अघोर भाग ३
“ साहेब ! हे बघा त्या वाड्याला कोणी वाली नाही. त्या वाड्यातून कोण कोण निघून गेल हे कुणालाच ठावूक नाही. तुम्ही एक बर केल ते तिकड त्या वाड्याकडे जायच्या आधी आमच्याकड आलात...” आपल्या घरात ओट्यावर सरपंच तंबाखू चोळत बसले होते त्यांच्यासमोरच्या ओट्यावरच एक जोडप बसल होत दिसायला नवरा बायको दिसत होते ते तरुणच होते. चहाचा घोट घेत ते अगदी लक्षपूर्वक सरपंचाची गोष्ट ऐकत होते. “ त्या वाड्याच्या संबंधित साहेब म्हटल तर एकाच माणसाला माहिती आहे पण त्याने जो तिथून पाय काढला तो पुन्हा काय या गावात परत आला नाही..सखाराम जोशी नाव त्याच तो पण इथ नाही...”
“ आम्हाला तुम्ही त्यांचा पत्ता मिळवून दिलात तर बरे होईल आम्ही रस्त्याने जात असताना तो वाडा आम्हाला नजरेस पडला आणि बंद दिसला त्याची बांधणी देखील अजून मोडली नाहीये. मला आणि माझ्या मिसेस न तो एवढा आवडला कि तो आम्हाला विकत घेऊ वाटला. पण तुम्ही तर म्हणताय कि त्याचा मालक कोणीच नाही इथे.” समोर बसलेल्या त्या माणसाने हातातला चहाचा कप खाली ठेवत सरपंचाना जे काही पाहिले ते सांगितले...
“ हे बघा साहेब..” तोंडातली तंबाखू थुंकत सरपंच बोलायला लागले... “ तोंडात तंबाखू बसेल एवढ गाव आहे आमच...वीस वर्षे झाले तो वाडा तिथ तसाच पडून आहे. वीस वर्षात साहेब कितीतरी लोक आले असते ते सोडाच दुसऱ्या लोकांच , आमचच बघा कि आम्ही पण कब्जा केला असताच कि एवढे वर्ष बंद पडलेला बघून त्याच्यावर काही न काही कारण असेलच कि भल्यासाठी सांगतोय तुम्हाला आलात त्या रस्त्यान पुढ जा नका लागू त्या वाड्याच्या नादीला विनंती समजा निघून जा...” सरपंच बोलत होतेच कि तोवर त्यांच्या घराच्या दारातून एक लहान मुलगी “ पपा ? पपा ?” करत धावत आतमध्ये आली कदाचित गाडीमध्येच झोपली होती ती जाग आल्यावर उठून आतमध्ये आली होती. सरपंचांने त्या मुलीला येताना पाहिले तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले...मनातल्या मनातच ते उद्गारले...
(अस आहे तर...तो स्वतःच नजरेला पडला यांच्या....यांना इथून लवकर घालवावं लागेल..)
“ साहेब निघायला पाहिजे तुम्ही त्या वाड्याचा विचार सोडून द्या.... आणि या गावचा अंधार काय चांगला नाही..या तुम्ही आता”
“ चला हो...! हे लोक काय आपल्याला सांगणार नाहीत आपणच करू काही ते..” त्या माणसाची पत्नी म्हणाली आणि मुलीला उचलून ते दोघे तिथून चालते झाले सरपंचाने त्यांच्या म्हणण्यावर आपले दोन्ही हात वरती केले... “ज्याच करायला जाव भल तो म्हणतो माझच खर...असो..भोगा...” तोवर सरपंचाच्या मागून त्यांचा नौकर जखोबा आला म्हातारा गुडघ्या पर्यंत धोतर आणि अंगात बंदी घालून पाठीतून वाकलेला निर्मळ चेहर्याचा दिसत होता तो जवळ येऊन सरपंचाजवळ म्हणाला ... “ मालक...?”
“ काय जखोबा ?” सरपंच म्हणाले
“ हे लोक काही ऐकायचे नाहीत अन तिकडे जायला बिगर काय राहणार नाहीत अन मालक...”
“ हम्मsss?”
“ आज अमावस्या आहे मालक. घात होईल काळी रात्र आली...सावज भक्ष्य बनून सवताच त्याच्या तोंडात चालल्यासारख दिसतय...बघा... बघा मालक ते काळ मेघ साक्षी ठरनार हाय...”
“ जखोबा...जा आपापल्या कामाला..इतकी वर्ष काही घात झाला नाहीये एकदाचा संपलाय तो परत नाही येणार...”
“ अं माफी मालक बारक्या तोंडी मोठा घास घेतला...”
जखोबा म्हणत होता त्यात अगदी तथ्य होत. काळे मेघ सावजावर झपट घालायला आलेल्या जाळ्या प्रमाणे संपूर्ण अवकाशात पसरले होते. “ परमेश्वरा...काळ आलाय. तूच वाली रे...तूच वाली आता...”
***
ते जोडपे बाहेर पडले व गाडी घेऊन आपापल्या वाटेने निघाले...गावातून थोडे दूर गेले होते न होते तोच रस्त्याच्या बाजूला उभा एका माणसाने त्यांना गाडीला हात दाखवला...अगदी हडकुळा तोंडात बिडी आणि एका डोळ्याने कान्या होता तो एक हात मागे आणि एक हातातली बिडी फुंकत होता तो. “ काय रे ? कोण आहेस तू ?”
तसा तो माणूस गाडीच्या खिडकीजवळ आला एक नजर त्याने त्यांच्या मुलीवर टाकली.... “हीहीही...साहेब मी अस ऐकल आहे कि तो वाडा बघायला आला होतात तुम्ही ? खर हाय का ?” त्याच्या तोंडातून बिडीचा वास येत होता. “ होय बरोबर ऐकलस पण तू कोण ? आणि तुला त्याच्याशी काय ?”
तो नाथ्या होता गावातला फुकट्या गावातले सगळे त्याला लाथाळून द्यायचे अगदी कुप्रसिद्ध होता तो त्या गावात कधी काळी म्हणे त्याने त्याच हि मीठ खाल्ल होत म्हणून त्याचा अख्खा गाव तिरस्कार करायचा आणि आज हि त्याच्या रक्तातून त्याच मीठ उतरले नव्हते असो...
“ तुम्हाला पाहिजे तर मी तुम्हाला ती जागा दाखवतो कि...अन नंतरच्याला तुम्हाला जर आवडली तर कागद पत्र पण गोळा करून देतो कि...”
“चला येताय का ?”
“चल चल गाडीत बस...ये ये...” तो माणूस नाथ्याला म्हणाला तोच त्याची पत्नी त्या नाथ्याचा तसा अवतार बघून जरा सावध झाली कारण तो सतत त्यांच्या मुलीलाच एकटक पाहत होता.
“ अहो काय चल चल.. मला काही ठीक वाटत नाहीये. हा कोण कुठला ओळखीचा नाही आणि तुम्ही त्याला गाडीत बसवून घेत आहात.मला बाई हे बरोबर वाटत नाहीये..”
“ अग तूच तर म्हणालीस न कि आपण दुसरा मार्ग शोधू...”
“ अहो पण तरीहि....मला काही ठीक वाटत नाहीये तो बघा आपल्या सोनूला कसा पाहत होता...” तसा नाथ्या गाडीच्या मागच्या दरवाज्यावर थाप मारु लागला
“उघडा साहेब मला आत बसू द्या..” गाडीच्या काचातून तो त्यांच्या मुलीलाच पाहू लागला... “ अहो दरवाजा उघडू नका माझ ऐका मला काही ठीक वाटत नाहीये.चला लवकर तुम्ही...दरवाजा उघडू नका त्याला चला लवकर...”
“ अग पण” तो पुढे काही बोलनार कि तोच कडकडून एक भयंकर वीज कडाडली त्या आवाजाने त्यांची ती मुलगी ओरडली आणि आपल्या आईला बिलगली...असे म्हणत असताना तिने मागे वळून पाहिले तेव्हा तिला नाथ्या आता काचावर जोरात थापा मारताना दिसू लागला.. आता मात्र तिच्या नवऱ्याला देखील शंका वाटू लागली त्याने इग्निशन चालू केलेच कि त्याची पत्नी ओरडली..
“अहो पळवा तो काचावर दगड घालणारे...निघा लवकर आपली पोर आहे सोबत निघा...” नाथ्याने मागून अवसान नसताना कसे बसे दगड खराच उचलला होता कदाचित जागीच त्याची मती फिरली होती कि कोणी फिरवली होती देव जाणो त्या माणसाने आपल्या बायकोचे ऐकले व गाडी वेगात काढली...इकडे मागे नाथ्या हातात दगड घेऊन पावसात उभा ओरडत होता...
“ साहेबsss ....वाडा दाखवतो साहेबssss... माझा मालक.... तुमची वाट बघतोय...वाट बघतोय तुमची...ईहीहीहीही....”
विजा कडाडत होत्या आसमंत दुमदुमून निघत होता.
***
घरातले लाईट्स आले होते संध्या बेशुद्ध अवस्थेत फ्लोरवरती पडली होती विश्वास धावतच खाली आला त्याच्या सोबत अनु आणि बकुळा देखील होती.
“ संध्या ? ए संध्या ? काय झाल तुला ? बकुळा लवकर पाणी घेऊन ये लवकर...संध्या ? उठ संध्या ?” विश्वास संध्याच्या गालावर थापत तिला उठवू लागला पण ती काही शुद्धीत येत नव्हती. बकुळा तेव्हा पाणी घेऊन आली विश्वासने पाणी घेऊन तिच्या चेहऱ्यावर शिंपडले तशी ती जागी झाली... “ संध्या ए संध्या उठ बर..” अनु देखील आपल्या आईला काय झाले म्हणून “ ममा ममा” करत तिच्या जवळ येऊन बसली होती. “आईsss......आई कुठेयस ?” संध्या आपल्या आईस हाका मारतच उठली... “ संध्या तू इथे कशी पडलीस ?”
“मी... म मी...मी आईला पाहिलं इथे...हो इथेच उभी होती ती मी तिची फ्रेम उचलत होते तेव्हा तिथे मला ती उभा आणि...” संध्याला शब्द फुटत नव्हते तिला बोलायला काहीच सुचत नव्हते बोलता बोलता तिने आपले बोट त्या खिडकीच्या दिशेने नेले “ तिथे एक तिथे एक माणूस उभा होता त्या...त्या खिडकीमध्ये...”
“ what ?? कुठे ?” विश्वास चकित झाला आणि जागेवरचा उठला... “ कुठे ?”
“ त्या तिथे ? समोरच खिडकी मध्ये... हो तिथेच...” विश्वासने जाऊन खिडकी उघडली आणि खिडकीमधून डोकावून बाहेर पाहू लागला बाहेर सुसाट वारा सुटला होता पावसाच्या सरी तोंडावर झापड मारल्यासारख्या लागत होत्या. खिडकीतून बाहेर पाहताना विश्वासच्या मनात विचार आला... “ संध्याची तब्ब्येत ठीक नाहीये हळू हळू तिचा तिच्या मनावरील ताबा सुटत चालला आहे, हि कसली मानसिक विकृती... नाही नाही असे कसे संध्याला मी ओळखतो नाही नाही असे काही नसेल...” विचार करतच विश्वासने खिडकी बंद केली आणि जशी विश्वासने खिडकी बंद केली त्याच क्षणी दारावरती एक थाप पडली....
“ ठप ठप ठप....”
“ एवढ्या रात्री ? अश्या पावसात कोण असू शकत ? संध्या तू अन अनु बकुळा सोबत किचनमध्ये जा निघा..लवकर...”
तसे संध्याने अनु आणि बकुळा दोघी सोबत किचन गाठले आणि तिघीहि किचनमध्येच दडून बसल्या...विश्वासने अगदी सावधरित्या जाऊन दरवाजाचा खटका फिरवला आणि दरवाजा उघडला...दरवाजा उघडल्याबरोबर वाऱ्याचा झोत झपाझप आत शिरला...बाहेर अंधार होता परंतु आतमधील किंचित प्रकाश बाहेरच थोडस अंगण उजळू शकत होत विश्वासने दरवाजा उघडून पाहिलं कधी एवढे लक्ष देऊन अंगण पाहिले नव्हते जेवढे विश्वास आता पाहत होता. अपेक्षे प्रमाणे दारावर थाप पडता समोर कोणीतरी असायला हव होत परंतु अंगण रिकामे होते. विश्वास आपले दोन पावले मागे सरकवत चौकटीतून आतमध्ये जाऊ लागला तोच अंधारातून त्याच्या बाजूने एक आवाज त्याच्या कानी पडला जो त्याच नाव घेत होता...
“ हेलो विश्वास...”
विश्वासने बाजूच्या अंधारात पाहिले तेव्हा अंधारातून एक मध्यमबांध्याचा व्यक्ती बाहेर त्या अंधुक प्रकाशात आला चेहरा आणि केस पावसाच्या पाण्याने भिजून चिंब झाले होते...
त्याला पाहून विश्वासने आपल्या नाकावरचा चौकट फ्रेम असलेला चष्मा बाजूला काढला आणि काही क्षण त्या व्यक्तीकडे पाहतच राहिला...आणि पाहता पाहता त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य उमटले...
“तू...!?”
क्रमश :
MARATHI HORROR STORY ALL PARTS ,BHAYKATHA AGHORI,