' सारी जमीन परत नावावर करतो, पण कल्याणीस देणार नाही' अप्पांनी सांगताच सखू अक्का घाबरली व अप्पा 'बापूच्या जाण्यानं बिथरून कल्याणीस आता देणारच नाही ' हे समजून चुकली.पण तोच
" मामा, मग तसं करा! आईच्या बाबांनी आधी आईलाच दत्तक घेतली होती नाही का! म्हणजे जमिनीवर हक्क आईचाच! नाही मुलगी देत तर जमीन परत करा व वचनाला जागा!" डोळे स्थिरावत मध्येच सुरेंद्र बोलला.
नी अप्पा चवताळलेच.
" सुरेंद्र, काय बोलतोय हे! नकोय त्यांची जमीन आपल्याला ! चल निघूयात!" अक्कानं कल्याणीची आशा सोडत सुरेंद्रला बजावलं.
" आई, हे जमीन तर देणारच नाही पण वरून मोठ्या फुशारकीनं वचन पूर्ती केलीय म्हणून ढोल बडवतील!नाटकं आहेत ही सारी यांची!"
आता तर अप्पाचा विस्फोटच व्हायला लागला.
" सुरेंद्र, कल्याणीच्या बदल्यात येत्या आठ दिवसांत सारी जमीन अक्काच्या नावावर झाल्याशिवाय या घरातून पाय काढायचा नाही! " अप्पा श्वासात अंगार फुलवत सुरेंद्र वर कडाडले.
अक्कास वचनाच्या बदल्यात कल्याणी हवी होती पण जमीन घ्यावी असा विचार ही तिच्या मनात स्पर्शला नव्हता.वचन फक्त भावांनी आपलं माहेर तोडू नये या भावनेनं होतं.पण त्याचा सुरेंद्र गैरफायदा घेतोय म्हणुन वाद वाढतोय पाहताच ती विदीर्ण झाली.
" अप्पा तुमची जमीन हिसकावण्याप्रत ही बहीण भिकारडी नाही रे!"
" आई ते देणार का? त्यांना मुलगी द्यायची नाही म्हणून नाटकं करत आहेत ही सारी!" सुरेंद्रने परत आग लावली.
अप्पा जागेवरून उठले व तयारीला लागले. अनेरच्या मातीतली माणसं काय असतात हे यांना दाखवायचंच हे त्यांनी ठाणलं.
घरात चाललेला वाद सारा कल्याणीच्या कानावर जात होता. आपणामुळं बापू गेले, भावा बहिणीत पुन्हा जुना वाद उफाळून येतोय व आता अप्पा जमीन दिल्याशिवाय राहणार नाहीत हे तिनं ओळखलं. आपल्याला सुखी करण्याच्या नादात अप्पा आपल्या उमेश व रमेश भावांना भिकेला लावेल हे तिच्या मनाला चटके देऊ लागलं. बापुच्या दु:खावर हे घाव तिला आणखीनच जिव्हारी लागू लागले.
पण....
पण...
कल्याण डोळ्यासमोर आला की ती हे सारं विसरत अप्पा जे करताय तेच योग्य समजत मूक आक्रोश करी.
सुरेंद्र ने एवीतेवी आग लागलीच आहे तर खाकच करुयात या इराद्यानं त्यानं आठ दिवस वाद होऊनही निगरगट्ट होत थांबावयाचं ठरवलं.म्हणून अक्का सांगत असुनही तो सातारला परतला नाही. पण त्याला एक बाब सलू लागली. आजोबा, वडिलांनी भरपूर कमवून ठेवलेली संपत्ती, देवानं दिलेलं सुस्वरूप, सैन्यात मोठा हुद्दा हे सारं कल्याणी का फेटाळतेय? घरचेही? का? ही आपल्या आत्मसन्मानास त्याला ठेच वाटू लागली.
या साऱ्या गोष्टी कल्याणच्या कानावर जात होत्या. पण आपण वादात कोणत्या नात्यानं पडणार? म्हणून तो टाळू लागला. की आतली कळ त्याला ते टाळावयास भाग पाडत होती हे कळेना. बापूंनी दवाखान्यात जातांना सांगितलेलं आठवलं की तो अस्वस्थ होई. कल्याणीच्या निर्णयाची तो वाट पाहू लागला. सारा गुंथनकाला वाढत चाललेला. सुरेंद्र अप्पाची, कल्याण कल्याणीची वाट पाहू लागले.
अप्पानं साऱ्या जमिनीचा बोजा उतरवत उतारे काढत सनदा तयार केल्या व तारीख ठरवत खरेदी करण्यास सिद्ध झाला.
कल्याणीनं झब्बूला बोलवत कल्याणला भेटावयास लावलं. पण सारे घरात असतांना कसं शक्य? एरवी बापू अप्पा असतांना त्याला भिती वाटेना पण सुरेंद्र? अनायासे नाशिकला बापुंच्या काही विधी करण्यासाठी अप्पा, द्वारकाबाई कल्याणीला घेऊन निघाले. अप्पांनी कल्याणला ही घेतलं. रात्री मुक्काम असतांना कल्याण व कल्याणीस संधी मिळाली. फिरण्या निमीत्ताने द्वारका काकीस घेत कल्याण कल्याणी निघाले. गोदाकाठी घाटावर शांत जागा पाहत बसले.
द्वारकाबाई देवळाकडं निघाल्या.

" कल्याण!..."
" ..........." गोदाकाठ एकदम सुन्न
" एका महिन्यात सारे संदर्भ बदलू पाहत आहेत! अप्पा संदर्भ बदलू नयेत म्हणून सारी जमीन डावावर लावत आहेत!"
" अप्पाच्या या प्रयत्नात बापूंच्या आत्म्यास शांती लाभेल का?" कल्याण गंभीर होतं सुस्कारा सोडत विचारता झाला.
" लाभायला हवी! अप्पा बापूंचं वचन तर पूर्ण करत आहेत ना!"
" वचन पूर्ण करत आहेत की पालटवत आहेत?" कल्याण बोलता बोलता थरथरू लागला.
तसा कल्याणीचा धीर खचू लागला.
" माझ्यापेक्षा तुला निर्णय घ्यायचाय! म्हणून तुला काय वाटतं हे महत्वाचं"
कल्याण सल्ला देण्यापेक्षा कल्याणीच्या मनात काय चाललंय रे जोखू पाहत होता.
" कल्याण ,मी माझ्या संदर्भात विचार करतांना अप्पा बरोबर करताहेत असं वाटतंय.पण बापू आठवले की अप्पांना आपल्या साठी भिकारी करणं योग्य नाही वाट" कल्याणीनं कल्याणचा हात थरथरत हातात घेतला.
" मग निर्णय तू घे!"
" पण माझ्या निर्णयानं ......." तिला पुढे बोलताच आलं नाही.जोराचा हुंदका फुटला व ती कल्याणला बिलगत जोरजोरात रडू लागली. ताबा ठेवण्याचा प्रयत्न करून ही त्याचा संयम सुटलाच व तिला छातीशी घट्ट धरत तो ही कित्येक वर्षानंतर रडू लागला.
" संदर्भ बदलतील ही भिती वाटते ना!" त्यानं हुंदक्याला मोकळी वाट करत विचारलंच.
" बापुंच्या वचनानं कुणीच सुखी होणार नाही रे!
" अप्पा जमीन देतील ही पण बापूंच्या आत्म्यास शांती मिळणार नाही व उमेश रमेश भिकेला लागतील!" कल्याण मनावर दगड ठेवत समजवू लागला.
" पण मग जगायचं कसं?"
" कल्याणी! साथीनं नाही जगता आलं तरी मरण साथीनं येईन याची वाट पाहत जगून पाहू!" कल्याण थरथरत बोलला.
" नाही....! कदापि नाही..." त्या पेक्षा आताच सोबत...."
" त्यानं काय हासील होणार ! शेवटी निखालस प्रेमास पापाचा शिक्काच!"

परत कल्याणी किती तरी वेळ तशीच रडत राहिली.कोंडी फुटेना.
दोघांनाही सारं झुगारत एक व्हावं व संदर्भ बदलू देऊच नयेत असंच वाटू लागलं पण बापूंचं शेवटचं बोलणं आठवलं की पुन्हा....
" कल्याणी निर्णय घ्यायला तू स्वतंत्र आहेस! त्यात मी अडसर करणार नाही!" असा दोन्ही बाजुचा सुटा पेच टाकत कल्याण तिला उठवू लागला.
कल्याणीनं पुन्हा त्याला करकचून कवेत घेतलं. ही मिठी सुटूच नये असंच दोघांना वाटत होतं. पण नियतीनं घडवून आणलेली ही एकांतातली शेवटचीच मिठी होती याची त्यांना कुठं जाण होती.
गुंता तसाच ठेवत विधी करत ते परतले.
खरेदीचा दिवस उजाडला. पण त्या आधीच्या रात्री कल्याणीनं ' मी सुरेंद्रशी लग्नास तयार असल्याचं सांगत अप्पास विनंती केली. पण अप्पानं साफ धुडकावली. अप्पा ऐकणार नाहीत हे कल्याणीनं ओळखलं.
अप्पा उमेश, सुरेंद्र, अक्काला घेत निघाले.रमेशला राधा ताई व कल्याणीस आणावयास सांगितलं. पण पुढे सुरेंद्र गाडीतून उतरला.त्यानं मी मागून येणाऱ्या गाडीतून येतोच सांगत त्यांना पुढं काढलं. मागून येणाऱ्या गाडीत बसत तो नागेश्वरला निघाला. महादेवाचा आशीर्वाद घेत राधाताई ,द्वारकाताई यांच्या समक्ष त्यानं रात्री ठरल्या प्रमाणं कल्याणीस वरमाला टाकली.अप्पा ऐकत नाही म्हणून कल्याणीनं त्याला रात्रीच होकार दिला तो तर तयारच होता. राधाबाई इच्छा नसून आपल्या पतीच्या अंतिम इच्छेखातर तयार झाल्या. महादेव मंदिरात माला टाकून दोघे बंधनात अडकली.
ज्या महादेवाच्या पिंडीवर बिल्वपत्र वाहत बापूंनी अक्कास वचन दिलं होतं; त्याच महादेवासमोर आज सुरेद्रला माला टाकत कल्याणी वचन पूर्ती करत होती. सुरेंद्रनं तेथूनच अप्पास फोन केला.
" अप्पा खरेदी रद्द करा व तातडीनं बोरवणला पोहोचा. आपल्या लाडक्या पोरीनं लग्न केलंय .या लवकर आशीर्वाद द्यायला!"
अप्पास आपण काय ऐकतोय यावर विश्वास बसेचना. पण सारा प्रकार समजताच ते परतले. व कल्याणीवर आक्रोश करत डाफरले.
" मन मारून मनासारखंच केलंस ना! आपलं आयुष्य पणाला लावलंस आपल्या भावांसाठी!" नी ते गदगदू लागले.
सखू अक्कास तिव्रतेनं स्वत:ची लाज वाटू लागली. या पोरीनं भावांना वाचवण्या साठी काय केलं नी आपण कसं वागलो. पण त्या ही स्थितीत अशी सून आपल्या घरी येतेय याचं अक्कास समाधान वाटलं.
अप्पानं लगेच तयारी करत बापूंचं दु:खं उरात ठेवत साऱ्या गावासाठी जेवणाची पंगत दिली.
तीन दिवसानंतर सुरेंद्र राव कल्याणीस घेत सजवलेल्या गाडीत अक्कासह परतू लागले.
साऱ्या घटना इतक्या जलद घडल्या की कल्याण सुन्न झाला. कल्याणीनं घेतलेल्या निर्णयाचं त्या घडीला समाधान वाटलं पण त्याच्या भविष्यात ज्या ज्वाला उठल्या त्यात तो होरपळायला सुरूवात झाली. जेवणाच्या पंगतीत तो गेलाच नाही. झब्बूला विनवूनही तो ही गेला नाही. अप्पाची बोलवायची हिम्मतच झाली नाही म्हणूश रमेशला पाठवलं तरी कल्याण आला नाही. आता मात्र कल्याणी चाललीय म्हणून अप्पा स्वत: त्याला बोलवायला गेले.
कल्याण उठला.
माडीच्या अंगणात सजलेली गाडी उभी. कल्याण बाहेरच उभा राहिला. अख्खा चौधरीवाडा कल्याणीस निरोप देण्यासाठी गोळा झालेला. कल्याणी राधाताई द्वारकाकाकीच्या गळ्यात पडत रडत रडत बाहेर निघू लागली. कमानीला धरून ओघळणारे अश्रू लपवण्यासाठी पाठमोऱ्या अप्पाजवळ येताच ती अप्पाच्या पायास बिलगली नी पहाडासारखे अप्पा, आपल्या ढोलानं कधीकाळी साऱ्या बोरवणाला नाचवणारे अप्पा बत्ती लावलेल्या बुरुजासारखे ढासळले.
" पोरी, बापाच्या व काकांनी दिलेल्या वचनानं तुझा बळी घेतला!" अप्पा लहान पोरागत रडू लागले. कल्याणीनं अप्पाची आसवे पुसली व ती पुढे सरकली.
अंगणात गाडी शेजारीच उभ्या कल्याणवर तिचं लक्ष गेलं नी घायाळ हरणीला काय करावं उमगेना .ती चक्रावून तशीच बावरून उभी राहिली. कल्याणनं घालमेल ओळखली तो तसाच शांतपणे पुढे सरकला व तिला घेत गाडीचा दरवाजा उघडत
" बसा मॅडम!" सावकाश उद्गारला नी ती तशीच परत उतरत कसलाच विचार न करता त्याला बिलगली. हे पाहून अप्पा राधाताई, द्वारकाबाई जास्तच गहिवरुन आक्रंदल्या.
कल्याणनं महामुश्किलीनं सयंमाचा बांध रोखत कल्याणीस गाडीत बसवलं. सुरेंद्र ची नस तडकली.बसता बसता कल्याणीनं त्याच्या हातात काहीतरी सरकवलं. त्यानं कुणाची नजर जाणार नाही असं खिशात सरकवलं.
गाडी निघाली. झब्बूच्या खांद्यावर हात ठेवत कल्याण परतला. खिशातून कल्याणीनं दिलेली वस्तू त्यानं पाहिली. गणपती विसर्जनात ढोल वाजवणाऱ्या कल्याणचा फोटो फोटोग्राफरनं काढलेला होता. मागं
त्याच्याकडून तो कल्याणी घेऊन गेली होती. तिनं जळगावहुन त्या फोटोवरून चांदीची छोटीशी मूर्ती घडवून तीच कल्याणला जातांना दिली.आपल्या ढोल बडवतांनाच्या मूर्तीला पाहताच त्याला सदा बाबा दिसू लागला. आपला प्रवास त्याच दिशेनं सुरू झाला म्हणून तो दोन दिवस खोलीतून बाहेर पडलाच नाही. झब्बूनं माईस फोन करत बोरवणला बोलवलं. माईला अचानक आलेलं पाहताच तो माईला बिलगत ढसाढसा रडू लागला.
" कल्याण बाबा! सदा बाबाला आठव! त्यांच्या दु:खापुढं तुझं दु:खं काहीच नाही. तुझ्या पुढं शेकडो कल्याणी पाणी भरतील! कशाला हिम्मत हारतोस!" माई आपल्या ह्रदयात दाबून धरलेलं तरूणपणातलं दु:खं दाबत पोरास धीर देऊ लागल्या.
" माई, दोष कुणाचा तेच कळत नाही! सदा बाबा पुढं दोषी नजरेसमोर होते पण मला दोषी कोण हेच कळत नाही!"
" बाबा! माणसाचं सांप्रत कर्म थोर असली तरी पूर्व जन्मीची संचितं प्रारब्धात येत परिस्थीती हिशोबाचा लेखाजोखा ठेवत असावी म्हणून कधी कधी परिस्थीतीच दोषी असते! तूर्तास हे समज पण उठ! नाउमेद होऊ नको!"
माईनं हवापालट म्हणून त्याला चिखलीस नेलं.
पण बदललेले संदर्भ सर्व स्थळावर परिणाम करतात. हे अनुभवत भंगणारी शांती त्याला चिखलीतही शांती लागू देईना.चार दिवस मुश्कीलीनं काढत तो परतला.
बोरवण जवळ येता येता त्याला बापूंचा मळा लागला. उमेश रमेश नाल्या काठावरील बोरींना झोडपत बोरं तोडत गोण्या भरत होते. विहीरीजवळ बाईक उभी करत तो पडलेल्या पट्ट्याच्या पलंगावर आडवा झाला. रमेश हातातलं काम सोडून आला.
" बाबा! केव्हा आलात!" विचारत त्यानं पाण्याचा गडवा भरून दिला.
" आताच आलो, घेतलं पाणी. प्रवासाचं थकलोय. झोपतो थोडं!"
" चला ना घरीच सोडतो मग!"
" नाही रे मळ्यातली शुद्ध हवा बरी म्हणून पडतो थोडा!" म्हणत कल्याणनं डोळे लावले.
रमेश डोक्याला लावण्यासाठी झोपडीतून ऊशी घेऊन आला व ती देत बोरं तोडायला निघून गेला. बोराचा पहिलाच तोडा असल्यानं धांदल होती.
पडल्या पडल्या एका वर्षापूर्वी आपण याच दिवसात आलो होतो! एका वर्षात माणसाच्या जिवनात एवढी ढवळाढवळ होऊ शकते यावर त्याचा विश्वास बसेना!
त्या दिवशी याच पलंगावर बापू बसलेले होते! नी आज कुठं आहेत बापू! त्याच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या व खालची उशी ओली होऊ लागली.
" पोरांनो, एवढी गाडी भरण्यातच आली. थोडं थांबा नी मग सोबतच जाऊ गावात!" हे बापूंचं बोलणं आठवलं. जर त्या दिवशी आपण या मळ्यात थांबलो नसतो तर कदाचित गाव आपल्या नजरेत भरलं नसतं व येथे दवाखाना टाकलाही नसता! किती बरं झालं असतं! जगलो असतो कोणत्या तरी गावात भावशून्य संदर्भांना गोंजारत. किंवा टाकला जरी असता तरी माडीशी इतका घनिष्ठ संबंध आलाच नसता! त्या दिवशी इथं थांबलो हा पहिला अपघात नी बापूसोबत गावात गेलो दुसरा अपघात!
पडल्या पडल्या त्याला बोरांचा घमघमाट जाणवू लागला. त्याला बापूनं गाडी भरेपर्यंत बोरं खायला पाठवलेलं आठवलं.
' कल्याण बोर किती मस्त लगडलीय रे!' दिनाचं कल्याणीकडे पाहून बोलणं नी त्यावर परक्या गावात आहोत ही जाण ठेवत ' सांभाळ बोरीला काटेपण आहेत' हे आपलं सावधानतेचं बोलणं आठवलं. बोरीला काटेच निघाले. परिस्थीतीनं गावात येतानाच जणु आपल्याला सावध केलं असावं.
बोरी आड उभी कल्याणी त्याला दिसू लागली व तो भारावल्यागत तडक उठत नाल्याकडील बोरीच्या झाडाकडं धुंदीतच निघाला.त्याच झाडाजवळ आला. पण तिथं ना कल्याणी होती ना ' तिकडच्या झाडाची खा' म्हणतांना बोरागत टपाटप पडणारे बोल.मागच्या वर्षीसारखाच बहर असुनही त्याला तिथं भकास वाटू लागलं.तो त्या बोरीच्या खोडाला धरत हालवत
" कल्याणीssss...!" म्हणून जोरात ओरडला. रमेश आला त्यानं कल्याण बाबास बाईकवर बसवत घरी सोडलं.
दहा बारा दिवस तो भांबावल्यागतच वावरू लागला. ना धड पेशंट ना धड कुणाशी बोलणं. त्यातच पौषी पुनव आली. सायंकाळी गावात फिरत जेमतेम काही पेशंट उरकत तो घरी आला. झब्बूनं टाकलेली खिचडीचे दोन चार घास गिळले .
" झब्बू बरेच दिवस झालेत चल मस्त नदीकाठी फिरायला जाऊ!"
झब्बूला बाबा स्वत: फिरायचं सांगताहेत म्हटल्यावर तो आनंदानं तयार झाला. त्यानं अंगावर पांघरण्यासाठी शाल दिली.
फिरत फिरत ते सिताराम भरवाडच्या वाड्याजवळ येताच लाखा गोविंदानं त्यांना घरात बोलवत दूधाचा ग्लास दिला. ग्लास द्यायला राधाभाभीच आली नी.त्यानं ग्लास घेताच राधाभाभी व गोविंदाकडं पाहत
" भाभी उष्ट दूध पिऊन खरच प्रेम वाढतं का? तसं असतं तर..."
हे ऐकताच भाभी ला कल्याणी ताई आठवली नी ती जागेवरच मट्टकन बसली.गोविंदानंही कोजागरी पुनव आठवत डोळ्यात तरारलेली आसवं पुसली.त्यानं कसंबसं अर्धा ग्लास दूध घोटलं.ग्लास झब्बूकडं देत
" झब्बू किती आटापिटा केला होतास तू! पण तरी उष्ट दूध पिणारे निघून गेलेच ना! नी तू मात्र आमच्या प्रेमाखातर रात्रंदिवस कुढतोय!" कल्याण बोलला नी झब्बू ढसाढसा रडू लागला.
" बाबा! अभी आगे का सोचो! जो बात हो गई वो बाके बिहारी पर छोड दो!" लाखा डाॅक्टराच्या खाद्यावर हात ठेवत धीर देऊ लागला.
कल्याण उठला व झब्बू बरोबर पात्रात उतरला. आजही पात्रात कोजागरी सारखंच चांदणं सांडलं होतं. चंद्र तेजाळत आभा फेकत होता. फक्त थंडी जास्त होती इतकंच. अनेर काठावर शेतातल्या रब्बी ज्वारीत व दादरीत रान डुक्करं व कोल्ही फिरत होती. मध्येच कोल्ही कुई उठवत होते.
कल्याण धारेला समांतर चालू लागला. एका ठिकाणी तो थांबताच
" बाबा काय झालं?" झब्बूनं विचारलं.
" झब्बू इथंच काही तरी पडलंय रे!"
झब्बूनं मोबाईलचा टाॅर्च लावत शोधायचा प्रयत्न केला
" झब्बू खरच तू पण गबाळा आहेस भावा!"
" का काय झालं?"
" अरे भावा इथं काही तरी पडलंय पण आता ते इथं कशाला सापडेल!"
झब्बू काय ते समजला व चपापला.
" साले सारे संदर्भ इतक्या लवकर कसे बदलले रे! ते ही माझ्याच बाबतीत! तुझ्या ताईनं विचारलं नी मोठा तिसमारखा होत तिला प्रवचन देत होतो,याच जागेवर.पण आज तेच आठवून आत जाळ होतोय रे झब्बू! कुठंय ती! मला थोडा वेळ एकटं सोड.नाहीतर मी ....."
झब्बूनं रडत खाली बसत कल्याणला मोकळं सोडलं.
कल्याणला आपल्या हातातल्या बोटात कुणीतरी बोटं अडकवतंय असं वाटू लागलं. तो पुढं चालू लागला. वारा त्याला भकास भेसूर भासू लागला. त्यानं चंद्राकडं आशेनं पाहिलं तर चंद्र त्याला लाल दिसू लागला. त्या लालीत लाखो चांदण्या अदृश्य झाल्या. तो चंद्रकोर धुंडू लागला. पण चंद्रकोर तर चंद्रात केव्हाचीच निमाली होती. त्यानं पाण्याची धार ओलांडली.व माघारी फिरला. तो आता बोरवणच्या अगदी समोर असलेल्या गावाजवळ आला.
" बाबा रात्र झाली आता तिकडं कुठं? माघारी फिर!" मागंमागं येणारा झब्बू त्याला विनवू लागला.
" झब्बू चूप बैस मी चंद्र कोर शोधतोय!"
तो गावात वर चढू लागला. त्याच गावाच्या शाळेत कल्याणी होती. लग्नानंतर एका वर्षाची बिन पगारी रजा तिनं टाकली होती. सुरेंद्र तिला
" ही बाराखडी पुरे आता, पाट्या पुसा" सांगत राजीनामा द्यायला लावला पण तिनं तूर्तास वर्षाची रजा घेतल्याची चर्चा त्यानं ऐकली होती.
बाराच्या सुमारास तो भुंकणाऱ्या कुत्र्यांना टाळत शाल पांघरून शाळेजवळ आला.
शाळेचं फाटक उघडत ते आवारात आले. एकदा पावसाळ्यात शिरसाठ गुरूजींनी पावसाळ्यात पसरणारे आजार व घ्यावयाची काळजी यावर लेक्चर द्यायला त्याला बोलवलं होतं. त्या आधीच माडीवर अपरात्री गेल्याचं प्रकरण घडलं होतं. कल्याणी ही रागात तर आपण जास्त रागात. त्या लहान पोरांसमोर आपण एक तास फाड फाड बोललो होतो. जे बोललो ते कल्याणीसाठीच. बिचारी लहान लेकरं उंदरागत तोंड करत गुरुजींनी धरून आणलेलं बिलंदर माकड काय बोलतंय याच विचारात मुंडकी खाजवत होती.
शिरसाठ गुरुजींनी बापूंच्या ओळखीचे डाॅक्टर म्हणून कल्याणीकरवीच शाल श्रीफळ व गुलाबपुष्प दिलं होतं. इथं इथंच स्विकारलं आपण! तो हात पुढं करत " कल्याणी दे ना गं गुलाब! तो गुलाब किती तरी दिवस मी जपला होता.
झब्बू नं हात धरत कल्याणला विनवत नदीतून घरी आणलं.
पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला.
झोपेतही तो बरळतच होता.
" कल्याणी निदान एकदा तरी ये ना गं! नाही आलीस तर मी मी...."
एकलिंगानं त्याचं मागणं ऐकलं असावं.
पहाटेच राधाताईच्या छातीत कळा सुरू झाल्या उमेश बोलवायला आला. तो नुकताच झोपलेला. हल्ली रात्री कुणी ही आलं तरी त्याला उठावंसंच वाटे ना. पण झब्बू त्याला हलवून
" बाबा मी चाललो बॅग घेऊन ,या तुम्ही!" म्हणत तो निघे नी मग त्याला नाईलाजानं निघावंच लागे. पूर्वी तो एका हाकेवर बॅग घेऊन निघे. आज ही झब्बूनं बॅग घेत निघाला. तो डोळे चोळत निघाला. माडीजवळ येताच त्याला भरून आलं. राधाताईचा रक्तदाब कमालीचा वाढला होता. त्यानं त्वरीत शिरपूरला नेलं. पण राधाताई गेल्या व कल्याणी सातारहून रडतच आली. सुरेंद्र सिमेवर गेल्यानं त्याला येताच आलं नाही.
पहाटेचा फोन जाऊनही तिला यायला नऊ वाजले. नंतर रात्रीच अनेर काठावर मुखाग्नी दिला. लग्नानंतर एक दिड महिन्यात परतलेल्या कल्याणीला पाहताच तो तीळ तीळ तुटला तर कल्याणी?........
तिची तर वठलेल्या खोडागतच स्थिती.

.
.
सुरेंद्र नंतर आला. कल्याणी तेराव्यानंतर सातारला परतणार होती.पण त्यापूर्वी कल्याणीनं झब्बूला बोलावलं व कल्याणची भेट घेतलीच!

क्रमशः
✒ वा....पा..
8275314774.
नंदुरबार.
8275314774.
नंदुरबार.