कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन- Marathi Bhutkatha
सुरेखा विश्वास राऊत, वयवर्षं २६, ती एका नामांकित हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. दिसण्यात चांगली, स्वभाव खोडकर तशी मनाने चांगली, मनात काही ठेवत नाही म्हणजे फाटक्या तोंडाची. म्हणे मला आत्मे दिसतात आता बोला जगात भूत आहेत का तुम्ही कधी बघितले आहेत. जाऊदे तो विषय.
...
मूळ मुद्यावर येतो एकदा म्हणजे कालची गोष्ट. घरी सुरेखा फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली असताना, एका मुलीचा आत्मा फिरत होता. तिला माहिती नव्हते की सुरेखाला ते सगळे दिसत असते.
ती तिच्यासमोर येऊन येडे वाकडे चाले कारत होती.
सुरेखाने बघून घेत, तीला फाड करून एक कानाखाली वाजून देत बोलते कधी पासून बघते आहे तुझे काय चाले चालू आहेत. चल निघ इकडून.
ती चेहऱ्यावर हात फिरवत बोलते तुला दिसते मी.
सुरेखा बोलते हो दिसते तु, आजुन गेली नाहीस.
जाते मी, बोलून त्यामुलीचा आत्मा निघून जातो.
ती जशी बाहेर येते.
तशी आई विचारते कोना बरोबर बोलत होतीस तु.
काही नाही ग एका मुलीचा आत्मा बाथरूममध्ये फिरत होता ग.
आई बोलते आता घरी पण यायला लागले का.
सुरेखा बोलते नवीनच होता ग. जाऊदे चल.
.......
रविवार होता म्हणून सुरेखाला इमर्जन्सी हॉस्पिटल मधून कॉल आला नव्हता म्हणून ती फ्री होती. सगळे आरामात जेवन करून टीव्ही बघत होते.
तेवड्यात एक बातमी न्युज चॅनेल वर झळकते.
"नुकताच हाती आलेल्या बातमी नुसार काल रात्री 12.30 वाजता एका मुलीचा अर्धवट बेशुद्ध अवस्थेत बाँडी वांगणी रोड वर सापडली आहे. तिचा फोटो जसा शो होतो.
तशी सुरेखा बोलते आई हीच ती मुलगी आपल्या बाथरूममध्ये फिरत होती.
आशु बोलते अग तु डॉक्टर आहेस ना,
अग गप्प बस जरा आणि धावत ती बाथरूममध्ये जाऊन बघते तिची आत्मा परत आली आहे की नाही. ती परत हॉलमध्ये येऊन बसते.
आई बोलते ती कशी येणार परत. तिला तु चांगली दिलीस वाजून ती परत येणार काय. चला ११.०० वाजले जा झोपायला दोघे.
सुरेखा बोलते कुठल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे काही सांगितले का ग.
आशु बोलते नाही सांगितले. चल झोपयला टीव्ही बंद कर.
सुरेखा टीव्ही बंद करून आपल्या बेडरूममध्ये जाऊन झोपते.
साधारण ३.०० च्या सुमारास कोणी तरी कानामध्ये बोलण्याचा भास सुरेखाला होतो. "अग ताई मला माहिती आहे तू मला ऐकू शकते, तशी बघू पण शकते. उद्या मला बघायला ये हॉस्पिटलमध्ये तुझ्याच येशील ना"
तशी सुरेखा झोपेतून जागी होत. लाईट चालू करून पाण्याचा ग्लास उचलून पाणी पीत, ड्रेस बदलून गाडीची चावी घेत. आईच्या रूममध्ये जाऊन आईला उठवत बोलते आई हिस्पिटलमधून कॉल आला मी येते. दरवाजा लावून घे ग. घराच्या बाहेर येत ती गाडी चालू करून सुरेखा हॉस्पिटलला निघून जाते.
......
आई दरवाजा बंद करत बोलते ह्यांच्यावर गेली आहे. काय माहिती हिच्या पदरी काय घालून गेले ते.
.....
आशु बोलते काय बडबडते आहेस, काही होणार नाही. तिचे दरवाजा बंद करून झोप चल.
.....
सुरेखा हॉस्पिटलमध्ये पोचताच. ती स्वाती नर्सला विचारते काल १२.३० ला कोणती मुलीची केस आली आहे का वांगणी रोड ची.
....
स्वाती बोलते हो मॅम वाँड न 12, रूमनंबर 2. स्वाती आजून काही बोलणार तेवड्यात सुरेखा निघून जाते.
......
सुरेखा लिफ्टमध्ये जाऊन १२ नंबरचे बटन दाबते.
लिफ्टमध्ये असलेल्या दामलेना बोलते. काका आता वेळ नाही आहे, नंतर भेटा.
तिथुन दामले अदृश्य होतात.
सुरेखा वाँड न 12, रूमनंबर 2 समोर उभी राहून, एक दीर्घ स्वास घेत ती दरवाजा उगडून आत जाते. तिच्याकडे बघत तीची केसफाईल घेऊन वाचत तिला चेक करते.
स्वातीला फोन लावूंन बोलते ऑपरेशनची तयारी कर आता. हिचे नातेवाईक कोण आहे का.
......
स्वाती बोलते पण मॅम ही केस डॉक्टर प्रताप बघतात आहे आणि पोलीस केस पण आहे. आँपरेशनचा खर्च पण.
सुरेखा बोलते जे बोलते ते कर बस बाकीचे मी बघते.
......
तू त्या इन्स्पेक्टर कोण आहे त्याला बोलावं. सांग मी बोलवले आहे आताच जा फोन लाऊन बोलावं. बाकीचे मी बघते.
......
किमान ८.०० तास ऑपरेशन चालू होते. ऑपेरेशन होऊन तिला ICCU मध्ये ठेवण्यात आले.
....
सकाळी ११.०० च्या सुमारास सुरेखानी पोलिस इन्स्पेक्टर रवी वानखेडे याना केबिनमध्ये येण्यास सांगितले.
......
तसे रवी केबिनचा दरवाजा नोक करून आत जातात.
.....
मी रवी वानखडे acp तुम्ही . मी डॉक्टर सुरेखा बोलते बसा रवी साहेब. नंतर बोलू आपण पाहिले सांगा काय घेणार तुम्ही चहा की कॉफी बोला.
.....
रवी बोलतो कॉफी.
.....
सुरेखा फोन करून सांगते. दोन कॉफी पाठव केबिनमध्ये.
रवी साहेब हिची हिस्टोरी सांगा कोण ही, कुठे भेटली.
.....
रवी बोलतो आजून काही सजले नाही आहे हीची डिटेल. शनिवारी १२.३० म्हणजे रविवार चालू झाला होता. चौकशी चालू आहे बघतो दुपारपर्यंत हिची डिटेल सांगतो.
आत्ता कशी आहे ती मुलगी. तिला मी बघू शकतो का.
.....
सुरेखा बोलते खूप मार बसला आहे. मला वाटते तिच्या अंगावर असलेल्या खुणा बघून आणि बॉडी बघून तिच्या बरोबर खूप मारपित केली आहे. तिचे प्रत्येक अवयव फ्रॅक्चर आहे.
डोक्यावर आणि मानेला जब्बर मार बसला आहे. बघूया पुढचे २४ तास.
जेवढ्या लवकर होईल तिच्या कुटुंबाना शोधा. मला तर असे वाटते ती कोमात गेली असावी.
ओके वॉर्ड नं १२ खोली नं २ मध्ये.
...
रवी बोलतो ठीक आहे आणि थँक्स फॉर कॉफी बोलून निघून जातो.
जसा रवी केबिनच्या बाहेर निघतो. त्याला सुरेखाचा बोलण्याचा आवाज येतो.
रवी दुर्लक्ष करून तो थेट वॉर्ड नं १२ खोली नं २ मध्ये जातो.
....
इथे सुरेखा बोलते बोला शिर्सेकर आजोबा काय झाले. असे का तोंड उतरून उभे आहे.
....
शिर्सेकर बोलतात डॉक्टर बाई वाचव तिला ती माझी नात आहे.
.....
सुरेखा बोलते काय बोलतात आहेत. कोणा बद्दल बोलतात आहेत. मला काही समजेल असे बोला. एक मिनिट इ. रवी परत येतात आहेत आपण नंतर बोलू.
....
रवी केबिन नाँक करून आत येत इथे तिथे बघत बोलतो. त्या मुलीची अवस्ता तर खूप नाजूक दिसते आहे.
ती शुद्धीत जेंव्हा येईल तेंव्हा मला लगेच कळवा तिची जबानी घ्यावी लागेल.
तिला या अवस्थेत कोणी नेले आहे. त्या माणसाला मी काळकोथडीत नेणार. मग तो कोण पण आसुदे. आजून एक मी माझा एक हवालदार बाहेर बसवतो तिच्या रूम बाहेर.
.....
सुरेखा बोलते ठीक आहे.
....
रवी उठून केबिन बाहेर येत तो रेसिपनिस्ट विचारतो. ही डॉक्टर कोणा बरोबर बोलत होती आत मध्ये तर कोणी नव्हते.
.....
रेसिपनिस्ट हसत बोलते इ. रवी साहेब त्याकडे नको लक्ष द्या. त्या खूप मोठ्या डॉक्टर आहेत.
प्राजक्ता आणि बाकीचे कसे आहेत. सध्या काय करते आहे.
......
रवी बोलतो ठीक आहे. त्यांना काय धाड बसली आहे. असे बोलून रवी निघत सावंतला बोलतात त्या मुलीच्या रूमबाहेर बसा फक हॉस्पिटल स्टाफ आत गेले पाहिजे,.
....
शिर्सेकर बोलतात वॉर्ड नं १२ खोली नं ३ मधली.
.....
सुरेखा बोलते म्हणून तुम्ही तिथे होतात का. ठीक आहे तुम्ही एकलच असेल सगळे ना.
आता तिच्या बद्दल बोला जरा एक मिनिट.
दामले नंतर बोलूया का आपण. जा आता तुम्ही मी बोलवले.
बोला शिर्सेकर तुम्ही.
.....
शिर्सेकर बोलतात ही गिरीजा वामन शिर्सेकर.
.....
कोकणातली गाव (माडबन), वयवर्षे 22. महर्षी कॉलेजमध्ये शिकते आहे.
राहायला बदलापूर (ईस्ट).
घरात एक बहिणी, आई आणि बाबा.
......
तिचे टाईम टेबल फिक्स ६.०० वाजता उठुन सगळे आवरून.
८.०० ते २.०० वाजे पर्यंत कॉलेज अटेंड करायचे.
३.०० ते १०.०० वाजेपर्यंत जॉब करायचा. रात्री १०.१५ वाजता घरी येऊन फ्रेश होऊन जेवण करून ११.०० वाजल्या नंतर कॉलेजचा अभ्यास करायचा.
तिला टीव्ही सीरिअल वगैरे बघायला कंटाळा येतो.
हां पण तिला भुताच्या गोष्टी वाचायला मजा येते. अशी आहे गिरीजा शिर्सेकर. दिसायला गोरीपाण, घारे डोळे, ओठा खाली बारीक तीळ, छोटेसे डोळे.
........
सकाळचे ५.३० वाजले की तिचे चालु ए आई अशी हाक मारत गिरीजा सकाळी उठत बोलते. लवकर नाष्टा तयार ठेव मला कॉलेजला जायला उशीर झाला आहे .
......
बस मग चालू सकाळी आई मुलीचे.
आई बोलते हो तयार आहे नाष्टा.
.......
तशी गिरीजा तयार होऊन येते. फटाफट नाष्टा करून कॉलेजला जाते.
सकाळचे ८.०० वाजले होते. आज कॉलेजला उशिरच झाला होता तिचा ग्रुप तिची वाट बघत असतो. हा आहे माझा कॉलेज ग्रुप.
काया, प्रेम, दिशा, मयूर आणि हा तिचा खोडकर ग्रुप.
........
कॉलेज अटेंड करून नंतर परस्पर आपल्या जॉबला म्हणजे कॉफी इन शॉपला जाते.
........
असे बघायला गेले तर घरची परिस्तिथी चांगली आहे. पण ही एक्सत्रा पॉकेटमनी साठी जॉब करते आणि हा आहे जॉबचा ग्रुप मोनिका, राघव, जोसेफ, माधव, शालिनी आणि अनिता.
पण मी तिथे म्हणजे, जॉबवर कोणाशी बोलत नाही आपले काम करा आणि निघा.
......
हे वामन आणि शोभा शिर्सेकर.
शोभा गृहिणी आणि बाबा एका कंपनी मध्ये मॅनेजर.
क्रमश