दैवी संपदा लाभलेली झाडे....
लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
प्रकाशन:- दि.१०.०६.२०१८
©Ankush S. Navghare ®२०१८
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो मी अंकुश सु. नवघरे. हा लेख कुठल्याही प्रकरच्या जादूटोणा, तंत्र मंत्र किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. हा लेख फक्त माहिती आणि करमणूक ह्या हेतूने पोस्ट केली गेलेली आहे.
नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला काही अशा झाडांबद्दल (झाडांपासून मिळणाऱ्या फळे, फुले, मूळ) माहिती सांगणार आहे ती घरात किंवा घरासमोर लावली असता किंवा त्या पासून मिळणाऱ्या वस्तू घरात ठेवल्या असता घरात कुठल्याही अशुभ शक्तींचा किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश सहजासहजी होत नाही किंवा अजिबातच होत नाही. तसेच ह्या झाडांच्या नुसत्या सानिध्याने आपले रक्षण होते किंवा त्यांच्या औषधी गुणधर्मामुळे आपले काही आजारही बरे होऊ शकतात.
१. तुळस:- आपल्या देशात तुळस ह्या झाडाला खूपच पवित्र मानले जाते आणि रोज त्याची पूजा केली जाते. एखाद्या घरात तुळस नाही असे कुठेच दिसून येत नाही. तुळशीची पाने भगवान श्री विष्णूंना खूप प्रिय आहेत. ज्या घराच्या दारासमोर किंवा घरात ईशान्य दिशेला तुळशीचे रोप लावलेले असते त्या घरात कधीच अशुभ किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, किंवा करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरात तुळस लावावी असे प्राचीन शास्त्रात पण लिहिले आहे. असे म्हणतात की ज्या ठिकाणी तुळस लावली जात नाही तिथे आशा शक्ती सहज प्रवेश करू शकतात आणि मग त्याच्या प्रभावाने घरात आजार, भांडणे इत्यादी आणू शकतात. मी काही घरी अशी पहिली आहेत की तिथे तुळस अजिबात जगत नाही अशा ठिकाणी जमिनीत किंवा वास्तूत नक्कीच काहीतरी दोष असतोच असतो. घरात वास्तू दोष आहे की नाही किंवा घरात काही अशुभ आहे की नाही हे पाहण्याकरिता घरात तुळस लावावी. ज्या घरात तुळस चांगली वाढत असेल तिथे सर्व मंगल असते. तुळशीचे काही औषधी गुण पण आहेत जसे खोकला झाल्यावर दिवसातून 3 वेळ ५ तुळशीच्या पानांचा रस आणि खडीसाखर घेतली असता अराम पडतो इत्यादी. तुळशीचे दोन प्रकार जास्त प्रचलित आहेत. एक कृष्ण तुळस आणि दुसरी राम तुळस. त्यापैकी कृष्णतुळस ही उत्तम मानली जाते, कृष्णतुळस च्या रोपाच्या आसपास उगवलेले गवत जरी उखडून तुम्ही घरात कागदात बांधून ठेवले तरी तुम्हाला खूप सकारात्मक प्रभाव दिसून येतो, परंतु असे दिसून येते की कृष्ण तुळस फ़क्त घराच्या बाहेरच कृष्ण राहते परंतु ती घरात लावली असता काही काळाने राम म्हणजेच सफेद होते.
२. लाजाळू:- लाजाळू चे रोप हे शक्यतो शेतात किंवा शेताच्या बांधावर उगवते किंवा क्वचितच रस्त्याच्या कडेला उगवलेले दिसते. लाजाळू च्या पानांना हात लावला असता ती पाने मिटायला सुरवात होते म्हणूनच तिला लाजाळू असे गमतीने म्हटले जाते. त्यात वरून खाली मिटणारी पाने आणि खालून वर मिटणारी पाने असा प्रकार असतो आणि त्यावरूनच लाजळूचे महत्व कमीजास्त होत असते. हे सर्व असले तरी लाजाळू च्या झाडात प्रचंड दैवी शक्ती आहे. ज्या घरात लाजळूचे झाड असते तेथे कधीच अशुभ शक्ती प्रवेश करू शकत नाहीत तसेच घराला सुब्बत्ता येते. ज्यांचे सहजासहजी ध्यान लागत नाही त्यांनी लाजळूची काही पाने आपल्या असनाखाली ठेऊन ध्यान केले असता ते जलद लागू शकते किंवा गाढ लागू शकते. दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लाजाळूची ११ पाने, हळकुंडाचा एक तुकडा, एक रुपयांचे एक नाणे, ७ काळे उडीद आणि एक सुपारी ठेऊन, लाल कपड्यात बांधून त्या पुरचुंडीची विशेष शबरी लक्ष्मी मंत्राने पूजा करून ती पुरचुंडी तिजोरीत ठेवली असता घराचे वातावरण चांगले राहते, घरात धनधान्य समृद्धी येते आणि कोणालाही बाहेरची बाधा लागत नाही. लाजळूचे झाडे शक्यतो पावसाळ्यात लावलेली चांगली असतात.
३. बेल:- भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असल्याने बेलाची पाने खूपच प्रसिद्ध आहेत. बेल हा एक खूप मोठा वाढणारा वृक्ष आहे तरीही सुरवातीच्या काळात त्याचे रोप तुम्ही कुंडीत लावू शकता. ज्योतिष शास्त्रानुसार बेलाच्या झाडाची सेवा केल्यामुळे भगवान श्री शंकराची सेवा घडत असते आणि त्यांचे सर्व भूत, प्रेत, गण, अशुभ शक्ती ह्यांच्यावर अधिपती असल्याने त्या शक्तींचे कारक ग्रह, राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावामुळे आपण वाचू शकतो. राहू आणि केतू ह्याच ग्रहांच्या पत्रिकेतील स्थितीवरून आपल्यावर बाहेरची बाधा होऊ शकते की नाही हे कळू शकते. परंतु, जर घरात बेलाचे झाड लावले आणि रोज त्याची सेवा केली तर राहू आणि केतू ह्या ग्रहांची सेवा घडून त्यापासून होणाऱ्या संभाव्य बाधा टळू शकतात. हे झाड शक्यतो आग्नेय दिशेला लावलेले चांगले असते. बेलाच्या फळाच्या गराचे सरबत पोटदुखी, मुरडा इत्यादींवर खूप गुणकारी असते. बेलाची पाने चावून खाल्ल्याने दात बळकट होतात तसेच दाताला एक प्रकारचे तेज प्राप्त होऊन बोलताना लोकांवर त्याचा संमोहनासारखा प्रभाव पडून तुमची पैशाची कामे जलदगतीने होऊ शकतात. एक गुप्त प्रयोग असा आहे की बेलाच्या पणाला एक ४×४ आकाराच्या पांढऱ्या कागदावर मध्यभागी चिकटऊन त्यावर त्राटक केले असता तुमच्यावर होणारे करणी प्रयोग समोरच्यावरच उलटतात. सर्वांनी असा गुणकारी वृक्ष लावून स्वतःचे जीवन सुखी करून घेणे.
४. ब्राम्हकमळ:- ब्राम्हकामळाचे झाड खुपच पवित्र मानले जाते. जेथे ब्रम्हकमळाचे झाड लावले जाते ती जागा खूप पवित्र असावी लागते अन्यथा त्याला फुले येत नाहीत व त्याची वाढ होत नाही. घरात वास्तुदोष किंवा काही अशुभ शक्तींचा वावर आहे की नाही हे पाहण्यासाठी ह्या झाडाचा उपयोग होऊ शकतो. जर घरात काही दोष किंवा तसेच काही असेल तर ह्याची पाने काळी पडू लागतात किंवा खराब होऊ शकतात. ज्या दिवसापासून तुमच्या घरातील ब्राम्हकमळाच्या झाडाची पाने खराब होऊ लागतील तेव्हा निश्चितच घरात काहीतरी समस्या निर्माण झाली आहे असे समजावे.
५. रुद्राक्ष:- रुद्राक्ष तर सर्वांना माहीत आहेच. रुद्राक्षाची उत्पत्ती भगवान श्री शंकरांच्या अश्रूंतून झाली आहे अशी आख्यायिका आहे. श्री गुरुचरित्रात असे म्हटले आहे की एक सहस्त्र रुद्राक्ष धारण करणारा मनुष्य साक्षात शिवासमान असतो. रुद्राक्षचे एकूण २१ प्रकार असतात. त्यांच्यावर असणारी रेष हे त्यांचे वेगळे पण स्पष्ट करते. त्यात १ मुखी आणि २१ मुखी रुद्राक्ष हे खूपच प्रभावी मानले जातात परंतु ते मिळण्यासाठी खूपच भाग्य लागते किंवा पैसे लागतात. सध्या बाजारात मिळणाऱ्या रुद्राक्षांपैकी ५ मुख असणारे रुद्राक्ष हे खरे असून बाकी सर्व नकली मिळत असतात. ५ मुखी रुद्राक्ष हे सहज उपलब्द्ध होतात. गळ्यात रुद्राक्ष धारण करणाऱ्याच्या मागे कुठलीही वाईट शक्ती लागत नाही. अशुभ शक्ती आशा माणसापासून लांब राहते. म्हणूंन प्रत्येकाने किमान एक रुद्राक्ष तरी धारण करावा. रुद्राक्ष हृदयाच्या इथे धारण केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच रुद्राक्ष पाण्यात भिजत घालून ते पाणी सकाळी अनाशे पोटी प्यायल्याने तुमचे निद्रानाश, इत्यादि मानसिक आजार बरे होऊ शकतात.
६. टिकली:- टिकली ही वनस्पती उंच डोंगरावर खडकांत आढळून येते. ही एक काटेरी आणि बोराच्या झाडासारखी परंतु साधारणतः एक फूट उंची पर्यंत वाढणारी वनस्पती आहे. टिकली ची पाने टिकली सारखी आकाराने लहान आणि गोल दिसतात म्हणून त्या झाडाला टिकली असे म्हटले जाते. टिकलीच्या झाडाला खूप काटे असल्याने त्याची पाने खूप काळजीपूर्वक काढावी लागतात. ती पाने सुकवून अपत्याच्या पणाची विडीसारखी नळी करून त्यात ही सुकलेली पाने तंबाखूच्या ऐवजी घालून ती विडी पेटवून त्याचा धूर घेतला असता कुठल्याही प्रकारची वाईट किंवा अशुद्ध शक्ती तुमच्या शरीरातून निघून जाते तसेच एक प्रकारचा सात्विक आनंद प्राप्त होतो. कित्येक साधु, तपस्वी अशा प्रकारे टिकली चे सेवन करत असतात. टिकलीचे झाड जरी आपण अंगणात लावू शकलो नाही तरीही तिची पाने सुकवून घरात ठेवली असता, घरावर कोणाची वाईट नजर, किंवा अशुभ शक्ती येऊ शकत नाही.
७. कोरफड:- ह्या झाडाला इंग्रजीमध्ये alovera असे म्हटले जाते. कोरफळीत नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती आहे. कोणाला नजर लागली असता त्याच्यावरून कोरफड ७ वेळा उतरवून कचऱ्यात टाकली असता नजरदोष जातो, त्यासाठी वेगळ्या मंत्राची आवश्यकता नसते. कोरफळीच्या झाडाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे ते झाड हवेवर पण खूप दिवस जगू शकते म्हणून कोरफळीचे लहानसे रोप तुम्ही घराच्या दाराच्या चौकटीला वरच्या भागाला बांधले तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करू शकत नाहीत. कोरफळ लक्ष्मीप्राप्तीच्या कामात पण उपयोगी पडू शकते.
८. कोहळा:- कोहळा ही भोपळ्यासारखी दिसणारी एक वनस्पती आहे. कोहळ्या मध्ये तीव्र प्रकारच्या नारारात्मक शक्ती, नजर आणि अशुभ शक्ती खेचून घेण्याची शक्ती असते. कोकणासारख्या गावांमध्ये तुम्हाला घरोघरी कोहळे बांधलेले आढळून येतील. कोहळा घरात पण बांधता येतो. ज्यावेळी नजरेचे प्रमाण वाढते त्यावेळी कोहळ्यातून पाणी ठिबकू लागते अशावेळी त्या कोहळ्याचे विसर्जन करून त्याजागी नवीन कोहळा बांधावा. अशाप्रकारे बदललेल्या कोहळ्यातून जेव्हा पाणी ठिबकायचे बंद होईल तेव्हा घरातल नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे गेली असे समजावे.
९. लिंबू:- लिंबाबद्दल तर सर्वानाच माहीत आहे. सर्व प्रकारच्या तांत्रिक आणि मांत्रिक कामात लिंबाचा आवर्जून वापर होत असतो करण लिंबामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा खेचण्याची ताकद आहे. असे म्हणतात की तंत्रात १००० बोकडांचा बळी हा १ रेड्याच्या बळी सारखा असतो, १००० रेड्यांचा बळी हा १ माणसाच्या बळी सारखा असतो आणि १००० माणसांचा बळी हा एक लिंबू कापण्यासारखा असतो. म्हणूंन कुठल्याही प्राण्यांचा बळी देण्यापेक्षा एक लिंबू कापणे हे जास्त प्रभावी मानले जाते. लिंबाचे झाड घरात किंवा घराच्या आवारात लावणे खूप शुभ मानले गेलेले आहे. लिंबाचा एक टोटका असा आहे की, एक लिंबू घेऊन तो काचेच्या ग्लास मध्ये पाण्यात बुडता ठेऊन तो ग्लास घरात सर्वाना दिसेल असा ठेवल्याने घरात येणाऱ्या सर्वांच्या वाईट नजरा तो शोषून घेतो आणि त्यापासून घरच्यांची सुरक्षा करतो. तो लिंबू खराब झाल्यावर त्याजागी नवीन लिंबू ठेवावा.
१०. काळी हळद:- हळदीचे काही प्रकार आहेत त्यात काळी हळद हा एक प्रकार आहे. मार्केट मध्ये काळ्या हळदीच्या नावाने काहीपण दिले जाते आणि पैशे उकळले जातात त्यापासून लांब राहणे. काळी हळद वशीकरण, कोर्ट केसेस मध्ये विजय, राजकारण मध्ये विजय, भूत बाधेपासून सुटका करून घेण्यासाठी तसेच लक्ष्मी प्राप्ती साठी उपयोगात आणली जाते. काळ्या हळदीचे रोप हे कर्दळीच्या झाडासारखे असते परंतु फरक हा असतो की काळ्या हळदीच्या पानावर मध्यभागी काळ्या रंगाची रेष असते. काळी हळद सहजा सहजी मिळत नाही. सर्वात उत्तम प्रतीची काळी हळद अमरकंटक, मध्यप्रदेश येथे मिळते तसेच कामाख्या मंदिराच्या आसपास मीळते. काळी हळद ओळखता आली पाहिजे नाहीतर काळी हळद सांगून आंबेहळद पण दिली जाते. काळ्या हळदीच्या झाडाचे मूळ कामासाठी वापरले जाते. मूळ कापले असता आतमध्ये काळा भाग असतो. हळदीचे ७ प्रकार आहेत त्यात एक प्रकार काळी हळद म्हणून प्रचलित आहे.
हळदीचे ७ प्रकार....
१. पांढरी हळद... ही आतून पांढऱ्या रंगाची असते आणि इतर हळदीच्या जोडीला ही वापरतात.
२. जांभळी... हीचे मूळ आतून जांभळे असते आणि पानावर जांभळा पट्टा म्हणजे रेष आलेली असते.
३. कुकवी... ही कुंकवासारखी लालसर असते. हिची ओळख म्हणजे हिच्या मुळाने कागदावर रेष मारली असता लाल रेष उमटते. हि खूप शक्तिशाली मानली जाते. हि धनप्राप्ती साठी पण वापरली जाते.
४. पिवळी... हि आतून पिवळी असते. हि वाशिकरणासाठी वापरली जाते.
५. शेंदरी... हि आतून शेंदरा सारखी असते. हि पतिपत्नी मध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी वापरता येऊ शकते.
६. काळी.. हि सर्वात शक्तिशाली हळद असते. हि खूपच दुर्लभ असून खूप खोल जंगलातच मिळू शकते. हिचे ५० ते १०० ग्राम वजनाचे मूळ ५० लाखाच्या आसपास जाऊ शकते. आणि ज्याच्या नशिबात असेल त्यालाच ती मिळू शकते. हिच्या आसपास रक्षण करण्यासाठी कोब्रा नाग असतात. हिची ओळख पटवणे आणि हिला काढणे ह्याचे काही प्रकार आहेत ते मी नंतर कधीतरी सांगेन.
७. साधी हळद... हि जेवणात वापरली जाते.
काळी हळद हि एक प्रकारची संजीवनी बुटी सारखी असते ज्यात दैवी गुण समावण्याची शक्ती आहे. बहुतेक सर्व संजीवन बुटी ह्या हिमालयात मिळतात. मग प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रात काळी हळद कशी आली किंवा काही औषधी वनस्पती कशा आल्या तर त्याची एक आख्यायिका जी मी काही जाणकारांकडून ऐकली आहे ती शेयर करत आहे.
....ज्यांनी कोणी रामायण पाहिल वाचलं असेल त्यांना हे माहीतच असेल की ज्यावेळी श्री राम आणि लक्ष्मण वर रावणाचा मुलगा इंद्रजित एक शक्ती प्रयोग करतो त्यावेळी ते दोघेही बेशुद्ध होतात. त्यावेळी श्री हनुमान रावणाच्या वैद्या ला उचलून घेऊन येतात. तेव्हा रावणाचा वैद्य सांगतो की ह्यांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला संजीवन बुटी ची आवश्यकता आहे आणि ती फक्त हिमालयात द्रोणागिरी पर्वतावर उपलब्ध आहे. हे ऐकून श्री हनुमान द्रोणागिरी पर्वतावर जातात परंतु त्यांना तिकडे नक्की संजीवनी बुटी कुठली ह्याची ओळख पटत नाही म्हणून ते पूर्ण पर्वतच उचलून आणतात. तो पर्वत आणत असताना श्री रामाचे भाऊ भरत त्यांना बाण मारतात आणि त्यामुळे तो पर्वत आणि ते दोघेही खाली पडतात अशी आख्यायिका आहे.
....तो पर्वत आणत असताना त्या पर्वताचा काही भाग तुटून खाली पडतो तो भाग म्हणजे आत्ताच नाशिक बाजूचा सप्तश्रुंगी देवीच्या गडावरील वणी या क्षेत्राचा डोंगर. त्याचप्रमाणे वसई येथील तुंगारेश्वर चा डोंगर आणि पालघर येथील काळदुर्ग तसेच इतर काही डोंगरांवर थोड्याफार प्रमाणात त्या संजीवनी बुटी पडल्या आणि त्यांची वाढ होत राहिली. त्यापैकी वणी चा डोंगर खूपच सिद्ध आहे आणि तिथे खूपच जाडीबुटी आहेत. कोणी जर नवनाथ भक्तीसार ह्या नवनाथांच्या सिद्ध ग्रंथाचे वाचन केले असेल तर त्याला माहित असेल की नावनाथांचे गुरु श्री मच्छीन्द्रनाथ ह्यांना श्री गुरुदेव दत्तांनी ह्याच भागात दीक्षा दिल्यानंतर त्यांनी इथे १२ वर्षे तिथे तपश्चर्या करून श्री सप्तशृंगी मातेला प्रसन्न करून वरदान प्राप्त करून घेतले होते. त्यामुळे हा डोंगर खूप सिद्ध आहे आणि तिकडे खूप संजीवनी बुटी सापडतात.
.... काळी हळद नुसती जवळ बाळगण्याने भाग्योदय होऊ शकतो. काळ्या हळदी च्या चमत्कारा बद्दल गव्हर्नमेंट ला पण माहिती असून ते उघडपणे काही बोलत नाहीत. रेल्वे च्या इंजिन मध्ये काळी हळद आणि किमया शेंदूर चा उपयोग होतो. रेल्वे चे इंजिन एक प्रकारे राक्षसी प्रवृत्तीचे असल्याने त्याच्याकडून बरीच आक्सीडेंट होत असतात परंतु रेल्वे मध्ये कधी कोणाला भूत बाधा शक्यतो होत नाही हा सर्व काळ्या हळदीचाच परिणाम असतो. त्याच प्रमाणे काळी हळद satelight मध्येही वापरली जाते कारण तिला RP म्हणजेच Rice Pulling ची पण शक्ती आहे.
काळी हळद हे एक असे झाड आहे त्याबद्दल जितके लिहावे तितके कमीच आहे आणि म्हणून काळ्या हळदीसंबंधी अजून माहिती उद्या देण्यात येईल.
धन्यवाद...
अंकुश नवघरे...
Desclaimer: सदरची माहिती ही काही जाणकारांच्या मार्गदर्शनातून आणि साधकांकडून संकलित केली गेलेली आहे ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.