जखीण (repost)
सदर ची घटना ही 60-70 च्या दशकातिल आहे.आमच्या इथे राहणाऱ्या कमलाबाई आजीनी अनुभवलेली आणि त्यांच्याकडून ऐकलेली.आमच्या ठाणेतील वागळे इस्टेट एरिया जसा इंडस्ट्रीज च्या बाबतीत जसा सुप्रसिद्ध तसा कॉर्पोरेशनच्या पाण्याच्या बाबतीत कुप्रसिद्ध,इथे पिण्याचे पाणी कधीही येते त्याला वेळकाळ नाही रात्री 12, 2 तर पहाटे 4, 4.30 म्हणजे हांडा कळशी घेउन सज्जच रहाव लागत,त्या काळी घरोघरी पाण्याचे कनेक्शन नसल्याने बाहेर नळावर पाणी भरायला जाव लागे, याच नळा शेजारी एक मोठ झाड़ होते त्या झाडाखाली असलेल्या ओटया वर एक हिरवी साड़ी व चूड़ा घातलेली,कपाळावरील कुंकु पुसलेल,आणि चेहरा पायात लपवून हुंदके देत रडत बसलेली जखीण हार्डली 5-10 मिनिटासाठी दिसे रात्री 2 ते 2.30 च्यादरम्यान कोणी अनोळखी व्यक्ति जर तिला विचारायला जात तर ही लगेच अदृश्य होत. असेच एकदा पाणी रात्रीच्या 2 वाजता आल आणि कमलाबाई त्यांच्या सासू हांडा घेउन निघाल्या.सासु बाई त्यांना पुढे जायला सांगून अजुन एक हण्डा अणायला घरी गेल्या तोवर कमलाबाई हण्डा नळाखाली लावून सासुबाईची वाट पाहत होत्या इतक्यात त्यांना कोणीतरी स्त्री रडत असल्याचा अवाज ऐकू आला त्या वेळी कमलाबाई गरोदर होत्या, बाई आवाजाच्या दिशेने पाहत होत्या इतक्यात ओटयावर हुंदके देत रडणारी ती जखिण बाईंना दिसली पण त्या ह्या बाबतीत अनभिज्ञ होत्या. त्यांना तिची दया आली आणि त्या तिला विचारायला गेल्या की काय झाल इतक्या रात्रि तुला कोणी घरा बाहेर काढल तुझ घर कुठाय etc etc. पण ती फक्त रडत होती काहीच बोलेना म्हणून बाईंनी तिचा हात धरला आणि चल माझ्या घरी रहा आजची रात्र म्हणून तिला विनवू लागल्या पण एका झटकयत त्या जाखिनीने बाईंचाच हात धरला व म्हणाली मला भूक लागलिये बाई म्हणाल्या चल घरी पण तू कुठ ऐकती माझ म्हणून तिला उठवू लागल्या तेवढ्यात जाखिनीने भयंकर रूप धारण केल आणि म्हणाली मला तुझ पोर खायचय ते तुझ्या पोटातल अस बोलून तिच्या पोटावर ती नख फिरवू लागली, हा सगळा प्रकार बाई च्या हण्डा घेउन येणाऱ्या सासुबाईंनी पाहिला आणि त्यांनी जोरजोरात घाण शिव्या,बोम्बा घालायला,आरडा ओरड करायला सुरुवात केली तितक्यात ती जाखिन अदृश्य झाली.कमला बाई भोवळ येऊन पडली आणि थोडक्यात वाचली.पण परत असा प्रकार होऊं नये म्हणून तो ओटा फोडून पूजा घालून तिथेच तुळशी वृन्दावन बांधल त्या नंतर ती जाखिण कुणालाही दिसली नाही.
प्रथम वाडकर