दिपिका आस्वार......
दत्तक (काल्पनिक कथा)
भाग १
त्याने रागातच गाडी लॉक केली आणि दाराची बेल वाजवणार तितक्यात तिने दार उघडलं.... तुला कळतं नाही का ग...??? किती वेळा सांगितलं आहे,,, मिटिंग चालू असताना कॉल करू नकोस म्हणून... ऑफिसची बॅग रागानेच सोफ्यावर फेकत त्याने बडबड सुरू केली... ती आपली मान खाली घालून शांतपणे सगळं ऐकत होती... इतकं काय महत्वाचं काम होतं,,, म्हणून तू तातडीने मला घरी बोलवलंस... तरीही ती शांतच होती... आता मात्र त्याला तिचा खूप राग आला. तिला शिवी देतच त्याने पुन्हा विचारलं... सांगशील का वेदिका का बोलवंल आहे मला...??? तू एक तास पण थांबू शकत नव्हती का..??? तिने मान वर करत त्याच्याकडे पाहिलं... तसा त्याचा राग कमी झाला... तिचे डोळे पाण्याने गच्च भरलेले... ती काही बोलणार तेच "आई..... बाबा......" अशी मोठ्याने किंचाळी त्यांना ऐकू आली... तो तीच्याकडे बघत म्हणाला हा तर रुद्रचा आवाज आहे ना.... तसा तो पळतच रुद्रच्या खोलीत गेला... समोरच दृश्य बघून तो एक पाऊल मागे सरकला.... ती मात्र एकटक रुद्रकडे बघत राहिली... तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या... पण काही केल्या त्यांना पुढे जाता येत नव्हतं... कोणी तरी अडवत होतं... संपूर्ण खोलीमध्ये टाचण्या टोचलेली लिंब ठेवलेली होती आणि रुद्र त्या टाचण्यांवर लोळत होता... एक-एक टाचणी त्याच्या अंगात टचकन घुसत होती.... खाली पडलेली पिवळी लिंब पण आता रक्ताने लाल झालेली होती.. वेदना तर खूप होत होत्या,,, पण तरीही तो तसाच लोळत होता.... वेदांतने स्वतःला सावरत आत जाण्याचा खूप प्रयन्त केला,, पण त्या वाईट शक्तीपूढे त्याला काहीच करता येत नव्हतं.. बाबा मला वाचवा ना,,, खूप त्रास होतोय... मला तुमच्या सोबत घेऊन चला... रडत रडतच रुद्र बोलत होता... पोराची अशी अवस्था पाहून त्याचाही जीव तळमळत होता... पण तो पुन्हा आत जाणार तेच धाडकन दार बंद झालं... तसे दोघेही जोर जोरात ओरडून दार ठोकायला लागले.... रुद्र तू ठीक तर आहेस ना बाळा... तुला काहीही होणार नाही.. ये सोन्या रडू नकोस ना... वेदिका रुद्रला धीर देत म्हणाली.... रडून रडून तिचे ही डोळे सुजले होते... वेदांतने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ घेतले... काही होणार नाही आपल्या रुद्रला... मी आहे ना...
तेच आतून विचित्र आवाजात कोणीतरी हसलं... कोणीच वाचवू शकत नाही ह्याला... मी ह्याला माझ्या सोबतच घेऊन जाणार आणि ते ही आजच.... दहा वर्ष वाट बघितली आहे मी ह्या दिवसाची.. घोगऱ्या आवाजात कोणी तरी बोलत होत,, जोर जोरात किंचाळत होत आणि मधेच हसत पण होतं.. पाहिजे तर माझा जीव घे,,, पण माझ्या मुलाला सोडून दे... वेदिका मोठं मोठ्याने रडून बोलत होती... त्याने काय बिघडवलय तुझं म्हणून तू त्याला इतका त्रास देत आहेस... तसा रुद्रचा रडण्याचा आवाज आणखीनच वाढला... आ..... आ....ईईई,,, बा....बा..... वाचवा ना मला... त्याचा आवाज ऐकून दोघांचा जीव कासावीस होतं होता पण करणार काय....??? पंधरा ते वीस मिनिट होऊन गेले पण रुद्रचा काहीच आवाज आला नाही... दार पण उघडत नव्हतं... वेदिका पळतच हॉल मध्ये जाऊन कलश घेऊन आली... तिने ते कलशातलं पाणी दाराच्या फटीतून आत टाकले,,, थोडं पाणी दारावर शिंपडल आणि कुलदेवीच नाव घेऊन कलश जोर जोरात दारावर आपटला... तस धाडकन दार उघडलं... दोघेही आत गेले पण आता खोली मध्ये काहीही नव्हतं... रुद्र जमीनीवर पडलेला होता.... त्याच्या अंगातून रक्त येत होत... ओठांना चिरा पडल्या होत्या... डोळ्याखाली काळी वर्तुळे झाली होती... आणि चेहऱ्याला टोकदार वस्तूने ओरखडाव तसं ओरखंडल होतं... रुद्रची ही अवस्था पाहून वेदांतने त्याला मिठी मारली आणि त्याला उचलून हॉलमध्ये आणलं.. तो अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता.. दोघेही त्याला शुद्धीवर आणण्यासाठी जीवाचा आटापीटा करत होते... त्याच्या तोंडावर पाणी शिंपडत होते पण काहीच होत नव्हतं... वेदांतने त्याला खाली ठेवल आणि मोबाईल घेऊन बाहेर गेला... दहा ते पंधरा मिनिटं बोलणं झाल्या नंतर तो घरात येऊन शांत बसला... कोणाला कॉल केला होता,,, आपल्या मदतीसाठी कोण येतंय का.. ??? एका माग एक असे अनेक प्रश्न वेदिकाने वेदांतला विचारले .. त्याने फक्त होकारार्थी मान हलवली... तशी ती खुश झाली... माझ्या बाळाला आता काही नाही होणार,,, अस म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली... वेदांतने पण त्याच्या पायाचे चुंबन घेतले... किती प्रेम करावं आणि किती नाही असे ते वागत होते... तितक्यात कोणी तरी दार वाजवल तसे दोघेही उठून उभे राहिले...आणि भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत हात जोडले....
क्रमशः