विसावा विहीर - आरे कॉलनी, गोरेगांव पूर्व (खरी घटना, खरा स्पॉट )
आरे कॉलनी, मुंबई चे फुफ्फुस ज्याला म्हंटले जाते तो भाग. सकाळी जितका निसर्गरम्य, रात्री तेवढाच भीतीदायक. आरे कॉलनीतल्या भुतांच्या गोष्टी तर शहराच्या अर्बन लेजंड च्या भाग आहेत. पण या विहिरीचा मात्र तसा उल्लेख नाही.
हि विहीर वेस्टर्न एक्सप्रेस वे सोडून आरे कॉलनीच्या मुख्य रस्त्यावरून काहीशी आतमध्ये आहे. इथलं वातावरण म्हणजे पूर्णपणे नकारात्मक. आजूबाजूला जंगल, जीवघेणी शांतता आणि त्यामध्ये आहे ती "विसावा विहीर." आजवर २७ बळी घेणाऱ्या या विहिरीने २२ नोव्हेंबर २०१८ ला आणखीन दोन बळी घेतले. आरे कॉलनीतील युनिट सहामध्ये विसावा विहिरीजवळून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला काही पुस्तके, पैंजण, मोबाइल आणि चपला दिसल्या. रात्री आठच्या सुमारास विहिरीजवळ कोण गेले हे पाहण्यासाठी हा पादचारी गेला, त्यावेळी त्याला आत काही तरी पडलेले दिसले. कोणी पडले असावे यासाठी या पादचाऱ्याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच आरे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचले. मुंबई अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत उतरून दोन मुलींनी बाहेर काढले. दोघींना सिद्धार्थ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आरे पोलिसांनी या दोघींची ओळख पटवल्यानंतर त्यांच्या पालकांना कळविण्यात आले.
त्या आधी एका महिले आत्महत्या केली होती.
योगायोगाची गोष्ट तर पुढे आहे, हि विहीर जोडीने बळी घेते कि काय अशी शंका आहे कारण जून २३, २०१७ ला या विहिरीत पडून एकाच दिवशी दोन टिनेजर्स मुलांचा बळी गेला होता. स्थानिक तर या विहिरीच्या आजूबाजूला अभावानेच फिरतात.
तर अशी हि विसावा विहीर. जी इथे येणाऱ्यांना आपल्या कुशीत कायमचा विसावा देते. कोणाला हि विहीर पाहायची असल्यास आरे कॉलनीच्या युनिट सहा मध्ये जाऊन हि झपाटलेली विहीर बघू शकता.