गुणांक्का ( पार्ट 3)
( ह्या आधीच्या सर्व पार्ट ची लिंक शेवटी दिली आहे. )
"नाय र बाबा , लई हट्टी हाय पोरग माझं , आणि लई भडक डोक्याचं हाय , डोक्यात लगेच राग घालून घेतंय . त्यानं घेतलेल्या घरात नाय राहिल तर कुठं तर निघून जाईल रागात . त्याचा बा त्याच्या लहानपणी वाराला . कुणाचा धाक राहिला नाय त्याला . तुमी नका करू काळजी माझी मी राहीन निवांत . जर माझं पोरग दिसलं तर त्याला घरला धाडा . आणि तुम्हाला कुणाला काय मदत लागली तर सांगा."गुणांक्का डोळ्यातील पाणी पुसत बोलली .
गुणांक्का त्या घरात राहणार म्हणून गावाला काळजी वाटत होती तिची . शिरपा तिला सोडायला गेला . तिला नदी पार करून दिली. गुणाक्का शिरपा ला जेवण्याचा आग्रह करत होती पण शिरपाला कधी एकदा परत गावात जातो असे झाले होते . तशीच होडी घेऊन तो मागे फिरला. जाताना परत गुणाक्का ला सूचना केली सांभाळून राहा म्हणून . गुणाक्का ला खूप बर वाटल तिची कोण तर काळजी घेत होत .
गुणाक्का संध्याकाळी गावात परत आली . तिला शिरपा कडून समजले होते भीमा ची बायको रखमा गरोदर होती . भीमा चे वडील त्याच्या लहानपणीच गेले होते आणि भीमाची आई जाऊन 2 वर्ष झाली होती . रखमाला तर तिच्या मामा -मामी ने सांभाळले होते . आणि मामा- मामी खूप लांब राहत असे. म्हणजे रखमाची काळजी घेणारे बाई माणूस असं कुणीच न्हवते . रखमाची एक मावशी होती ती पण लांब राहत असे. गुणाक्का भीमाच्या घरी आली . त्याला आणि रखमाला सांगितलं आज पासून मी तुमची आई . पोरी तू काय भी करायच नाय आज पासून समंध मी बघते . मी सकाळच्या ला येत जाईल तुझ्या घरच आवरते मग माझ्या घरी जाते आन संध्याकाळच्या परत येते . रखमाच्या डोळ्यात पाणी आले . आता गुणाक्का आहे आपल्या बायकोची काळजी घ्यायला हे पाहून भीमा निर्धास्त झाला .
गुणाक्का रोज सकाळी आणि संध्याकाळी भीमाच्या घरी येत . भीमाच्या घरचे सर्व आवरत असे . 2 दिवस झाले गुणाक्का जरा अशक्त वाटत होती तरी पण ती रखमा त्या साठी आली होती . गावातील नामा कुंभार आजारी होता . तरणाबांड गडी , रोज व्यायाम करून कमावलेलं शरीर , पिळदार मिशा . अंगात ताप मुरला आणि नामा हांतरुणालाच खिळला . काही केल्या ताप उतरतच न्हवता . नामा ची बायको आणि आई नी सगळे उपाय केले पण नामा ची तब्बेत ठीक होत न्हवती . गुणांक्का ला फारच कस तरी होऊ लागलं मग ती तिच्या घराकडे गेली . तीला एवढा अशक्तपणा जाणवत होता की तीला नाव पण वल्हवता येईना . शेवटी भीमा तीला नदीपार सोडून आला . भीमा गावात आला तेव्हा कळले की नामा आता या जगात राहिला नाही . तो तडक नामा च्या घरी गेला . नामा च्या घरासमोर गाव जमला होता . नामा ची बायको आणि आई खूप रडत होत्या . हळूहळू अंधार पडू लागला होता . नामा चे प्रेत लवकर जाळन्यासाठी न्यायला हवे होते . गावातील लोक तयारी ला लागले . प्रेत नावेत ठेवलं . बाकीचे लोक पण प्रेताला अग्नी देण्यासाठी आले . नदीपार करून स्मशानात आले तेव्हा खूपच अंधार पडला होता. सर्वाना तेथून कधी परत गावात जातोय असं झालं होत . प्रेताला अग्नी दिला . सगळी तडक नदीकडे जाऊ लागला . भीमा म्हणाला अरे आज गुणांक्का ची पण तब्बेत ठीक न्हवती र . इथे आलूया तर तीला भी बघून जाऊ . पण त्या साठी कुणी तयार होईना . शिरपा बोलला भीमा रखमा घरी एकटी हाय ते भी अशा अवघडलेल्या अवस्थेत , आणि आता हित एवढ्या रातच्याला थांबणं बरोबर नाय . वाटल्यास उद्या सकाळी येऊ पण आता हाल इथंन . भीमाला पण शिरपा चे बोलणं पटलं . सगळी जण नावेत बसून गावाकडे परत गेली
इकडं त्या स्मशानात कुणी तरी आलं होत . त्या व्यक्तीन जवळच पडलेल्या काठीने ते आगीत जाळणारे प्रेत खालती ढकलले . ती व्यक्ती तिथेच बसून ते प्रेत खाऊ लागली . थोड्या वेळात प्रेताची राहिलेली हाडे गोळा करून ती व्यक्ती त्या जंगलाकडे जाऊ लागली . त्या व्यक्तीन नामा ची हाडे जंगलात फेकली .
दुसऱ्या दिवशी भीमा गुणांक्का च्या काळजी पोटी तीला भेटायला तिच्या घराकडे निघाला . त्याला गुणांक्का नदीच्या काठावरच भेटली.
भीमा म्हणाला "बर झालं इथेच भेटलीस ,गुणांक्का तुलाच भेटायला येत होतो बघ , कशी हाईस ? बर वाटतंय का तुला ? लई काळजी वाटत होती बघ तुझी . काल रातच्यालाच तुझ्या कडे येणार होतो पण शिरपा बोलला उद्या सकाळी जा ."
" किती र पोरां जीव लावशील , एक तू हाईस एवढी काळजी करतोस माझी आन एक माझं पोरग हाय त्याला काय भी पडली नाय माझी . आता जरा बरी हाय तब्येत . आणि आता वयाच्या मानानं होणार कि र काय तर .लई बर वाटल बघ तू मला भेटायला आला ते पाहून . चल मी तुझ्या घरीच येत होती ."
"गुणांक्का तुझ् पोरग कुठं हाय ? "भीमा ने विचारलं .
"काल रातच्याला लई उशिरा आला , जेवण केल आणि परत रातच्याला बाहेर गेलं . काय करत कुठं जात कुणा बरोबर असत काय भी मला सांगत नाय . काळजी वाटती रे मला त्याची किती भी झालं तर आई हाय ना मी . तो कसा भी वागला तरी माझ्याच पोटचा गोळा हाई. " गुणांक्का शुन्यात कुठेतरी विचार करत बोलली . तीच पुढ कस होणार याची काळजी तिच्या डोळ्यात दिसत होती .
क्रमश .....
गुणांक्का ( पार्ट 2)
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/2.html
गुणांक्का (पार्ट 1)
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/1.html