अनोळखी_ती
hiiii.....good evening......98.9 सदाबहार fm मध्ये मी RJ निखिल आणि माझा सहकारी मित्र RJ रोहित सहर्ष स्वागत करतो...सर्वप्रथम मी सर्वांचे धन्यवाद देतो की नाईट शो असून सुद्धा तुम्ही माझ्या कार्यक्रमाला एवढा भरभरून प्रतिसाद देत आहात...माझे 2 लाख फॉलोअर्स झालेत पण मी क्षमा मागतो कारण सोशल मीडियावर मी त्याचे रिप्लाय द्वारे आभार मानू शकत नाही...कारण माझ्याबद्दल तुम्हाला एक महत्वाची गोष्ट माहीत नाही...पण आता वेळ आलीय सांगायची.....मी जन्मजात अंध आहे....हो मी एक अंध आहे....पण देवाने मला दृष्टी दिली नसली तरी कथा.कविता.विनोद रचण्याचे कौशल्य मात्र भरभरून दिलंय...आणि परिणाम तुम्ही बघत आहात...तुमचे माझ्या बद्दलचे प्रेम मला माझ्या व्यंगची जाणीव करू देत नाही...बाकी माझा सहकारी रोहित तुम्हाला छान छान गाणी ऐकवतोच आणि मला मदत सुद्धा करतो....
तर आजचा विषय जरा खाजगीच आहे....मला माहित नाही आजच्या ह्या प्रोग्रॅम नंतर माझ्याविषयी लोक काय विचार करतील...पण खूप काहूर माजल होत...कुणाला तरी सांगावं अस नेहमी वाटायचं...म्हंटलं मी अनाथ...कुणाला सांगावे...मग म्हंटलं की चला आपल्या श्रोतेवर्गाला सांगूंया....तर झालं असं की त्या दिवशी माझा शो संपला जवळपास सर्व आवरून साडे बारा वाजले असतील...रोहित मला गेट बाहेर सोडून निघून गेला....काही हाकेच्या अंतरावर माझा बस स्टॉप होता...मी चाचपडत गाणी गुणगुणत चाललो होतो....आता आपल्या नगरपालिकेचे रस्त्याचे काम....नेहमी मोकळा रस्ता आज खडकाळ होता...आता माझ्या सारख्या आंधळ्याला तो पार करणे म्हणजे तारेवरची कसरतच....चालता चालता एका मोठ्या दगडाला ठेच लागली....मग काय पडला ना तुमचा लाडका RJ......कुत्री भूकत होतीच....बहुतेक गुडघ्याला मार लागला होता....जरा ओलसरपणा जाणवत होता...बहुतेक रक्त आलं होतं....तसाच लंगडत चाललो होतो.....अचानक मागून एक आवाज आला "लागलंय का तुम्हाला??"
अरे हा कुणाचा आवाज??आवाज तर अनोळखी आणि सुमधुर....मी स्माईल करत नाही नाही बोललो.....तसा तिचा सुमधुर आवाज परत आला "अहो पायातून रक्त येतंय तुमच्या?"
आवाजावरून तर तरुण वाटतं होती...पण ह्या वेळी इथे काय करते?? ही "तसली" मुलगी तर नसेल?? हिला टाळलेलं बरं....चालू लागलो तसाच....अरे...अरे...स्टॉप...स्टॉप द बस.....अरे काय झालं हे....सुटली माझी बस...आता घरी जाऊ कसा??तसा तो सुमधुर आवाज परत आला "काही प्रॉब्लेम आहे का?...मी मदत करू का काही?
आधीच माझं डोकं आउट झालं होतं...त्यात ही म्हणजे...तुम्ही काय मदत करणार ह्या आंधळ्याला?? मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही...आणि plz हं मला एकटं सोडा...
काही वेळात हुंडक्याचा आवाज आला...बहुतेक ती रडत होती...."अहो काय झालं??का रडताय तुम्ही??अच्छा सॉरी मला अस बोलायला नको होतं"
तसे ते हुंदके अजून वाढत होते सोबत आवाज आला "मी काय केलं?...माझा काय दोष...सगळे मलाच बोलतात..माझे घरचे सुद्धा ओरडत होते माझ्यावर"

मी हवेत हात फिरवत तिला शोधण्याचा प्रयत्न केला..पण ती सापडत नव्हती
"डोन्ट टच मी...लांबूनच बोला ओके" तिचा हुंदकेवाला आवाज परत आला
"ओके ओके सॉरी...मी जरा चिडलो होतो....बस सुटली ना माझी...इथून फक्त एक किलोमीटरवर माझं घर आहे तुम्ही मला फक्त दिशा दाखवाल का?"
"हो हो चला" तिचा होकारार्थी आनंदाचा आवाज आला
तसे आमच्या चर्चा चालू झाल्या....तिने तिच्या विषयी सांगितलं आणि मी माझ्याविषयी...वाटेत येणारे अडथळे ती सांगत होती आणि मी तिच्या डायरेक्शन वर चालत होतो....मग काय ह्या गप्पात घर कधी आलं समजलच नाही....तिचा निरोप घेतला पण तिचा तो सुमधुर आवाज तीच हसणं अजून डोक्यात घर करून होतं...आता तर ती रोजच भेटू लागली....ऑफिस ते बस स्टॉप अगदी मनमोकळे पणाने बोलत होतो...आणि ती बस आली की निघून येत होतो...अर्चना तिचं नाव....तिचा तो आवाज आणि तीच ते बोलण आठवलं की मला खूप रोमँटिक कविता सुचायच्या....तुम्हाला तर माहीत असेलच....रोहित सुद्धा हैराण होता "काय रे प्रेमात वैगेरे पडला नाहीस ना?" असा त्याचा सवाल असायचा....पण त्याला कसं सांगणार..कोण कुठून येते आणि मनमोकळं करून निघून जाते....प्रेम होतं ते पण सांगण्यापलीकडचं
एकेदिवशी बसस्टॉप वर तिच्याशी बोलत होतो...बस आली तसा तिचा निरोप घेऊन निघालो....ड्रायव्हर जवळची सीट पकडली....तसा ड्रायव्हर मला म्हणाला "काय भाऊ तब्बेत ठीक आहे ना?"
हो हो मला काय झालंय??पण अस का विचारलं
तसा ड्राइव्हर म्हणाला "नाही हो..एकटं एकटं बडबडत उभे असता..हातवारे करत असता हसत असता स्टॉप वर उभे राहून म्हणून विचारलं"
तसा मी त्याला बोललोच "अस काही नाही माझी एक मैत्रीण आहे अर्चना...तिच्याबरोबर बोलत उभा असतो"
तसा खसकन ब्रेक चा आवाज झाला बस थांबली "का हो ड्राइव्हर भाऊ काय झालं??"
आता ड्राइव्हर चा आवाज गंभीर होता "अहो भाऊ सांभाळून रहा...अर्चना....6 महिन्यांपूर्वी रेल्वे ट्रॅक वर आत्महत्या केली तिने....त्या रोडवर वावर असतो तिचा...अनेकांना दिसलीय ती....भूत आहे ती भूत

ह्या वाक्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली...दुसऱ्या दिवशी सकाळी स्टेशन वर चौकशी केली तर. ..सगळं खरं होतं...म्हणजे ती भूत आहे??
त्या दिवशी कार्यक्रमात लक्ष लागेना...रोहितने कसाबसा कार्यक्रम सांभाळला...बाहेर पडण्याची भीती वाटत होती....पण सांगणार कुणाला...आलो बाहेर तसा तिचा आवाज आला....hiii निखिल
तसा मी घाबरलो...आणि माझ्या चालण्याचा वेग वाढला...."दूर हो...दूर हो माझ्यापासून" तसा मी खाली पडलो आणि हवेत माझी छडी फिरवू लागलो
तसा तिचा आवाज आला...खूप काळजीत वाटतं होती..."अरे अरे...मी काही नाही करणार मी तुला..मला नको ना घाबरू....मी...मी...माझा काही दोष नव्हता....केला होता अभ्यास...पण 2 टक्क्यांनी स्कोर कमी झाला...बाबांचा स्वभाव खूप कडक...मी डॉक्टर झालेच पाहिजे असा आग्रह...मग मला खूप टेन्शन आलं....तरी पण घरी गेले....खूप ऐकावं लागलं मला....मला हा दर वर्षीचा त्रास सहन होत नव्हता...माझ्या कित्येक आवडीनिवडी मी पप्पांच्या हट्टापायी मारून टाकल्या होत्या....आज जरा जास्तच झालं...फायनल पेपर त्यात 2 टक्के कमी....खूप ऐकलं मी....शेवटी घेतली उडी धावत्या ट्रेन खाली...सांग ना मला....हेच का आयुष्य??मी केले होते ना प्रयत्न
परत तिच्या हुंदक्याचा आवाज...आता मात्र माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं....तिची समजूत काढली...पण आता वेळ झाला होता...अवास्तव अपेक्षेच्या खालच्या दुनियेच्या आणि निश्वार्थी स्वर्गाच्या वरच्या दुनियेच्या मध्ये ही भटकत होती....दोघांचं दुःख सारखाच....दुसरे लोक हिला बघू शकत नव्हते आणि मी दुसर्यांना बघू शकत नव्हतो....मग काय झालो आम्ही रात्रीचे सोबती....आता बस ची वाट बघावी लागत नाही बरं...तीच येते माझ्यासोबत चालत घरी...सोबत असते तिच्या गोड आवाजाची
आणखीन एक महत्वाची गोष्ट..जी अर्चना ने मला लोकांपर्यंत पोचवायला सांगितली ती म्हणजे....उद्या 12 वीचा निकाल आहे...सो..आपल्या मुलांवर कमी मार्क पडले म्हणून रागावू नका...त्यांना समजून घ्या...जीवन एकदाच आहे...त्यांना मुक्तपणे जगू द्या....चला कार्यक्रम संपवायची वेळ झाली....ती माझी वाट पाहत असेल....आज काहीतरी सांगणार आहे मला...तोच निरोप तिच्या आईपर्यंत पोचवायचा आहे म्हणे.....चला गुड नाईट

#शशांक_सुर्वे