कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन
लेखक :- मंदार साखरकर
भाग :- १३
(मी गिरीजाची मैत्रीन.
ह्या कथेचे पुढचे भाग मी मंगळवार, शुक्रवार आणि रविवार प्रकाशित करणार आहे.)
सगळे निघून जातात तसे बाबा बोलतात हे काय केले त्यांना का सोडले तू.
.
लेखा बोलते ते माझ्या वशमध्येच आहे. त्यांच्यावर आजोबांनी दिलेली शक्ती वापरून त्यांना मी कंट्रोल करणार.
.
अग तिथे गेल्यावर त्या दोघीनाच काय तर खुशीला पण समजेल.
.
लेखा बोलते नाही समजणार कारण ते तिथे असणार सगळ्यांसमोर नॉर्मल. बघाच तुम्ही पुढे काय होते ते.
.
घरी येत सगळे गिरिजाला हाक मारत घराच्या बाहेर उभे असतात.
गिरिजा बाहेर येत बोलते तुम्ही सगळे बोलून बाहेर जाणार तेवढ्यात सुरेखा बोलते थांब तिथेच.
.
सुरेखाची आई बोलते येउदे आत सगळ्यांना आणि गिरिजा भेट सगळ्यांना.
.
सुरेखा बोलते या सगळे आत आणि भेट ग.
.
सगळे आत येत गिरीजला भेटून बोलतात व्हा मस्त दिसते आहे ग. पहिल्या पेक्षा कोकणचे पाणी लागले ग.
काया बोलते येतो आहे दोन दिवसा नंतर टेन्शन नको घेउ.
.
मुग्धा बाहेर येत बोलते हो ना काय ते बोलतेस त्याला फटका ना गिरिजा.
लेकेश कसा आहे तू गाडी हळू चालवतो ना. काय बघतो आहे तू , अरे हो मी विसरली ओळख करून द्यायला माझे नाव मुग्धा.
.
गिरिजा बोलते तुला कोणी मध्ये बोलायला सांगितले.
.
नाही ग तुझी सवय लागली ना मुग्धा बोलते जाते मी, चल ताई आपण पाहुण्यांना चहा बनवूया चल ग काही होत नाही गिरिजाला.
.
खुशी दरवाज्यावर उभी राहून सगळ्यांना बघत असते.
.
मयूर हळू आवाजात बोलतो गिरिजाला हा फटका कोण ग ओळख करून दे की.
.
गिरिजा पाठी वळून बघते तर खुशी उभी असते.
तिला बघून मयूरला बोलते गप्प बस तिने ऐकलेना मग झाले कल्याण सगळ्यांचे. अरे फटका नाही ती अणुबॉम्ब आहे. चला आपण माझ्या खोलीत जाऊन बोलू.
.
तशी खुशी खोकते आणि गिरिजाला बोटाने खुणावत बोलते. अणुबॉम्ब फोडू का बस तिथेच.
.
गिरीजाची आई-बाबा येत बोलतात कसे आहेत तुम्ही. तिने त्रास नाही दिला ना तुम्हाला आणि प्रेम कुठे आहे त्याला नाही सोडले.
.
काया बोलते नाही तो दोन दिवसा नंतर येणार आहे.
.
सुरेखा चहा घेऊन येत बोलते, फटका बद्दल बोलतात आहे का तुम्ही.
.
बाबा बोलतात फटका हा कोण.
.
सुरेखाची आई बाहेर येत बोलते तुमचा जावई हो. खूप गुणी आहे तो ना ग गिरिजा.
.
आई बोलते काय ऐकते आहे हे. पहिले ते पुस्तके आणि हे काय ग एक धपाटा मारत बोलते.
.
तेवढयात लेखा दरवाज्यातून आत येत बोलते, हो ना आई म्हणून मी त्याला सोडले नाही. काय माहिती ते काय करतील दोघे ना ग ताई, पपी कशी वाटली गालावर त्याने दिली तेंव्हा अशोक भावोजीनची आठवण झाली असेल ना.
.
गिरिजा उठत बोलते नाही ही खोत बोलत आहे. सुरेखा मी असे काही केले नाही.
.
सुरेखा बोलते ते राहूदे तू का आली आणि ह्यांना सोडण्या बाबतचे पाठचे हेतू काय आहे तुझा.
खुशिकडे बघत बोलते शांत रहा.
.
लेखा बोलते तेच ही मला दे आणि ह्यांना वाचब बस.
जसे तुम्ही राघवला ठेवले ना आई तसे, मी काय ग हां फटका ठेवला. गिरिजाच्या आईकडे बघत बोलते तुमचा जावई.
आता दोन गोष्टी राघव बरोबर हिला पण द्या समजले.
आजोबा भेटून सांगितले मला आई. तू सुभदा आईला पण आणले या युगात आणि ती तुझ्या बरोबर आहे.
मी आईला नाही सोडवणार तूच देणार मला आई. विचार करा बोलून साचीकडे बघून अदृश्य होते.
.
खुशी आईला बोलते कुठे आहे. हिची आई सांग का वाचवते आहे तिला, बोल गप्प का.
.
आई काही न बोलता आपल्या रूममध्ये जाते.
.
मुग्धा बोलते तुला काय करायचे आहे. त्यांच्या घरातील मॅटरमध्ये तू विचार कर ती साचीकडे बघून का गेली ती.
एवढ्या युगानंतर शास्त्रीने तुझी बहीण का दिली. तिला विचारले एकदा तरी, लांब रहा ह्यांच्या पासून, तुला बोलते आहे साची नाही तर समजून जा.
तू स्वतःहून बोल नाही तर ....
.
सुरेखामध्ये येत बोलते गप्प बस ती बोलून गेली आणि आपापसात का वाद घालतात आहे. ती अशीच करते.
गिरिजा ह्या सगळयांना वरच्या रूममध्ये ने जा.
स्वाती बाहेर जाऊन राघवला जायला सांग जा.
.
खुशी बोलते हे काय करते आहे तू आणि तिची आई.
.
सुरेखा बोलते स्वाती ऐकलेना तू जा.
.
गिरिजा बोलते काही गरज नाही त्याला सोडायला. मी स्वतःहा जाते तिच्याकडे आणि बोलते त्याला सोड म्हणून.
.
मुग्धा बोलते हाय रे ये प्रेमरोग तू जाते, ताई जाऊदे हिला शहीद व्हायला.
हिला वाटले खुशीचा गळा पकडला म्हणजे ही कोकणची राणी झाली.
.
तशी गिरिजा उठून मुग्धाचा गळा पकडून बोलते. तू माझ्यात हस्तक्षेप करू नको समजले.
.
तसे मुग्धा तिचा हात गळ्या वरून झटकत तिचा गळा पकडून उचलत बोलते. तुला पहिल्या पासून सहन केले मी समजले. तुझ्या आई-बाबांना बघून सोडले समजले मी. नाही तर कधीच तिकिट काढले असते ताई हिला समजावं बोलून खाली फेकत बोलते जाते तर जाऊदे. तू हिला मदत करायचे शब्द दिला आहे. मी नाही समजव हिला चिरकूटला.
.
आई रूममधून बाहेर येत बोलते मुग्धा शांत हो. गिरिजा जा वर ह्यांना घेऊन तू.
.
स्वाती जा सोड त्या राघवला जा आणि सुरेखा, खुशी, रुपाली आणि तू पण जा जेवणाचे बघा.
.
तुम्ही तिघे आत या मला बोलायचे आहे. मुग्धा तू पण ये. ह्या काही कामाच्या नाही जा चला किचनमध्ये.
एक मिनिट थांब, गिरिजा तुला मी हे पहिले आणि शेवटचे सांगते मध्ये मध्ये टीव टीव करायची नाही.
हिने तुला सड्यावर सोडले. मी तुला कुठे सोडून येणार ते हिला पण समजणार नाही.
साची उद्या पासून ती कोण होती. ते चालू कर शोधायला आणि स्वतःला पण सांभाळ.
.
स्वाती घरात येत बोलते राघवला सोडून आली. पण तो बोलतो आहे मी गिरिजाला भेटल्या शिवाय जाणार नाही.
.
आई बोलते घरात आण त्याला आणि गिरिजाला बोलावं खाली.
.
स्वाती राघवला आत आणत, गिरिजाला बोलवले.
.
गिरिजा खाली येत बोलते बोलवले मला तू आणि रागात राघवकडे बघत बोलते. चाललास तू भेटू परत तेंव्हा नाही तू वाचणार.
.
राघव बोलतो ठीक आहे. कुठे बोलायचे हिच्या बराबर.
.
आई गिरिजाला बोलते तुझ्या खोलीमध्ये घेऊन जा ह्याला काय बोलायचे आहे ते बोलून घे राघव.
.
राघव बोलतो ठीक आहे. चल गिरिजा बोलू आपण.
.
गिरिजा आणि राघव अर्ध्या तासाने बाहेर येत बोलतो जातो मी सुरेखा भेटू लवकर युगात बोलून अदृश्य होतो.
.
तो गेल्या नंतर गिरिजा सुरेखाला बोलते ही रक्षा साहिल साखरे कोण आहे.
.
सुरेखा बोलते रक्षा अरे का माझ्या सगळे पाठी लागले आहेत.
आई तळ घर उघड ग मी झोपते आणि तू सांभाळ आता.
.
आई बोलते गप्प बस म्हणे मी झोपते. अजून काय बोलुन गेला तो.
.
गिरिजा बोलते युक्ताच्या हातात पुस्तक लागले होते. पण तिने चुकी केली आणि शास्त्रीने वाचवले त्यांना.
.
ते ऐकून आई आपल्यारूम मध्ये निघून जाते.
.
गिरिजा बोलते आता रक्षा, साहिल आणि युक्ता कोण नवीन शी बाई परत सगळे पुस्तके वाचायला लागणार.
..
मुग्धा बोलते आता ही रक्षा कोण आणि साहिलातर बघितले.
.
सुरेखा बोलते तुला खूप गिरिजाची सवय लागली आहे ग.
ही कोण, ती कोण तिला भेटायचे आहे का तुला तर सांग. नेते तुला तिच्या युगात आणि बघ.
.
आई बाहेर येत बोलते हो का, तुलाच परत पाठवते तिच्या युगात काय. गिरिजा तू नाही सुधारणार तुलाच नेते रक्षाच्या युगात, म्हणजे ही पण तिथे येणार नाही, कुठे जाते तू. अग हो बाजूला बोलली ना.
.
सुरेखा काही न बोलता मध्येच उभी राहुन रागात मुग्धा कडे बघत असते.
क्रमश