विवाहित नवरा बायकोची प्रेम कथा.
तिचे लग्न तिच्या मर्जी विरुद्ध अशा मुला बरोबर करून देतात जो एकदम साधा सरळ स्वभावाचा आहे ज्याला त्याच्या आई शिवाय कोणी ही नाही.त्याला भरपूर हुंडा दिला गेलाय ज्यात जीवनोपयोगी वस्तु तसेच मोठी रक्कम पन आहे.
ती मुलगी दुसऱ्या मुलावर आतिशय प्रेम करीत होती तसेच तो मुलगा ही. मुलगी लग्न होऊन आपल्या सासरी आली, मधुचन्द्रा च्या वेळी मुलगा दूध घेऊन आला, त्या वेळी ति मुलगी आपल्या नव-याला एक प्रश्न विचारत की "बायकोच्या मर्जी शिवाय जर नवरा तिला हाथ लावतो त्याला बलात्कार म्हणतात का अधिकार"?
नवरा - "तुम्हाला इतके लांब आणि खोलवर जायची काही गरज नाही,
फक्त दूध घेऊन आलो आहे,पिऊन घ्या मि फक्त गुड़ नाइट बोलायला आलो होतो" बोलून बाहेर निघुन जातो.
मुलगी मन मारून गप्प होते कारण तिला वाटत होते की दोघां मध्ये भांडण व्हायला पाहिजे तेव्हाच या खुळ्या बरोबरचा संबंद तुटेल.
ती आहे तर नवी नवरी पन घरचे कोणतेही काम करत नव्हती,फक्त दिवसभर ऑन लाइन रहायची आणि माहित नाही कुणा कुणा बरोबर चैट करत रहायची,
पन तिकडे तिची सासु दिवस भर वीना तक्रार जेवन बनवन्या पासून घरचे सारे काम करत असे
पन सदा चेहऱ्यावर हास्य घेऊन फिरत असे.
मुलगा एका छोट्या कंपनी मध्ये छोटा सा कर्मचारी होता आतिशय प्रमाणिक आणि मेहनती.
जवळ पास महीना होत आला होता पन नवरा बायको एकत्र नाही झोपले,तसा मुलगा फार शांत स्वभावाचा होता.
त्यामुळे तो जास्त बोलत नसे फक्त जेवताना आपल्या बायकोला विचारत असे की कुठे जेवनार...तुमच्या रूम मध्ये की आमच्या बरोबर....
त्याला रोज डायरी लिहायची सवय होती. जी तो रोज रात्रि लिहित असे, तसे मूली कड़े एक स्कूटी होती तिच्या वर रोज बाहेर जात असे.
नवरा ऑफिस ला गेल्या बरोबर आणि नवरा घरी आल्या वर परत येत असे.
सुट्टी चा दिवस होता मुलगा घरीच होता.
तेव्हा मुलीने चांगल्या जेवनाला ही नाव ठेवून सासुला अपशब्द बोलून जेवन फेकून दिले.
परन्तु सदा शांत राहनारा तिचा नवरा आपल्या बायकोवर हाथ उचलतो,पन त्याची आई त्याला फार ओरडते,
इथे त्या मुलीला एक कारणच पाहिजे असते भांडायला जे तिला मिळाले,ती आपले पाय आपटत स्कूटी घेऊन निघुन गेली.
ति मुलगी जे रोज बाहेर जात होती ते आपल्या प्रियकराला भेटायला जात असे,मुलगी भले जीव तोडून त्याच्या वर प्रेम करत होती पन तिला माहित होते की प्रत्येक मुलीची एक मर्यादा असते ज्याला इज्जत म्हणतात जी तिने वाचऊण ठेवली होती,
ति मुलगी आपल्या प्रियकरा जवळ जाउन बोलते की "आता मला एक क्षण भर ही त्या घरात नाही रहायचे,
आज त्या खुळयानी माझ्यावर हात उचलून चांगले नाही केले"
प्रियकर- "अरे मी तुला किती वेळ सांगितली की माझ्या बरोबर कुठे लांब पळून चल,पन एक तूच आहेस की आज उद्या, आज उद्या करत बसलीस"
मुलगी- "लग्नाच्या दिवशी मी तुज्या कड़े आले तर होते,
पन तूच मला परत पाठवलेस"
प्रियकर- "तूच सांग रिकाम्या हाताने कुठवर जाणार,मि तर बोललो होतो की काही पैसे आणि दागिने संगती घेउन ये, पन तू तर रीकाम्या हाताने आली होती,शेवटी दूर कुठे तरी नव्याने सुरुवात करण्या साठी पैसे तर लागतील ना"?
मुलगी- "आपले प्रेम प्रकरण माझ्या घरच्याना माहित झाल्या पासून माझ्या घरच्यानी बैंक पासबुक,एटीएम कार्ड,आणि माझे दागिने ही त्यांच्या ताब्यात घेतले आहेत तर मग मि कशे काय सोबत घेऊन येणार,
आपन दोघे मेहनत करून पन कमाऊ शकलो असतो ना"
प्रियकर- "हुशार मानुस पहिला विचार करतो मग काम करतो, रिकाम्या हाताने पळून गेलो असतो तर हे प्रेमाचे भूत दोन दिवसात उतरले असते समझले,
आनी जेव्हा पन मी तुला टच करायला जातो तेव्हा किती नखरे करतेस तू की हे सगळे लग्ना नंतर"
मुलगी- "हा लग्ना नंतरच ते सर्व योग्य आहे, आनी सगळ तुझेच तर आहे,मि आज ही वर्जिन आहे,लग्न झाले तरी त्या खुळया सोबत झोपले नाही,कारण मि तुलाच आपला नवरा मानले आहे,फक्त तुज्या नावाचे कुंकु लावायचे बाकी आहे,फक्त ते लाव मग सर्व तुझ्या मर्जी ने कर"
प्रियकर- "ठीक आहे मि तैयार आहे,पन या वेळी काही पैसे जरूर संगती घेऊन ये, हा विचार नको करु की मला पैशाचा मोह आहे, मि फक्त तुझ्यावर प्रेम करतो,फक्त लहान मोठा व्यवसाय सुरु करण्या साठी पैसे तर पाहिजेत ना"
मुलगी- "त्या खुळया जवळ कुठून आलेत पैसे,माझ्या वडलानी त्याला तीन लाख रुपये आनी वरुण मारुति कार दिली आहे,फक्त काहि दागिने आहेत ते घेऊन येते आज"
प्रियकर मुलीला एका होटेल चा पत्ता देऊन निघुन जातो,
मुलगी घरी येऊन परत भांडण करते,पन तिचे दुर्दैव ती एकटीच ओरडत राहते तिच्या बरोबर भांडनारे कोन्ही नव्हते.
रात्रि 8 वाजता तिच्या प्रियकराचा मैसेज येतो व्हाट्सएप वर की केव्हा येणार ?
मुलगी उत्तर देते की "संयम ठेव अजुन कोणी झोपले नाही मि 12 च्या आत पोहचेन. कारण इथे तुझ्या शिवाय मला श्वास ही घेता येत नाही.
प्रियकर- "ठीक आहे लवकर ये मि होटेल च्या बाहेर उभा राहीन बाय...
ती मुलगी आपल्या नव-याला सांगते की मला खायचे नाही, मी बाहेर खाल्ले आहे म्हणून मला त्रास देऊ नका इतके बोलून ती दरवाजा बंद करून आत निघुन जाते.
नवरा बोलतो की...त्या कपाटातुन माझी डायरी देऊन दरवाजा परत बंद करा मि तुम्हाला परत त्रास देणार नाही.
मुलगी दरवाजा न खोलता म्हणते "चावी दया कपाटाची"
नवरा- "तुमच्या बेडच्या पायाकडच्या साइडला गादीच्या खाली आहे"
पन बायको दरवाजा नाही खोलत शिवाय जोर जोरात गाने ऐकायला लागते,बाहेर तिचा नवरा काही वेळ दरवाजा वाजवून थकुन निघुन जातो.
परन्तु त्याची बायको दरवाजा नाही खोलत,उलट गाने मोठ्या आवाजात लावते.
मग ती कपाट उघडून बघते जे तिने प्रथमच उघडले होते,कारण ती तिचे सामान दुसऱ्या कपाटात ठेवत असे, कपाट उघडताच ती हैरान झाली कपाटात तिचे बैंक पासबुक,एटीएम कार्ड, होते जे तिच्या घरच्यानी तिच्या कडून घेतले होते,खोलून बघितले तर त्यात ते पैसे पन जमा होते जे हुंडयात तिच्या नव-याला मिळाले होते आणि पुष्कळ दागिने होते जे एका पेपर संगति होते ज्यांची हक्कदार ती मुलगी होती मुलगी फार हैरान आणि परेशान झाली,मग तिची नजर डायरी वर पडली,मग तिने पटकन ती डायरी काढली आणि वाचायला लागली.
त्यात लिहिले होते,
"तुमच्या वडिलांनी एक दिवस माझ्या आईचे प्राण वाचवले होते आपले रक्त देऊन,मि माझ्या आई वर खुप प्रेम करतो म्हणून मि तुमच्या वडिलांच्या पाया पडून बोललो की...तुम्हचे हे उपकार मि कधीच विसरणार नाही,काही दिवसांनी तुम्हचे वडील आमच्या घरी आले माझ्या आणि तुम्हच्या लग्नाची बोलनी करण्या साठी परन्तु त्यानी तुम्हची प्रत्येक गोष्ट आम्हाला सांगितली की तुम्हचे त्या मुला वर फार प्रेम आहे,तुमच्या वडीलाना तुमची खुशी हवी होती,
त्यामुळे त्यानी प्रथम त्या मुलाची माहिती काढली शेवटी तुम्ही तुमच्या वडिलांची राजकुमारी आहात,प्रत्येक वडिलांची इच्छा असते की त्यांच्या राजकुमारीला एक चांगला इमानदार, प्रेम करणारा राजकुमार मिळाला पाहिजे,
तुमच्या वडिलांनी शोधून माहिती काढली की त्या मुलाने पहिले पन फार मुलींना धोका दिला आहे,आनि त्याचे पहिले लग्न ही झाले आहे, पन ते तुम्हाला सांगू नाही शकले,कारण त्याना माहित होते की ही जी प्रेमाची नशा आहे ति हमेशा परक्याना आपले आणि जे आपले आहेत त्याना परके समझते,एका वडिलांच्या तोंडाने एका मुलीची गोष्ट ऐकून मि चकित झालो कोणताही वडील कदाचित आपल्या मुली साठी इतका विचार करणार नाही,मला विस्वास झाला की मला एक चांगला पती होण्याचा मान भेटो न भेटो परन्तु एक चांगला जावई होण्याचा मान सदा मिळेल,
मला हुंडयात मिळालेले सर्व पैसे मि तुमच्या अकाउन्ट वर जमा केले आहेत,तुमच्या घरुन मिळालेली गाड़ी आज ही तुमच्या घरी आहे,जी मि या साठी परत केली जेव्हा कधी तुम्हाला माझ्या वर प्रेम होइल तेव्हा संगती दूर कुठे तरी फिरायला जाऊ...हुंडा या शब्दाची मला फार चिढ़ आहे. तुम्ही स्वतंत्र आहात कुठे ही जाऊ शकता, डायरी च्या मध्ये घटस्फोटाचे पेपर आहेत ज्या वर मि पहिलीच साइन केली आहे,जेव्हा तुम्हाला वाटेल की या खुळया बरोबर नाही रहायचे तेव्हा साइन करून कुठे ही तुम्हच्या साऱ्या वस्तु घेऊन जाऊ शकता,
मुलगी हैरान आणि परेशान झाली होती इच्छा नसतानाही खुळयाच्या शब्दांनी हृदयाला स्पर्श केला होता. न पाहिलेले खुळयाचे प्रेम जाणून तिचे डोळे इच्छा नसतानाही ओलसर झाले होते,
पुढे लिहिले होते..
मि तुम्हाला या साठी मारले की तुम्ही आईला शिवि दिली होती,आणि जो मुलगा स्वता: समोर आपल्या आईचा अपमान झालेला पाहू शकतो तो मुलगा कसला,
उद्या तुम्हाला ही मुले होतील, भले कोणाची ही असोत, तेव्हा तुम्हाला आईचे मोठेपन आणि प्रेम कळेल,
तुम्हाला पत्नी म्हणून जीवन भर साथ देण्या साठी आणले होते तुमच्या वर जबरदस्ती करण्या साठी नाही,
"आपसे...आपकी हर गुस्ताखी का बदला हम शिद्दत से लेंगे...गर आप मेरी हुई तो बेपनाह मोहब्बत करके और किसी और की हुई तो आपके हक मे दुवाये माँग के"
मुलीचा फोन वाजत होता जो वायब्रेशन मोड़ वर होता,
मुलगी आता खरोखर नवरी बनली होती,डोळ्यातून अश्रु वाहत होते, हुंदके देत देत तिने प्रथम मोबाईल मधून सिम काढून तोडून टाकले मग सारे सामान जसे होते तसे ठेवून कधी झोपी गेली तिलाच कळले नाही,
सकाळी उशीरा उठली तो पर्यन्त खुळा ऑफिसला गेला होता,प्रथम आंघोळ करून साड़ी घातली,
भांगेत कुंकु लांब पर्यन्त भरले मग मंगलसूत्र घातले पहिले एक टिकली सारखे साइडला कुंकु लावत असे जेने करून कोणत्याही मुलाने ध्यान न द्यावे,परन्तु आज 10 किलोमीटर वरुण ही दिसावे असे लांब आणि गडद कुंकु भरले होते भांगेत नवरीने,
मग किचन मध्ये जाउन आपल्या सासुला जबरदस्ती ने बाहेर काढून रूम मध्ये नेऊन लवकर तैयार व्हायला सांगितले,आणी आपल्या खुळया नवऱ्यासाठी नाष्टा आणि चहा बनवून आपल्या स्कूटी वर सासुला जबरदस्ती बसवून(त्या बिचारीला काही माहितच नाही की तिची सुन तिला आज कुठे घेऊन चालली आहे बस गुपचिप बसते)मग रस्त्या मध्ये आपल्या सासुला
नव-याच्या ऑफिसचा एड्रेस विचारुन तिकडे पोचली
नवरा बायकोला या अवतारात बघून हैरान झाला
नवरा- "सर्व ठीक तर आहे ना आई"?
परंतु आईच्या बोलण्या आधी बायको त्याला मीठी मारून बोलते "आता सगळे ठीक आहे...I love you forever....
ऑफिस मधले सर्व लोक उभी राहतात
तेव्हा नवरी बोलते की..."मि यांची बायको आहे वनवासाला गेले होते सकाळी परतले आहे आता एक महिन्या पर्यन्त माझा नवरा ऑफिस मध्ये दिसणार नाही"
ऑफिस ची लोक - "का...!
नवरी- "कारण आम्ही लांब सुट्टी वर चाललो आहोत एकत्र"
नवरा- "वेडी..!
नवरी- "तुमचा साधे पना आणि भोळया स्वभावाने बनवले आहे"
सर्व लोक टाळ्या वाजवून अभिनंदन करु लागतात.
नवरी पुन्हा आपल्या खुळयाच्या मिठित शिरते.. जीतून तिला पुन्हा कधीच सुटावे उसे नाही वाटत.
कधीकधी आपल्या साठी आपले प्रियजन मोठे कठोर निर्णय घेतात, परंतु आम्हाला ते समजत नाही ... कधी कधी आपले लोक आपली जास्त चिंता करतात, पालकांच्या निर्णयाचा आदर करा कारण हे दोन लोक आहेत जे नेहमी जगापेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम करतात...