ती काळरात्र (The Unsolved Mystery)
Written By : Abhishek Shelar
भाग 1 :-
टीप : या कथेचे संपूर्ण हक्क लेखकाकडे आहेत. ही कथा व यातील पात्र ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही आणि तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा कोणत्याही अंधश्रद्धा किंवा अफवांचे समर्थन करत नाही, केवळ मनोरंजन करणे हाच तिचा हेतू आहे.
नमस्कार मित्र - मैत्रिणींनो !! मी अभिषेक शेलार. “Haunted College” या माझ्या पहिल्या कथेला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आभार !!
आज पुन्हा एकदा एक कथा मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मला खात्री आहे कि ही कथासुद्धा तुम्हाला माझ्या पहिल्या कथेइतकीच आवडेल. तर आता कथेला सुरुवात करतो.....
दिपेश..... महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा. काही वर्षांपूर्वी नोकरीनिमित्त तो मुंबईतील त्याच्या काकांच्या घरी राहण्यास आला होता. पुढे त्यांच्याच ओळखीने त्याला एका कंपनीत नोकरीसुद्धा मिळाली.
दिपेश तसा खूप मेहनती व समजूतदार मुलगा होता. त्याला आपल्या परिस्थितीची जाण होती. काही वर्ष खूप कष्ट केल्यावर पुढे स्वखर्चानेच त्याने दीप्ती नावाच्या मुलीशी लग्न केले. लग्नानंतर मात्र काकांच्याच घरात राहणे त्याच्या मनाला पटत नव्हते. स्वतःचे नाही परंतु किमान भाड्याने तरी घर मिळावे यासाठी तो खूप प्रयत्न करत होता. त्याने त्याच्या मित्रांना तसेच ऑफिसमधील colleagues ना याबद्दल सांगून ठेवले होते.
काही दिवस असेच गेले आणि एकेदिवशी वृत्तपत्र वाचताना त्याला एक जाहिरात दिसली. 1 HK रूम भाड्याने देणे आहे असे त्या जाहिरातीत नमूद करण्यात आले होते. त्यावर त्याने त्याच्या काकांशी तसेच दीप्तीशी चर्चा केली. त्या दोघांचीही मते विचारात घेऊन त्याने जाहिरातीतील त्या क्रमांकावर संपर्क केला व घरमालकाशी बोलणे केले.
पुढे काही दिवसांतच त्या तिघांनी प्रत्यक्ष त्याठिकाणी जाऊन रूमची पाहणी केली. त्या 4 मजल्याच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर ती खोली होती. प्रत्येक मजल्यावर 4 खोल्या होत्या व तळमजल्यावर दुकाने होती. इमारतीच्या आसपासही तशी बरीच मोकळी जागादेखील होती. एकूणच पाहता नाव ठेवण्यासारखे तसे काही दिसत नव्हते. दिपेश व दीप्ती दोघांनाही ती रूम पसंतीस पडली, तसेच रूमचे भाडेही त्यांच्या बजेटमध्ये बसत असल्याने त्यांनी Deal Final केली.
पुढच्याच महिन्यापासून ते तिथे राहायला आले. कशीही का असेनात, पण त्यांच्या ईवल्याशा संसाराची आता नव्याने सुरुवात होणार होती, त्यामुळे दोघेही खूपच खूश होते. दिवसा दोघेही ऑफिसला जात असल्याने ऑफिसमधून घरी आल्यानंतरच त्यांना एकमेकांसाठी वेळ देता येत असे.
त्यांच्या सोसायटीतील बहुतांश कुटुंब मराठीच असल्याने प्रत्येक सण-उत्सव तेथे अगदी जल्लोषात साजरे होत असत. सोसायटीतर्फे अनेक लहान-मोठे सामाजिक उपक्रमही राबवण्यात येत असत, त्यामुळे दिपेश व दीप्तीस त्या सर्वांमध्ये रूळण्यास जास्त काळ लागला नाही.
काही दिवसांनी सोसायटीमधील सचिन नावाच्या व्यक्तीशी दिपेशची छान मैत्री जमली. सारख्याच वयाचे असल्याने ते दोघे एकमेकांना बऱ्याच गोष्टी share करत. सचिनची पत्नी सरितासुद्धा अगदी मनमिळावू होती. सोसायटीत पार पडणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात ती अगदी हिरीरीने सहभाग घेत असे, तसेच सामाजिक उपक्रमातही ती नेहमीच पुढे असायची. तिथे राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला तिने आपलेसे केले होते, त्यामुळे सर्वांचीच ती लाडकी होती.
सचिन व दिपेश यांच्यातील घनिष्ठ मैत्रीमुळे त्यांचे परिवारही एकत्र आले. एकमेकांच्या घरी येणे – जाणे वाढू लागले, एकत्रितपणे family trips होऊ लागल्या. एकूणच सर्वच जण अगदी एकाच कुटुंबाप्रमाणे राहत होते.... परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही....
एकेदिवशी दिपेश ऑफिसमध्ये असताना त्याच्या सोसायटीमधील एका व्यक्तीचा त्याला फोन आला व त्यांचे बोलणे ऐकून त्याला धक्काच बसला.... त्याला त्याच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता, कारण बातमीच तशी होती.... सचिनच्या पत्नीने म्हणजेच सरिताने राहत्या घरात स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही..... दिपेशच्या मनात असंख्य प्रश्नांचे वादळ घोंगावू लागले, कारण सर्वच अगदी अनपेक्षितरित्या घडले होते.....
त्याच्या बॉसला सांगून तडकच तो ऑफिसमधून निघाला. इमारतीत पोहोचताच त्याला लोकांच्या रडण्याचे आवाज येऊ लागले. घरी येऊन त्याने bag ठेवली व थेट तो सचिनच्या घरी गेला. दीप्तीलाही कॉल करून त्याने बोलवून घेतले होते.
दारात जमा झालेल्या माणसांच्या गर्दीतून वाट काढत तो पुढे आला... काळीज पिळवटून टाकेल असे समोरील दृश्य होते..... पांढऱ्या कपड्याने संपूर्ण झाकलेला सरिताचा मृतदेह.... त्याभोवती बसून रडत असलेली असंख्य लोक...... भिंतीला डोके टेकून बसलेला सचिन व त्याला सावरत असलेले त्याचे आई-वडील....
दिपेशला समोर पाहताच तो धावतच त्याच्याजवळ आला व त्याला बिलगून रडू लागला. आपल्या जिवलग मित्राची झालेली ही अवस्था पाहून त्यालाही अश्रू अनावर झाले.
इतक्या हसत्या-खेळत्या व्यक्तीचे असे अचानक निघून जाणे त्या सर्वांनाच अगदी चटका लावून जाणारे होते. तिने आत्महत्येपूर्वीही असा कोणताच पुरावा ठेवला नव्हता की ज्याने तिच्या आत्महत्येचे कारण समजेल. सर्वकाही अगदी अनाकलनीयच होते.
या घटनेनंतर काही दिवस असेच निघून गेले आणि एकेदिवशी......
दीप्ती तिच्या वडिलांची तब्येत बरी नसल्याने माहेरी गेली होती, त्यामुळे दिपेश घरी एकटाच होता.......
क्रमश : (उर्वरित कथा पुढील भागात)