कथेचे नाव :- मी गिरीजाची मैत्रीन
लेखक :- मंदार साखरकर
भाग :- १५
.
आई बाहेर येत बोलते साहिल तू कधी आलास.
.
घरचे एक एक करून सगळे बाहेर येतात.
.
सुरेखा बोलते थांब तुला सगळ्यांची ओळख करून देते.
ही आहे खुशी, साची, मुग्धा, रूपाली, स्वाती आणि तिला तर ओळखतो ना तू.
हे गिरिजाचे आई-बाबा, ती मुग्धाची आई, आणि ते वर उभे आहेत ते गिरिजाचे मित्र.
हे आहेत साहिल साखरे.
.
मुग्धा काही बोलणार.
.
सुरेखा तिच्याकडे बघत बोलते बस गप्प उभी रहा म्हंटले.
.
साहिल बोलतो एक मिनिट सुरेखाकडे बघत बोलतो. हे कोण म्हंटले तू. बोलून अदृश्य होत वर जाऊन एकेकाच्या डोळ्यात नजर घालून परत आपल्या जागेवर येत बोलतो काही नाही.
का ग तिला गप्प बसवले तू.
.
मुग्धा बोलते मोठे होण्याचा वर्चस्व आजून काय.
.
मध्येच आई बोलते जेवणार की जाणार तू नाही म्हंटले माफिया वाट बघत असेल ना.
बदलली का मूल झाल्यावर का आहे तशीच आहे.
.
बदलली आहे मी, काय ग ह्यालाच बोलवले आम्हाला कोण बोलावणार.
आई ही आहे ऐकता आणि सारिका.
सारिका, ऐकता ही आजी आणि ती बसली आहे ती बाबांची बहिण नाव कुठले सांगू तूच बोल.
.
आई बोलते मुलींनो हिचे नाव लावण्या रघुनाथ चाकण आणि तुमच्या आजीचे नाव चंद्रकला रघुनाय चाकण. असे बोलून गिरिजाकडे बघत बोलते आणि त्या दोन्ही मुलींना बोलते या ईथे.
.
दोघी एकसाथ बोलतात आमची मोठी ताई कुठे आहे ग आजी.
ती बघ सगळ्यांच्या पाठी उभी आहे. असे बोलून गिरीजाकडे धावत जातात.
.
गिरिजा खाली बसत बोलते या इकडे बोलून दोघाना उचलत दोघांच्या गालावर पपी देत बोलते बरोबर ओळखले ग. मला सांगा कसे ओळखले तुम्ही ग.
.
दोघी बोलतात रक्ता वरून ग ताई. तिच्या कानात काही तरी बोलतात.
.
मुग्धा बोलते म्हणजे तू, हिची मुलगी. काय ग सुरेखा, म्हणून हिचे जास्त लाड पुरवत असते काय, वरून काय बोलली होती, मला पण माहिती नाही माझी मुलगी कुठे आहे. ही आपल्यामध्ये असून हिने सांगितले पण नाही, आता गप्प का ग.
.
गिरिजा त्या दोघांना खाली ठेवत बोलते. गप्प ए मी नाहीं आहे, हिची मुलगी, मी माझ्या आई बाबांची मुलगी काही पण.
अग त्या लहान आहेत, म्हणून त्यांचे मन ठेवण्यासाठी मी तशी वागले जा मुलींना आजी कडे.
आई तू आता काही विचार करू नकोस आणि तू पण.
.
तसे साहिल, सुरेखा आणि रक्षा हसायला लागतात गिरिजा कडे बघून.
.
रक्षा बोलते खूप प्रश्न विचारते ना तू म्हणून तुझी जरा आम्ही खेचली.
मुग्धा तुझ्याकडे हीच शक्ती आहे आईने आणि खुशी ने दिली आहे. दुसऱ्यावर ताबा घेऊन त्यांना ह्या पद्धतीने वापरावे.
आई निघतो आम्ही सगळे परत भेटू. सारिका आणि ऐकता बोलते. आम्ही पहिल्यांदा आमच्या मोठ्या बहिणीला भेटलो आहे आणि आजीकडे आलो आहोत, तर आम्ही इथे राहू का काही दिवस बाबा.
..
रक्षा बोलते ठीक आहे रहा, पण कोणाला त्रास द्यायचा नाही समजले आणि आपल्या रूपात आल्यातर समजून जा मग. आई जातो आम्ही , चल ग खुशी आणि साची बोलून अदृश्य होतात.
.
आई बोलते जा आपल्या मोठ्या बहिणी बरोबर तिच्या खोलीत जा. काय ग का बोलवले होते साहिलला काय काम काढले त्याच्याकडे.
गिरिजाकडे बघत बोलते एकटिंग करत होती की खरच ग मला वाटले खरच तू हिची मुलगी आहेस. जा त्यांना घेऊन तुझ्या खोलीत.
.
खुशी बोलते ही चिरकूट अरे ही कुठे आणि ही चल. जेवायचे काय, मिलाप झाले ना, पोटाचे मिलाप बघा जरा कोण बनवणार आहे. बोलून वर बघत बोलते फुकट नाही भेटत खाली या जरा बाल्कनीतून, हम आपले हे कोण शो संपला.
.
सुरेखा बोलते राहूदे मी बनवते, स्वाती ये मदतीला तू कुठे जाते माझी लाडकी काय मध्ये बोललीस तू हिचे लाड पुरवते काय. तुझे नाही पुरवत काय ग.
आम्हाला पण मम् मम् पाहिजे आहे. आम्ही पण जेवतो सगळे नकुला रघुनाथ चाकण. हेच खरे नाव ना आजी. ताई तुला माहिती आहे का हिला ना लाज वाटते हे नाव सांगायला.
आणि
.
तशी मुग्धा बोलते मीच दिसते काय ग सगळ्यांना बोलून. आपल्या आईच्या पाठी जाऊन उभी राहते बोलते, हो खूप पुरवले माझे लाड, मी लास्ट टाइमला सांगितले. मला ही जीन्स पॅन्ट आणि हा ते टी-शर्ट पाहिजे, तर काय बोलली तू मला, आठव जरा भूत, ड्रॅकुला, हडळ, मानव पिशाच्च.
का प्रयोग करू का तुझ्यावर आता हिच्यावर केला तसा बोल, सगळ्यांना सोडिन तुझ्यावर हां.
.
तशी आई बोलते, गप्प बस काय बोलते आहे तिला तू, जा चल माझ्या पाठी उभी नको राहू.
.
सुरेखा बोलते चला साहेब या खूप नाटक चालू आहेत तुझी हा कोण, ती कोण आणि काय बोलते आहे मला तू जीन्स पॅन्ट काय.
आई हिला दिली नाही ती पॅन्ट आणि टी-शर्ट. हिच्या लग्नाला देणार आहेस काय आणि बरोबर ते झुमके पण दे.
.
सुरेखा बोलते जाते कुठे तू नंतर आई देईल तुला आधी चल किचन मध्ये. असे बोलून तिला किचनमध्ये घेउन जात.
मुग्धाला बोलते बघ मी जे काय बोलते आहे. त्यावर लक्ष दे रात्री ३.०० वाजता साहिल एकीला घेऊन येणार आहे तिला नीट सांभाळायचे समजले.
ती कोण आहे वगैरे ते मी तुला ती आल्यावर सांगीन आता काही प्रश्न नाही समजले.
आजून एक ह्यातले काही आईला, समजले नाही पाहिजे ३.०० वाजे पर्यंत. तुला समजले का मी काय बोलले ते.
.
मुग्धा बोलते हो समजले पण ते साहिल आणि रक्षा त्याच्या मुली का आल्या अचानक.
.
सुरेखा बोलते तुम्हाला बघायचे होते ना.
साहिल आणि रक्षा ला. आणि हो युक्ता आणि लावण्या ती मीच समजले का. आता बस कर आणि काम कर.
.
मुग्धा तिच्याकडे बघत बोलते हो का. मग हा भाऊ कुठून मधेच आला म्हणजे मामा.
.
सुरेखा तिच्या डोळ्यात बघून बोलते आता काय.
.
मुग्धा बोलते मी काही बोलले का.
.
बाहेर खुशी गिरीजाकडे जात बोलते. ईथे ये जरा तू नक्की एकटिंग करत होती की खरच तू ताईची मुलगी तर नाही ना.
.
सुलेखा किचनमधूनच बोलते. ये तू इथे मी सांगते तुला सविस्तर.
अग मुग्धा आइस्क्रीम नको खाऊ ग. तिला पण ठेव नाही तर जीव खाईल माझा.
.
तशी खुशी बोलते, आइस्क्रीम बोलून किचनमध्ये येत बोलते कुठे आहे.
.
सुरेखा बोलते जा तुला जे काम दिले आहे ते बघ आइस्क्रीम खायला आली जा चल.
अरे ती एकटिंगबाझ आहे तिच्या नादाला नको लागू. आलीस आहे तर, ने बाहेर जेवण चल.
.
सगळे जेवण करून झोपायला आपापल्या रूममध्ये जातात.
.
रात्री ३.०० वाजता मुग्धा उठून बाहेर येत बोलते.
साहिल हीच का ती ताईने सांगितले होती ती. खूप अशक्त वाटते आहे ही.
.
साहिल बोलतो हात पकड माझा चल.
.
मुग्धा हात पकडते तशी ती खालच्या तळ घरात येते.
.
साहिल बोलतो हिला सांभाळ जरा. फक्त स्वास घेऊ नको तू. मी येई पर्यंत जमेल ना तुला मी आलोच बोलून अदृश्य होतो.
.
मुग्धा स्वास न घेता, तिला पकडून उभी राहते. तिचा कंट्रोल सुटणार तेवढ्यात साहिल परत येत. सुद्राला पकडत मुग्धाला बोलतो घे स्वास आणि ती समोरची खोली उघड.
चावी समोर आहे बघ, अग ती नाही ती खुशीची आहे. अग ती तुझी आहे. माठ हा बरोबर उघड ते.
.
मुग्धा ती खोली उघडते तशी ती आश्चर्य होऊन बोलते हे काय ह्या बारिक बारीक सुया लागलेल्या नळ्या कुठल्या.
.
साहिल बोलतो ते खेच अगोदर आणि तिला त्या वर झोपून, सगळ्या सुया सुद्राच्या शरीराला लाऊन. मुग्धाला बोलतो प्रत्येकाला त्या रक्ताच्या पिशव्या लाव चल.
.
मुग्धा पिशव्या लावत बोलते ती खोली कोणाची आहे आणि ही.
.
साहिल बोलतो ही तुझ्या ताईची आणि ती तू तुझ्या ताईला विचार ती सांगेल. आता बस कर प्रश्न आणि काम कर.
ह्या बद्दल आईला नको बोलू समजले का, आईची चोमडी.
.
मुग्धा बोलते ए चोमडी कोणाला बोलतो रे. साहिल काही पण बोलू नको समजले का. नाही तर माझा इंगा दाखवेल.
.
साहिल बोलतो गप्प रहा ती आली आहे हळू आवाजात घाबरत बोलतो.
.
मुग्धा बोलते कोण रे आली आहे, हळू आवाजात घाबरत बोलते कोण रे.
.
तसा साहिल तिचा हात पकडून अदृश्य होऊन वर येतो. जा तू तुझ्या रूममध्ये मी जातो जा ती वर येण्या अगोदर.
.
तशी मुग्धा लगेच आपल्या रूममध्ये जात आईच्या बाजूला झोपते.
.
इथे साहिल हसत अदृश्य होतो.
.
सकाळचे ६ ०० वाजले होते. आई बाहेर येत बोलते काही तरी फरक जाणवतो आहे. असे बोलून गिरीजाच्या रूमकडे जाते.
.
सुरेखा बोलते तिथे कुठे जाते आहे तू आई. काय बोलली होती विसरली की काय चल पाठी वळ.
.
खुसी बाहेर येत बोलते काही तरी फरक जाणवतो आहे ग आई.
.
आई बोलते तेच मला जाणवतो आहे. म्हणून मी गिरिजाच्या रूममध्ये जात होती. तिला काही झालें तर नाही ना बघायला जात होती. तर ही मला बोलते पाठी वळ.
.
गिरिजा जांभया देत बाहेर येत बोलते आई काय ग झोप येत नाही का तुम्हाला.
उठलीस आहे तर चहा दे मला आणि नाष्टा पण दे मी आलीच फ्रेश होऊन.
.
गिरीजाची आई बाहेत येत बोलते हो देते ना. राणी साहेब, हेच काम आहेना माझे असे बोलून सुरेखाकडे बघून किचनमध्ये जाते.
.
आई जा तुम्ही तुमचे काम करा. तुम्हाला पण पाहिजे असेल ना ग. ती आजून उठली नाही आहे ती.
.
दोघे हो बोलतात, आलोच आम्ही फ्रेश होऊन.
.
सुरेखाची आई बोलते, ती तर माझ्या अगोदर उठते. आजून कशी झोपली आहे.
.
मुग्धा बाहेर येत बोलते झोप लागली होती मस्त. बोलून अदृश्य होते.
तसा वरून आवाज येत, सगळे खाली धावत येत बोलतात वर कोणी तरी आहे आमची सगळ्यांची चादर खेचून हवेत उडते आहे.
.
आई बोलते जा ग मुलींनो वॉशरूममध्ये फ्रेश होऊन या.
तशी काया आणि दिया जोरात ओरडते.
.
गिरिजा दोघींचा आवाज ऐकून वॉशरूममध्ये जाऊन ती पण ओरडते.
.
तसे गिरिजाचा आवाज ऐकून बाहेर येत बाबा बोलतात काय झाले गिरिजा.
.
गिरिजा बोलते या मेलीला पहिलेच सांगितले होते.
समोर सकाळी उभी नको राहू तरी सुधारणार नाही.
.
सुरेखा बोलते गप्प बस सकाळी चालू झाली का. येऊ तिन्ही खऱ्या रूपात मग हे होतील राम राम.
.
तशी सुरेखा बोलते मुग्धा, साची बाहेर ये लवकर आणि तुम्ही सगळे आमच्या पाठी या बोलते लवकर गिरिजा लवकर ये.
मुग्धा, साची बाहेर ये ती येते आहे वर.
.
आई बोलते कोण वर येत आहे. कोण आहे ते सुरेखा.
.
सुद्रा वर येत घोगऱ्या आवाजात बोलते कोण आहे तुम्ही आणि मी कुठे आहे. असे बोलून सुरेखाच्या पाठी उभी असलेली गिरीजकडे बघून तिच्याकडे हात दाखवत पुढे जात असते.
.
स्वाती पाठून येऊन बोलते शांत हो. सुद्रा तू तुझ्या आजीच्या घरी आहेस.
.
सुद्रा बोलते माझी आजी कोण आजी बोलून बेशुद्ध होते.
.
ते रूप बघून मयूर चक्कर येऊन पडला असतो.
.
खुशी बोलते ये फटका पाणी मार त्याच्या चेहर्या वर.
.
साची बोलते ही कोण आहे, आई काय ग आणि स्वाती हे काय होते.
.
आई बोलते मला पण नाही माहिती. मी पहिल्यांदा बघते आहे. मुग्धा कोण आहे ही. म्हणून मला फक्त घरात फरक दिसत होता ना खुशी तुला पण तेच जाणवले ना.
क्रमश
.