ही ओढ रक्ताची-Bhag 3
भाग ::--तिसरा
जेष्ठाच्या पाडव्याला दुपारच्या बारा वाजता लिंबर्डीला सूर्याचं बऱ्याच दिवसांनी दर्शन झालं व झडीही उघडली. सूर्यकांतराव आपल्या वाड्याच्या गच्चीवरून स्वच्छ प्रकाशात निर्विकारपणे, जणू काही झालंच नाही या अविर्भावात पहुडलेल्या बुराई बंगल्याकडे पाहत होते. एव्हाना गत रात्रीचा सारा प्रकार त्यांच्या कानावर आलाच होता. पण त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं की कृष्णा काकडे वा कुंदा का सापडली नाही. त्यांना पंधरा विस वर्षापूर्वीचा सारा पट आठवू लागला. जशी काल जेष्ठाची अमावास्या होती तसीच त्या दिवशीही जेष्ठाची अमावास्याच होती. इतकंच काय पण त्या भंगाडे तलाठी व सुभाणरावांचा किस्सा झाला तो दिवस पण अमावास्याचाच. त्यांना सारं सारं आठवू लागलं. त्या प्रकारानंतर मागच्या खाणाखुणा मिटविण्यासाठी त्यांनी मोठ्या हौसेनं बुराई बंगल्याचं खळ्यात बांधकाम लावलं. आर्केस्टा तर कधीचाच बंद झाला होता. नंतर मग ट्रान्सपोर्ट मध्ये उतरत बिहार, युपी, कर्नाटक सारीकडं ट्रक धावू लागल्या. गॅस, पेट्रोलच्या एजंन्सीज मिळवल्या. पण ऐंशी एकराचा काळजाचा ठाव निम्मा गेला ही सल काळजात कळ उठवतच होती. त्यातच बंगल्याच्या बांधकामावर विचित्र प्रकार घडू लागले. बांधकाम करणारा काॅंन्ट्रॅक्टर व मजूर टिकतच नव्हते. चारपाच वेळा बदलवत बांधकाम जेमतेम पुरं केलं पण तोपावेतो कळून चुकलं की या नव्या बंगल्यात आपलं राहणं धोक्याचं आहे. म्हणून लाखो रूपये खर्च करूनही बंगल्यात राहणं टाळावच लागलं. तिकडे सचिवालयाचंही तसच. ते ही बांधकाम जेमतेम पूर्ण केलं. जुन्या चावडीतून नव्या सचिवालयात ग्रामपंचायत कार्यालय व तलाठ्याचा सजा हलवला. जळगावचा भंगाळे म्हणून तलाठी होता. एकदम इरसाल कांडी. परंतू आपल्या ताटाखालचे मांजर. याच्याच जिल्ह्यातला सुभाणराव दुय्यम निबंधक होते. भंगाडे व सुभाणरावाचे घनिष्ट संबंध होते. या मुळेच सुभाणरावांकडून आपलं जमिनीचं काम होणार होतं वीस एकर जमीनीचा ठाव जो शालिनी च्या नावावर होता. तो आपल्या नावावर करणं सहज शक्य होणार म्हणून सुभाणरावाकडं भंगाडेमार्फत घसपट वाढली. सुभाणरावही लिंबर्डीला मुक्कामाला येऊ लागले. त्याची सारी बडदास्त व हौस पुरवली जाऊ लागली. त्याचेही निवृत्तीचंच वय झालेलं. सुभाणरावाची नजर बुराई बंगल्यावर पडली. तो बंगला पाहून तो तर वेडाच झाला. आपल्या दृष्टीनं मात्र बंगला बिनकामाचा. भंगाडेमार्फत डिल फायनल झाली. शालीनीची जमीन आपल्या नावावर करायचं काम सुभाणरावांनी व भंगाळेंनी करावं त्या बदल्यात बुराई बंगला आपण सुभाणरावांना द्यावा. आपण शालीनीच्या जबरीनं सह्या घेतलेलं सारं बाड त्याच्याकडं दिलं. आज रात्रीच सारं फायनल करतो असं सांगत ते दोघं बुराई बंगल्यावर गेले. जेष्ठाच्या अमावास्येला. सुभाणरावांनी भंगाळेला सातबारा काढायला लावला. पण दिवसा गर्दी असते सजात म्हणून रात्रीच काढता येईल. आपण संध्याकाळी दोघांना मटणाची व रम्सची व्यवस्था लावली. पण नऊच्या सुमारास अचानक काम निघाल्यानंतर चंद्रकांत व आपण लगेच मुंबईला निघालो.
"सूर्यकांतराव आपण निवांत जावं परत याल तेव्हा आपण चाळीस ऐवजी साठ एकराचे मालक व्हाल असं काम आम्ही आजच करतो" सुभाणरावांनी अडखळत व लाल झालेल्या डोळ्यांनी शब्द दिला. रात्री बऱ्याच उशीरापर्यंत त्यांनी उंची मद्य रिचवत मटणाचा आस्वाद घेतला. भिमा शिपाई सोबतच होता. बारा वाजता भिमाला घेत भंगाळे तलाठी सातबारा काढण्यासाठी नव्या सचिवालयात डोलत डोलत निघाला. नवं सचिवालय रात्री पहिल्यांदाच उघडत होतं. तेही जेष्ठाच्या अमावस्येला. भिमानं प्रभात कंदिल तलाठ्याकडं देत सोटा खाली ठेवत मुख्य दरवाजा उघडला. खोल्या व सभागृह मागे टाकत ते सजाजवळ आले.. सजा उघडून भिमानं भंगाळेकडून कंदिल घेतला. तितक्यात त्याला आपण सोटा पहिल्या दरवाज्याजवळच रायल्याचं आठवलं. भंगाळेनं रेकाॅर्ड ठेवलेल्या मोठमोठ्या लाकडी कपाटी उघडावयास सुरुवात केली. पण त्याला हवं असलेलं लेझर सापडेना. शेवटची मधली कपाट बाकी राहिली तिच्याकडं तलाठी वळला. तोच भिमानं हातातील प्रभात कंदिल टेबलावर ठेवत"अप्पा सापडत नसेल तर लाईट लावू का?" विचारलं.
"भिम्या प्यालो मी नी तुला चढतेय का? मूर्खासारखं बरडू नकोस. लाईट लावले तर रात्रीचं सचिवालय उघडं कसं असा उगाच लोकांना डाउट होईल.बंदच राहु दे"
भंगाळे कपाटाकडं सरकू लागताच अचानक बोकडाचा'बे-बे' असा आवाज आला. सुरुवातीला तलाठ्याचा वाटलं बाहेरून आला असावा. तो कपाटाजवळ पोहोचला. तोच पुन्हा तसाच आवाज अगदी जवळ.
" भिम्या तु काय ऐकलं का? "
" अप्पा बोकडाचा आवाज का? मी पण तुम्हाला विचारणारच होतो"
आता आवाज अगदी जवळ जवळ व जोरात येऊ लागला.
"भिम्या दरवाजाकडे जा बरं नी पहा तर काय आहे वा कोणी आलं तर नाही?"असं भंगाळे म्हणताच भिमा दरवाजा कडं निघाला. त्यानं अंधारात अदमासे पाहिलं तर त्याला काहीच दिसेना. तोच तो लथळत कोलमडत खाली पडला. मघाशी कुलुप उघडताना खाली ठेवलेला सोटा त्याच्या पायात आला होता व अडखळत तो कोलमडला होता. तो सोटा हातात घेत व कुणीच नाही ही खात्री करत सजाकडं परत फिरला व माघून जे पाहिलं त्यानं जागच्या जागी थिजला. घसा खरडून तो "अप्पा! अप्पा! "ओरडू लागला पण घशातून आवाजच निघेना. तलाठी कपाटात लेजर शोधत होता व त्याच्या मागं माणसाच्या धडावर बोकडाचं शीर लागलेली आकृती उभी. तलाठी लेझर शोथतच होता. तोच त्या आकृतीनं"भंगाळे अप्पा तुम्हाला जे लेजर हवंय ते त्या कपाटात नाहीत त्या कपाटाच्या वर आहे बघा" म्हणताच भंगाळेला वाटलं भिम्याच बोलतोय.
"आरं हा रं! भिम्या हेच शोधत होतोय बघ मी केव्हाचा" असं म्हणत भंगाळे मागं न पाहताच कपाटाला वर लटकला. लेझर घेत मागे वळला. तोच बोकडाचं शीर मानवाच्या धडाला अशी विचित्र आकृती पाहताच तलाठ्याची क्षणात उतरली. तो मागे भिंतीला चिकटून बसल्या सारख्या उभ्या भिमाकडं भयाड व भयाण नजरेनं पाहू लागला. तोच त्या आकृतीनं एका हातानं जोरात लाकडी कपाट भंगाळे तलाठ्यावर आपटलं. तलाठी पुरता कपाटाखाली दाबला गेला. फक्त डोकच बाहेर.
"साल्या हराम खोरं माझ्या शालीनीच्या जमीनीचा सातबारा हवाय का तुला? थांब देतो तुला! इंथ एका वर्षापासून मी माझं शीर व शालिनीला शोधतोय नी तुम्ही जमिन हडपताय" ती आकृती थयथयाट करत म्हणाली. भिमा भिंतीला चिकटून उभा. त्याला तिथनं धूम ठोकायची होती पण पायाला मणाच्या बेड्या जणू ठोकल्या असाच तो पुतळा
झाला.
आकृतीनं भंगाळेच्या डोक्यावर पाण्यानं दाब देताच कोंबडीचं अडं हत्तीच्या पायाखाली यावं व टचकन फुटावं तसंच टचकन फुटलं व पिवळ्या बलक ऐवजी लाल रक्ताच्या चिरकांड्या सज्याच्या भिंतीवर उडाल्या. तोच भिम्याची ही चड्डी भर्रकन ओली झाली. पण त्या क्षणी जणु पायातल्या बेड्या एकदमच तुटल्या. भिम्यानं जिवाच्या आकांताने धूम ठोकली ती थेट बुराई बंगल्यावर. धापा टाकतच तो सुभाणरावाना शोधू लागला. सुभाणराव बाथरुम मध्ये बसलेले.
"साहेब साहेब भंगाळे भंगाळे अप्पा...." भिमा जीव तोडून सांगू लागला तोच हाॅल मधून एक स्त्रीच्या धडावर माणसाचं शीर लागलेली पाठमोरी आकृती बाथरुम मध्ये घुसताना त्यानं पाहिली. ती आकृती पाठमोरी असल्यानं भिमाला चेहरा दिसेना. हातात तुटलेलं शीर. भिमा आता तर बेशुद्ध पडायला लागला. तितक्यात बाथरूम मधून आवाज आला." साल्या बुढ्ढ्या माझ्या जमिनीची परस्पर खरेदी पालटणार तू. बुढ्ढ्या मसणात गेला तरी अजून.........थांब घे ना मला कवेत घेतोस ना? " आकृती हातातलं शीर सुभाणरावाकडं झुलवत होती. सुभाणराव भिंतीलाआखूड बसून खाली मान घालून "मला माफ कर मला माफ कर" म्हणून ओरडत होता.
आकृतीनं बाथरुममधील गिझरच्या सिलेंडरच्या रेग्युलेटरची नळी झटक्यात ओढली. तोच भिमाला आकृतीच्या दुसऱ्या हातात लाइटर दिसलं. भिमानं क्षणात तिथनंही धूम ठोकली. तो बंगल्यापासून काही अंतर आला तोच सिलेंडरचा बंम्मकन आवाज, सुभानरावाचा चिथडा, मांसाचा चिखल उडाला. बंगल्याचा बराचसा भाग आकाशात उडाला. पण भिमानं मागं वळूनही पाहिलं नाही. तो पळाला थेट सूर्यकांतरावाकडंच. धडधड दरवाजा ठोकत असतांना दरवाजा सूर्यकांतरावांनीच उघडला. भिमा मिठी मारत बारक्यावाणी ओक्साबोक्शी रडू लागला.भर ओसरल्या नंतर त्याच्या लक्षात आलं. "तुम्ही तर मुंबई ला गेले होते ना?"
"ते महत्वाचं नाही, आधी काय झालं ते सांग"
भिमानं जे सांगितलं ते ऐकून आपल्या ही अंगावर काटा आला. पण त्या ही परिस्थितीत भिमाला लगेच आपल्याच ट्रान्सपोर्टच्या ट्रकवर बसवत त्याची उत्तरप्रदेश रवानगी केली. त्यानंतर भिमा एक वर्ष लिंबर्डीत आलाच नाही. सकाळी कपाटं पडल्यानं भंगाळेचा व गॅस सिलिंडरच्या स्फोटानं सुभाणरावाना मृत्यू इथपर मॅनेज करता करता आपल्याला खूपच जड गेलं.
नंतर सचिवालय व बुराई बंगला कायमचाच बंद झाला होता. शालनीच्या जमीनीचं घोंगडं ही तसंच भिजत पडलं. मग आपण आता तर नविनच योजना आखली होती. कृष्णा काकडेची एकुलती एक मुलगी कुंदालाच उडवलं तर......?
कृष्णा नंतर किती दिवस टिकणार? मग शालिनी सहित कृष्णाचीही जमिन......
पण
पण
तिथंही माशी शिंकलीच.
नी आता तर कालच्या प्रसंगात 'मुकुंद' चा उल्लेख? कोण असावा हा?
?
?
शालिनी- देवधरचा मुलगा???
सूर्यकांतच्या मेंदूला झिणझिण्या येऊ लागल्या.
तिकडं कृष्णा अण्णाकडं बसलेल्या मुकुंदाला पाहत कृष्णा अण्णाच्या मेंदूही झिणझिण्या उठत होत्या की एम. डी माने(मुकुंद) व आपल्या मुलीचे केस सारखेच का? कुरळे घुंगराले अगदी? त्यांना अशाच केसाचं आणखी एक जण आठवले व त्यांचे डोळे पाणावले.

क्रमश.......
✒वासुदेव पाटील.