कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन
लेखक :- मंदार साखरकर
भाग :- १४
.
आई बोलते मला माहिती आहे, तुम्ही दोघी काही कामाच्या नाहीत कसे वाचले ते.
ती बिनडोक पहिली पिशाच्च कशी चुकी केली. गिरिजा अजून काय बोलून गेला तो.
.
गिरिजा बोलते जे तुम्हाला माहिती आहे ते सगळे.
.
आई बोलते ठीक आहे आणि गप्प बसायचे. जा वर मित्रांकडे नको थांब. तुला तर किचनकडे बघून बोलणार, तेवढ्यात गिरिजा पळत जात आईला जीभ दाखवत वर जाते. ए बिनडोकं मुलींनो तयार झाले का जेवण.
.
सुरेखा बोलते हो झाले या सगळे.
.
जेवण करून गिरिजा आपल्या खोलीत जात बोलते मला बोलायचे आहे आत ये.
.
सुरेखा बोलते आली मी जा तू.
.
सुरेखा जरा वेळाने गिरीजाच्या खोलीत जात बोलते बोल काय बोलायचे आहे तुला.
.
गिरिजा दरवाजा बंद करून सुरेखाला मिठी मारत बोलते. आजून किती माझ्या साठी तू एकनार आणि सहन करणार आणि किती शक्ती गमवणार तू बोल ना.
.
सुरेखा बोलते तुझ्यासाठी काही पण करीन मी. हेच बोलायच होते का तुला.
.
गिरिजा बोलते नाही तो बोलून गेला आहे. आईला सोडू नका. जर ती बाबांच्या हाती लागली तर ते तिला मारून ताकतील आणि त्याच बरोबर आई पण मरेल ग. बघ तू काय करायचे ते, खुशीला बोल त्यांना संपव ना आणि ती रक्षा कोन आहे.
.
सुरेखा बोलते पाहिले रडायचे बंद हो.
दोन्ही आईला काही होणार नाही.
मला माहिती आहे ती कुठे आहे आणि आता समजले ते आई तिला का वाचवते आहे. म्हणून राघव हेच सांगायला गोवाला आला होता. तो आता कुठे जातोय सांगितले का त्यांनी. म्हणजे त्या दिवशी शुभदा आई आली होती मुग्धाला वाचवायला. रक्षा ही पिशाच्च दुनियेतील माफिया आहे.
.
गिरिजा बोलते हे काय नवीन माफिया.
तुमच्यात पण माफिया असतात वा मस्त ग.
.
सुरेखा हो बोलून हळूच चुटकी वाजवते आणि बोलते सोड मला.
.
गिरिजा बोलते मी नाही आणि टिचकी वाजून काही फायदा नाही. चल जा तू आता.
.
खुशी बोलते बाबा काय जाणवले तुम्हाला.
.
बाबा बोलतात हो ग डोकं जरा घरघरल्या सारखे वाटले ग.
.
सुरेखा बाहेर येत खुशीला बोलते आत ये जरा.
.
खुशी बोलते काय ग ताई कशाला बोलवले मला.
.
सुरेखा बोलते आज पासून तू राघववर लक्ष दे. तो गिरीजाला कुठे जातो ते काही सांगितले नाही. कदाचीत ती शुभदा आई असणार मुग्धाला वाचवायला आली होती ती.
आजून एक बाबांच्या हातात लागली नाही पाहिजे ती समजले. जर ती त्यांना भेटली तर दोन जण जगातून जातील आपली आई पण.
.
खुशी बोलते काय बोलते ती का मदत करेल आणि काय बोलते आहे ते कसे शक्य आहे.
.
सुरेखा बोलते जा पहिले राघवकुठे गेला तो बघ आणि हो आजून एक कामकर ती रक्षा बद्दल बघ जरा.
.
खुशी बोलते आता ही रक्षा कोण ग.
..
सुरेखा बोलते अरे हो तुला कसे माहिती असणार ना. जाऊदे तू नको त्या भानगडीत पडू. साचीला पाठव जरा.
.
जरा वेळाने साची येत बोलते मला बोलावले तू.
.
सुरेखा दरवाजा बंद करते. तसे रूममध्ये बदल होत साची एका घरात उभी असते.
.
ती बोलते तू कोण आणि कुठून आलीस.
.
तशी साचीच्या शरीराचा उपयोग करून सुरेखा बोलते. रक्षा हे बघ मला माहिती आहे तू आणि साहिल या युगात आले आहेस. तू तुझे काम कर मी तुझ्या कामात ढवळा ढवळ करणार नाही. तू चंद्रकांत आणि त्याच्या साथीदारांना संपव.
तुझे वैरी महंत शास्त्री आले आहेत. माझ्या कामात तू येऊ नकोस बस हेच बोलायचे होते.
.
रक्षा बोलते ठीक आहे. पण तू त्याला संपवायचे नाही मी त्याला संपवणार आणि तुझ्या बाबाना पण ठीक आहे चालेल तर बोल. हो तुझी मुलगी बोलून गप्प बसले.
.
सुरेखा बोलते ठीक आहे. साहिलला बोल भेटायचे आहे मला. बोलून साचीला परत ये बोलून तिच्या शरीरातून बाहेर येते.
.
रूममध्ये येत साची बोलते हे काय होते.
.
सुरेखा बोलते काही नाही बस आता बोलून दरवाजा उघडते तर गिरिजा तिच्या अंगावर पडून बोलते तुला कोणी तरी भेटायला आले आहे बाहेर.
सुरेखा तिला सांभाळत बोलते काय ग बोलून तिला उभी करत बोलते काही ऐकले का तू.
कोण भेटायला आले आहे.
साची बाहेर नको निघू तू ईथेच बस, चल ग तू बाहेर येत बोलते तू.
लवकर आलास, गिरीजाला बोलते जा ग कॉफी आन बोलून खुर्चीवर बसते.
.
साहिल बोलतो निरोप भेटला मला तसा आलो बोल काय बोलायचे होते तुला.
.
सुरेखा बोलते एक काम होते. सुद्राला सोडावं आणि इथे आन आज रात्री ३.०० वाजे पर्यंत. तिच्या तीन अटी पैकी दोन मान्य आहे मला.
.
साहिल बोलतो ते नको करू काय, तिच्यात बदल आणला आहे मी पुस्तका मार्फत.
.
सुरेखा बोलते ठीक आहे मुली कश्या आहेत.
.
तेवढयात गिरिजा कॉफ़ी देत बोलते ही घ्या आणि ही तुला. जाते मी नाही तर परत मध्ये बोलली.
.
सुलेखा तिच्याकडे बघत बोलते हा साहिल मामा नाव ऐकले होते ना त्याचे हे उत्तर.
.
गिरिजा नमस्कार करून बोलते मामा काय.
.
साहिल बोलतो हो मामा जा आता तू.
.
गिरिजा बोलते बहीण तसे भाऊ काही फरक नाही. आई हाक मारत आत जाते. तशी बोलते हे काय मी कुठे आली आहे सुरेखा.
.
साहिल बोलतो तुझ्या घरी का स्वतःचे घर पण विसरली का गिरिजा.
.
गिरिजा बोलते हे माझे घर नाही आहे. हा कुठला तरी महाल दिसतो आहे.
.
साहिल बोलतो हा महालच आहे. बघ स्वतःला जरा आणि जा बाहेर फिरून बघ. तिथं पर्यंत मी आणि माझी ताई जर बोलतो.
.
गिरिजा स्वतःला बघून बोलते अरे हे काय माझे कपडे असे कसे बोलुन बाहेर जाते. तसे दरवाजाचा प्रहारेकरी तिला मुजरा करत बोलतो, लहान ताई साहेब कधी आल्यात.
.
गिरिजा दचकून बोलते मी मी आताच आले. मला बोला मी कुठे आहे.
.
सॅनिक तिच्याकडे बघून बोलतो तुम्ही हरिहरेश्वर राज्यात आहे. त्या कुंपण बाहेर जाऊ नका बोट दाखवत बोलतो.
.
तसे दोघे बाहेर येत बोलतात काही होणार नाही मुकुंदा जाऊदे.
.
तसा सॅनिक मुजरा करत बोलतो ताई साहेब तुम्ही.
.
अभिषेक येत बोलतो लावण्या वहिनी कधी आलात आणि लहान ताई साहेब पण.
.
गिरिजा बोलते मी लहान ताई साहेब नाही आहे. माझे नाव गिरिजा आहे. तुमची लहान ताई मी नाही आहे.
पाठी वळून बोलते उत्तर मिळाले मला तूच लावण्या आजून मस्त दिसते ह्या कपड्यात.
अशोक कुठे आहे ग.
.
अभिजित बोलतो प्रधानचे नाव घेऊन बोलते आहे ही तर.
.
लावण्या बोलते जाऊदे लक्ष्य देऊ नका. तिच्याकडे हे कुठे आहेत काही बोलून गेलेत का.
.
सॅनिक बोलतो आलेत प्रधान ते बघा
.
तशी आपल्याला सावरून गिरिजाला बोलते तोंड बंद कर आता समजले नाही गळ्यावरून अंगठा फिरवते.
.
अशोक घोड्यावरून उतरत जवळ येत बोलतो. स्वारी दरवाज्यावर आणि हेर साहिल पण वा लहान पण काय हेतू काय आहे. चला आत बोलू आपण.
हो अभिषेक ती वैश्यागृहातील लेखा हिच्या घरावर लक्ष दे. ती डोंगराच्या गुहेत काही तरी लपवत आहे. रात्रीच जरा बघ आणि स्वतःला पण बघ मला आजून हेर गमवायचे नाही आहेत.
असे बोलून आत येत बोलतो. मी जरा स्नानगृहेत जाऊन येतो तिथं पर्य़त जेवायचे बघा जरा नाही म्हंटले खूप दिवसाने छोट्या मालकीण बाई आल्या आहेत ना.
.
लावण्या बोलते हो. या तुम्ही आम्हाला पण जायचे आहे लवकर.
.
गिरिजा बोलते हे अशोक मुख्य सचिव का. मनात बोलते.
.
साहिल बोलतो हो भेटले उत्तर आणि बघितले ना. चला आता भोजनकक्षेत जेवायला आणि तिथे काही भलते प्रश्न नको विचारू. तू कालचक्रात आहे समजले.
.
सगळे जण जेवण करून उठत बाहेर येत दालनात बसतात.
तसे अशोक बोलतो ही का गप्प आहे.
.
लावण्या बोलते गप्प आहे तेच चांगले आहे. काय ग बरोबर ना.
.
गिरिजा फक्त मान हलवते.
.
लावण्या बोलते स्वारी चला आम्ही जातो आता नाही तर उशीर होईल.
.
क्रमश