मांजर...*
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
प्रकाशन:- दि. ०५.०५.२०१७
©Ankush S. Navghare ®२०१७
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)

नमस्कार मित्रांनो मी अंकुश नवघरे...
आजचा हा अनुभव मला माझ्या एका गुरूंनी सांगितला होता ज्यांनी मला exorcism ह्या क्षेत्रातल्या काही गोष्टी, मंत्र इत्यादी शिकवले आहेत.
मित्रांनो माझे अनुभव ऐकून मला बरेच लोक विनंती करतात की आम्हाला पण ह्यात इंटेरेस्ट आहे आम्हाला पण हे सर्व शिकायचे आहे इत्यादी. त्या सर्वांचा मान ठेऊन मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे क्षेत्र खूप धोकादायक आहे. ज्यात तुमची जराशी चूक तुमच्या किंवा तुम्ही ज्याच्यावर उपचार करत आहात त्याच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. तुम्ही एकदा ह्या क्षेत्रात आल्यानंतर जे लोक ह्या क्षेत्रात पारंगत आहेत परंतु जे त्याचा उपयोग समाजविघातक कार्यासाठी म्हणजेच जे लोक काळी जादू इत्यादी करतात ते तुम्हाला त्यांचे दुश्मन मानू लागतात आणि नेहमी तुमच्या अहितावर टपलेले असतात. त्यामुळे आपल्यावरचा धोका वाढतो. अशीच एक गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे पण ती जरा विनोदी आहे.
माझे जे गुरु आहेत त्यांना सर्व मामा बोलतात. त्यांना भूत उतरवणे, घर भूतांपासून सोडविणे, करणी, मूठ उतरवणे इत्यादी सर्व कामे येतात. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी लोकांची वर्दळ असते, जागरणे असतात. साधारण ३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यांच्या ह्या कामांमुळे त्यांच्या आजूबाजूला राहणारे आणि काळी विद्या करणारे लोक त्यांच्यावर खूप जळून असत. कधी त्यांचा घात करता येईल ह्याचीच वाट पहात असत. तुम्हाला हे माहितीच असेल की ही विद्या शिकण्यासाठी आपल्या कुटुंबातील नवजात अर्भकाचा बळी देऊन त्याचे मास खावे लागते. हे लोक खूप ताकदवान असतात. त्यांना कुठलेही पण वाघ सिव्ह इत्यादी दैवी प्राणी सोडून रूप धारण करता येते.
तर मामांवर असले बरेच प्रयोग करून ते लोक थकले होते पण मामा काही त्यांना दाद देत नव्हते. मामांना नुसत चेहर्यावरूनच ओळखता येते की कोण माणूस कसा आहे आणि त्याच्या मनात काय आहे. एक दिवशी मामांना मारण्यासाठी त्या लोकांनी मीटिंग घेतली त्यात असे ठरले की त्यांच्यातली सर्वात जाणकार बाई सापाचे रूप घेऊन मामांना दंश करेल. ठरल्याप्रमाणे तिने काळ्या रंगाच्या नागाचे रुप घेतले आणि रात्री गुपचूप घरात घुसली. जसे मामा झोपायला गेले तसे तिने त्यांच्यावर हल्ला चढवला परंतु मामांना त्याचा संशय आल्याने त्यांनी तो वार परतावला, पण ती पळून गेली.
असेच करता करता खूप प्रयन्त केले परंतु ते असफल होत गेले. ह्या सर्व प्रकाराला मामा खूपच वैतागले होते. आणि त्यांचा जीव पण धोक्यात आला होता. मामांना कधी कधी ह्या गोष्टीचा संशय येत असे की हा योगायोग आहे की घातपात. त्यांना पूर्ण संशय होता की हे सर्व तेच लोक करत आहेत. शेवटी त्यांनी त्या सर्वांना अद्दल घडवायची अशी मनाशी खूणगाठ बांधली. एक दिवशी मामांना एक काळ मांजर संशयास्पद रीतीने घरा भोवती घुटमळताना दिसलं. मित्रांनो मांजरीच रूप त्यांच्या मध्ये सर्वात प्रभावी मानलं जाते कारण वाघानंतर सर्व कावेबाजपणात मांजरीचा हात कोणीच धरू शकत नाही. त्यामुळे मामाही जरा चिंतेत होते. मित्रांनो ह्या सर्व प्रकाराला अंधश्रद्धा असे समजत असल्याने मामांवर कोणीही विश्वास ठेवला नसता की त्यांची मदतही केली नसती. त्याच प्रमाणे ह्या अशा लोकांच्या घरच्यांनाहि काहीच कल्पना नसते कि हे लोक असल्या प्रकारची कामे करतात.
मग मामांना एक कल्पना सुचली. त्यांनी विचार केला की बघूया तर खरं काय होतंय जर का हे मांजर आज आलंच तर समजायच की तेच आहे आणि त्याला पकडायचा. त्यासाठी त्यांनी एक गोणपाटाचा साफळा बनवला आणि त्यांचा झोपायच्या जागेवर अशा पद्धतीने ठेवला कि पाहणाऱ्याला असे वाटेल की कोणीतरी डोक्यावर चादर घेऊन झोपल आहे. ठरल्याप्रमाणे त्यांनी मुद्दामुनच दरवाजा उघडा ठेवला आणि तिची वाट पाहात बसले. रात्री २ वाजेच्या सुमारास ती मांजरीचे रूप घेऊन आली आणि चादर समजून जशी गोंणपाटात घुसली तसे मामांनी त्या गोणपाटाचे तोंड बंद करून कपडे धुवायच्या धोक्याने गोणपाट बडवायला सुरवात केली. आवाज ऐकून आजूबाजूची खूप माणस जमा झाली आणि काय झालं म्हणून विचारू लागली. तर मामा म्हणाले की एक मांजर पिसाळले आहे. त्याने मला चावा घेतला म्हणून मी त्याला पकडून मारतोय. ते ऐकून लोकं जास्त काही म्हणाली नाहीत आणि ती बाई मांजरीच्या रुपात असल्याने परत माणसाच रूप घेऊ शकली नाही कारण की त्याने तीच गुपित लोकांना कळलं असत तर लोकांनी तिला दगडाने ठेचून मारलं असत.
मामांनी तिला जीवे न मारता अद्दल घडवायची म्हणून आणि मनुष्यहत्या नको म्हणून नंतर सोडून दिले. दुसऱ्यादिवशी सकाळी त्या बाईच्या घरून ओय ओय मेले ग मेले ग असले आवाज येत होते. इतक्यात तिचा नातू रस्त्यावरून जाताना मामांनी त्याला विचारले की काय रे काय झालं तुमच्या म्हातारीला तर तो म्हणाला की पहाटेस परसात गेलेली तेव्हा पाय घसरून पडली आणि हात पाय मोडून घेतलेत. मी आता कोणी वैद्य मिळतो का पहायला चाललोय. तेव्हा मामा त्याला म्हणाले जा लवकर काळजी घे म्हातारीची बर झालं जास्त काही लागलं नाही. म्हातारीला माझा निरोप दे कि काही मदत लागली तर निसंकोच सांग म्हणावं...
मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्की लाइक करा. काही माहिती हवी असेल तर कंमेन्ट करा. कथा हॉर्रोर नाही पण तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.

धन्यवाद..
अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)