आधीच्या भागाची लिंक वर दिली आहे 👆👆
कथा : #घुंगरु भाग ८ वा
लेखक : #अनुप_देशमाने
का कोणास ठाऊक पण आज आजी च्या कपाळावर घाम आणि छातीचे ठोके वाढले होते, तिच्या बोलण्यामुळे स्मिता ते घुंगरु घालून त्या वाड्यात गेली होती, कित्येक वर्षे बंद असलेला वाडा आज उघडला गेला होता, भीतीचे सावट आज पूर्ण गावभर पसरले होते, काही लोक आजी बरोबर थांबले होते, घरातील बाकीचे मंडळी देखील परत त्या ठिकाणी आले, एकीकडे स्मिता च्या रुपात असलेली सगुना आणि दुसरीकडे गावातील लोक आणि भयाण रात्रीचं वातावरण थक्क करून टाकणार होत, एवढ्यात आजी पुढे जाऊ लागली... विक्रांत ने तिचा हात धरला आणि माघे खेचले... दबक्या आवाजात तो बोलला..
विक्रांत : आई वेडी आहेस का, ती स्मिता नाही सगुना आहे , काही पण करू शकते ती...
आजी : करू दे माझ्या पोरीला काही नाही झालं पाहिजे म्हणत आजीने तिचा हात विक्रांत च्या तावडीतून सोडवून परत सगुना च्या दिशेने जाऊ लागली....
सगळं गाव आता डोळ्यात तेल घालून आणि आ करून आजी कडे बघु लागले होते, गावातील मंदिरातील घंटा नाद चालू झाला, कोणी गावावरील संकट दूर होण्या साठी देवाकडे साकडे घालत घंटा वाजवून देवाला जागे करत होता.... घरातील मंडळी डोळ्यातील अश्रू पुसत आई आई आजी आजी हाका मारू लागले.... पण आजी च्या डोळ्यात आता फक्त स्मिता दिसत होती... जशी आजी स्मिता रुपी सगुना कडे जाऊ लागली तशी सगुना जास्तच चिडली....तिने एक उडीत आजी समोर आली आणि आजीला जोरात धक्का दिला... आजी हवेत उडून खाली कोसळली... सगळ्यांच्या तोंडून एकच आवाज "आई आई, आजी आजी, ताई ताई" सगळीकडे भयाण शांतता पसरली गेली, त्या शांततेत सगुणाचे विद्रुपी हसणे मात्र कानात आग ओकत होतं... सगळे गावकरी आणि घरातील मंडळी आजी कडे धावून गेले, आजी बेशुद्ध पडली होती, डोक्यावर मार लागला होता...कपाळ पूर्ण रक्ताने माखले गेले होते.... अखंड सौभाग्यवती असलेली सगुना आज तिच्या मुळे आजीच्या कपालावर रक्ताने शेंदूर माखला गेला... विजेचा कडकडाट झाला आजीच्या डोळ्यात प्राण आला, ती परत त्याच वेगाने उठली आणि कुंकवाची मागणी करू लागली... गावातील एकाने पळत जाऊन स्वतःच्या घरातील कुंकू आजीला आणून दिले....आजी परत सगुना कडे जाऊ लागली...
सगुना : परत हिकडं येऊ नकोस, नाहीतर प्राणाला मुकशील तू...
आजी हातातील कुंकवाचा करंडा दाखवत : आग परत जायचं पण नाही मला, फक्त तू एकमेव अशी स्त्री होती जी माझ्या घरातून कुंकू न लावता गेली होती... आज ती इच्छा पण पूर्ण होणार आहे, माझा प्राण गेला तरी बेहत्तर, पण सौभाग्यच लेन मी लावूनच जाणार आहे...
आजीच्या हातातील कुंकू बघून सगुना थोडी बिथरली... ती माघे सरकू लागली, एक मानवा पुढे आज एक अमानवीय शक्ती हरत असताना दिसू लागली होती... स्मिता रुपी सगुना आता वाड्यात देखील जाईना झाली होती, ती वाड्याच्या इतरत्र पळू लागली होती....आजीने आता वाड्याचा दार गाठलं आणि कुंकु चिमटीत घेऊन त्या वाड्याच्या उंबऱ्याला लावणार इतक्यात सगुना विव्हळू लागली....
सगुना : थांब नको लावू कुंकू, शेवटचं मला माझ्या पोरीला बघायचं आहे, ही पोरगी परत घेऊन जा पण एकदाच मला माझ्या पोरीला बघायचा आहे....
सगळे गावातील लोक एकमेकांकडे बघू लागले... हिची पोरगी कुठं आहे हिची पोरगी, ही जायच्या आधी ती गायब झाली होती का कोणी घेऊन गेली...
आजी : तुझी मुलगी.. कुठे आहे तुझी मुलगी???
सगुना : ती खुप शांत झोपली आहे, उठतच नाही ती आणि मी तिला स्पर्श देखील करू शकत नाही..!!
आजी : आम्हाला सांग आम्ही उठवतो तिला..!!
सगुना : बोलव मग सगळ्यांना, घे मदतीला सगळ्यांना...!!
आजीने सर्वाना बोलवले, काहीजण आले नाहीत तर काहीजण आले... आता सीमा देखील तिथे दाखल झाली, स्मिता ला बघताच तिने टाहू फोडला...आजीने कुंकू चा करंडा वाड्याच्या बाहेर ठेवला...तस सगुना ने वाड्यात प्रवेश केला , त्या पाठोपाठ सगळ्यांनी वाड्यात प्रवेश केला, सगळीकडे शांतता होती आणि आवाज येत होता तो फक्त आणि फक्त घुंगराचा...
"छम छम छम छम छम छम"
आजी : कुठे झोपली आहे मुलगी तुझी दाखव आम्हाला...??
सगुना ने आतील खोलीकडे बोट दाखवत इशारा दिला... आजीने आत जाऊन पाहिले असता तिथे कोणी नव्हते, तिने बाकी लोकांना बोलवून खोली मध्ये खोदकाम करण्यास सांगितले... लोकांनी पळत जाऊन हत्यारे आणली आणि खोली खोदु लागली...बराच वेळ झाला खोद काम चालू होते, 4 फूट खोदल्या नंतर लोकांना एक मानवाचा सांगाडा लागला, तो दिसताच लोक पळू लागली, सगुना आत पळत आली... तिने तो सांगडा घेऊन आपल्या छातीशी कवठाळून धरला आणि जोर जोरात रडू लागली....
"काय ग, एवढे दिवस झोपायचं असते का सांग, किती आठवण काढत होते मी तुझी, रोज ची नाच गाण्याची मैफिल संपली की, मी तुला तसच शोधत होते गावभर, पण तू कुठे दिसलीच नाही, पण जेव्हा मी हिच्या कडे गेले (आजी कडे बोट दाखवत) तेव्हा कळले की तू घरीच लपून बसली आहेस... आता नको बघ जाऊ सोडून मला कळलं मी पण नाही जाणार आता तुला सोडून...."
हा सगळा प्रकार लोक स्वतःच्या डोळ्यांनी पहात होते, काळजाला चिरत जावे अस दृश्य डोळ्यासमोर दिसत होते, काहींच्या डोळ्यातून तर अश्रू वहात होते,
सगुना : "बाळाने मला खाण्यास मागितले होते, पण मला देता आले नाही, कारण पुरुष मंडळी दम काढत नव्हते... नाचावे लागले, आणि नाही नाचले तर खाणार काय ह्या विचारामुळे तुझ्या कडे लक्ष नाही गेले, आणि तू वेडी मला सोडून गेलीस..."
जोर जोरात वाड्यात आता स्मिता च्या रडण्याचा आवाज घुमु लागला....
आजी : मिळाली ना तुझी पोर आता सोड बरं माझ्या पोरीला..!!
सगुना : एका अटीवर..
आजी : आता कसली अट तुझी प्रत्येक अट आम्ही पूर्ण केली आहे ना...!!
सगुना : मला माझ्या मुलीला कुशीत घेऊन झोपायचं आहे आणि आम्ही झोपल्यानंतर माझे घुंगरु आमच्या जवळ ठेवून द्या...आणि माझ्या कपटाखाली काही दागिने आहेत ते गावातील देवीच्या मंदिरासाठी वापरा.... पण लक्षात घ्या सर्व जण पर स्त्री ला माते समान मानून जगणे हाच मानवतेचा धर्म आहे... काही क्षणात स्मिता चक्कर येऊन बाजूला पडली, आणि तो सांगडा अलगद त्या परत खड्यात जाऊन झोपला... आजीने स्मिता च्या पायातील घुंगरु काढले.. दुसरे घुंगरु आतील खोलीतून जाऊन आनले... ते दोन्ही घुंगरु आजीने पाया पडून त्या खड्यात टाकले...सर्वांनी दर्शन घेतले आजीने बाहेरील कुंकुवाचा करंडा मागीवला आणि शेवटचं कुंकू म्हणून त्या अखंड सौभाग्यवती सगुनाला लावले... आणि तो खड्डा बुझवण्यास सुरवात केली... खड्डा पूर्ण बुजवण्यात आला, एक अमानवीय आई चा शेवट तिच्या लेकराला कुशीत घेऊन झाला, गावातील मंडळीने आता दागिने घेऊन गावातील देवीच्या मंदिरात गेले, स्मिता ला उचलून अभी ने देखील मंदिर गाठले... अखंड घंटा नाद चालू होता, गावातील सगळे ग्रामस्थ आता मंदिराकडे वळली,
सर्वमंगल मांगल्ये शिवे सवार्थ साधिके ।
शरण्येत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ।।
हा मंत्राचा जाप चालू झाला, पहाटेची काकड आरती झाली, आई दुर्गा च कुंकू स्मिता च्या कपाळी लावण्यात आले, हळू हळू स्मिता हालचाल करू लागली, कही क्षणात तिने डोळे उघडले आणि बघताच आपण येथे कसे आलो हे विचारू लागली... स्मिता शुद्धीवर आलेली पहातच सर्वांच्या जीवात जीव आला, सगळे परत घरी पोहचले...स्मिता ची दृष्ट काढण्यात आली.... सीमा ने तेवढ्या गडबडीत परतीची बॅग भरण्यास सुरवात केली....अख्खी रात्र जागून काढल्या मुळे सगळे दमले होते म्हणून झोपी गेले सगळे.... दुसऱ्या दिवशी दुपारची गाडी असल्यामुळे बाकी आवरा आवरी सावकाश चालू होती...अखेर जेवण करून चौघे ही सर्वांचे दर्शन घेऊन निघाले...परत त्याच्या गावी,
स्मिता : काय झालं होतं मला आई..??
सीमा : "काही नाही बाळा तुझं आपलं काहीतरीच..!!
रात्री गाडी थोडी उशिरा पोहचली, रात्र भलतीच झाली असल्यामुळे साहजिकच सर्वांनी आपल्या मोबाईल मधील टॉर्च लावले.... तेवढ्यात अचानक
"छम छुम छम... छम छुम छम"
कोणीही माघे न वळून बघता घर गाठले....
#समाप्त
(पूर्ण कथा कशी वाटली, नक्की सांगा आणि सर्वाना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा....💐💐💐💐)
कथा #घुंगरु भाग ८