अंजुला कैद करून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला....त्यांची गाडी आता गावाबाहेर चालली होती....गावाबाहेर एक नवीन हॉटेल झालं होतं तिथं जाऊन पार्टी करायचा बेत त्यांनी आखला होता...त्यांची गाडी आता त्या सुमसान रस्त्यावरून चालली होती.....जॉनने संजयभैयाच्या सांगण्यावरून डिक्की तुन दारूच्या बाटल्या काढल्या आणि संदीप आणि जॉन मागे बसून दारू पिऊ लागले...गाडीत जोर जोरात म्युझिक चालू होतं...त्या तालावर मागे संदीप आणि जॉन थिरकत होते....मागून एक बाटली घेऊन संजयभैयाने आपल्या तोंडाला लावली....तो दारू पित गाडी चालवत होता...मांत्रिक त्याच्या बाजूला बसला होता...काहीतरी मंत्र पुटपुटत होता....त्याला बघून संजयभैया ने दारूची बाटली त्याच्या नाकाला लावली.
"अरे काय विचार करतोयस...घे पी...आरं तुझ्यामुळ आम्ही त्या भुताच्या त्रासातून मुक्त झालो...घे...पी"
मांत्रिकाने आपलं तोंड बाजूला फिरवलं...नाक दाबत तो संजयभैया ला म्हणाला
"भैया...काय राव उगाच तलब आणली तुम्ही दारूची..असली इंग्लिश दारू पित नसतो मी...माझ्याकडे आहे माझी देशी....तुमचं चालू द्या"
संजयभैयाने ती बाटली मागे घेतली ...दारूच्या वासाने बेभान झालेल्या मांत्रिक आपला देशी ब्रँड काढू लागला..संजयभैयाने बाटली तोंडाला लावली त्याने मागे बसलेल्या संदीपकडे मान फिरवली
"अरे संदप्या हरम्या....ती एवढी मोठी फटाकडी...ती अंजु....हुश्श यार कसली खतरनाक पोरगी होती ती....असली भारी पोरगी तुला पटली कशी रे??"
तसा संदीप हसला आणि तोंडात घेतलेला सिगरेटचा धूर खिडकीतून बाहेर सोडत म्हणाला
"काय नाही ओ संजयभैया...ह्या पोरी लई हळव्या असत्यात बघा...ही पोरगी पण लई टफ होती...घासच देत नव्हती...पण मी काय कमी हाय व्हय??? मी पण सारखं मागे लागलो हिच्या....मग मी शेवटचं जाळ फेकलं आणि ती पोरगी फसली...आव कोंबडीच्या रक्ताने लेटर लिव्हल आणि हाताला एक बँडेज बांधलं आणि पडली की येडी प्रेमात...मग काय रोज मज्जा मारून हिला परत हॉस्टेल वर सोडत होतो...मग एकदा आणली आपल्या लॉज वर तुम्ही होताच की तिथं...काय पण म्हणा पोरगी जबरदस्त होती...मरायला नको पाहिजे होती....तिचे व्हिडिओ दाखवून अजून वापरली असती तिला....पण जाऊ दे आता एक नवीन पाखरू जाळ्यात ओढतोय...तेच आपल्या फेसबुक वरून....तिला जरा माझे आईबाबा नाहीत मी अनाथ आहे असं सांगून इमोशनल केलंय...आता लवकरच तिला पण घेऊन येतो लॉजवर...कस आहे ना संजयभैया...जोपर्यंत ह्या देशात सिनेमा सिरीयल मधील प्रेमाचा अखंड चूxxप्पा चालू आहे ना...तोपर्यंत आपल्याला अश्याच नवनवीन शिकार मिळत राहणार आणि आपल्या रात्री रंगीन होणार....आता हेच बघ ना ती अंजु बाटलीत बंद व्हायच्या आधी काय म्हणत होती "सबका हिसाब करुंगी" गेल्या वर्ष्यातल्या पिक्चर मधला डायलॉग.....आता काय घंटा हिसाब घेणार हाय ही.....आता ही फेसबुक वाली मला बोलतेय तू त्या...कोण तो बुटका हिरो...कोण........कोण.....
हे ऐकून संजयभैया हसला..." अरे ती रुम तुमची पण आता आम्हाला विसरू नका म्हणजे झालं.."
ह्या वाक्याने संदीप जॉन जोरजोरात हसू लागले
आणि हो संदप्या कशी वाटली माझी ऍक्टिग.....काल तुझ्याकडे सुशांत बनून आलो ओळखलं का तू??
संजयभैयाच्या प्रश्नाने संदीपने डोक्याला हाथ मारला
काय भैया....कसं काय जमलं राव तुम्हाला...मला जरा सुद्धा ओळखता आलं नाही बघा.....पण तुमच्या या नाटकात जीव गेला असताना माझा
पिऊन रिकामी झालेली बाटली संजयभैयाने खिडकीतून बाहेर फेकली आणि हसत म्हणाला
"अरे अभिनयाचा किडा माझ्यात लहानपणापासून होता...पण कधी चान्स मिळाला नव्हता...तस पण ह्यो मांत्रिक म्हणाला तसं मी केलं...आणि तू माझा सच्चा कार्यकर्ता हाईस तुझा जीव थोडीच जाऊ देईन मी"
अचानक संजयभैयाची नजर मंत्रिकाकडे गेली....प्रचंड गारठा होता...त्या गरठ्यात सुद्धा मांत्रिकाला घाम सुटला होता...तो काहीतरी बडबडत होता....त्याच्या चेहऱ्यावरची चिंता बघून संजयभैया ने गाडी स्लो केली आणि त्याला विचारलं
"अरे ए मांत्रिका....काय झालं तुला??....तब्बेत ठीक नाही का तुझी???बघ किती घाम आलाय तुला"
घाबरलेल्या चेहऱ्याने मांत्रिकाने संजयभैयाकडे बघितलं....त्याच्या चेहऱ्यावरून घाम खाली ओघळत होता....त्याचा धीर गंभीर आवाज त्या गाडीत घुमला
"पळा.....इथून लवकर पळा....आता आपल्या सगळ्यांची वाट लागणार आहे"
अस बोलून त्याने हात वर केला..संजयभैयाला काहीच कळत नव्हतं....त्याच्या त्या हातात रिकामी बाटली दिसत होती....रात्रीच्या त्या अंधारात थरथरत्या हातांनी त्याने दारूच्या बाटली ऐवजी चुकून त्या बाटलीचं बुच उघडलं होतं ज्या बाटलीत अंजु बंदिस्त होती....काळ्याशार धुराने भरलेली ती बाटली आता पूर्णपणे रिकामी दिसत होती.....आधीच चवताळलेल्या अंजुची त्या बाटलीतून सुटका झाली होती
खर्रर्रर्रर्र आवाज करत अचानक ब्रेक न दाबताच गाडी थांबली....पुढे जाऊन गाडी बंद पडली....संजयभैया चावी फिरवू लागला पण पेट्रोल फुल्ल असून सुद्धा ती गाडी स्टार्ट होत नव्हती....त्या शांत भयाण अंधारात त्या स्टार्टर चा खर्रर्रर्रर्र.....खर्रर्रर
"पळा.....पळा रे इथून जान प्यारी असलं तर"
त्या तिघांना काहीच कळत नव्हते मांत्रिक त्या अंधारात काहीतरी बघून आपल्या गळ्यातील खड्याच्या माळेवर हाथ फिरवत होता....त्या तिघांनी बाहेर बघितलं स्ट्रीट लाईटच्या मर्यादित प्रकाशात समोरच्या झाडीत फक्त अंधार दिसत होता....जॉन ने रागाने मांत्रिकाला हलवलं
"आरे ये काय झालं बोल की"
मांत्रिकाचे लक्ष अजून त्या अंधारातच होतं त्याच्या त्या काळ्या साधनेने मिळवलेल्या दिव्यदृष्टीला ती स्पष्ट दिसत होती....ती हवेत तरंगत होती...तिची मान खाली लटकली होती....अचानक तिचे हात वर आले...अंजु आता आकाशाकडे बघत होती.....वाऱ्याचा एक मोठा झोत आला.....शेकडो बाण एकाच वेळी एका लक्षावर
घुसावेत अश्या पद्धतीने पलीकडच्या स्मशानातल्या शेकडो भटकत्या आत्मा तुफान वेगाने अंजुच्या दिशेने येत होत्या....मांत्रिक हे दृश्य स्पष्टपणे बघू शकत होता...पण गाडीतील इतर तिघांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होते....बाणाच्या वेगाने डोळ्याच्या खाचा झालेले अतृप्त भयाण आत्मे आपले भयाण दात विचकत अंजुच्या शरीरात घुसत होते...अंजु तडफडत होती....स्वतःला सावरत ती त्या आत्म्यांना आपल्या शरीरात जागा देत होती...कुणी तोंडात कुणी डोळ्यात कुणी पोटात शेकडो अतृप्त आत्मे ती आपल्यात घेत होती...अचानक तिची नजर त्या बंद पडलेल्या गाडीकडे गेली...मांत्रिकाची आणि तिची नजरानजर झाली....मांत्रिकाने आपली दिव्य माळ घट्ट पकडली....अखेर ते वादळ शांत झाले...अंजु वरून धाडकन खाली कोसळली....तो मोठा आवाज त्या तिघांना अस्वस्थ करणारा होता...संजयभैया मांत्रिकाचा काळा सदरा पकडून "काय झालं...काय झालं" विचारत होता.....त्या शांततेत अचानक झाडाची हालचाल सुरू झाली...मांत्रिकाची माळेवरची पकड घट्ट झाली तो जोरजोरात मंत्र पुटपटू लागला....
शेकडो आत्मे आपल्यात घेऊन अंजु आता आक्राळ विक्राळ झाली होती....जवळपास नऊ दहा फुटाची अंजु आता भलतीच भयानक दिसत होती.....तिची नखे आता भाले बनले होते..काळी मिट्ट भेगळलेली जमीन दिसावी तसा तिचा चेहरा दिसत होता.....ती उभी राहिली....तिने आपले डोळे उघडले....लाल भडक तिची बुब्बुळे बघून मांत्रिक कमालीचा घाबरला होता...त्या शांततेत अचानक धाड धाड असे आवाज येऊ लागले....तिघे इकडे तिकडे बघत होते त्या अंधारात त्यांना काहीच दिसत नव्हते...मांत्रिकाला ती येताना दिसत होती...तिच्या पावलांचा धडधड आवाज त्या आजूबाजूच्या जंगलात घुमत होता....ती जवळ येत होती मांत्रिक जोरजोरात मंत्र पुटपटू लागला...ती आता त्या लाईटीच्या उजेडात आली....आक्राळ विक्राळ काळी मिट्ट.... मोठमोठी नखे आणि सुळे असलेली अंजु बघून संजयभैया जॉन आणि संदीप किंचाळत गाडीतून थेट जंगलात पळाले.....धाड धाड पाय टाकीत अंजु त्या गाडीजवळ आली मांत्रिक मान वर करून तिला बघत होता......अंजुने गाडीचा दरवाजा उखडून फेकून दिला मांत्रिक जवळच बसला होता...त्याच्या गळ्यातील ती दिव्य खड्याची माळ तिच्या डोळ्यांना त्रास देत होती..त्या माळेच्या आशेवर तो निर्धास्त होता.....पण त्या माळे कडे बघून अंजुच्या डोळ्याचा दाह होत होता....तिने घट्ट डोळे बंद केले....मांत्रिक हसला
"काही वाकडं करू शकत नाहीस तू माझं....तुझ्या सारखी 56 sssss"
मांत्रिक आपलं वाक्य अर्धचं बोलू शकला अंजुने त्याचा गळा पकडून वर उचलले..जमिनीपासून 5 फूट उंच..तो बरोबर तिच्या चेहऱ्यासमोर आला....त्याने आपली माळ घट्ट पकडली होती..इतका भयाण चेहरा तो पहिल्यांदा बघत होता....त्या माळेच्या दिव्य ताकतीमुळे शेकडो आत्म्यांची शक्ती आपल्या अंगात घेतलेली अंजु..पण कित्येक वर्षे काळी साधना करून अफाट शक्ती आपल्यात घेतलेल्या त्या दिव्य माळेपुढे कित्येक प्रेत आत्मे जळून खाक झाले होते....अंजूचं सुद्धा तसंच होत होते....तिचा हात जळू लागला..तिचा जळता हात बघून मांत्रिक हसू लागला....मांत्रिकाच्या गळ्याभोवती त्या जळत्या हाताचा फास आवळतच होता..त्या आगीच्या प्रकाशात मांत्रिकाचा घाबरलेला आणि अंजुचा भयाण तोंडातून लाळ गळत असलेला चेहरा स्पष्ट दिसत होता...फास आवळत असल्यामुळे दबक्या आवाजात मांत्रिक मंत्र पुटपुटत होता....अंजुच्या शरीरातून धूर निघत होता पण तिच्या हाताची पकड सैल होत नव्हती....तिच्या अंगातील आत्मे त्या दिव्य माळेच्या प्रभावाने जळून तिच्या अंगातून बाहेर पडत होते........आता अंजु एखादं लाकूड पेटवं तशी जळत होती...किंचाळत होती....तिने आपली सगळी शक्ती एकवटली आणि आपल्या दुसऱ्या हाताचा एक जोरदार प्रहार त्या माळेवर केला...एखादा मोठा स्फोट व्हावा तसा जोराचा आवाज त्या जंगलात घुमला....ती माळ तुटून खाली पडली....अंजुच्या अंगावरच्या ज्वाळा शांत झाल्या..अंजुने मान तिरकी करून मांत्रिकाकडे बघितलं....तिने आता सगळ्या शक्तीने फास आवळला तशी खाडकन मांत्रिकाची मान मोडली....तो मृत होऊन खाली कोसळला....त्याबरोबर जळलेली अंजु सुद्धा खाली कोसळली.....तिच्या अंगातुन धूर निघत होता....तिने एकडाव त्या काळ्या जंगलाकडे बघितले...ते तिघे अजूनही मोकाटच होते...अंजु जोरात किंचाळली...माळेच्या प्रभावामुळे तिने आपल्यात घेतलेले काही आत्मे जळून भस्म झाले होते....तिच्या शक्ती आता थोड्या कमजोर झाल्या होत्या..तिला काहीच सुचत नव्हतं...बाजूला मृत पडलेल्या मांत्रिकाच्या तोंडात तिने बोट घातलं आणि क्षणार्धात ती त्याच्या अंगात घुसली....मांत्रिकाचे डोळे उघडले....बुबुळे पांढरी फेक असलेला मांत्रिक आपल्या अंगाकडे बघत होता. ..अंजुने पूर्णपणे मृत मांत्रिकाच्या शरीराचा ताबा घेतला...आतून तिच्या शरीराची आग होत होती...त्याला नीट उभं सुद्धा राहता येत नव्हतं....तो तसाच विव्हळत ...त्याने जंगलाकडे बघितले आणि त्या काळ्या जंगलात शिरला
त्या मिट्ट अंधारात...जॉन संजयभैया आणि संदीप धावत होते...समोरचा अंधार त्यांना आंधळा करून टाकत होता...जॉनला त्या छोट्या डोंगरावरून त्याला एक हायवे दिसत होता....भांडणात पुढे आणि संजयभैयाचा खास माणूस असलेला जॉन...आज फक्त अंजूचं आक्राळ विक्राळ रूप बघून घाबरला तो त्या हायवेच्या दिशेने तो धावू लागला....पानांची सळसळ वाढत होती..धावत असताना ..मधेच वटवाघळे त्याच्या तोंडाला बडवत होती....तो प्रचंड घाबरला होता...त्या जंगलात अचानक त्याला एक शेकोटी दिसली....त्या शेकोटीच्या जवळ तो जाऊ लागला...काळ्या कपड्यात एक माणूस बसला होता..."अरे ह्यो तर आपला मांत्रिक आहे..ह्योच वाचवू शकेल आपल्याला" अंजुला आता पर्यंत मांत्रिकाने भस्म केलं असेल ह्या विचाराने खुश होऊन जॉन धापा टाकत त्याच्या जवळ आला...त्याने धापा टाकत टाकत मांत्रिकाच्या खांद्यावर हात ठेवला
"मेली का ती??? मारलंस का तिला??"
तसा एक भेसूर आवाज घुमला
"ती मरणार नाही....मारणार आहे....तुझा मांत्रिक कधीचा वर पोचवला मी....आता....आता
अस बोलून मांत्रिक उभा राहिला...त्याने जॉनचा गळा पकडला....जळल्यामुळे मांत्रिकाचा ताबा घेतलेल्या अंजुची ताकत कमी पडत होती...त्याचा हात थरथरत होता...मांत्रिकाचे ते पांढरे फेक डोळे बघून जॉन घाबरला अंजुच्या थरथरणार्या हाताला तो झटकू लागला...मांत्रिकाची पकड सैल होत होती...जॉनचा तगडा हाथ मांत्रिकाला आव्हान देत होता....जॉन सर्व ताकतीनिशी त्याचा हात दूर करू लागला...एक दोन लाथा मांत्रिकाच्या पोटात बसल्या...तसा तो मागे सरकला...मांत्रिकाने आपल्या झोळीत हाथ घातला..त्याच्या हातात एक बाटली लागली...त्याने ती उचलली आणि आगीच्या प्रकाशात तिच्याकडे बघितलं....त्यात काळा धूर होता...मांत्रिकाने अजून एक आत्मा कैद केली होती....तो हसला आणि त्याने ती बाटली सरळ जॉनचा तोंडात कोंबली...त्याने मान तिरकी करून जॉनकडे बघितलं.....एक जोरदार ठोसा त्या बाटलीवर दिला तशी ती बाटली जॉनचा तोंडात फुटली....त्याच्या तोंडातून रक्त वाहू लागलं....तो काळा धूर आता त्याच्या पोटात शिरला होता...बाटलीतील आत्मा मुक्त झाली होती तिने जॉनचा शरीराचा ताबा घेतला...मांत्रिकाने आपला हात सैल सोडला जॉनने डोळे मांत्रिका सारखे पांढरे फेक झाले....मांत्रिक त्याच्याकडे बघून हसला...त्याने आपली मान फिरवली...त्याने आपले बोट समोरच्या दगडावर दाखवले....जॉन त्याच्याकडे बघत त्या मोठया दगडाजवळ गेला....त्या दगडावर तो आपले डोके जोर जोरात बडवून घेऊ लागला...त्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली...त्याच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता...रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या....त्याच्या रक्ताचा पाट मांत्रिकाच्या पायाजवळ आला....त्याने इशारा केला आणि जॉनचा शरीरातून काळा धूर बाहेर आला...आणि हवेत विरून गेला...जॉनचा मुडदा पडला तसा मांत्रिक हसला आणि मांत्रिकाच्या तोंडून काळा धूर बाहेर आला...मंत्रिकाचे निर्जीव मृत शरीर खाली कोसळले...अंजु त्याच्या शरीरातून बाहेर आली..तीचे शरीर भाजले होते पण तिच्या डोळ्यातील आग जशीच्या तशी होती..तिने परत आपले हात वर केले....तश्या परत आसपास फिरणाऱ्या आत्मा तिच्या शरीरात बाणाप्रमाणे घुसू लागल्या....तिने परत आपले क्रूर आक्राळ विक्राळ रुप घेतले.....ती सरसर एका उंच झाडावर चढली....टोकावरून सगळं जंगल दिसत होतं....
संदीप धनदाट जंगलात धावत होता त्याला कुठेच वाट सापडत नव्हती....एखादं दुसरं माकडं दात विचकत त्याच्या अंगावर यायचं आणि ओरबाडून निघून जायचं....मध्येच कोल्हेकुई त्या वातावरणाला अजून भयानक करीत होती...आयुष्यात देवळात न गेलेला संदीप आज देवाचे नाव घेत धावत होता...त्याच्या आसपास कुणीतरी धाड धाड पाय टाकीत धावत होतं....त्या पायाची धडपड संदीपला घाम फोडणारी होती...मध्येच एक भेसूर आवाज यायचा
"पिल्लू...कुठे आहेस तू??...भेटणार नाहीस का मला"
भेसूर राक्षसी आवाजाने संदीप सैरावैरा धावत होता...फिरून फिरून एकाच जागी येत होता....अचानक त्याला ठेच लागली तो खाली कोसळला....घुबडांच्या आवाज पानांची सळसळ त्याला वेड लावत होती...तो उठला आणि धावू लागला...त्याच्या धावण्याची गती वाढत होती....अचानक तो थांबला त्याचे पाय ओले होऊ लागले....तोंडातून रक्त आलं....त्याचे डोळे मोठे झाले....त्याने खाली बघितले....एक मोठा काळा हात त्याच्या पोटात शिरला होता....त्याच्या पोटातील रक्त त्याचे पाय ओले करीत होते....झाडाच्या मागून अंजु बाहेर आली....तिने संदीपच्या पोटात हाथ खपसून आरपार केला होता..तिने त्याच्या पोटातून हाथ घालून त्याच्या मणक्याचे हाड आपल्या हातात पकडले....तिने संदीपच्या विव्हळणाऱ्या चेहऱ्याकडे बघून स्मित हास्य केले आणि त्याला वर उचलले..तिने त्याचा गळा पकडला त्याच्या अंगातून काडकड आवाज येत होता ....अंजुने आपल्या सर्व शक्तीने त्याच्या पाठीचा मणका उपसून काढला....संदीपचा मृतदेह खाली कोसळला..आपल्या हातातील संदीपच्या मणक्याकडे बघून ती हसली आणि आता शेवटच्या शिकारीसाठी निघाली.....
ए संदीप.....जॉन.....अरे कुठे मेला रे सगळे....त्या जंगलात संजयभैयाचा आवाज घुमला....आजूबाजूला गर्द झाडी....अधून मधून डोक्यावरून किंचाळत कुणीतरी जात होतं...संजयभैया धावत होता....भेसूर कुत्र्याचं रडणं ऐकू येऊ लागलं....अचानक त्याला टेकडीवरून रस्ता दिसला....रस्त्यावरचा प्रकाश बघून तो सुखावला....त्या रस्त्यावरून एखादं दुसरं वाहन ये जा करत होतं...त्या रस्त्यावर "वेलकम टू संगम लॉज" चा मोठा डिजिटल बोर्ड लावला होता....तो रस्ता जवळच होता....संजयभैया त्या रस्त्याच्या दिशेने धावत होता.....अचानक त्याला कसला तरी गुरगुरण्याचा आवाज आला...तो जागेवर थांबून इकडे तिकडे बघू लागला....एका मोठ्या स्ट्रीट लाईटीच्या उजेडात संजयभैया उभा होता....समोरच्या अंधारातून त्याला चार लालभडक डोळे त्याला दिसले गुरगुरण्याचा आवाज वाढला....ते डोळे बघून संजयभैया धावू लागला....तशी ती भली मोठी कुत्री त्याचा पाठलाग करू लागली...."हाड हाड" करीत तो धावत होता...अखेर कुत्र्यांनी त्याला गाठले आणि एकाने त्याच्या पायाचा लचका तोडला तसं दुसरं पण आलं आणि त्याने खाली पडलेल्या संजयभैयाच्या मांडीचा ताबा घेतला...त्याने सुद्धा एक मोठा लचका तोडला...ते दोघे त्याच्या पायावर तुटून पडले....रक्ताच्या चिळकांड्या त्याच्या पायातून वाहत होत्या....परत ती धाड धाड ऐकू आली...तशी ती कुत्री एकामेकाकडे बघुन आपल्या तोडलेल्या मांसाचा तुकडा घेऊन चघळत त्या अंधारात निघून गेली...संजयभैया हाताने सरकत सरकत पुढे जात होता...त्याने कंबरेला खवलेली पिस्तुल बाहेर काढली..ती धडधड वाढली संजयभैया ने मागे बघितले...आपले मोठं मोठे पाय आपटीत....एका हाताने चेहऱ्याचा चेंदामेंदा झालेले जॉनचं प्रेत आणि एका हाताने मांत्रिकाचं प्रेत ती फरफटत आणत होती...त्या फरफटतन्यामुळे धुळीचा लोट उठला होता....तिने खांद्यावर संदीपचं प्रेत टाकलं होतं....संदीपच्या फाटलेल्या पोटातून रक्त वाहून तिचं अंग लालभडक करीत होतं....ती साक्षात "मृत्यूदेवता" वाटतं होती....
संजयभैयाने पिस्तुलेचे 4,5 राउंड एकदम तिच्यावर फायर केले.....पण आक्राळविक्राळ अंजु वर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता...विव्हळत विव्हळत संजयभैयाने नेम धरून बरोबर तिच्या तोंडावर गोळी मारली....तोंडावर गोळी बसताच अंजूची मान फिरली आणि ती रागाने गुरगुरु लागली....ती त्याच्या दिशेने चालत येत होती
ती जवळ जवळ आली तसा जखमी संजयभैया तिच्या समोर हाथ जोडीत होता
"माफ कर मला माफ कर....घे माझे सगळे पैसे घे...तुझ्या आईवडिलांच्या नावे करतो सगळी प्रॉपर्टी...दया कर मला मारू नको"
सुळ्याचे दात बाहेर काढून अंजु हसली....तिने आकाशाकडे बघितलं आणि एका कर्णकर्कश आवाजात किंचाळी ठोकली..एक वेगळ्याच ध्वनी लहरी त्या काळोखात धुमल्या..त्या भयाण आवाजाने संजयभैया ने कान बंद केले....त्या पूर्ण जंगलात आता हालचाल जाणवू लागली होती....सगळ्या कोपऱ्यातून अंजुच्या त्या भयाण आवाजाला "काव काव" असा प्रतिसाद देत ते आले....समोरच्या आंब्याच्या झाडावर त्यांनी कब्जा केला...हिरव्या पानांची जागा आता कावळ्यांनी घेतली होती....त्यातील कावळ्याचं एक छोटं पिल्लू अंजुच्या खांद्यावर येऊन बसलं...संदीपच्या पाठीतून मांस ते ओरबाडून खात होतं....अंजुने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हाथ फिरवला
"सामूहिक बलात्कार....सामूहिक बलात्कार......मर्दपणा दाखवायची खाज आहे ना तुमच्यात चल आता मी दाखवते तुला सामूहिक बलात्कार काय असतो ते"
अस बोलून तिने आपलं बोट संजयभैया कडे केलं....तसा काव काव असा असंख्य कावळ्यांचा चित्कार एकाच वेळी झाला...आणि ते एकाच वेळी त्याच्यावर तुटून पडले....संजयभैया तडफडत होता....कावळे अक्षरशः त्याचे मांस ओढून काढत होते...त्याची तडफड अंजुला एका वेगळ्याच समाधानाकडे घेऊन जात होती...अचानक संजयभैयाची फडफड बंद झाली आता फक्त त्याच्या मृतदेहावर कावळ्यांची फडफड सुरू होती....थोड्या वेळाने कावळे बाजूला झाले....अंजु बघून भेसूर हसू लागली....तिथे फक्त आता संजयभैयाचा सांगाडा उरला होता...त्याच्या मांसावर कावळ्यांनी चांगलाच ताव मारला होता....त्या कावळ्यांचे लाल डोळे अचानक सामान्य झाले आणि ते परत त्या जंगलात निघून गेले...अंजुने समोरच्या रस्त्याकडे बघितले....तिला झगमगणारी लायटिंग दिसली संजयभैयाचा सांगाडा तिने आपल्या दुसऱ्या खांद्यावर टाकला....आणि रस्त्याच्या दिशेने चालू लागली....तिने समोर बघितले...."संगम लॉज" चा लायटिंग ने लकाकणारा डिजिटल बोर्ड तिला दिसला.....तिने आपल्या हातातील मांत्रिकाचे आणि दुसऱ्या हातातील जॉनचे प्रेत वर उचलले आणि त्या बोर्ड च्या अँगल ला लटकावले....त्यानंतर खांद्यावरचे संदीपचे प्रेत दुसऱ्या अँगलला लटकावले....आता तिने संजयभैयाचा सांगाडा हातात घेतला......त्याला वर उचलून ती बोलली
"लॉजचे मालक तुमची जागा इथं नाही बरं...तुम्ही तर vip लोकं"
ती रस्त्या पार करून जाऊ लागली.....समोर एक अजून एक भला मोठा बोर्ड दिसत होता...त्यावरील मजकुराकडे ती एकटक बघत होती
"वाढदिवस वाघाचा....वाढदिवस आमच्या संजयभैयाचा"
coming soon वादळ येणार आहे
बोर्डावर संजयभैया हसतानाचा फोटो अंजुला दिसला त्या चेहऱ्याला बघून अंजुने त्या सांगाड्याकडे बघितलं...त्या कवटीकडे बघून अंजु हसली आणि तो सांगाडा तिने त्या बोर्डावर लटकवला...तिच्या खांद्यावर संदीपच रक्त सांडलं होतं...ते रक्त हातात घेऊन तिने संजयभैयाच्या बोर्डावरील चेहऱ्यावर फुली मारली...आणि खाली लिहले
"हिसाब क्लियर"
रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन बोर्ड रस्त्याच्या बरोबर मध्ये आक्राळ विक्राळ अंजु उभी होती....संगम लॉज चा बोर्ड जॉन आणि संदीपच्या रक्ताने लाल भडक झाला होता...आणि दुसऱ्या संजयभैयाला शुभेच्छा देणाऱ्या बोर्डवर त्याचाच सांगाडा लटकत होता....हे दृश्य बघून अंजुने डोळे बंद केले...आणि रस्त्याने धाड धाड आपली मोठी वजनदार पावले टाकत चालू लागली....ती आता त्या स्मशानात आली तिने आपले डोळे बंद केले...तिच्या अंगातील शेकडो आत्मे बाहेर पडू लागले...अंजु आता मूळ रुपात आली...तिचा बदला पूर्ण झाल्यामुळे तिच्या अंगावरचे त्या नराधमांनी दिलेले डाग पूर्णपणे गायब झाले होते....तिच्या भोवती डोळ्याच्या खाचा नसलेल्या अतृप्त आत्माची गर्दी झाली होती...तिने मान वर करून सगळ्यांच्याकडे बघितलं आणि हात जोडले ती आता हळूहळू हवेत मिसळत होती...तिच्या तोंडून त्या आत्म्यांची केलेल्या मदतीबद्दल "आभारी आहे" असे शेवटचे शब्द आले आणि ती हवेत मिसळून गेली..…....…..........(समा