स्मशानातील पैसे
माझं पहिलंच लेखन आहे समजून घ्याल ही अपेक्षा.
परसू तात्या गेल्याची बातमी सगळ्या गावात पसरली तशी मलाही माहीत झाली, कोण्यातरी देवरूषाने आईला सांगितले होते की, याला प्रेत यात्रा पाहू देऊ नका. मग काय आई मला प्रेतासारखी राखनच बसायची. मी आपला डफड्याच्या आवाजावरून प्रेतयात्रा घरून निघाली वेशीपर्यंत गेली, अंधूक आवाज आला की गावाबाहेर गेली, आणि आवाज बंद म्हणजे नदीत पोहोचली, असे मनातल्या मनात विचार करत बसायचो. तर परसूतात्या गेले समजल्यावर जवळची व्यक्ती म्हणून घरचे सगळे तिकडे गेले मला बाहेर निघू नको अशी तंबी देत आईही गेली. मी पण संधी पाहून तिच्या मागे मागे गेलो. तेव्हा तिथले दृश्य पाहुन मला हसावं की रडावं हेच कळेना. परसू तात्याची मुलगी आणि जवळचे नातेवाईक खुप जोरजोरात रडत होते, दुःख तेवढे झाले होते पण बाजूच्या बाया रडताना मला संशयास्पद वाटल्या. कोणी तोंडाला पदर लावून रडायचं नाटक करत होत्या तर कुणाचा आवाज येत होता, पण डोळ्याला पाणी नव्हते कुणाच्या डोळ्याला पाणी पण आवाज नाही, तर काही बाया नुसत्याच बाजूला कोण रडतय आणि कोण नाही ते पाहत होत्या नवीन कोणी पाहुणे आले की, काही क्षण सगळेच मोठ्याने रडायचे थोड्या वेळाने शांत.
परसू तात्याला श्रीमंत, चिकट, खडूस काहीबाही बोलणारी लोकसुद्धा आज रडताना दिसली सगळे रडतात म्हणून मी सुद्धा थोडा रडलो तितक्यात आईने मला पाहिले जवळ येऊन कानाला धरले आणि विचारले का आलास? मी मोठ्याने सूर लागला तेव्हा सगळ्यांना वाटले याला म्हतार्याची खुप आठवण येते. आईने शांत बसवले. मग मी रडत रडत सांगितले की, घरात मला सगळीकडे भूतच दिसतात, आणि तेवढ्यावर काम झाले. आईने कान फुंकले मला घेऊन लांब बसली. थोड्यावेळाने सगळे एकदाच जोरात ओरडले आणि प्रेतयात्रा नदीकडे निघाली.
"दोन दोन रुपयाला पावली कमी" या चालीवर डफड्याने आवाज घुमवला. त्या प्रेतावर कोणीतरी पैसे फेकताना मी पाहिले, चिल्लरीचा खूप मोठा खुर्दा उधळला गेला,तो पैशांचा पाऊस पाहून माझ्या मनात एक कल्पना सुचली. मी आईला म्हणालो मला इतक्या पुढे खूप भीती वाटते मी सगळ्यांच्या मागून येतो आणि मी सगळ्यांच्या मागे लोकांच्या नजरा चुकवत बरीचशी चिल्लर खिशात टाकली. नदीवर पोहोचलो तसे 'मढ्यावरचे लोणी खाणारा माणूस', असं बर्याचदा मी ऐकलं होतं म्हटलं आज तो शोधायचा, लांबून दिसायचा नाही म्हणून जवळ जाऊन मी पाहिलं पण कोणीच मला दिसलं नाही, मढ्यावर लोणी सुद्धा दिसलं नाही माझा भ्रमनिरास झाला कदाचित हा विधी प्रेत उचलतानाच झाला असावा असा कयास मी काढला. गावातल्या ज्या लोकांविषयी हे बोलले जायचे त्यांच्याकडे मी पाहिलं पण कोणीच पुढे आले नाही कदाचित त्यांनी अगोदरच खाल्ले असेल आता नवीन कुणीतरी खाईल असे वाटले पण कसचे काय?
प्रेताला अग्नीडाग दिला. सगळे घरी गेले त्यानंतर गावातले कोणी जरी मेले तरी मी खूप रडायचो आणि प्रेत यात्रेच्या सर्वात शेवटी चालायचो काही दिवसानंतर परसूतात्यांची समाधी बांधली, आणि शेवटी त्यात एक तांब्या ठेवण्यात आला त्यात पुन्हा पैसे टाकले गेले आणि तिथेच पैसे मिळवण्याचा मला एक मार्ग सापडला. काही दिवसानंतर आम्ही शाळेत जात असताना खडकावर मला एक पडलेली , अस्ताव्यस्त समाधी दिसली विजेच्या वेगाने डोक्यात कल्पना आली, डोळ्यासमोर पैसे नाचू लागले. समाधी फोडायची ही कल्पना दोन मित्रांना बोलून दाखवली त्यांनी लगेच होकार दिला आणि आम्ही शाळेतून येताना काम करायचा प्लान ठरला.
शाळेतून येताना सगळ्यांच्या मागे चालत येऊन आम्ही समाधी फोडली त्यात बरेच पैसे मिळाले आम्ही त्याचे गोळ्या बिस्किटे खाल्ली घरी ही गोष्ट जेव्हा वडिलांना समजली तेव्हा त्यांनी कोलदांडा घालून मारले घरच्या बऱ्याच जणांनी हात साफ करून घेतला.
भा. स.तकिक.
तळटिप:- वरील घटना सत्य घटनेवर आधारीत आहे. (पुढील भाग मात्र कल्पनारम्य असेल)
क्रमश:
छायाचित्र:- गुगल.