटीवच येवुन बसन मी मेल्याव...

हे आठवल्याव माझी मात्र गाऴन उडाली मी पुरा घामाघुम झालो
आवाज येतच होता दिपू... दिपू...
एकदम कानाजवळच कुणितरी आवाज देतय असा
आवाज येतच होता दिपू... दिपू...
एकदम कानाजवळच कुणितरी आवाज देतय असा
माझी दिपु (बायकु) कधी कधी मजाक मध्ये लपुन बसुन भाँ करायची
पण आज हा कुठचा टाईम भाै भाँ करायचा मरल ना ऐखांद
अन
पण आता ह्या वेळेस ही माहेराहुन कशी येईन रातच्या ३ वाजेला? ते पण २०० कि.मी.वरनं ?

मन म्हन दिप्या कायतरी गडबडे भाै. आता काय खर नाय.
एकतर नवा फ्लॅट २ वर्षतर अस कधी झाल नव्हत पण २ दिवसांपासुन गडबड चालु झाली होती हे नक्की.
मनात विचारांचे काहुर की ही बया खरच मेली की काय ? आज फोन पण नाय उचलला सासरवाडिवाल्यांनी, समध्यांनीच सामुहिक आत्महत्या त नाय केली? दिप्या तु काळतोंडाचा कशाला म्हणला रे बायकुला " मर तिकड जावुन" आता मेली वाटत आन आली तुह्या मानगुटीव बसाया आता तु बी मर

आवाज देतच होत ते भुताड दिपू.. दिपू...
माझी कुस बदलायची ही हिम्मत होईना कारन आवाज एकदम कानाजवळच येत होता.

मोबाईला हात लावण्याची हिम्मत होईना म्हणल मोबाईलचा उजेड पडला त मग तु त ऊजाड झाला दिप्या
ते आवाजच देतया ना नुसत काही करत त नाय ना त देवुदे आवाज, आवाज देऊन देऊन कटाळा आला का जाईल.
हनुमान चालिसा परत आठवली पण म्हणायला नाय नुसतीच आठवली, एक दोन अोळी बोललो का कुटतरी मधल्याच अोळिवर जायाचो मी, नायतर लास्टच्या अोळिवर.
मनात म्हणल अशी जर हनुमान चालीसा म्हणालो तर भुताड कन्फ्युज होवुन आनखीनच चेकळतय मग अन मग चेवकतय मला समध्या ताकतीनिशी
आवाज कानात चालुच होता
मागे पहायची पंचायत पार येड व्हायची वेळ आली
एकदा तर असही मनात येवून गेल की हे भुताड नेमक कुणाल झपाटायला आलया? कारण ते दिपु म्हणुन बोंबलतय मी त कुणाच वाईट केल नाय मग हे माझ्या बायकुला काहुन हाका नसल मारीत कारण दोघांच नाव सारखच ना. मनात म्हणल या भुतालाच सांगाव तुला जो दिपु पाहिजे तो माझ्या सासुरवाडीला भेटेन म्हणुन.

पण आवाज परत आला अन मला अटॅक येण्याईतपत माझी अवस्था खराब झाली. कारण मी समजुन गेलो होतो की आवाज बायकुच्या आवाजासारखाच येतोय. अन मग जाम टरकलो.
आवाज येन अजुनही चालुच होत
आता मात्र मी ठरवल असा अटॅक येवुन मरण्यापेक्षा भुताड पाहुनच मरु अन मग एका झटक्यात अंगावरच ब्लैंकेट मागच्या बाजुला भिरकवल अन लाईट्स आॅन केली कुणीच नव्हत घाम आलेला म्हणुन पंखा चालु केला आता आवाज येत नव्हता. थोडा वेऴ पलंगावरच बसुन राहिलो. बाहेरच्या रुममध्ये जायचे धाडस होईना. जरा वेळ बसल्यावर धाडस करुन सगळ्या रुम चेक केल्या कुठच काही दिसेना नंतर मेन बाथरुम मध्ये गेलो तिथेही काही नाही. आता फक्त बेडरुमचे बाथरुम व गैलरी चेक करायची राहीली होती गैलरीचा दरवाजा उघडला तर समोरच्या गैलरीत कुणीतरी लेडिज फोनवर बोलताना दिसली, कुणीतरी जागे आहे हे पाहुन थोडा जिवात जीव आला मग बेडरुमच्या बाथरुमकडे मोर्चा वळवला आत पाहिले तर काय...
शाॅवर तुटुन खाली पडला होता.
२ वाजता बहुतेक तोच आवाज आला होता. पण दिपु च काय लफड ये भाै मग फॅन बंद केला अन आवाज परत चालु झाला.
दिपू . . . दिपू.. .

च्या मायची कटकट शाॅवर च्या पाईपमधून एक एक थेंब गोळा होत खालच्या भरलेल्या बादलीत पडत होता
टिपू. . .क टिपू. . . क
टिपू. . .क टिपू. . . क
आता मात्र बायकुला फोन करुन शिव्या द्यायच मन करत होत. फोन का नाय उचलत म्हणुन हाडळे.....
(सत्य घटना माझी अवस्था खुपच बिकट झाली होती)