🔹हायवे - भाग एक🔹
हायवे..आजकालच्या वेगवान व धावपळीच्या काळासाठी एक अत्यावश्यक असणारा घटक.. अनेक वेगवेगळ्या शहरांना , राज्यांना एकमेकांसोबत जोडण्यासाठी, दळणवळण आणी व्यापार वाढवण्यासाठी दिवसेंदिवस हायवेज सुद्धा वाढत चाललेले आहेत.. हायवेवरची गावे- शहरे झोपी गेले तरी हायवे मात्र रात्रभर जागेच असतात.. दिवसरात्र हजारो वाहने सुसाट वेगाने धावतच असतात..पण अशा हायवेवरून जात असताना वेगासोबतच ड्रायव्हरचे आपल्या वाहनावर नियंत्रण असणे पण तितकेच आवश्यक असते..एकदा ते निसटले की मग छोटीशी चूकपण अपघाताला निमंत्रण देत असते..आपल्या देशातील हायवेंवर दरवर्षी अनेक अपघात होत असतात..काही अपघातानंतर तर काळे डांबरी हायवे माणसांच्या रक्ताने लाल भडक होतात.. हायवेच्या अशा प्रत्येक किलोमीटरवर कधीना कधी रक्त सांडलेले असतेच..अशा मोठ्या अपघातांमध्ये सापडलेल्या व्यक्ती एकतर जखमी होतात नाहीतर म्रुत्युमूखी पडतात..पण अशा घटनांमध्ये म्रुत्यु प्राप्त झालेल्या माणसांचे पुढे काय होत असेल??😨ही कहाणी अशाच एका हायवेवरील अपघाती घटनेची आहे..
रात्रीची वेळ होती..सुमारे साडेअकरा वाजलेले असतील..एक नवीन पॉश कार हायवेवरुन अंधार कापत धावत होती..त्या कारमध्ये एका कुठल्यातरी पिकनिक स्पॉटवरून मौजमजा करून परतणारे चार कॉलेज स्टुडंट बसलेले होते..
“अरे काय बैलगाडी चालवतोस का यार..एवढा मोकळा हायवे आहे तरीपण एवढी स्लो... ए स्नेहा’, तु तरी समजवून सांग रॉकीला” सुशांत हसत हसत म्हणाला.
“बघ ना..या स्पीडने गेलो तर मुंबईला पोहोचायला सकाळच होईल आपल्याला.” स्नेहानेपण नाराजी दर्शवली.
“ओ कमॉन..गाडीचे स्पीड नव्वदच्या पुढे आहे..पण तुम्हां दोघांना आमच्यापेक्षा जास्त चढली आहे म्हणुन कारचा स्पीड कमी वाटतोय..तरी सांगत होतो एवढी घेऊ नका म्हणुन..हो की नाही सोनी?.” रॉकीने त्याच्या शेजारी बसलेल्या सोनीला विचारले. सोनीने इशार्यानेच सहमती दर्शवली.🚘
राकेश सक्सेना उर्फ रॉकी हा मुंबईतील एका मोठ्या बिजनेसमँनचा मुलगा असतो..एका विकेंडचे निमित्त साधून तो त्याच्या कॉलेजच्या इतर तीन फ्रेंड्ससोबत एका थंड हवेच्या ठिकाणी दोन दिवसांच्या पिकनिकला गेलेला असतो..पिकनिक स्पॉटवरून परत निघताना अपेक्षेप्रमाणे उशीर झालेला असला तरी सकाळच्या आधीच आपण मुंबईला पोहोचू याची त्याला खात्री असल्याने तो निश्चिंत होता..
रात्रीची वेळ असली तरी गाडीमध्ये त्या चौघांचाही मोठा आरडाओरडा, गोंधळ, हास्यविनोद चालू होता..रॉकीने आधीच मोठा असलेला कारमधील म्युझिक सिस्टीम चा आवाज आणखी मोठा केला.. आणी कारचे स्पीडपण आणखी वाढवले..कार सुसाट वेगाने धावू लागली..रॉकी आता वेगळ्याच धुंदीत होता..अचानक हायवेवरच्या एका वळणावर त्याला कारच्या हेडलाईटच्या प्रकाशात एकदम समोर एक सायकलस्वार दिसला.. पण त्याची कार आता त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर होती, त्याने कचकन ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला पण त्या समोरील सायकलला त्यांच्या कारची जोराची धडक बसलीच..एका क्षणात सायकल आणी त्यावर बसलेला तो पांढर्या कपड्यातला व्यक्ती रस्त्याच्या कडेला भिरकावले गेले..🚲
रॉकीने पण लगेच कार कडेला ऊभी केली आणी तो, सुशांत, स्नेहा आणी सोनी हे चौघेजण बाहेर येऊन काय झाले ते पाहु लागले.. साधारणपणे साठ वर्षाच्या आसपास वयाचे एक म्हातारे बाबा हे त्यांच्या सायकलसहीत रस्त्याच्या कडेला पडलेले होते..अंधारात त्यांच्या पांढर्याशुभ्र कपड्यांवर रक्ताचे अस्पष्ट लाल डाग दिसत होते.. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे सर्वांच्या चेहर्यावरील रंग आता उडाला होता..
“माय गॉड..हे काय केलेस तु रॉकी? टर्निंग वर तरी गाडी स्लो घ्यायला हवी होती ना.” सुशांत रॉकीकडे पाहून म्हणाला.
त्याचे बोलणे ऐकून रॉकीचे डोके सटकले..
सूशांतला एक शिवी हासडून त्याने त्याची कॉलर पकडली.
“साल्यांनो, तुम्हीच मला गाडी फास्ट चालवायला सांगितली.. निघाल्यापासून गोंधळ घालून माझे लक्ष विचलीत केले, आणी आता मला शिकवता का? परत त्यामध्ये हा गावठी म्हातारा एवढ्या रात्री कुठे मरायला चालला होता काय माहित?..पण तुम्हाला काय फरक पडणार आहे म्हणा.. गाडीचे स्टेअरिंग तर माझ्या हातात होते, फसणार तर मी एकटाच.”😡
स्नेहा आणी सोनीने मध्ये पडुन दोघांचे भांडण सोडवले.
“हे बघा, जे झाले ते झाले..आता फक्त यातुन बाहेर कसे पडायचे हे बघा..भांडण करून काही उपयोग नाही”
स्नेहाने समजुत घातली..सगळ्यांना तिचे बोलणे पटले.
“अं...आंंह..आं..” तेवढ्यात रस्त्याच्या खाली पडलेल्या म्हातार्याचा कण्हन्याचा आवाज आला आणी थोडी हालचाल जाणवली.
“अरे..हा म्हातारा तर जिवंत दिसतोय, धडकेमुळे बेशुध्द पडला आहे वाटत.. ह्याला आपल्या गाडीत टाकून घेऊन जाऊ, वाटेवरच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये अँडमीट करू” सोनीने तिचे मत सांगितले.
तेवढ्यात हायवेवरून मागुन एक गाडी वेगाने हेडलाईट चमकवत आली आणी रस्त्याच्या कडेला ऊभे असणाऱ्या या चौंघाकडे लक्षही न देता तशीच पुढे निघून गेली. 🚚
“वेडी आहेस का? आपण सगळ्यांनीच ड्रिंक घेतलेली आहे.. हा म्हतारा मेला तर आपल्यावर कायमची पोलीस केस पडेल.. म्हातार्याच्या नातेवाईंकांचा ससेमिरा आपल्या मागे लागेल..हे सगळे लफडे निस्तरताना नाकी नऊ येतील आपल्या घरच्यांच्या.. त्यापेक्षा ह्याला आहे येथेच सोडून निघून जाऊ.. या स्पॉटवर म्हातार्याला ठोकताना तर आपल्याला कोणीही पाहिलेले नाही..येथे चालू हायवेवर रात्री कोणती गाडीपण थांबणार नाही.. हा म्हातारा येथे पडलेला लोकांना सकाळीच समजेल, तोपर्यंत आपण मुंबईत पोहोचू..सकाळपर्यंत हा जिवंत राहिलाच तर सकाळी कोणीतरी ह्याला उचलून हॉस्पिटलमध्ये अँडमीट करेलच.. पण आपल्या मागे काही कटकट राहणार नाही”
रॉकीचे हे स्पष्टमत तिघांनाही आवडले. आणी सर्वजण घाईघाईने गाडीमध्ये बसून काहीही झाले नाही अशा अविर्भावात पुढच्या प्रवासाला लागले...पुढील प्रवासात थोडावेळ कोणीच एकमेकांसोबत बोलत नव्हते..झालेल्या प्रकरणामुळे सगळ्यांचा मुडहाफ झालेला असावा. 😒
“डोंट वरी गाईज..तो म्हतारा गाडीच्या धडकेमुळे लगेचच बेशुद्ध झाल्याने त्याने आपल्याला पाहिलेले नाही..त्यामुळे जरी तो वाचला तरी आपले व माझ्या कारचे वर्णन कोणाला सांगू शकणार नाही.. आणी समजा जरी त्याने सांगितले आणी आपल्यावर कंप्लेट झाली तरी या ‘हिट अँण्ड रन’ च्या केसमधून माझा बाप मला सहिसलामत बाहेर काढेल..तुम्ही काहीही काळजी करू नका”
रॉकीने गाडी चालवताना बाकी तिघांनाही आश्वस्त केले आणी म्युझिक चा आवाज पुन्हा वाढवला.
रॉकीचा अंदाज बरोबर होता..ते चौघेही सकाळच्या आत मुंबईला पोहोचले. पुढे काही दिवस त्यांना अधूनमधून या घटनेची आठवण येत होती..पण हळूहळू या प्रसंगाची आठवण विरळ होत गेली.
तो म्हातारा पुढे जगला का मेला हे पण नंतर कोणाला समजले नाही आणी त्यांना ते जाणुन घेण्याची कधी गरजही भासली नाही..👳
########################
अपघातच्या या भयानक घटनेला आता सात वर्षे उलटून गेली होती. दरम्यान रॉकी त्याच्या दैंनदिन जीवनात बिजी झाल्याने त्याच्या स्मृतीतुन ही घटना पुर्णपणे पुसून गेली होती. रॉकीने चार वर्षापुर्वीच त्याचे उच्चशिक्षण संपवून वडिलांच्या बिजनेसमध्ये लक्ष घालायला सुरूवात केली होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यालाही एक यशस्वी बिजनेसमँन बनायचे होते आणी त्यादृष्टीने तो कसून प्रयत्न करत होता. बिझनेसवाढीसाठी रात्रंदिवस मेहनत करत होता..अनेकवेळा क्लाईन्ट मिटींगसाठी व बिजनेसच्या इतर कामांसाठी त्याला सतत मुंबईबाहेर दूसर्या शहरामध्ये पण जायला लागायचे..आजपण तो दुसर्या शहरातील एक महत्वाचे काम उरकून रात्री त्याच्या कारमध्ये बसून एकटाच मुंबईकडे निघाला होता.🚗
ती एक पावसाळी मौसमातील अमावस्याची रात्र होती.. हायवेवर पुर्ण अंधार पसरला होता, अधेमधे पाऊस पडत असल्याने हायवे भिजून ओलाचिंब झाला होता..मधूनच एखादे वाहन पास झाले कि तेवढ्यापुरता प्रकाश पडायचा आणी नंतर परत अंधार पसरायचा..
रात्रीचे अकरा वाजले असतील, रॉकीने काहीवेळापुर्वीच हायवेवरच्या एका हॉटेलमध्ये जेवण केले होते त्यामुळे गाडी चालवताना आता त्याला थोडीशी पेंग आल्यासारखे जाणवत होते.
झोप लागु नये म्हणुन त्याने म्युजिकचा आवाज वाढवला..एसी बंद करून कारची खिडकीची काच खाली घेतली आणी एका हाताने सिगारेट पेटवून झुरके घेत गाडी चालवू लागला..
पावसाची भुरभुर चालूच होती..टॉप गिअरवर असणार्या कारचा स्पीड तो आणखी वाढवणार एवढ्यात त्याला हेडलाईटच्या प्रकाशात दूरुनच रस्त्याच्या मधोमद कोणीतरी एक व्यक्ती ऊभी असलेली दिसली..त्याला आश्चर्य वाटले आणी हळूहळू ब्रेक दाबत त्याने कारचा स्पीड कमी करत समोर निरखून पाहु लागला..
अंदाजे साठ पासष्ट वयाचा एक उंचपुरा खेडुत होता तो.. अंगावर सफेद कपडे, डोक्यावर पिवळा फेटा आणी हातात सायकल धरुन रस्त्याच्या मधोमध ऊभा राहुन तो एकटक नजरेने रॉकीकडेच पाहत होता..🗿
त्याला असे समोर पाहताच रॉकीला काहितरी आठवले आणी त्याचे पुर्ण अंग भितीने शहारले..सहा सात वर्षापूर्वी आपण याच ठिकाणी अशाच एका वयोवृद्ध माणसाला गाडीने उडवले होते हे त्याला आठवले.
त्याने जोरात हॉर्न वाजवला तरी तो म्हातारा त्याच्या जागेवरून किंचीतही हालला नाही...रात्रीची वेळ आणी वरून पडणाऱ्या पावसामध्ये पुर्णपणे भिजलेला तो म्हातारा पाहुन त्याची भितीने गाळण उडाली होती आणी त्याला आता लवकरात लवकर त्या जागेपासून दूर जायचे होते.. त्याने एक्सेलेटरवर पाय दाबून स्पीड वाढवला आणी रस्त्याच्या मधोमध हातात सायकल धरून ऊभ्या असणाऱ्या त्या व्यक्तीला एका साईडने कट मारून कार जोरात पुढे दामटली.
रॉकीने साईड मिररमधून मागे पाहिले असता त्याला रस्त्याच्या मधोमध ना कोणती सायकल दिसली ना कोणी म्हातारा व्यक्ती.
“बापरे..काय भयानक भास झाला मला”
रॉकी स्वताशीच पुटपुटला. संपत आलेल्या सिगारेटचा एक शेवटचा झूरका मारून त्याने सिगारेट खिडकीबाहेर फेकून दिली.. पण आता त्याच्या कपाळावर घाम जमा झाला होता. 😰
#क्रमश..