"दि एंड"
पूर्वी बरं होतं.
अलीकडेच गाव संपायचं
नदीपल्याड जायची फारशी वेळ यायची नाही.
वर्षामागून वर्ष गेली.
गाव फुगत चाललं.
जागा पुरेना.
गावानं नदीपल्याडची वाट धरली.
पल्याड गाव झपाट्यानं वाढू लागला.
मग कधीतरी नदीवर हा पूल बांधला.
लोखंडी पूल.
मजबूत दणकट.
सतराशे साठ लोखंडी खिळ्यांनी सजवलेला.
पुलाखालनं वाहणारी ती धष्टपुष्ट नदी.
पावसाळ्यात एखाद्या जळूसारखी टम्म फुगायची.
दिवसा पूल बिझी असायचा.
गर्द गर्दी.
रात्री मात्र निवांत.
हल्ली रात्रीही ट्रॅफीक असतो.
गावाची झोप कमी होत चाललीये.
सतत जागा असतो गाव.
आत्ता सुद्धा जागाच आहे.
रात्रीचे पावणेबारा..
पुलावर दिव्यांची दिवाळी.
खरं तर आज अमावस्या.
ईथं कुणाला काहीच नाही त्याचं.
ऊजेड ओकत जाणार्या गाड्या.
रस्त्यावरचे हायमॅक्स.
अंधारी अमावस्येला ऊजेडाची भिती वाटते हल्ली.
पुलाखालचं पाणी तेवढं भीती जपणारं.
खोल अंधारी डोह वागवणारं.
आवाज न करता चूळूक वाहणारं.
मी बघतोय त्याला.
त्याने पुलाच्या अलिकडेच गाडी लावलीय.
चेहरा ओढलेला.
तो आतून हलल्यासारखा वाटतोय.
दोनदा पुलाच्या दिशेने आला.
अर्ध्या वाटेतून परत गेला.
धीर गोळा करतोय.
जमेल ?
नक्की जमणार.
ईथं जगायला हिंमत लागते.
मरणं त्यामानाने सोप्पंय.
मी म्हणलं नव्हतं ?
तो झपझप पावलं टाकत पुढं आला.
आता काहीच प्राॅब्लेम नव्हता.
पुलाच्या कठड्यावरनं एक पाय पलीकडे टाकलाय.
आगे बढो..
तो दुसरा पाय पलीकडे....
तेवढ्यात खेचला मी त्याला.
अगदी शेवटच्या क्षणी.
मृत्युच्या तोंडचा घास हिरावून घेतलाय मी.
खालची अंधारी नदी,
जिभल्या चाटत त्याला गिळायला टपलेली.
चिडलीय जाम.
काय झालं ?
एकोणतीस वेळा विचारलं असेन मी.
पठ्ठ्या बोलेचना.
शेवटी जीवावर आल्यासारखं बोलला.
बाप आयफोन घेवून देत नाहीये,
म्हणून जीव द्यायला निघालोय...
अशानं वेड लागेल मला.
काय भंकस चाललीय ?
तुला मरायलाच हवं.
तीच लायकी आहे तुझी.
पहाटे पहाटे मार ऊडी खाली.
नाहीतर मीच ढकलीन तुला.
आधीचा फोन असेलच तुझ्याकडे.
ते फोनचं डबडं तुझ्या आयुष्यापेक्षा महाग झालंय.
त्यात डोकं घालून बसतोस.
त्यापेक्षा बापाशी दोन शब्द बोल...
जाऊदे..
बापाचं एटीएम केलंय तुम्ही लोकांनी.
नकार पचत नाही.
पराभव सोसत नाही.
अपमान सहन होत नाही.
जरा मनाविरूद्ध झालं की निघाले जीव द्यायला...
चालतंय की.
तुमचं आयुष्य आहे.
जगायचं की मरायचं ?
ईटस् युवर चाॅईस..
तिकडच्या जगात काय चालतं काही माहितीय ?
तिथं सगळं गुडीगुडीच असेल ना ?
सगळं काही मनासारखं.
मज्जानु लाईफ.
अन् तिथं काही मनाविरूद्ध घडलं की ?
सोप्पंय..
पुन्हा जीव द्यायचा...
नको वाटतंय...??
प्राॅब्लेम ईकडच्या जगाचा नाहीये,
अन् तिकडच्या जगाचाही.
प्राॅब्लेम तुझ्या मनाचा आहे..
तुझ्या मनाला भट्टीत घालायला हवं.
तालून सुखावून टणक पोलाद व्हायला हवं.
जाऊ दे...
मरणाईतकं सोपं नाहीये ते.
खरं सांगू ?
तुझ्यासाठी नाही.
माझ्यासाठी वाचवला तुला.
खूप कंटाळा येतो रे...
रात्री बारा ते सकाळी साडेचार.
पुल एकटा पडतो.
सोबत हवी रे..
कार्पोरेशनची नोकरी आहे ही.
पुलावर गस्त घालायची.
कुणी तयारच नव्हतं.
मला जगण्यात ईंटेरेस्ट होता.
पोटाची भूक भागतेय ना.
मग झालं तर...
तुला सांगतो..
हा पूल फेमस आहे.
स्युसाईड पाॅईंट.
अठरा वर्ष झालीयेत.
रोजची नाईट शिफ्ट.
पाचशे एक लोकांना वाचवलं असेल.
तुला जसं मागे खेचलं तसं..
हजार एक लोकांनी मला चकवलंय.
मी पोचेपर्यंत नदीनं पोटात घेतलंय त्यांना.
आता काहीच वाटत नाही.
तू बोल..
तू जगण्याच्या लायकीचा नाहीस..
तसाही मरणारच आहेस.
दोन चार तास ऊशीरा.
तेवढीच मला कंपनी...
तो भडाभडा बोलला.
बापाला शिव्या घातल्या.
मेलेल्या आईच्या आठवणीनं पीळदार रडला..
पहाटे पहाटे बाप त्याला समजायला लागला.
बापानं त्याच्यासाठी खाल्लेल्या खास्ता.
बापाचा त्याच्यात अडकलेला जीव...
बापाच्या गळ्यात पडून रडावसं वाटू लागलं त्याला.
आता काय ऊपयोग ?
शेवटी माझ्याच खांद्यावर डोकं ठेवून बादलीभर रडला.
पुलाखालनं एक टिटवी केकाटत गेली.
पहाटेचे साडेचार वाजत आलेले.
वेडापिसा झालेला त्याचा बाप.
शेजार्याबरोबर मॅरेथाॅन पळत पुलाच्या दिशेने.
दिव्याखालच्या अंधार्या ऊजेडात ,
पोरगं डोक्याला हात लावून बसलेलं.
झाली एकदाची गळाभेट.
पुलावर आसवांची नदी..
चला..
माझी ड्युटी संपत आलेली.
मी हळूच सटकलो.
बापलेक दोघं घरी पोचले.
खरंच पुनर्जन्म झालाय.
दोघांचाही..
थरथरत्या हातानं बाप पोरासाठी चहाचं आधण ठेवतो.
पेपरऽऽ
पोरंग गॅलरीतनं पेपरची गुंडाळी ऊचलतो.
हेडलाईन.
मनपा कर्मचार्याची आत्महत्या.
परवा रात्री अमुक नावाच्या कर्मचार्याने ,
पूलावरून पाण्यात ऊडी मारून आत्महत्या केली.
अठरा वर्ष त्याने पुलावर रात्रपाळीत,
सुरक्षारक्षकाचे काम केले.
अनेकांचे जीव त्याने वाचवले होते.
तिथल्या काही अमानवीय शक्ती...
वगैरे वगैरे...
बातमीमधे माझा फोटो बघून,
पोरगं घाबरलं असणार नक्की..
तुम्ही पण नीट बघून घ्या फोटो.
रात्री बारा ते चार.
कधीही पुलावर या.
गावाकडून तिसरा दिव्याचा खांब.
तिथून खाली पाण्यात बघा..
हळूच...
माझा चेहरा बरोबर ओळखू येईल..
हसण्याचा आवाज.
मी नाही हसलो बुवा.
ईथे बरेच आहेत.
मग काय ?
सांभाळा हो.
तुमचा तोल जाईल.
डुबूक...
दि एंड व्हायचा...
एंड कसला ?
ही तर खरी सुरवात आहे.
ऊगाच वाचवत होतो मी लोकांना.
तुम्हाला काहीच कळत नाहीये ?
कळेल..
काय घाई आहे ?
मला तरी कुठं कळलंय.
पाण्याखालचा पहिला दिवस आहे माझा..
तुम्हाला म्हणून सांगतो.
जख्खड म्हातारा बाप आहे माझा.
गावाकडं एकटा राहतो.
खूप बोलावासं वाटतं त्याच्याशी.
त्याला एक सेकंडहॅन्ड साधा फोन घेऊन द्यायचाय.
दोन महिने रक्त आटवतोय.
नाही जमलं.
मग काय ?
मारली ऊडी आणि दिला जीव.
अरे हाय काय आणि नाय काय ?
दि एंड.
शेवटला हेच खरं.
अलीकडेच गाव संपायचं
नदीपल्याड जायची फारशी वेळ यायची नाही.
वर्षामागून वर्ष गेली.
गाव फुगत चाललं.
जागा पुरेना.
गावानं नदीपल्याडची वाट धरली.
पल्याड गाव झपाट्यानं वाढू लागला.
मग कधीतरी नदीवर हा पूल बांधला.
लोखंडी पूल.
मजबूत दणकट.
सतराशे साठ लोखंडी खिळ्यांनी सजवलेला.
पुलाखालनं वाहणारी ती धष्टपुष्ट नदी.
पावसाळ्यात एखाद्या जळूसारखी टम्म फुगायची.
दिवसा पूल बिझी असायचा.
गर्द गर्दी.
रात्री मात्र निवांत.
हल्ली रात्रीही ट्रॅफीक असतो.
गावाची झोप कमी होत चाललीये.
सतत जागा असतो गाव.
आत्ता सुद्धा जागाच आहे.
रात्रीचे पावणेबारा..
पुलावर दिव्यांची दिवाळी.
खरं तर आज अमावस्या.
ईथं कुणाला काहीच नाही त्याचं.
ऊजेड ओकत जाणार्या गाड्या.
रस्त्यावरचे हायमॅक्स.
अंधारी अमावस्येला ऊजेडाची भिती वाटते हल्ली.
पुलाखालचं पाणी तेवढं भीती जपणारं.
खोल अंधारी डोह वागवणारं.
आवाज न करता चूळूक वाहणारं.
मी बघतोय त्याला.
त्याने पुलाच्या अलिकडेच गाडी लावलीय.
चेहरा ओढलेला.
तो आतून हलल्यासारखा वाटतोय.
दोनदा पुलाच्या दिशेने आला.
अर्ध्या वाटेतून परत गेला.
धीर गोळा करतोय.
जमेल ?
नक्की जमणार.
ईथं जगायला हिंमत लागते.
मरणं त्यामानाने सोप्पंय.
मी म्हणलं नव्हतं ?
तो झपझप पावलं टाकत पुढं आला.
आता काहीच प्राॅब्लेम नव्हता.
पुलाच्या कठड्यावरनं एक पाय पलीकडे टाकलाय.
आगे बढो..
तो दुसरा पाय पलीकडे....
तेवढ्यात खेचला मी त्याला.
अगदी शेवटच्या क्षणी.
मृत्युच्या तोंडचा घास हिरावून घेतलाय मी.
खालची अंधारी नदी,
जिभल्या चाटत त्याला गिळायला टपलेली.
चिडलीय जाम.
काय झालं ?
एकोणतीस वेळा विचारलं असेन मी.
पठ्ठ्या बोलेचना.
शेवटी जीवावर आल्यासारखं बोलला.
बाप आयफोन घेवून देत नाहीये,
म्हणून जीव द्यायला निघालोय...
अशानं वेड लागेल मला.
काय भंकस चाललीय ?
तुला मरायलाच हवं.
तीच लायकी आहे तुझी.
पहाटे पहाटे मार ऊडी खाली.
नाहीतर मीच ढकलीन तुला.
आधीचा फोन असेलच तुझ्याकडे.
ते फोनचं डबडं तुझ्या आयुष्यापेक्षा महाग झालंय.
त्यात डोकं घालून बसतोस.
त्यापेक्षा बापाशी दोन शब्द बोल...
जाऊदे..
बापाचं एटीएम केलंय तुम्ही लोकांनी.
नकार पचत नाही.
पराभव सोसत नाही.
अपमान सहन होत नाही.
जरा मनाविरूद्ध झालं की निघाले जीव द्यायला...
चालतंय की.
तुमचं आयुष्य आहे.
जगायचं की मरायचं ?
ईटस् युवर चाॅईस..
तिकडच्या जगात काय चालतं काही माहितीय ?
तिथं सगळं गुडीगुडीच असेल ना ?
सगळं काही मनासारखं.
मज्जानु लाईफ.
अन् तिथं काही मनाविरूद्ध घडलं की ?
सोप्पंय..
पुन्हा जीव द्यायचा...
नको वाटतंय...??
प्राॅब्लेम ईकडच्या जगाचा नाहीये,
अन् तिकडच्या जगाचाही.
प्राॅब्लेम तुझ्या मनाचा आहे..
तुझ्या मनाला भट्टीत घालायला हवं.
तालून सुखावून टणक पोलाद व्हायला हवं.
जाऊ दे...
मरणाईतकं सोपं नाहीये ते.
खरं सांगू ?
तुझ्यासाठी नाही.
माझ्यासाठी वाचवला तुला.
खूप कंटाळा येतो रे...
रात्री बारा ते सकाळी साडेचार.
पुल एकटा पडतो.
सोबत हवी रे..
कार्पोरेशनची नोकरी आहे ही.
पुलावर गस्त घालायची.
कुणी तयारच नव्हतं.
मला जगण्यात ईंटेरेस्ट होता.
पोटाची भूक भागतेय ना.
मग झालं तर...
तुला सांगतो..
हा पूल फेमस आहे.
स्युसाईड पाॅईंट.
अठरा वर्ष झालीयेत.
रोजची नाईट शिफ्ट.
पाचशे एक लोकांना वाचवलं असेल.
तुला जसं मागे खेचलं तसं..
हजार एक लोकांनी मला चकवलंय.
मी पोचेपर्यंत नदीनं पोटात घेतलंय त्यांना.
आता काहीच वाटत नाही.
तू बोल..
तू जगण्याच्या लायकीचा नाहीस..
तसाही मरणारच आहेस.
दोन चार तास ऊशीरा.
तेवढीच मला कंपनी...
तो भडाभडा बोलला.
बापाला शिव्या घातल्या.
मेलेल्या आईच्या आठवणीनं पीळदार रडला..
पहाटे पहाटे बाप त्याला समजायला लागला.
बापानं त्याच्यासाठी खाल्लेल्या खास्ता.
बापाचा त्याच्यात अडकलेला जीव...
बापाच्या गळ्यात पडून रडावसं वाटू लागलं त्याला.
आता काय ऊपयोग ?
शेवटी माझ्याच खांद्यावर डोकं ठेवून बादलीभर रडला.
पुलाखालनं एक टिटवी केकाटत गेली.
पहाटेचे साडेचार वाजत आलेले.
वेडापिसा झालेला त्याचा बाप.
शेजार्याबरोबर मॅरेथाॅन पळत पुलाच्या दिशेने.
दिव्याखालच्या अंधार्या ऊजेडात ,
पोरगं डोक्याला हात लावून बसलेलं.
झाली एकदाची गळाभेट.
पुलावर आसवांची नदी..
चला..
माझी ड्युटी संपत आलेली.
मी हळूच सटकलो.
बापलेक दोघं घरी पोचले.
खरंच पुनर्जन्म झालाय.
दोघांचाही..
थरथरत्या हातानं बाप पोरासाठी चहाचं आधण ठेवतो.
पेपरऽऽ
पोरंग गॅलरीतनं पेपरची गुंडाळी ऊचलतो.
हेडलाईन.
मनपा कर्मचार्याची आत्महत्या.
परवा रात्री अमुक नावाच्या कर्मचार्याने ,
पूलावरून पाण्यात ऊडी मारून आत्महत्या केली.
अठरा वर्ष त्याने पुलावर रात्रपाळीत,
सुरक्षारक्षकाचे काम केले.
अनेकांचे जीव त्याने वाचवले होते.
तिथल्या काही अमानवीय शक्ती...
वगैरे वगैरे...
बातमीमधे माझा फोटो बघून,
पोरगं घाबरलं असणार नक्की..
तुम्ही पण नीट बघून घ्या फोटो.
रात्री बारा ते चार.
कधीही पुलावर या.
गावाकडून तिसरा दिव्याचा खांब.
तिथून खाली पाण्यात बघा..
हळूच...
माझा चेहरा बरोबर ओळखू येईल..
हसण्याचा आवाज.
मी नाही हसलो बुवा.
ईथे बरेच आहेत.
मग काय ?
सांभाळा हो.
तुमचा तोल जाईल.
डुबूक...
दि एंड व्हायचा...
एंड कसला ?
ही तर खरी सुरवात आहे.
ऊगाच वाचवत होतो मी लोकांना.
तुम्हाला काहीच कळत नाहीये ?
कळेल..
काय घाई आहे ?
मला तरी कुठं कळलंय.
पाण्याखालचा पहिला दिवस आहे माझा..
तुम्हाला म्हणून सांगतो.
जख्खड म्हातारा बाप आहे माझा.
गावाकडं एकटा राहतो.
खूप बोलावासं वाटतं त्याच्याशी.
त्याला एक सेकंडहॅन्ड साधा फोन घेऊन द्यायचाय.
दोन महिने रक्त आटवतोय.
नाही जमलं.
मग काय ?
मारली ऊडी आणि दिला जीव.
अरे हाय काय आणि नाय काय ?
दि एंड.
शेवटला हेच खरं.
......कौस्तुभ केळकर नगरवाला.
*माझी पोस्ट नावासकट शेअर करायला माझी ना नाही.