फ्लॅट- A real horror story ,bhutachi gosht -9 to 10
A real horror marathi story
A real horror marathi story
फ्लॅट...भाग ०9 - A real horror marathi story
फ्लॅट...भाग 10 - A real horror marathi story
आणि त्यांच्यामध्ये दुर्गा पण होती…
मला जाग आली तेव्हां वैभव मला उठवत होता… सगळे अचंबित चेहऱ्याने माझ्याकडे बघत होते…
"काय झालं प्रीती?… तू पाणी आणायला वरती आली होतीस ना?… मं तू अशी झोपलीस का?… आणि तू जर झोपलीस तर आम्हांला दार कोणी उघडलं?…"
म्हणजे?… त्या!…"
"काय झालं सांग तुला?… बरं वाटत नाहीये का?… चक्कर येतीये का?… आपण डॉक्टरांकडे जाऊया का?…"
"माझ्या मते तुम्ही जरा सगळे शांत व्हाल का?… मला जरा प्रीतीशी बोलायचंय… प्रीती आपण तुमच्या बेडरूममध्ये जाऊन बोलूया का?… आणि पिल्लूलोग तो पर्यंत मी तुमच्यासाठी कॅडबरी आणली आहे ती एंजॉय करा…" (दुर्गा)
मी आणि दुर्गा आमच्या बेडरूममध्ये आलो…
"प्रिती… नक्की मला काय काय झालं ते सगळं सांगशील?…"
"मी आज वरती आले ना…"
नाही!… हे नाही… त्या दिवशी मला मठात भेटली होतीस त्याच्यानंतर काय काय झालं ते सगळं सांग…"
त्यानंतर मी प्रीतीला घडलेल्या सगळ्या घटना सांगितल्या… सासऱ्यांना दिसलेली ती चंदी, प्लंबर आणि सासऱ्यांना आलेला चंदीचा अनुभव, सासू-सासरे आमच्या घरी येऊन राहिल्यानंतर सुरळीत गेलेला आठवडा, सासू-सासरे गेलेल्या दुसऱ्याच दिवशी रात्री रुद्रला पाण्यात खेळताना दिसलेल ते बाळ, बाथरूम पासून बेडरूम पर्यंत उठलेले ते दोघांच्या पावलांचे ठसे, वैभवला बाल्कनीत त्या बाळाबरोबर उभी दिसलेली ती बाई, वैभव चं आजारी पडण, तन्मय आणि मला ऐकू येणारं बाळाचं रडणं, सासऱ्यांना कुणीतरी अंगाई गायलेल्या चा आलेला आवाज, नळातून पडणारं ते स्वच्छ पाणी पण सिंक भरून ओव्हरफ्लो होणारं ते हिरवट शेवाळी रंगाच पाणी, वैभव च्या मानेवर उमटलेले ते चार बोटांचे ठसे, मी पाणी घ्यायला वरती आलेले असताना मला दिसलेली चंदी आणि तिच बाळ, चंदीच मला धमकावणं, चंदीच्या तावडीतून मला माईंच सोडवणं, माईंनी मला गळ्यात घालायला दिलेली ती रुद्राक्षाची माळ, ह्या सर्वातून दुर्गा ची होणार असलेली मदत आणि हे सर्व फक्त दुर्गा ला सांगायचं अशी माईंनी दिलेली ताकीद आणि सर्वकाही मी दुर्गा ला सांगितलं…
मी बोलत असताना दुर्गा माझ्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे सगळं ऐकत होती… माझं पूर्ण बोलून झाल्यावर दुर्गाने पद्मासन घातलं आणि ध्यानाला बसतो तसं दुर्गाने ध्यान लावलं… अगदी दोनच मिनिटाच ध्यान लागल असेल तिचं आणि झटका लागावा तशी ती ध्यानातून बाहेर आली… तिच ध्यान लागलेल बघून असं वाटत होतं की ती समोर नाहीच ए, तिचं शरीर तिथेच होतं पण ती तेथे नव्हती हे कळत होतं…
"मला आता तुझ्याशी आणि वैभवशी थोडं बोलायचंय… आपण वैभवला पण आत बोलूया का?…"
वैभव ही आता बेडरुममध्ये आला होता… बेडरूमचे दार घट्ट लावून दुर्गा ने मला आणि वैभवला तिच्या समोर बसवलं…
"आता मी काय सांगते ते नीट ऐका… तुमच्या या घरात दोन निगेटिव शक्तींचा वावर आहे…"
"असं कसं म्हणू शकतेस तू?…"
वैभव चा हा प्रश्न कदाचित तिला अपेक्षितच होता कारण तिच्या चेहर्यावर एक मिश्किल हास्य होतं…
"पहिली तर गोष्ट… मी जे काही सांगतीये ते माझं पूर्ण सांगून होत नाही तोपर्यंत कोणीही मध्ये बोलू नका… माझं पूर्ण बोलून झालं की तुम्हाला जे प्रश्न विचारावेसे वाटतात ते विचारा… माझी आजी ही खूप मोठी स्वामी भक्त होती… तिच्यावर स्वामींचा अनुग्रह होता… का आणि कसा माहिती नाही पण हा स्वामी सेवेचा वारसा मला तिच्याकडूनच मिळालाय… मी या सगळ्या साठी पात्र आहे की नाही हे ही मला माहिती नाही… तुमची मदत करण्यासाठी माझी निवड का करण्यात आली याचे ही उत्तर माझ्याकडे नाही…"
"आपण हे आपल्या आजूबाजूला जे दृश्य जगं बघतोय त्याचबरोबरच आपल्या आजूबाजूला एक अदृश्य जगं ही वावरतय, ते आपल्या सामान्य मनुष्याच्या नजरेला पडत नाही पण ते असतं मात्र नक्की… ह्या जगात वावरणारे म्हणजेच ज्याला आपण भूत-पिशाच्च आणि वेगवेगळ्या नावाने ओळखतो ज्याला तुम्ही सायंटिफिक भाषेत नेगेटिव एनर्जी म्हणता… या प्रत्येक निगेटिव पॉवरचा एक एरिया ठरलेला असतो म्हणजेच त्यांची हद्द ठरलेली असते… या आपल्या हद्दीत येण्यासाठी ते सावज शोधत असतात… सावज आपल्या हद्दीत येण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारची लालूच दाखवतात… आणि एकदा का सावज त्यांच्या हद्दीत आलं की त्याच्यावर फक्त त्यांचाच अंमल चालतो… काय वाट्टेल ते झालं तरी ते त्याला सोडत नाहीत… आणि जर का त्यांच्या या हद्दीतला शिरकाव हा जर स्वतःहून केलेला असेल तर मग त्यांच्यासाठी सोन्याहून पिवळं असतं… तुमच्या बाबतीत तेच झालय… तुमच्या घरात एकूण दोन निगेटिव शक्ती वावरतायत त्यांनी तुम्हाला बोललेलं नाहीये तुम्ही स्वतःहून त्यांच्या हद्दीत शिरकाव केलायत… आता फक्त ते तुमच्याशी खेळत आहेत, तुम्हाला घाबरवत आहेत… तुम्ही घाबरणे हीच त्यांची सगळ्यात मोठी शक्ती आहे… आपल्याला घाबरणाऱ्या माणसाला जसं आपण स्वतः घाबरवत राहतो, आपण मनुष्य असून आपल्यालाही हे कळतं मं ते तर पिशाच्च आहेत… तुमच्याबरोबर होणाऱ्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हीटी मधून तुम्ही घाबरता ही त्याना मिळत असलेली शक्ती आहे… तुमच्या घरात वावरणारे चंदी आणि तिचं बाळ इथे कधीपासून आहेत?… ते का आले?… ते तुम्हाला का त्रास देत आहेत?… याचं आत्ता माझ्याकडे काहीही उत्तर नाही आत्ता मी एवढच करू शकते की यांचा तुम्हाला होणारा त्रास थोड्याफार प्रमाणात कमी करू शकते… चंदी आणि तिच बाळं अजूनही पिशाच्च योनीत का आहेत?… त्यांना मुक्ती का मिळाली नाही?… याची उत्तरं प्रीती तुला आणि मला मिळवून शोधायची आहेत आणि म्हणूनच कदाचित मला तुमच्या मदतीसाठी पाठवले असेल…"

दुर्गा ने तिच्या पर्समधून लाल पिवळ्या रंगाचे काही धागे काढले… असे धागे सहसा मंदिराच्या बाहेर वगैरे विकायला ठेवलेले असतात… तिने ते धागे तिच्या मुठीत पकडले आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी मंत्र पुटपुटून त्यांच्यावर फुंकर मारली… वैभव कडे ते धागे देऊन घरातल्या सर्व व्यक्तींना बांधायला सांगितले… पण माझ्यासाठी त्यात धागा नव्हता…
"आणि मला धागा नाही?…"
"मी आहे नं तुझ्यासाठी…"
"म्हणजे?…"
"गंमत केली गं… मला ती माईंनी दिलेली माळ बघू जरा…"
ऋद्राक्षाची माईंनी दिलेली माळ मी दुर्गा च्या हातात दिली… तिने ती दोन मिनिटं हातात धरली आणि मला परत देत म्हणाली…
"जो पर्यंत ही रुद्राक्षाची माळ तुझ्या जवळ आहे तो पर्यंत तुझ्या केसालाही कोणी धक्का लावू शकत नाही… इतकी पॉवर फुल माळ आहे ही… पण एक गोष्ट लक्षात ठेव… तुझ्या घरात वावरत असलेली ती निगेटिव्ह शक्ती ही माळ किंवा मी दिलेले धागे तुमच्या पासून लांब कसे होतील याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतील… या गोष्टी तुमच्या शरीरापासून दूर होऊ देऊ नका… आता मी निघते उद्या सकाळी आपण दोघे बाहेर पडतोय चंदी आणि तिच्या बाळाचा इतिहास जाणून घ्यायला…"
"अग थांब पटकन चहा करते… पहिल्यांदा आलीस घरी आणि तुला साधं पाणीही विचारलेल नाहीये मी…"
"गैरसमज करून घेऊ नकोस प्रीती पण मी तुझ्या घरचे पाणीही पिऊ शकत नाही… एवढेच सांगेन की तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढायचं तर मला स्ट्राँग राहण गरजेच आहे… येते मी… आता सकाळी भेटू आपण आणि हो अजून एक गोष्ट… तुम्हाला बोलवण्यासाठी त्या निगेटिव्ह पॉवर कोणत्याही प्रकारच आमिष दाखवू शकतात… स्वामींवर विश्वास ठेवा ते सगळं करतील व्यवस्थित…"
दुर्गाच्या येऊन जाण्याने सगळ्यांच्याच मनात एक वेगळाच उत्साह आणि वेगळाच कॉन्फिडन्स तयार झाल्या सारखा दिसला… घरातलं वातावरण एकदम बदलून गेलं… प्रत्येकाच्या मनात एक आत्मविश्वास होता की आता आपण लढू शकतो… रात्रीची जेवणं झाली आणि आम्ही कालच्या सारखेच न झोपता आमच्या बेडरूममध्येच सगळेजण झोपलो… मुलं आजी-आजोबा बेडवर आणि मी वैभव खाली गादी टाकून… त्या दिवशी रात्री आम्हाला काहीच जाणवलं नाही… सकाळी नॉर्मल उठलो… मुले शाळेला गेली… वैभवला आई-बाबांकडे थांबवून मी आणि दुर्गा निघालो… चंदीचा इतिहास शोधायला…
एकदा का डाव रचला की तो तुम्ही अर्धवट सोडू शकत नाही तो तुम्हाला पूर्ण खेळूनच संपवावा लागतो
क्रमशः………
फ्लॅट...भाग 10 - A real horror marathi story