'अनोळखी चाहुल'
"कुठवर&** असे *** करून *** पोट भरू...?" भरड्या आवाजातील हे तुटक, अर्धवट शब्द कानावर पडताना; सोबतच माझ्या उषाशेजारी कोणीतरी बसलय असच दिसु लागल. रात्रीच्या अंधारात काळ्याभोर केसांनी झाकलेला तो चेहरा , त्यातुन दिसणारा डाव्याबाजुचा रक्ताळलेला डोळा माझ्यावर रोखलेला. दंडातुन तुटलेला डावा हात माझ्या छातीवर रूतवला आणी उजव्या हातातील लांब धारधार सुरा गळ्यावर ठेवला आणी खस्स कन....... 'आई.... ' तोंडातुन नकळत शब्द फुटले आणी झटकन जागा झालो ..बाप रे काय भयानक स्वप्न होत... भीतीन अजुही काळीज धडधडतय.. कुस बदलली पन डोळ्यात बोटे घालावी असा मिट्ट अंधार पसरलाय. काहीच दिसत नाही आहे.. कदाचीत घरातली आणी बाहेर डांबावरील लाईटही गेली आहे. काळ्या कुट्ट अंधारात खिडकीतुन दिसणार पांढरट एकसारख आभाळ आणी कोसळणारा पाऊस यांचा आवाज परिस्थीती अधिकच भयाण करतेय. आणी या एकांतात जशी चाहुल जाणवतेय... जणु एकांतातही एकट नसल्याची चाहुल... या निरव भयाण शांततेत बाहेरच्या;लख्ख काळोखात धो धो कोसळणा-या पावसाचा सरसरणार आवाज मात्र आहे, तसा हा आवाज आपल्या सर्वांच्याच परिचयाचा, जर तुम्ही आहात तीथे पाऊस चालु असेल तर पावसाचा हा आवाज तुम्हीही ऐकु शकत असाल... बाहेर दारात , कौलारू घरांच्या छपरांवर, सिमेंट वा लोखंडी पत्र्याच्या छतावर पावसाचे तडतड आवाज करत कोसळणारे ते थेंब मी ही आता ऐकतोय, पन मध्यरात्रीची वेळ, पसरलेला अंधार आणी एकांत यात अशा या भिषण वातावरणाची भीती नाही वाटली तर नवलच.. त्यात एक अनोळखी; चाहुल जाणवतेय ... जस कोणीतरी माझ्या बेड जवळ बसलय .. आता बेडजवळ की खाली हे समजत नाही आहे पन चाहुल स्पष्ट जाणवतेय... आज तसा प्रवासान खुप थकवा आलाय.. डोळे काही केल्या उघडत नाहीत. एका कुशीवरुन दुस-या कुशीवर झालो आणी काहीतरी जाणवल ... कोणीतरी माझ्या बेडवर बसल होत पन मी कुस बदलताच ते बेडवरुन उठल...... हो , अगदी तशीच हलचाल जाणवली होती.... पन कोण असेल.....? घरी तर कोणीच नाही... मग कोण आहे या एकांतात..?
माझे कान लहानात लहान आवाजाचा वेध घेऊ लागलेत. तो आवाज मात्र येतच आहे.... एका रुम मधुन दुस-या रुम मधे चालत जाण्याचा आवाज.. कधी धावत गेल्याचा आवाज.. कधी खुप दुर तर कधी एकदम जवळ... आपण घरात एकट आहोत हे माहीत असुन जेव्हा अशी अनोळखी चाहुल जाणवु लागते तेव्हा खरच काळजातुन भय दाटुन येत..
पन ते काय आहे हे पहायच धाडस मात्र खरच माझ्यात नाही आहे... या अंधा-या खोलीत बाजुच्या खिडकीतुन येणा-या प्रकाशात डोळे किलकीले करत घड्याळावर नजर टाकली .
बाप रे.. रात्रीचे 2 वाजलेत... आजचा सलग तीसरा दिवस बरोबर दोन ला जाग येतेय... काय कारण असाव...?
या एवढ्या मोठ्या घरात मी एकटाच आहे आणी जाग आलीये.. ती ही रात्री दोन वाजता. त्यात कहर म्हणजे बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस आणी लख्ख काळोख जसा मला गिळंकृत करेल असच वाटतय..
आणखी एक विसरलोच..... ती चाहुल..?
हो.... ती अनोळखी चाहुल...

मी रहातो तीथ तशी लोकवस्ती कमीच आहे, म्हणजे आजुबाजुला किंचीत घर आणी रिकाम्या जागेवर काटेरी बाभळींचा घुसपा आणी पळसाची कुठतरी खुरटी तर कुठ कंबरेपर्यान्त वाढलेली झाड... गुडघ्यापर्यंन्त गवत... रस्ता तसा कच्चाच आहे आणी रस्त्यावरील खांबांवर पांढ-या ट्युब्स.. पन त्या ही आज बंद आहेत... पन कुठुनतरी येणा-या प्रकाशात अंधुकस का असेना, पन दिसतय... भिंतीवरील घड्याळाच्या सेकंदकाट्याचा टीक , टीक, टीक असा मंद आवाज एवढच सांगतोय की वेळ पुढ सरकतेय... आणी पुढे सरकणा-या या सेकंदाबरोबर काळजातल भय अाणखीनच दाट होत चाललय. घसाही कोरडा पडलाय पन उठुन पाणी प्याव एवढ धाडस होईनास झालय...
कधी कधी चारचौघात आपन खुपच धाडशी असल्याच आव आणतो पन भीतीची जाणीव होते ती अशा रात्री... खरतर भीती म्हणजे काय.... ? आता ते अवलंबुन आहे की आपण कुठे आहोत....आजुबाजूला काय परिस्थिती आहे... आणि त्या परिस्थितीचा आपल्यावर काय परिणाम होत आहे...किंवा होईल.. म्हणजे आपण एखाद्या नवख्या चालकासोबत प्रवास करतोय आणि तो मात्र आपल्या गाडी च्या आडवी येणारी वाहाने चुकवत गाडीचा वेग ५० वरुन ताशी ९० किमी च्या पुढे नेत राहील.. एक दोन दा तो गाडी ट्रक खाली नेता नेता चुकेल तेव्हा वाटणारी भीतीच. म्हणजे परिस्थिती प्रमाणे भीतीची तिव्रता...
आज माझी ही परिस्थिती तशीच आहे...त्याला कारणही तसच आहे... हो कारण.. एक घटनासत्र.. एक भयाण भिषण , कदाचीत हे शब्दही कमी पडतील असच काहीस... हो असच काहीस...
आज माझी ही परिस्थिती तशीच आहे...त्याला कारणही तसच आहे... हो कारण.. एक घटनासत्र.. एक भयाण भिषण , कदाचीत हे शब्दही कमी पडतील असच काहीस... हो असच काहीस...
आमच्या गल्लीत रहाणारी एक मुलगी काही दिवसांपासुन पित्ताच्या त्रासान हैरान होती, त्या ही रात्री अचानक गुळणी आली तशी समोरचाच दरवाजा उघडुन बाहेर गेली.. थोडा वेळ तशीत बाहेर होती तीची आई अंथरुणात पडुनच तीला जास्त उलट्या करू नको म्हणुन समजावत होती, मागील आठ दहा दिवसापासुन तीचा हा त्रास सुरूच होता , कधी दिवसा कधी रात्री उलट्यांचा त्रास. त्यामुळ अती जागरणान आईचीही तब्बेत बरी नव्हती. त्या दिवशी नेमक्या त्या बाहेर गेल्या नाहीत तर तशाच पडुन बाहेर जाण्यासाठी तीच्या भावाला उठवत होती..
पित्ताच्या उलट्या करत ती मुलगी बाहेर बसलेली. बराच वेळ ती आत आली नाही.. तीला साद देत आई बाहेर आली तर ती मुलगी दारात बेशुद्ध दिसली. घाईघाईत नव-याला मुलांना उठवल आणी तीला उचलुन आत आणल...
पित्ताच्या उलट्या करत ती मुलगी बाहेर बसलेली. बराच वेळ ती आत आली नाही.. तीला साद देत आई बाहेर आली तर ती मुलगी दारात बेशुद्ध दिसली. घाईघाईत नव-याला मुलांना उठवल आणी तीला उचलुन आत आणल...
सकाळ पर्यंन्त तीला जाग नव्हती... दुपारची केव्हा उठलीआणी अंथरूणात ऊभी राहीला पन कोणाशी काहीच बोलत नव्हती अगदी शांत होती पन तीची नजर मात्र एके ठिकाणी स्थिरावलोली, आई किचन मधे आपल्या कामात होती, तसा बाहेरून पाणी ओतत असल्याचा आवाज येऊ लागला, पन त्यांना दुर्लक्ष केल, तोच शेजारची एक बाई ओरडली...
" ए कवीचे आई, बाहेर ये लवकर.. हे बघ काय विपरीत..."
तस हातातल काम टाकुनच घाईघाईत त्या बाहेर आल्या . आणी पाहुन शहारल्या, कवीता दारात उभी होती आणी बाजुला भरलेल्या बॅरल मधे हातातली रिकामा घागर बुडवली, क्षणात पाण्याने भरलेली ती घागर झटकन बाहेर काढली आणी तशीच उभ्याने अंगावर ओतुन घेऊ लागलेली..... एक , दोन, तीन बघता बघता दहा एक घागरी तीन अंगावर ओतुन घेतल्या... तशी आई आोरडली.

" ये कविता.. अग डोचक फिरल काय तुझ.. अस काय करतीयास..?"
पुढ येत हातातली घागर हिसकावुन घेताच कवीतान झटक्यासरशी मान फिरवत रक्ताळलेल्या नजरेन त्यांच्याकड पाहील, तीचे डोळे आणी चेह-यावरचे विचित्र हावभाव पाहुन आईच्या काळजात धस्स झाल, पन इतक्यात
काहीच न बोलता ती मुलगी पुन्हा बेशुद्ध झाली.. शेजारच्या दोघी तीघी महिलांनी तीला उचलुन आत नेल. अंगावरचे कपडे बदलुन तीला बेडवर झोपवली... रात्री ती जेवायला पन उठली नाही...
काहीच न बोलता ती मुलगी पुन्हा बेशुद्ध झाली.. शेजारच्या दोघी तीघी महिलांनी तीला उचलुन आत नेल. अंगावरचे कपडे बदलुन तीला बेडवर झोपवली... रात्री ती जेवायला पन उठली नाही...
त्या रात्री घरचे सारे झोपले होते. दोन वाजले असतील.. तीची आई ठसक्याने जागी झाली तर घरभर धुर आणी तो दर्प.. आईने दरवाजा उघडला तर बाहेर कसलाच धुुर नव्हता...पन घरभर मांस करपलेला दर्प पसरलेला, दरवाजा तसात उघडा ठेऊन त्या स्वयंपाक घराच्या दिशेने पाहु लागल्या पन काळोखान सार काही माखल होत. लाईटच बटन दाबल पन लाईटही नव्हती, उशाला नेहमी मेणबत्ती आणी माचीस असायची , अंधारात चाचपडत मेणबत्ती पेटवली आणी किचनमधे निघाल्या. मेणबत्तीच्या तांबुस पिवळसर प्रकाशात किंचीत धुसर दिसु लागल, धुरान डोळ्यांची जळजळ होऊ लागलेली, पन तशाच चालत त्या धुरकटलेल्या किचन खोलीत पोहचल्या. आत एक पांढरी पाठमोरी आकृती तेवढीच दिसत होती. मेणबत्ती समोर धरत त्या पुढ निघाल्या आणी त्यांनी साद दिली...
" कवीता...बाळा किचनमधे काय करतेयस..?"
गैस सुरु होता आणी कवीता त्यावर काही भाजत होती... पुर्ण बाह्यांचा पांढरा गाऊन त्यावर मोकळे सोडलेले केस . आणी श्वासातली घरघर यांनी आई थोडी घाबरलीच होती.. किचनकट्या समोरील उघड्या खिडकीतुन स्ट्रेटलाईटचा येणारा प्रकाश तेवढाच आत पसरलेला.
आई आणखी पुढ जात पाहु लागली तस अंगावर शहारा आला, डोळे विस्फारुन पहातच राहीली.. मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात पुर्ण किचनकट्ट्यावर पसरलेला रक्ताचा सडा पाहुन त्यांची बोबडीच वळली... गर्भगळीत होऊन त्या मुलीकड पाहु लागल्या . तीन गैस फुल्ल केलेला आणी हातातील मांसाचा तुकडा गैसवर भाजत त्यावरील मांस तसाचे गरम खात पुन्हा भाजत होती. पायात ओलसर चिकटस काही होते म्हणुन मेणबत्ती खाली करत पाहील आणी जोरात किंचाळल्या... पायात काळ्या तांबुस पंखांचा खच आणी रक्ताने माखलेले काळ्या कोंबडीचे पोटातील अवयव विखुरले होते... पांढ-या फर्शीवर हे अधिकच भडक भयान दिसत होत.. आईच्या आवाजान भावाला जाग आली , तो धावतच आत आला आणी जमिनीवर थरथर कापत बसलेल्या सावरू लागला, समोर बहीनीच ते रुप पाहुन तो ही घाबरला, इतक्यात एक भरडा आवाज कानावर आला...

" तुम्हाला पन भुक लागलीये.. हे घ्या. खा..."