कॉलेजमध्ये असताना पिकनिकला जाणं म्हणजे कॉलेज तरुणांसाठी पर्वणीच असते...त्यात विकेंड आला
की, पिकनिक प्लॅनल्स ला तर उधाणच येत...,मधु आणि तिच्या मित्र-मैत्रींनीही काहीसा असाच प्लॅन बनवला कि, येणाऱ्या विकेंडला सर्वांनी दीपकच्या गावी जायचं पिकनिकला..,बघता बघता खूप जण जमले म्हणून आम्ही एक ट्रॅव्हलरच बुक केली..शुक्रवारी रात्री निघून शनिवार रात्री राहून..,रविवारी रात्री पुन्हा मुंबई कडे परतणार होतो

ठरल्या दिवशी सर्वजण आपापल्या घरून रात्री ८ वाजता ठरलेल्या ठिकाणी भेटले आणि तिथुन पुढे आम्ही दीपक च्या गावी निघालो. मग गाडीत बसल्यानंतर सर्वांच्या गण्या-गप्पांची सुरवात झाली...,रात्रीचे बारा वाजून गेले तरी सगळ्या उत्साह काही कमी होत नव्हता..,अनेक गायकांना आज कंठ गवसला होता..,मग काय गाण्याची मैफिलच जमली होती..गाडी मध्ये एकच धमाल सुरू होती..,हळूहळू दीड-दोन वाजेपर्यंत धमाल गॅंग दमून झोपी गेली..., तरी काहीजण अजूनही जागे होते आणि गप्पा मारण्यात गुंग होते(मुली) ते कॉलेजच्या जुन्या आठवणीं ताज्या करण्यापासून,आतापर्यंत कोण कस ग्रुप मध्ये ऍड झालं..या आधीच्या पिकनिक ला काय काय झालं या अशा गप्पा खूप उशिरापर्यंत सुरु होत्या, बहुतेक जण झोपून गेले होते...,दीपकचा ही डोळा लागला होता.. दोन-अडीच च्या सुमारास अचानक त्यांची बस एका ठिकाणी बंद पडली...तसे बहुतेक जणांना जाग आली..,कुठे पोहचलो बघायला बाहेर मान डोकावली तर बाहेर नुसता काळाकुट्ट अंधार...लांब लांब पर्यंत प्रकाश आणि इतर वाहनाचा लवलेश ही दिसत नव्हता...गाडी च्या स्टार्टर चा आवाज त्या भयाण शांततेला छेत देत होता...ड्राईव्हर स्टार्ट मारून गाडी चालु करण्याचा प्रयत्न करत होता....पण गाडी चालूच होता नव्हती.. ड्राईव्हर खाली उतरला तसे बक्कीचें ही खाली उतरले...,काळाकुट्ट अंधार...,गाडी एका सुनसान रस्त्याला उभी होती..,सगळ्यांनी पटापट आपल्या मोबाइलच्या टॉर्च चालूया केल्या...ड्राईव्हर ही आपल्या बॅटरी च्या उजेडात बोनेट उघडून पाहू लागला...बक्कीचें टॉर्च च्या उजेडात इकडेतिकडे पाहत होते...रस्त्याच्या दोनी बाजूनं घन जंगल असल्या सारख दिसत होता...गाडी हायवे वर न्हवती...ती एका अरुंद रस्त्यावर होती...तसं दीपक च्या चटकन लक्षात आलं..ड्राईव्हर ने गाडी हायवे वरून न घेता शॉर्टकट ने जंगलात ल्या मार्गाने घेतली होती..,तशी भीतीची एक नाजूक लहर त्याच्या पूर्ण शरीरातून गेली...कारण त्याला काही तरी आठवलं...गेले वेळेस गावाला आल्यावर त्यांने हा मार्ग आता अपशकुनी झाल्याचं ऐकलं होतं....तत्काळ तो त्याच्या मित्रानं कडे गेला..आणि भेदरल्या स्वरात सगळ्यांना गाडीत बसायची विनंती करू लागला..पण ऐकतील ते मित्र कसले..,सगळे त्याची थट्टामस्करी करू लागले..,त्याला ड्राईव्हर मदत करायला सांगून..सगळे पुन्हा गप्पा मध्ये गुंगले..आता त्यांचा टॉपिक अंधश्रद्धा आणि सायन्स वर येऊन ठेपला होता..,बोलता बोलता त्यांचे पैकी एकच्या टॉर्च चा उजेड गाडीच्या माघच्या टायर वर पडला...त्याला लाल लाल काहीतरी लागलं होतं....जवळ जाऊन बघितलं तर ते रक्त होत..टायरा खाली नक्कीच काही तरी आलं होतं म्हणून सगळे पळतपळत मागे आले...तेव्हा त्यांना एक काळी मांजर मरून पडल्याचं दिसलं..सगळ्यांना ते थोडंस विचित्रच वाटलं..बिचारी गाडी खाली येऊन मेली etc दिलगिरी व्यक्त करून सगळे पुन्हा गाडी कडे निघाले मात्र मधू अजून ही तिथेच उभा होती..मंत्रमुग्ध झाल्या सारखी ती...एकटक त्या मांजरी कडे बघत...अचानक ती वळाली आणि चालू लागली..पण गाडीच्या विरुद्ध दिशेला....अंधार...बक्कीचेंना कळालच नाही की मधू त्यांचे मध्ये नव्हती...ती आता चालत चालत एक वळणावर आली होती..मग डावीकडे वळून...ती एका झाडाकडे एकटक पाहू लागली..आणि अचानक शुद्धी वर आली..आपण कधी,कसे.., इथे एकटेच आलो.. तिला काहीच कळत न्हवते..ती प्रचंड घाबरली आणि गाडी च्या दिशेने पाळणार..तेवड्यात तिला कोणच्या तरी रडण्याचा आवाज आला...तिने हातातील टॉर्च त्या झाडायच्या बुंध्याशी वळवला तर तिला तिथे कोण तरी बसल्या सारख दिसलं..जवळ जाऊन पाहिलं तर गुडघ्यात तोंड घालून एक बाई तिथे रडत बसली होती..थरथरत्या स्वरात मधु ने विचारलं, "तुम्ही एकट्या इथे काय करत आहात" पण त्या बाईने काहीच उत्तर दिले नाही..,त्यावर मधु ने पुन्हा विचारलं.."तुम्ही रडत का आहात", त्याच क्षणी त्या बाईने मान वरती करून पाहिलं तस मधु ची बोबडीच वळली..तिचा पूर्ण चेहरा सडला होता आणि डोळे लालबुंद होते..त्या टॉर्च च्या उजेडात ते विदारक दृश्य पाहून मधु हादरलीच...आणि प्राण कंठाशी आणून ती गाडीच्या दिशेने पळत सुटली..., तोपर्यंत गाडी चालूच झाली होती..आणि सगळे गाडीत चढतच होती..माघून पळतपळत ती सगळयांच्या मागे उभ्या असलेल्या दीपक च्या अंगवर जाऊन आपटली...तस दीपक ने तिला सावरल....तशी ती जोरजोरात रडू लागली तसे सगळे जण तिच्या भवती जमले कोणाला.काही कळेनाच.,.मधु मात्र थरथरत होती....तिच्या सर्व अंगाला घाम सुटला होता..धापा टाकत मागे बोट दाखवून ती सांगू लागली..,"तिथ...तिथे... कोणी तरी आहे..कोणी तरी आहे..,त्या...त्या झाडाखाली..होती"...मधु प्रचंड घाबरली होती..काय बोलावे तिला काहीच सुचतच नव्हत..सगळे तिला धीर देऊ लागले..दीपक ला कळून चुकलं काहीतरी भयाण घडलं आहे..अजून काहीतरी अघटित घडायच्या आधी त्याने तिथुन लवकर काढता पाय ठरवल आणि सगळयांना गाडीत बसवलं
गाडीत बसले वर ती सगळ्याना सांगू लागली..,मागे एका झाडाखाली बाई बसली होती...,भूत होती ती..,भूत...पण...कोणाला विश्वासच बसेना...तिला काहीतरी भास झाला असेल असे समजून सगळे तिची समजूत काडू लागले..पण आता काहीवेळापूर्वी आपण जे पहिला तिच्यावर तिचा पूर्ण विश्वास होता...दीपक ने तिला कसंबसं शांत केल...आणि ती कशीबशी झोपी गेली
सकाळी गाडी दीपक च्या गावी पोहचली...सगळ्यांनी दोन दिवस भरपूर एन्जॉय केलं..मधु नाही करू शकली..सकाळ-दुपार-संध्याकाळ...तुच्या डोळ्यासमोरून ते दृश्य हलतच न्हवत...त्या दिवसापासून आणि दीपकच्या गावी जाऊन आल्यानंतरही न जाणो..,का पण आता प्रत्येक ठिकाणी मधूला तीच बाई वारंवार दिसत होती, आपल्या आसपास त्या बाईचे अस्तित्व तिला जाणवत होते. पण तिला माहित होतं कि, तिच्या बोलण्यावर कोणाच विश्वास ठेवणार नाही.., म्हणून तिने या गोष्टीबद्दल दिपकशी बोलायचे ठरवले. मग एक दिवस त्याच्या घरी जाऊन तिने दीपकला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी घडलेली सर्व हकीकत त्याला सांगितली. दिपकानेही तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं , कारण त्यालाही त्या दिवसापासून या घटनेबद्दल मधुशी बोलायचं होतं . दोघानाही काहीच सुचेना कि काय करावं...दोघेही खूप टेन्शनमध्ये आले होते. दीपकची मधू खूप चांगली मैत्रीण असल्याने तो आपल्या मैत्रिणीला या अवस्थेत पाहू शकत न्हवता .
"आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू " असं बोलून त्याने मधूला पुन्हा घरी पाठवले .
"आपण यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू " असं बोलून त्याने मधूला पुन्हा घरी पाठवले .
त्याच्या दुसर्या दिवशी रात्री साधारण 8 च्या दरम्यान मधु आपल्या घरी एकटीच बसली होती...तिचे आई-बाबा काही कार्यक्रमानिमित्त जवळच कुठेतरी बाहेर गेले होते... मधु कसलंसं पुस्तक वाचत बसली होती..अचानक काही वेळाने तिला घरात कोंडल्या सारखा वाटू लागलं..मधूला थोडं विचित्र वाटल...पण आपल्याशिवाय पण घरात कोण तरी आहे असं तिला जाणवू लागलं..तिने दुर्लक्ष केले...पण अचानक तिला कसलातरी भयानक आवाज ऐकू आला तो एका बाईच्या किंचाळण्याचा आवाज होता..त्या आवाजाने मधु इतकी घाबरली कि, जागेवरच पुस्तक टाकून ती बाहेरच्या दिशेने पळत सुटली...पण बाहेर आल्यानंतर अचानक धाडकन..बाहेरचा दरवाजा बंद झाला आणि संपूर्ण घरात “वाचवा वाचवा” अशी एका बाईची किंकाळी घरात घुमू लागली..., तो आवाज ऐकून मधूही घाबरून गेली भीतीने ती घरभर सैरावैरा धाऊ लागली... मग तिने कसाबसा आपल्या मोबाईलवर तिच्या बाबांचा नंबर डायल केला. रिंग वाजत होती पण कार्यक्रमात असल्याने त्यांना कदाचित ती ऐकू गेली नसावी...,आता मात्र मधु रडकुंडीला आली होती.., मग काहीतरी विचार करून तिने दीपकचा नंबर डायल केला. इकडे दिपकही झोपण्याची तयारी करत होता इतक्यात त्याचा मोबाईल वाजला...त्याने स्क्रीन वर मधूचा नंबर पाहताच पटकन तिचा कॉल रिसीव्ह केला..,तर तिकडून मधुने अत्यंत भेदरलेल्या आवाजात त्याला घडणाऱ्या घटनेबद्दल सांगितले आणि ती तिच्या घरी येण्याची विनंती करत होती.., मग दिपकने तिला घरातल्या देव्हाऱ्याजवळ जाऊन बसण्यास सांगितले व तो तिथे येईपर्यंत कुठेही न जाण्यास सांगितले..,मग क्षणाचाही विलंब न करता दीपक आपली बाईक घेऊन मधूच्या घराच्या दिशेने निघाला..साधारण २० मिनिटांनंतर दीपक मधूच्या घराजवळ पोहोचला..मग त्याने तिच्या घराचे दार ठोठावले इतक्या वेळापासून घरात घाबरून बसलेली मधु त्या आवाजाने दचकली...,मग दिपकने बाहेरून आवाज देताच पळत जाऊन तिने दरवाजा उघडला..,मग दिपकने समोर पहिले तर अश्रूंनी भरलेले डोळे , घामाने भिजलेल्या चेहऱ्यावर भेदरलेले भाव असलेली मधु त्याला दिसली..,मग तो आत आला त्याने तिला पाणी दिले आणी सगळ काही सविस्तर विचारले...,इतक्यात पुन्हा तोच आवाज संपूर्ण घरात घुमला आणी मागून एका बाईचा “वाचवा वाचवा” असा किंचाळण्याचा आवाज आला . आता या आवाजाने दीपकची पाचावर धारण बसली होती...तरीपण त्याने थोड धाडस करत विचारलं ," कोण आहे इथे plz समोर ये , मधूला असा त्रास द्यायचं काय कारण आहे ? "
मग काही वेळ कसलाच आवाज आला नाही . काही वेळासाठी घरात स्मशानशांतता पसरली होती...,दीपक आणि मधु दोघेही एकेकांकडे पाहू लागले . मग अचानक पुन्हा एक थंड हवेची झुळूक येउन गेली आणि हळूहळू त्यांच्यासमोर एक धुसरशी आकृती तयार होऊ लागली . बघता बघता त्या आकृतीतून एक बाई त्यांच्यासमोर उभी राहिली...,आता ती बाई फक्त रडत होती हे पाहून दीपक आणि मधूला दोघानाही खूप आश्चर्य वाटले. मग पुन्हा दिपकने थोडा धीर करून तिला विचारले कि ," कोण आहात तुम्ही आणि मधूने काय बिघडवलंय तुमच ?"
मग ती बाई रडायची थांबली आणि आपल्या घोगर्या आवाजात म्हणाली ," माझ तुमच्यापैकी कुणाशीही वैर नाहीये पण मला मुक्ती हवीय"
"मुक्ती??" दीपक आणि मधूच्या तोंडून एकाचवेळी हे वाक्य बाहेर पडलं , मग मधु इतक्या वेळानंतर पहिल्यांदाच त्या बाईशी बोलली म्हणाली ," तुम्हाला मुक्ती हवी आहे तर आम्ही कशी देऊ शकतो , आम्ही साधारण माणसे आहोत "
मग ती बाई म्हणाली ,"नाही मला मुक्ती तुम्हीच देऊ शकता..,कारण माझ्या मृत देहाला अजूनही अग्नी मिळालेला नाहीये..,त्याशिवाय मी मुक्त होऊ शकत नाही , कितीतरी दिवसांपासून मी याच प्रतीक्षेत होती कि, कोणीतरी येयील आणि मला मुक्ती देईल...,पण कुणीच आलं नाही , त्या दिवशी अचानक हि मुलगी माझ्याजवळ आली आणि मला माझ्या मुक्तीचा मार्ग सापडला"
"पण काय झाल होतं तुमच्या बाबतीत ?" दिपकने उस्तुकतेपोटी आणि काळजीने विचारले
मग ती बाई म्हणाली " काही महिन्यांपूर्वी ज्या ठिकाणी तुमची गाडी बंद पडली होती.., त्या ठिकाणीच माझा अपघात झाला होता. जखमी झाल्यामुळे मी मदतीसाठी खूप आराडाओरडा केला पण कुणीच माझी मदत केली नाही...एकतर मी जखमी झाले होते आणि कुणी मदतीसाठीही आले न्हवते त्यामुळे माझ्यावर मृत्यू ओढवला..,पण त्यानंतर माझ्या कुटुंबालाही या अपघाताची नीटशी माहिती कळली नाही.. त्यामुळे ते माझ्या प्रेतालाचा शोध घेऊ शकले नाहीत आणि अंत्यसंस्काराविनाच माझा मृतदेह सडून गेला पण अजूनही मला मुक्ती मिळाली नाहीये..तुम्ही जर माझे प्रेत शोधून त्यावर अंत्यसंस्कार केले तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल आणि हेच सांगण्यासाठी या मुलीचा पाठलाग करत मी इथवर येउन पोहोचले"
तिचे बोलणे ऐकून दोघानाही वाईट वाटले..त्यानंतर दोघांनीही तिला तिचे विधिवत अंत्यसंस्कार करण्याचे वचन देऊन मधुचा पाठलाग सोडण्यास सांगितले आणि त्या बाईनेही त्यांचे म्हणणे ऐकून तिथून निघून गेली.

त्यानंतर दिपकही मधूचे आईवडील घरी पुन्हा येयीपर्यंत तिथे थांबला.. मग तिचे आईबाबा आल्यानंतर घडलेली सगळी घटना दोघांनीही सविस्तर तिच्या आईवडिलांना सांगितली.. ते ऐकून मधूचे आई-बाबाही खूप घाबरले.. मग काही दिवसांनी दीपक, मधु आणि तिचे बाबा पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी गेले व शोध घेतला असता.. त्यांना खरोखरच तिथे एका बाईच्या शरीराचा सांगाडा मिळाला.. मग त्यांनी त्या बाईच्या आत्म्याने ज्याप्रमाणे मधु आणि दीपकला सांगितले होते त्याप्रमाणे तिच्या कुटुंबाचा शोध घेऊन त्यांच्याकडे तो सांगाडा सुपूर्द करून त्याचे विधिवत अंत्यसंस्कार करण्यास सांगितले .
त्यानंतर कधीच ती बाई मधूला पुन्हा दिसली नाही...