ती__थरारक__रात्र
ती__थरारक__रात्र |
"येवता".... बस कंडक्टर तारस्वरात ओरडला आणि यशवंतला खडबडून जाग आली. बस थांबल्यावर बॅग घेऊन तो पटकन खाली उतरला, आणि रो ss रो ss असा मोठा आवाज करत बस पुढे निघून गेली. बसचा आवाज हळूहळू कमी होत गेला आणि चहूकडे भयाण शांतता पसरली. यशवंतने अस्वस्थपणे मनगटी घड्याळात वेळ बघितली. रात्रीचे सव्वा दहा वाजले होते .त्याने आजूबाजूला नजर टाकली. स्टॅण्डच्या जवळ असलेले एक टपरीवजा हॉटेल सोडले ,तर मानवी वस्तीची कोठे खूणही नव्हती. तेथे गावातली दोन-तीन टाळकी उगाच टाइमपास करत उभी होती . गल्ल्यामागे गलेलठ्ठ मालक कोठेतरी शून्यात नजर लावून बसला होता. बॅग उचलून यशवंत हॉटेलकडे निघाला. हॉटेलमधील लोखंडी खुर्चीवर बसून त्याने टेबलवरील कळकट जग मधील पाणी, मेणचट ग्लासात ओतले आणि ते घटाघट पीत आपली तहान भागवली. हॉटेलमधील एकमेव कामगार असलेला पोऱ्या लगबगीने त्याच्याकडे आला.
" खायला काय आहे ?" यशवंतने त्याला विचारले.
"मिसळ-पाव, वडा-पाव, आणि जिलेबी !! " त्याने उत्तर दिले.
" एक मिसळ पाव आणि चहा आण." यशवंतने ऑर्डर दिली. पोऱ्या घाईघाईने भटारखान्यात कडे पळाला आणि यशवंत बाहेरील अंधाराकडे एकटक बघत भूतकाळात हरवून गेला.
.
.
यशवंतच्या वडिलांनी खूप वर्षांपूर्वीच बीड जिल्ह्यातील येवता हे गाव सोडून मुंबईत बस्तान बसवले होते. खरंतर यशवंतचा जन्म येवत्यातलाच ,पण त्याचा जन्म झाल्यावर उण्यापुऱ्या दोनच वर्षात सर्व कुटुंब तेथून मुंबईत स्थलांतरित झाले. त्यानंतर त्यांच्यापैकी कोणीही कधीच येवत्याला आले नव्हते . या गावात त्यांचे स्वकष्टार्जित घर अजुनही शाबुत आहे हे ऐकीव माहितीनेच यशवंतला माहित होते. खरं तर त्याच घरात रात्री मुक्कामाला जावे असे यशवंतच्या मनात होते. पण येथे पोहोचायला त्याला तब्बल पाच तास उशीर झाला होता. संध्याकाळी पाच वाजता पोहोचण्या ऐवजी बसला पोहोचायला रात्रीचे सव्वा दहा वाजले होते. वाडा आणि मालकीची असलेली थोडीफार जमीन मिळेल त्या किमतीत विकून येवत्याला कायमचा रामराम ठोकण्याच्या इराद्याने, ऑफिसला चार दिवसांची रजा टाकून यशवंत येथे आला होता.
.
.
हॉटेलमधील पोऱ्याने टेबलावर मिसळपावच्या ताटल्या आपटल्या आणि यशवंत भानावर आला. आजूबाजूला त्याने नजर फिरवली. ते कामगार पोरगं, हॉटेलचा गलेलठ्ठ मालक, आणि तो स्वतः याशिवाय हॉटेलमध्ये कोणीही नव्हते. मघाशी टाइमपास करणारी दोन-तीन टाळकीही निघून गेली होती. यशवंतने मिसळ खाण्यास सुरुवात केली. दोन घास पोटात जाताच त्याला हुशारी वाटू लागली. सकाळपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते. ग्लासमधील पाणी घटाघटा पिऊन त्याने पुन्हा एकदा खाण्यास सुरुवात केली. मिसळ चांगलीच झणझणीत होती. तिखट खायची सवय नसलेला यशवंत हा s s हू करत घामाघूम झाला .कशीबशी मिसळ संपवून त्याने गोडपाक चहा पिण्यास सुरुवात केली. तिखट मिसळीवर गोड चहाचा उतारा त्याला बरा वाटला. चहा संपवून यशवंतने कोपऱ्यातल्या वॉश बेसिन मध्ये हात धुतले. तोंडावर गार पाण्याचे हबके मारल्यावर त्याला पुन्हा एकदा हुशारी वाटू लागली. गल्ल्यावर पैसे देताना यशवंतने हॉटेल मालकाच्या चेहऱ्याकडे पाहिले .इतका वेळ निर्विकार असलेला त्याचा चेहरा पैशांचे दर्शन होताच चांगलाच खुलला.
.
" कुण्या गावचे पाहुणे ?" यशवंतकडे पाहात मालकाने विचारले.
.
" मुंबईहून आलो आहे." यशवंत उत्तरला.
" लई उशीर केला जणू पोहोचायला !" पैसे गल्ल्यात ठेवत मालक पुटपुटला .
.
"बसचे ब्रेक फेल झाले." यशवंत म्हणाला.
" नेहमीचच हाये ते ! मुक्काम कोठे आहे तुमचा?" हॉटेल मालकाने उत्सुकतेने विचारले.
.
" आमचं घर आहे गावात. तेथे जाण्याचा विचार करतो आहे .पण इतक्या रात्री घर सापडेल की नाही कोण जाणे!!" काळजीयुक्त आवाजात यशवंत म्हणाला.
" अरेच्या येथे घर आहे म्हणता ? नाव काय तुमचं ?" आश्चर्यचकित होऊन हॉटेल मालकाने विचारले.
" यशवंत म्हेत्रे !! म्हेत्रे वाडा आमचा आहे." यशवंतचे बोलणे ऐकून हॉटेल मालक कमालीचा दचकला.
" राजू आवर बाबा सगळं !! मला घरी जायचं आहे लवकर ....." यशवंतच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत हॉटेल मालक पोऱ्याला म्हणाला, आणि सामानाची आवरा आवर करू लागला.
.
.
सुट्टे पैसे परत घेऊन यशवंत वळला आणि बॅग घेऊन हॉटेल बाहेर पडला .इतक्या रात्री वाडा शोधण्याचं संकट याच्यापुढे आ वासून उभं होतं. त्याला आठवलं, इकडे यायला निघताना त्याची आई म्हणाली होती,
" यशवंता .... अरे, मध्यंतरी राधाक्काचा सांगावा आला होता. आपल्या वाड्यात जाणं-येणं ठेवलं आहे तीनं !! आठ पंधरा दिवसातून साफ सफाई करते ती ..... तू राधाक्काला भेट .... म्हणजे ती तुझी सगळी व्यवस्था करेल. आणि हो .... आठवणीने वाड्यातल्या देव्हाऱ्यात मी दिलेला बाळकृष्ण ठेव !!"
.
" पण इतक्या रात्री या राधाक्काला शोधायची तरी कशी ?" खिशातली बाळकृष्णाची मूर्ती चाचपत निराशेनं यशवंत स्वतःशीच पुटपुटला. गडद अंधारातून त्याने गावाकडे जाणार्या पायवाटेवर चालण्यास सुरुवात केली. एवढ्या रात्री राधाक्काला शोधण्यापेक्षा वाटेत मिळेल त्या घरात रात्रीपुरता आश्रय घ्यायचं त्यानं ठरवलं. उद्या सकाळी राधाक्का आणि वाडा दोन्ही शोधता येण्यासारखं होतं. हवेत चांगलाच गारवा होता. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही इतका गर्द काळोख आजूबाजूला पसरला होता. जवळ असलेल्या टॉर्चचा प्रकाश पायापुढील वाटेवर टाकत यशवंत झपाझप चालत होता. अर्धा तास चालल्यानंतर दूरवर मिणमिणते दिवे दिसले आणि यशवंतचा जीव भांड्यात पडला. त्या मिणमिणत्या दिव्यांच्या दिशेने चालण्यास त्याने सुरुवात केली. दहा-पंधरा मिनिटे चालल्यावर यशवंत त्या दिव्यांपाशी पोहोचला. चांदण्यांच्या अंधुक प्रकाशात त्याने निरखून पाहिले. एका दगडी वाड्यापाशी तो पोहोचला होता. वाड्याची अंधुकशी बाह्यरेषा त्याला चांदण्यांच्या प्रकाशात दिसत होती. वाड्याचे फाटक उघडून त्याने अंगणात प्रवेश केला आणि काळ्या रंगाचे एक मरतुकडे कुत्रे त्वेषाने भुंकत त्याच्या अंगावर आले. त्या कुत्र्याचा आवेश पाहून यशवंत स्तंभित झाला आणि जागीच थांबला.
" काळ्या .... थांब तेथेच !! " उच्च स्वरातला पण अत्यंत मधुर असा आवाज त्याला ऐकू आला. आवाजाच्या दिशेने यशवंतने नजर टाकली आणि दिग्मूढ होऊन तो बघतच राहिला. अतिशय मोहक सौंदर्य असलेली एक तरुणी अंधारातुन वेगाने त्याच्या दिशेला येत होती. मरतुकडे काळे कुत्रे जागीच थांबले व यशवंतकडे पहात शेपटी हलवू लागले.
" माफ करा !! घाबरला नाहीत ना ? हा काळ्या नुसताच भुंकतो. चावत नाही कोणाला. या ना ... आत या !! " मधुर आवाजात ती सौंदर्यवती बोलली आणि भारावल्यासारखा यशवंत तिच्या पाठी आत जाण्यासाठी चालू लागला.
.
.
तिच्या हातात कंदील होता. व्हरांड्यातून दोघे जण आत आले आणि वाड्यातील प्रशस्त दिवाणखान्यात शिरले.
" बसा ह .. पाणी आणते तुमच्यासाठी !" एवढे बोलून लगबगीने ती आतल्या खोलीत अदृश्य झाली. यशवंतने खिशातली बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती चाचपली आणि आरामात बसत उत्सुकतेने तो चोहीकडे बघू लागला. दिवाणखाना खूपच प्रशस्त होता. छताची उंची नेहमीपेक्षा दुप्पट ठेवल्याने दिवाणखान्याची भव्यता आणखीनच वाढली होती. चारी बाजूच्या भिंतींवर शिकार केलेल्या प्राण्यांची मुंडकी टांगलेली होती. त्या हिंस्त्र श्वापदांच्या चेहर्यावरील अविर्भाव अत्यंत भीतीदायक होते. चटकन नजर वळवून यशवंत दुसरीकडे पाहू लागला. अनेक उंची आणि खानदानी वस्तूंनी दिवाणखाना भरलेला होता. ती सौंदर्यवती पाणी घेऊन आली आणि यशवंतला तांब्या-भांडे देऊन तेथेच अदबीने उभी राहिली. वाळा घातलेले सुगंधित पाणी प्यायल्यावर यशवंतची तहान प्रथमच खरोखरची भागली.
.
" मी मुंबईहून काही कामासाठी येथे आलो आहे. बसला उशीर झाल्याने पोहोचायला इतकी रात्र झाली. तुमची हरकत नसेल तर आजची रात्र येथेच काढण्याचा माझा मानस आहे." अगदी हळू आणि आर्जवी आवाजात यशवंतने तिची विनवणी केली. ती हसली.
" नक्कीच ... हा वाडा तुमचाच आहे असं समजा. घरातली सर्व मंडळी बाहेरगावी गेल्याने सध्या मी एकटीच काळ्या सोबत राहत आहे. तुम्ही जेवण करणार ना ?" तिने प्रश्न केला.
.
" नाही ... मी जेवून आलो आहे. फक्त रात्र येथे काढून मी सकाळी लवकर बाहेर पडेन ." यशवंत तिच्याकडे पाहात म्हणाला. त्याच्या लक्षात आले की बोलताना ती अनिमिष नजरेने एकटक त्याच्याकडे पाहात होती. तिच्या त्या नजरेनं तो थोडासा अस्वस्थ झाला. स्वतःला लगेच सावरून ती यशवंतला म्हणाली,
.
" या माझ्या मागे ... मी तुमची झोपायची खोली दाखवते." कंदिलाच्या मंद प्रकाशात काही वेळ चालल्यावर ते दोघे एका बंद दाराशी पोहोचले. दार उघडून ती खोलीत शिरली. पाठोपाठ यशवंतनेही खोलीत प्रवेश केला. उत्तमरित्या सजवलेल्या त्या खोलीच्या मध्यभागी एक शिसवी लाकडाने बनवलेला मोठा पलंग ठेवलेला होता. खोलीत सगळीकडे मंद सुगंध पसरला होता. पलंगा शेजारील घडवंचीवर पिण्याच्या पाण्याचे तांब्या-भांडे ठेवले होते. यशवंत दिग्मूढ होऊन पहातच राहिला.
.
" आपण शांतपणे विश्रांती घ्या. सकाळी लवकर मी आपणास उठवायला येईन."
.
यशवंतकडे एकटक नजरेने पाहत ती म्हणाली.
" थँक यू सो मच !!" कृतज्ञतेने यशवंत म्हणाला. ती वळली आणि दरवाजाकडे जाऊ लागली.
.
" या सगळ्या गडबडीत तुमचे नाव विचारायचेच राहिले !! " अचानक यशवंत म्हणाला आणि ती स्तब्ध होऊन उभी राहिली. सावकाशपणे त्याच्याकडे वळत ती गूढ आवाजात म्हणाली,
.
" देवयानी ..... विसरलात एवढ्यात ?" तिच्या बोलण्याचा अर्थबोध न झाल्याने यशवंत प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहू लागला, तशी भानावर येऊन ती हसत म्हणाली,
.
"तुम्हाला आल्याआल्याच मी माझे नाव सांगितले होते. जाऊ दे फार विचार करू नका. झोपा शांतपणे !!"
एवढं बोलून ती खोली बाहेर निघून गेली. येथे आल्यापासूनच्या सर्व प्रसंगांची उजळणी मनातल्या मनात करूनही तिने तिचे नाव कधी सांगितले होते हे काही यशवंतला आठवेना. शेवटी कंटाळून त्याने तो विचार सोडून दिला आणि बॅग उघडून नाईट ड्रेस काढला. पॅन्टच्या खिशातून बाळकृष्णाची मूर्ती काढून तिला मनोभावे नमस्कार करत त्याने ती बॅगेत नीट ठेवली आणि अंगावर कपडे चढवले. नाईट ड्रेस घातल्यावर त्याला एकदम हलके-फुलके वाटू लागले. पलंगावर आडवे होताच त्याला खूप बरे वाटले. दिवसभरच्या कंटाळवाण्या प्रवासाने त्याचे अंग अगदी आंबून गेले होते. पाच मिनिटात तो गाढ निद्रेच्या आधीन झाला.
.
.
रात्री उशीरा कधीतरी यशवंतला अर्धवट जाग आली आणि अंथरुणात आपल्या शेजारी कोणीतरी झोपले असल्याची विचित्र जाणीव त्याला झाली. हा भास आहे की सत्य आहे याचा शहानिशा करण्यासाठी त्याने हाताने चाचपून पाहिले आणि क्षणार्धात त्याची झोप पूर्ण उडाली . त्याच्या शेजारी एक तरुण स्त्री झोपली होती. तिच्या अंगावर एकही वस्त्र नव्हते . विजेचा झटका बसावा अशी यशवंतची अवस्था झाली. झटकन तो उठून बसणार एवढ्यात त्या स्त्रीने आपल्या घट्ट मिठीत त्याला जखडून घेतले. त्याच्या कानात अतिशय हळू आवाजात ती काहीतरी पुटपुटली आणि ती देवयानीच असल्याचे यशवंतच्या लक्षात आले. मंद प्रकाशात दिसणारे तिचे अनावृत्त सौंदर्य आणि तिच्या शरीराचा स्वर्गीय स्पर्श याची नशा इतकी प्रभावी होती की त्यात आपली आहुती कधी पडली हे यशवंतलाही कळले नाही. यथेच्छ रातिक्रिडेचा उत्सव पार पडला आणि त्या धुंद अवस्थेत यशवंत पुन्हा गाढ निद्रावस्थेत गेला. संपूर्ण रात्रीत अशी बरीच आवर्तने पार पडली. सकाळी उशिरा सूर्याची किरणे डोळ्यांवर पडल्याने यशवंत खडबडून जागा झाला. घाई-घाईने तो उठला. एका भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली तो झोपला होता. अंगावर एकही कपडा नसल्याचे लक्षात येताच, यशवंत लाजेने चूर झाला. खाली पडलेली वस्त्रे पटकन नेसून त्याने आजूबाजूला पाहिले. दूरवर एक रस्ता दिसत होता. आणि त्याला लागून घरे दिसत होती. लगबगीने उठून यशवंत रस्त्याच्या दिशेने चालू लागला. तेथे चौकशी करताच तो म्हेत्रे वाड्यापाशीच असल्याचे त्याच्या लक्षात आले. दोन घरे सोडून राधाक्का राहत असल्याचेही त्याला सांगण्यात आले. वृद्ध राधाक्काला स्वतःची ओळख सांगून यशवंतने त्यांना वाकून नमस्कार केला. राधाक्का त्याच्याकडे बघतच राहिल्या.
.
" किती मोठा झालास रे यशवंत !! तुला दोन वर्षांचा असताना शेवटच पाहिलं होतं !! ये घरात ये !! "
राधाक्कानी यशवंतला गरम गरम चहा दिला आणि त्याची विचारपूस सुरु केली. त्याच्या येवत्याच्या भेटीचा उद्देश समजल्यावर त्या गंभीर झाल्या.
.
" यशवंत तुमचा वाडा विकला जाणे खूप अवघड आहे. त्याचे कारण मी तुला नंतर सांगेन. आता प्रथम प्रातर्विधी आटपून तू तयार हो. आपण तुमच्या वाड्यावर जाऊ आणि तेथेच बोलू ." एवढं बोलून राधाक्का न्याहरीच्या तयारीसाठी माजघराकडे निघाल्या. न्याहरी नंतर यशवंत आणि राधाक्का म्हेत्रे वाड्यावर गेले. निघताना यशवंतने आठवणीने आईने दिलेली बाळकृष्णाची छोटी मूर्ती बॅगेतून काढून खिशात ठेवली. वाड्याचे फाटक आणि अंगण पाहताच यशवंत चरकला. रात्री आपण येथेच आल्याचे त्याच्या लक्षात आले. राधाक्क्यांनी व्हरांड्यातून पुढे जाऊन दिवाणखान्याचे कुलूप उघडले. यशवंत उत्कंठतेने त्यांच्या पाठोपाठ आत शिरला. दिवाणखान्याचा मूळ ढाचा त्याने रात्री बघितल्याप्रमाणेच होता. मात्र चारही बाजूच्या भिंतींवर त्याने रात्री पाहिलेली शिकार केलेल्या प्राण्यांची मुंडकी गायब होती. रात्री त्याने अनुभवलेला दिवाणखाना उंची आणि खानदानी वस्तूंनी भरलेला होता. मात्र आता तो बघत असलेला दिवाणखाना पूर्णपणे रिकामा होता. राधाक्कांनी भिंतीला टेकवून ठेवलेल्या दोन फोल्डिंगच्या लोखंडी खुर्च्या उघडल्या, आणि दोघे त्या खुर्च्यांवर बसले.
.
.
यशवंत आवाक होऊन इकडे तिकडे बघत असताना राधाक्कानी बोलायला सुरुवात केली
.
" यशवंत तू रात्री कोठे मुक्काम केलास?" भीतीची थंड लहर यशवंतच्या मणक्यातून खाली सरकली. त्याचा चेहरा पांढराफटक पडला.
.
" काय रे तब्येत बरी आहे ना ? एवढा का घाबरला आहेस ?" त्याच्या अवताराकडे बघत राधाक्कांनी काळजीने विचारले.
.
" याच वाड्यात रात्री मुक्कामाला होतो...." आवंढा गिळत यशवंत कसाबसा बोलला.
.
" काय ??" राधाक्का घाबरून उद्गारल्या.
" होय राधाक्का .... रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास मी येथे पोहोचलो, त्यावेळी सगळं काही निर्मनुष्य होतं. इतक्या रात्री तुम्हाला शोधणं मला शक्यच नव्हतं. मिळेल त्या ठिकाणी रात्रीपुरता आश्रय घेणे एवढंच माझ्या हातात होतं, आणि कोणीतरी ढकलत आणल्या सारखा मी याच वाड्यात आलो." यशवंत बोलायचा थांबला आणि गुढ शांतता पसरली.
.
" पुढे काय झालं ?" हलक्या आवाजात राधाक्कांनी विचारलं.
.
" देवयानी नावाची एक सुंदर युवती आणि काळ्या रंगाचं एक मरतुकडं कुत्र एवढे दोघेच त्यावेळी येथे होते .मी रात्रीपुरता आश्रय देण्याची तिला विनंती केली आणि तिच्या परवानगीने येथेच राहिलो." चोरट्या नजरेने राधाक्कांकडे पहात यशवंत दबक्या स्वरात बोलला. राधाक्का रोखून त्याच्याकडे पहात होत्या. त्यांची नजर एखाद्या एक्स-रे सारखी त्याचे मन वाचण्याचा प्रयत्न करत होती.
.
" बस एवढंच ? आणखी काय घडलं ?" राधाक्कानी तीव्र स्वरात प्रश्न केला. घडलेलं सगळं राधाक्काना सांगावं की नाही या द्विधा मनस्थितीत यशवंत सापडला. पण मनाशी लगेच निर्णय घेऊन त्याने राधाक्काना रात्री काय घडलं ते न सांगण्याचे ठरवलं.
.
" येथे एका स्वतंत्र खोलीत देवयानीने माझी व्यवस्था केली. दिवसभराच्या श्रमाने मी गाढ झोपी गेलो. सकाळी जाग आली तेव्हा मी परसातील वडाच्या झाडाखाली होतो." राधाक्काची नजर चोरत यशवंत पुटपुटला. राधाक्कांनी नाराजीने मान हलवली. यशवंतने रात्री घडलेल्या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवल्याचे त्यांच्या लक्षात आले. पण मग त्यांनीही विषय जास्त ताणला नाही.
.
" कुठल्या खोलीत तू झोपला होतास ? आठवतंय का ? दाखव बरं मला.... " खुर्चीतून उठत राधाक्कानी विचारले. यशवंत त्यांच्या पाठोपाठ आत निघाला. राधाक्कानी दाखवलेल्या कुठल्याच खोलीत तो झोपला नव्हता. सरतेशेवटी कोपर्यातली एक खोली सोडली, तर इतर सर्व खोल्या पाहून झाल्या . त्या बंद खोलीच्या दरवाज्यापुढे उभा राहात यशवंत म्हणाला,
" राधाक्का हीच ती खोली !! येथे मी रात्री झोपलो होतो." राधाक्का दचकल्या.
" कसं शक्य आहे यशवंत? अरे ही खोली गेल्या कित्येक वर्षात उघडलेली नाही .पहा तिचे दरवाजे खिळे मारून बंद केलेले आहेत." राधाक्का भीतीयुक्त आवाजात उद्गारल्या. यशवंतने पाहिले. खरोखरंच खोलीची दारे कुर्हाडी खिळे मारून बंद केलेली होती.
"तरीही मला खात्री आहे राधाक्का !! याच खोलीत मी झोपलो होतो." यशवंत म्हणाला.
" आपण ही खोली उघडून पाहूयात !!" ठाम स्वरात यशवंत म्हणाला आणि जवळच पडलेल्या एका लोखंडी सळईने त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न सुरू केला. का कोण जाणे मनात असूनही राधाक्कांना त्याला विरोध करता आला नाही. त्या नुसत्याच बघत राहिल्या. थोड्या वेळाच्या प्रयत्नांनंतर दरवाजा उघडला गेला आणि दोघेही उत्सुकतेने खोलीत शिरले.
.
.
संपूर्ण खोली कोळीष्टकांनी भरलेली होती. खोलीच्या मध्यभागी तोच प्रशस्त शिसवी लाकडाने बनवलेला पलंग ठेवलेला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पलंगाच्या आजूबाजूची जागा अगदी स्वच्छ होती. तेथे कोळीष्टकांच नामोनिशाणही नव्हतं. यशवंतची भिरभिरती नजर भिंतीवरील एका पेंटिंगवर जाऊन स्थिरावली. डोळे किलकिले करून तो ते पेंटिंग बघू लागला. राधाक्काही भीतीने कापत त्याच पेंटिंगकडे पाहत होत्या .दोघांच्याही डोळ्यात आश्चर्य आणि एक अनामिक भीती दाटून आली होती. एका खानदानी जोडप्याचे ते पेंटिंग होते. एक राजबिंडा पुरुष आणि एक अतिशय सुंदर लावण्यवती, हसतमुख चेहऱ्याने एकमेकांकडे पहात असल्याचे ते चित्र होते. यशवंतने त्या सुंदर लावण्यवतीला क्षणार्धात ओळखले. ती देवयानी होती. मात्र त्या राजबिंड्या पुरुषाकडे नजर जाताच तो कमालीचा दचकला. दाढी मिशा वाढवून व राजपुत्राचे कपडे घालून काढलेले ते जणू त्याचे स्वतःचेच चित्र होते !! होय तो यशवंतच होता. काही क्षण राधाक्का आणि यशवंत दोघेही तसेच स्तब्ध उभे होते. प्रथम भानावर आल्या त्या राधाक्का !! लगबगीने त्या पलंगापाशी पोहोचल्या आणि काळजीपूर्वक निरीक्षण करू लागल्या. पलंगावरील गादीवरून त्यांनी हळुवारपणे हात फिरवला . त्यांच्या या कृतीचा उद्देश लक्षात येताच यशवंत कमालीचा लाजला. काहीच न बोलता दोघे पुन्हा दिवाणखान्यात येऊन बसले. थोडावेळ तसाच शांततेत गेला. एक मोठा सुस्कारा टाकून राधाक्का अतिशय हळू आवाजात बोलू लागल्या.
" हळूहळू कोडं उलगडतयं !! मला माहित असलेली या वाड्याची कथा आणि आपण आत्ता बघितलेल्या गोष्टी यांचा एकमेकांशी असलेला संबंध कळायला लागलाय मला !! हा वाडा एका अतिशय शूर आणि पराक्रमी अशा मराठा सरदारांचा होता. आत्ता आपण त्याचे भग्नावशेष पाहत आहोत. पण त्याकाळी अतिशय संपन्न असा हा वाडा होता. त्या पराक्रमी सरदाराचा पुत्र म्हणजेच राजपुत्र धैर्यशील."
बोलता-बोलता राधाक्का थांबल्या. चक्रावलेल्या यशवंतकडे स्थिर नजरेने पाहत त्यांनी पुढे बोलण्यास सुरुवात केली.
" होय !! राजपुत्र धैर्यशील !! राजपुत्राला शिकारीचा भारी नाद होता. हिंस्त्र श्वापदांची शिकार करून त्यांची मुंडकी दिवाणखान्यात टांगून ठेवण्याचा त्याला शौक होता. त्या काळी हा दिवाणखाना अशा हिंस्त्र श्वापदांचा मुंडक्यांनी भरुन गेला होता." ऐकता ऐकता यशवंतच्या अंगावर शहारे आले .रात्री त्याने पाहिलेल्या दिवाणखान्यात टांगलेल्या जनावरांच्या मुंडक्यांचा संदर्भ जुळला होता .
"पण हा शिकारीचा नादच त्याच्या अंताला कारणीभूत ठरला." क्षणभर थांबून राधाक्का पुन्हा बोलू लागल्या.
.
" धैर्यशील आणि देवयानीच्या लग्नाची पहिली रात्र होती. वाड्यातील आत्ता आपण पाहिलेले शयनकक्ष सजवून ठेवण्यात आले होते. मनातल्या मनात भावी संसाराची स्वप्ने बघत देवयानी सजून-धजून धैर्यशीलची वाट पाहत होती. तेवढ्यात कोणीतरी खबर आणली .जंगलालगतच्या वस्तीत वाघ शिरला होता. दोन गावकरी त्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते .अशा वेळी गप्प बसेल तो धैर्यशील कसला !! त्याने लगेच त्या वाघाची शिकार करण्याचा संकल्प केला. निवडक सैनिक बरोबर घेऊन त्याने जंगलाकडे प्रयाण केले .इकडे देवयानीला काहीच कल्पना नव्हती .ती आपली धैर्यशीलची वाट बघत जागत राहिली. तिकडे जंगलात हिंस्त्र वाघाशी समोरासमोर झालेल्या चकमकीत राजपुत्र धैर्यशील मृत्युमुखी पडला. पहाटे-पहाटे त्याचा मृतदेह वाड्यावर आणण्यात आला. आणि रात्रभर त्याची वाट बघत जागलेल्या देवयानी वर जणू आभाळच कोसळले. लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिच्या कुंकवावर दैवाने घाला घातला होता. मनातल्या साऱ्या आशा-आकांक्षा आणि भावी संसाराच्या सोनेरी स्वप्नांची राखरांगोळी झाली होती. त्या वेळच्या प्रथेप्रमाणे देवयानी धैर्यशीलच्या कलेवरासोबत सती गेली. पण तिच्या अपूर्ण इच्छांमुळे तिच्या आत्म्याला मुक्ती मिळू शकली नाही. आपल्या अपूर्ण इच्छांसह तिचा वाड्यात वावर सुरू झाला. दरम्यान दुसरा कोणीच वारस नसल्याने, सरदार घराणे अस्तंगत झाले."
.
बोलता-बोलता राधाक्का थांबल्या. शेजारी ठेवलेल्या तांब्या भांड्यातुन त्यांनी दोन घोट पाणी प्याले आणि क्षणभराची विश्रांती घेऊन त्या पुन्हा बोलू लागल्या,
" कर्मधर्मसंयोगाने तुझ्या वडिलांनी हा वाडा विकत घेतला आणि सर्वजण या वाड्याला 'म्हेत्रे वाडा' म्हणून संबोधू लागले. देवयानीचा पिशाच्च रूपातील वावर तुझ्या आई-वडिलांनी अनुभवला होता. परंतु तुझ्या जन्मानंतर अचानक नाही नाही ते भयंकर अनुभव येऊ लागले. तुझा पाळणा एका खोलीतून दुसर्या खोलीत आपोआप जाई . पिशाच्च रूपांमधील देवयानी तुला सगळ्यांच्या नकळत खेळवी. या सर्व प्रकारांनी घाबरून तुझ्या आई वडिलांनी मुंबईत स्थलांतर करण्याचे ठरवले आणि वाडा पुन्हा ओस पडला. अमावस्येच्या रात्री वाड्यामध्ये वावरणारी हडळरुपी देवयानी खूप जणांनी पाहिली होती. त्यामुळे येथे राहण्यास कोणीच कधी आले नाही. तूच राजपुत्राचा पुनर्जन्म असावास असं कालच्या घटनेनंतर मला वाटू लागले आहे. राजपुत्राच्या चित्राशी असणारं तुझ्याबरोबरच साम्य, आणि काल रात्री देवयानीने तुझ्याबरोबर केलेला संग यावरुन माझा असा समज झाला आहे."
राधाक्का बोलायच्या थांबल्या आणि त्यानंतर पसरलेल्या शांततेने यशवंत भानावर आला.

" राधाक्का वाड्यात देवघर कोठे आहे ?" खिशातील बाळकृष्णाची छोटी मूर्ती बाहेर काढत यशवंतने विचारले.
" आईने देवघरात ठेवायला ही मूर्ती दिली आहे."
समाधानानं हसत राधाक्का उठल्या आणि त्यांच्या पाठोपाठ यशवंत देवघराकडे निघाला. यशवंतने देवघरातील देव्हाऱ्यात बाळकृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि मनोभावे हात जोडले. दोघेही देवघरातून पुन्हा दिवाणखान्यात आले. दिवाणखान्यात ते पाऊल ठेवतायत् न ठेवतायत तोच एका अंधार्या कोपर्यातून मरतुकडं काळं कुत्र वेगाने बाहेर पडलं आणि वाड्याबाहेर पडून दिसेनासं झालं. आश्चर्याने स्तंभित होऊन यशवंत आणि राधाक्का बघतच राहिले.
" हेच काळ कुत्र काल रात्री देवयानी बरोबर मी बघितलं होतं." थरथरत्या आवाजात यशवंत बोलला. काही न बोलता राधाक्का पुन्हा एकदा हसल्या.
"यशवंत..... देवयानीच्या राजपुत्राकडून असलेल्या अपूर्ण इच्छांची पूर्तता काल रात्री तुझ्याकडून झाली आहे. त्यामुळे तिला मुक्ती मिळून तुमचा वाडाही शापमुक्त झाला असावा असा माझा कयास आहे. काळ्या कुत्र्याचं वाड्याबाहेर तडकाफडकी निघून जाणं, हे त्याचंच द्योतक आहे. आता वाडा आणि जमीन विकण्यापेक्षा तू आणि आई पुन्हा एकदा येथे येऊन स्थायिक व्हा असा माझा सल्ला आहे. म्हणजे मलाही उतारवयात माझ्या जुन्या मैत्रिणीची साथ लाभेल, आणि तुलाही मुंबईच्या धकाधकीतून बाहेर पडून येथे एखादा उद्योग धंदा सुरू करता येईल."
.
.
सकाळचे सुंदर आणि प्रसन्न वातावरण मन मोहून टाकत होते.दिवाणखान्यातील फरशीवर पडलेली कोवळ्या ऊन्हाची नक्षी एखाद्या रांगोळीसारखी शोभून दिसत होती. रात्री घडलेल्या घटनांचे नामोनिशाणही उरले नव्हते. देवघरातील देव्हाऱ्यात ठेवलेला बाळकृष्ण खट्याळपणे यशवंतकडे बघून हसत होता ..... वाडा शापमुक्त झाल्याची जणू ग्वाही देत होता.

समाप्त
.
.
लेखक - मिलिंद अष्टपुत्रे.
समाप्त
.
.
लेखक - मिलिंद अष्टपुत्रे.