मागील (चौथ्या) भागाची लिंक
गानू आज्जी आणि तिची अंगाई...
सरसरसर करीत माझ्या तळपायातून भीतीची तीच थंड जाणीव शरीरभर पसरली. मला तो प्रसंग आठवला. न जाणो केव्हा घडलेला ? ती घटना घडून एव्हाना चार सहा वर्ष ऊलटून गेलेली. त्या दिवसानंतर मी कधी सुनंदनच्या आज्जीला पाहिलंही नव्हतं. ना सणासुदीला, ना लगीन सराईला. जणू ती अस्तित्वातच नव्हती. पण ती आठवण अजून मनात ताजी होती. मघापासूनचा माझा धीरोदत्तपण क्षणार्धात गळून पडला. माझा भीतीने वाकडा झालेला चेहरा काकुंना बहुदा दिसला असावा.
‘‘ घाबरु नको. घाबरण्यासारखं काही नाही.’’ त्याही बळ एकवटत मला समजावत म्हणाल्या.‘‘ मी सांगते ते लक्ष देऊन ऐक. घाबरण्याची खरंच काही गरज नाही. मी लागलीच परतणार आहे. तुला फार तर दोन तास एकट्याने काढायचेत. कंटाळा आला तर माधव उठल्यावर त्याला घेऊन बाहेर पड. कंटाळा आला तर नव्हे,तो उठल्यावर त्याला घेऊन बाहेर पडच. दुसरी गोष्ट..हा नेवेद्य ’’ काकु त्या ताटाकडे माझं लक्ष वेधत म्हणू लागल्या,‘‘ हा नेवेद्य मी बोळातल्या त्या खोलीपाशी ठेवते आहे. एरवी खोलीला कुलुप असतं; पण आज लावत येत नाही. आहेत काही कारणं. ती जाणून घेण्याएवढा तू मोठा नाहीस आणि तेवढा वेळही आपल्याकडे नाही.’’

माझं ह्रद्य एव्हाना चांगलंच जोरात धडधडू लागलं होतं. कपाळावर घाम जमलेला. ‘‘ त्या खोलीतून, बोळातून एखाद वेळेस काही आवाज येतील. ते अर्थात आजीचे असतील. तू ओळखतोस तिला. एकदा पाह्यलयस तू तिला, हो ना? ’’
मान हलवताना मला प्रचंड प्रयास घ्यावे लागले.
‘‘ आजी ओरडेल,हाक मारेल. आपण लक्ष द्यायचं नाही. हे असं घडेलच असं नाही. पण आजचा दिवस पाहता घडण्याच्या शक्यता जास्त आहेत. ती कदाचीत एखादं गाणं म्हणेल, आपण घाबरायचं नाही. तू हुषार मुलगा आहेस. पुढच्या वर्षी आठवीत जाशील. आणि एक लक्षात ठेव. हे तू तुझ्या मित्रासाठी, सुनंदनसाठी करतो आहेस, बरोबर ?’’
खोल ह्रद्यातून उसळी मारून आलेली भीती दाबत मी निमुट मान डोलावली.
‘‘ सर्वात महत्वाचं. जर परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असं वाटलं, तर...’’ काकु थांबल्या त्यांना बहुदा शब्दाची जुळवाजुळव करायची होती किंवा हे सारं माझ्यासारख्या लहान मुलाला कसं सांगावं हा प्रश्न त्यांना पडला असावा. शेवटी एक मोठा निश्वास टाकत त्या म्हणाल्या,
‘‘ सर्वात महत्वाचं म्हणजे, जर परिस्थिती हाताबाहेर जाते आहे असं वाटलं, तर...तर जोरात किंचाळत म्हणायचं, चिखलभात खा. परत जा. माती मायेची शपथ आहे तुला. कळलं ? काय म्हणायचं, चिखलभात खा. परत जा. मातीमायेची शपथ आहे तुला. म्हण पाहू माझ्यासोबत.’’
मी थरथरत्या स्वरात काकुंच्या आवाजात माझा अशक्त आवाज मिसळत म्हटलं,
‘‘ चिखलभात खा. परत जा.
मातीमायेची शपथ आहे तुला.’’
एवढं बोलून झाल्यावर काकु भिवामामाला हाक मारीत उठल्या आणि बाहेर जाऊन बैलगाडीत बसल्या. मीही त्यांच्या मागोमाग गेलो. जाताजाता काकुंनी शेवटचं एकदा माझ्याकडे पाहिलं.त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी काळजी होती, भीती होती.
‘‘ जाऊ ना बाळा.’’ काकुंनी विचारलं.
‘‘ जा. काळजी करु नका काकु. मी ठेवतो लक्ष.’’ मी उसनं आव आणत म्हणालो. पण तेवढ्यानंही त्यांचा चेहेरा खुलला. एवढ्यात भिवाकाकाने बैल हाकले. गानु काकु,त्यांच्या मांडीवर झोपलेला सुनंदन आणि भिवाकाका वाडीतून बाहेर पडत दृष्टीआड झाले, तेव्हा माझ्या सर्वांगावर भीती कोसळली होती.

बैलगाडी दिसेनासी झाली. थोड्यावेळाने गाडीने उडवलेला धुरळाही खाली बसला. आणि मी खर्या अर्थाने वाडीत एकटा उरलो. मी सभोवताली नजर फिरवली.
आज वाडी किती वेगळी दिसत होती !
एरवी आपल्या झुळुकांनी अंगावर सुखद शहारा आणणारी झाडे आता एकदम अनोळखीच वाटत होती. एकटी एकटी आणि घुम्म. जिथे नजर जाईल तिथे झाडंच झाडं. झाडांनी उजेडही अडवलेला. तसा पश्चिमेकडे अजूनही सूर्य होता. अगदी पूर्ण तांबूस सोलीव गोळ्याएवढा मोठा;पण त्याचं तेज झपाट्याने क्षय पावत होतं.

बाहेर फार वेळ न घालवता मी आत गेलो. आत थेट माजघरात. तिथे देव्हार्यातले देव जणू माझीच वाट पहात बसल्यागत त्या भेसूर प्रकाशात भयाण चमकत होते. तेव्हा मी काही फार लहान नव्हतो. असेन तेरा चौदा वर्षांचा. ते वय म्हणजे धड लहानही वा मोठंही असण्याचं नव्हतं. ती घटना घडून चार वर्षे उलटली होती. एव्हाना माझी देव्हार्याविषयीची भीतीही थोडी कमी झालेली. पण त्यादिवशी त्या एकांतात गानुंच्या देव्हार्यातल्या देवांनी माझ्या अंगाचा थरकाप उडवला.
मी देव्हार्याकडे पाहणं शक्य तेवढं टाळत होतो. माजघरात बसायचा कंटाळा आला की, मध्येच येऊन बाहेर पडवीतल्या आजोबांच्या लोखंडी पलंगावर येऊन बसायचो. या ना त्या कारणे वेळ मारून नेण्याचे शक्य ते सारे प्रयत्न मी करत होतो.
दहा मिनीटे गेली.
पंधरा गेली.
वीस, तीस. चांगला तासभर गेला.

माझ्या ह्रद्याची धडधड आता स्थिरावली होती. कंटाळा आला आणि मी पुन्हा उठून माजघरात गेलो. बोळाच्या चौकटीच्या अगदी विरुद्ध बाजुला समोर आणखी एक दरवाजा होता. परसात उघडणारा. तो दरवाजा उघडून मी बाग न्याहाळत बसलो. उन्हाचे ठिपके तर माझ्या डोळ्यांसमोर सावळसर होत नाहीसे झाले. झाडांच्या सावल्या लांब होत होत पार माजघरात शिरल्या आणि नंतर दिसेनाशा झाल्या. गानुंच्या बागेत संधीप्रकाश जरा जास्तच काळसर वाटतो. काळोखाचा सख्खा भाऊच म्हणा ना. संधीप्रकाश फार काळ रेंगाळलाच नाही. आल्या आल्याच गुल झाला. म्हणता म्हणता बाग काळीठिक्कर पडली. आता नजरेस पडत होते ते झाडांचे नुसते आकार. अंधाराने गिळलेले. अंधार पुरेसा पडतो न पडतो तोच आकाशातून लठ्ठ वाटोळा चंद्र झरझर वर आला आणि एके ठिकाणी स्थिरावला. चंद्राच्या प्रकाशानं गानुंच्या परसात अनेक नक्षी चितारल्या. परसातल्या पाचोळ्यावर निळसर चंदेरी रंगाचे ठिपके पडले. बाहेर आता मंद वारे वाहु लागलेले. वार्याच्या झुळुका अंगावर सुखद थंडावा आणत होत्या.
किती वेळ गेला होता याचा मला अंदाजच राहिला नव्हता. काकु एव्हाना परतायला हव्या होत्या. शेवटी बाहेर पाहण्याचा कंटाळा आल्यावर परसात उघडणारं माजघराचं दार बंद, त्याला अडसर अडकवून मी मागे वळलो.
मागे वळलो आणि पुतळा झाल्यागत जागीच थांबलो -

बोळाच्या तोंडाशी गानुआजी होत्या..! चार पायांवर एखादं कुत्रं चालावं तशा रांगत रांगत पुढे सरकणाऱ्या गानु आज्जी !!
क्रमशः
(हा भाग नाईलाजाने काहीसा छोटा झाला. *पुढचा सहावा भाग हा अंतिम आणि खूप मोठा आहे.* काही तासांत लगेच टाकतो. कथा खूप दीर्घ आहे हे एव्हाना कळलंच असेल. कथेचा सगळा मजकूर एकाच वेळी पोस्टमध्ये बसतही नव्हता... भाग करतानाही कुठे थांबावं, कुठून सुरुवात करावी, पुढच्या भागाची उत्कंठा, उत्सुकता कायम ठेवावी अथवा वाढवावी इत्यादी गोष्टींचा विचार करून भाग पाडावे लागतात... त्यामुळे सारासार विचार करून तसेच हे नीट वाचून टिप्पण्या कराव्यात... धन्यवाद.)

कथा - श्री ऋषिकेश गुप्ते.
C/P
पुढचा (अंतिम) भाग :