मॉल ( पार्ट 7) (आधीच्या सर्व पार्टस ची लिंक खाली दिली आहे.)
"तुम्हाला शिक्षा द्यायची आहे तर मला द्या पण माझ्या नवऱ्याला सोडा . मी भीक मागते , पदर पसरते तुमच्या समोर पण माझ्या नवऱ्याला माफ करा " खामकरांची बायको रडत सांगत होती .
"पप्पा चुकले आहेत पण तुम्ही त्यांना एकदा माफ करा , पप्पा त्यांचे सगळे वाईट धंदे बंद करतील पण पप्पाना काही करू नका. "खामकरांचा मुलगा हात जोडून खिलारे फॅमिलीला सांगत होता .
"आमची काय चूक होती ? आम्ही साधी सरळ प्रामाणिक माणसे आहोत ही ? त्या न जन्मलेल्या बाळाचा काय दोष होता ? या छोट्या 2 मुलांचा काय दोष होता ? आम्ही खामकरान वर विश्वास ठेवला तर त्यांनी असा विश्वासघात केला . तुमच्या एका हव्यासा पोटी आमच्या कुटुंबाची राख रांगोळी झाली . तुम्ही गुंगी चे औषध घालून खोटा प्रसाद दिला . आम्हाला जिवंत जाळले , आम्हीच नाही तर असेच किती तरी गोर गरिबांना तुम्ही तुमच्या स्वार्था साठी वापरून घेतले . त्यांची आयुष्य बाद करून टाकली . कोणी अधिकार दिला होता तुम्हाला ? हरिभाऊ खिलारे अगदी काकुळतिने विचारात होते .
माणूस खरा असला की त्याच्या नजरेला नजर देण्याचे धारिष्ट्य पण होत नाही . माणसाच्या वागण्यातील प्रामाणिकपणा त्याच्या नजरेत दिसत असतो .आज पहिल्यांदा खामकराना पश्चाताप होत होता ते जे वागत आले होते त्याचा . त्यांनी ज्या ज्या चुका केल्या होत्या त्याचा . आपण आपल्या घरच्यांशी कसे वागत आलो आणि आज तेच आपल्या साठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही आहेत . स्वतःच्या स्वार्था साठी ते किती नीच पातळी ला उतरले होते याची आज त्यांना लाज वाटली . त्यांचे मन त्यांना खाऊ लागले . त्यांनी त्यांच्या बायकोला मिठी मारली . मुलाला मिठी मारली . नातवाला 2 मिनिट छातीशी घट्ट कवटाळले . खिलारे कुटुंबातील सर्वांची माफी मागितली . स्वतःच्या कुटुंबातील सर्वांची माफी मागितली . आणि कुणाला काही समजायच्या आत 5 व्या मजल्या वरच्या ऑफिस च्या खिडकीतुन खाली उडी मारली .
खामकरांचा निषप्राण देह खालती मॉल च्या आवारात पडला होता .
खामकरांचा निषप्राण देह खालती मॉल च्या आवारात पडला होता .
शेवट पर्यंत समजले नाही खामकर मॉल मध्ये बेशुद्ध पडले आहेत असा कॉल मॉल मधून कोणी केला होता .
मॉल पण कायमचा बंद पडला . अजून पण खिलारे फॅमिली त्या मॉल मध्ये राहते . कारण ती त्यांची वडिलोपार्जित जागा होती . पूर्ण गजबजलेल्या रस्त्यावर तो एकटा मॉल फक्त निर्मनुष्य आहे.
दर वेळी कोणी तरी येऊन तुम्हाला तुमच्या कर्मांची शिक्षा देत नाही . काही काही वेळेला तुमची सदसद विवेकबुद्धी, नियती , तुमचे प्रारब्ध पण तुम्हाला तुमच्या कर्माची फळे भोगायला लावते .
"Karma has no menu , you get served what you deserve "
मॉल ( पार्ट 1)
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/1_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/1_30.html
मॉल ( पार्ट 2 )
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/2_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/2_30.html
मॉल ( पार्ट 3)
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/3_30.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/3_30.html
मॉल ( पार्ट 4)
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/4.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/4.html
मॉल ( पार्ट 5 )
मॉल ( पार्ट 6)